Submitted by मुग्धानंद on 6 May, 2011 - 07:05
उन्हाळा आला की सुट्टीबरोबर चाहुल लागते ती फळांचा राजा "आंब्याची"! तुम्ही आंबा कसा खाता? नुसता चोखुन, रस काढुन, चिरुन, इ.इ. प्रांताप्रांतानुसार आंबा, आमरस करण्याची, खाण्याची पद्धत वेगळी......चला तर मग आपापली पद्धत सांगा, ! प्र.चि. देखिल टाका.
अशाच आशयाचा दुसरा धागा असल्यास सांगा. हा डिलीट करुन टाकेन.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केशर, रायवळ, राजापुरी,
केशर, रायवळ, राजापुरी, मलगोबा, तोतापुरी, लंगडा, बदाम, दशहरी सर्वच मस्त असतात..
आंबा खाणे म्हणजे काय लाडु
आंबा खाणे म्हणजे काय लाडु खाण्या सरखे सोप्पे नव्हे, की उचलला नी टाकला तोंडात.>>>>
आंबा बाजारात कधी येतो याची वाट बघावी लागते. मग तो घरात कधी येणार याची. मग एकदा घरात पेटी आली कि त्यातल्या त्यात चांगला पिकलेला, मोठ्ठा, रसरशीत आंबा शोधावा लागतो. तो कोणाच्या नजरेत यायच्या आधी त्यावर ताबा मिळवावा लागतो. मग आजूबाजूला कोणी नाहीना ते बघून....'त्यानंतर मग एखादा खुपदिवस......पुन्हा सोनेरी मोहीम सुरू करावी.'(अगदी अगदी)
आंब्यात आंबा सोडुन काहि घालणं
आंब्यात आंबा सोडुन काहि घालणं पाप आहे >>> अगदीच! आंबा बाधत बिधत नाही.फक्त आंबा पिळून रस काढायचा .तो मिक्सरमधून गिरगिट्वायचा नाही. असा रस फ्रीजमधे ठेऊन खायचा( हो गराचे गठ्ठे चमच्याने खायला लागतात)
आता वेळ नाही नाहीतर २ हापूस आंबे सोलून फोडी करून फ्रीजमधे ठेऊन खायचे ही माझी पहिली आवड.मानुषीची पद्धत अंमलात आणली पाहिजे.
हापूस आंबा,पायरी आंबा(पण तोही सावंतवाडी/रत्नागिरीचाच),मानकुराद आंबा (खूप टेस्टी.खाऊन कित्येक वर्षें झाली.)मग नंतर केशर, नीलम( हल्ली मिळतो का?) आवडतो.पण कापूनच.आंब्याचा बाठा चोखता चोखता (त्याबरोबर आपला हातही चाटून) ब्रम्हानंदी टाळी लागते.
(No subject)
Pages