Submitted by शर्मिला फडके on 2 May, 2014 - 12:41
माझी मुलगी इटलीतील मोडेना येथे महिन्याभरासाठी जात आहे. तिला तिथे लोकल कॉलिंगकरता, भारतात फोन करण्याकरता, भारतातून आम्ही फोन करण्याकरता चांगल्या व स्वस्त कॉलिंग कार्डच्या कोणकोणत्या सोयी आहेत कुणाला सांगता येऊ शकेल का?
आम्ही मॅट्रीक्सच्या प्लॅनची चौकशी केली आहे. त्यात एक इनकमिंग फ्री पडतील मात्र लोकल कॉल करता आणि बाहेर फोन करताना हेवी चार्जेस आहेत.
इंतरनॅशनल रोमिंग बरं पडेल का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारतातून इंटरनॅशनल रोमिंगपण
भारतातून इंटरनॅशनल रोमिंगपण खूप महाग पडेल. लायकामोबाइलचं प्रीपेड सिमकार्ड सोइचं ठरेल. http://www.lycamobile.it/en/
मी बेल्जियममध्ये लायकाच वापरतोय. प्रत्येक रिचार्ज बरोबर भारतात लँडलाइनवर फोन साठी काही फ्री मिनिटं मिळतात. लायका-लायका काही कॉल्स फ्री आहेत शिवाय इंटरनेटपण आहे. मी दिलेल्या वेबसाइटवर तुम्हाला इटली लायकासाठीचे डिटेल्स मिळतील.
ग्रेट मनीष. छान माहिती आहे.
ग्रेट मनीष. छान माहिती आहे. हे कार्ड तिकडे गेल्यावरच घायवं लागेल ना? की इथून अॅक्टीव्हेट करता येईल? मी साईट वाचून पहातेच आहे.
hangout इ. असताना गरज आहे का
hangout इ. असताना गरज आहे का कॉलिंग कार्डची? इंटरनॅशनल रोमिंगपण अॅक्टीवेट असलेले बरे पण इमर्जन्सीशिवाय वापरायची गरज पडायला नको. एकच महिन्याचा प्रश्न आहे म्हणून.
हे फक्त कॉलिंग कार्ड नाहिये
हे फक्त कॉलिंग कार्ड नाहिये तर इटलीमधले सीम-कार्ड आहे. त्यामुळे इटलीत जाउनच घ्यावे लागेल. इथे बेल्जियममधे याचे रेल्वेस्टेशन्स आणि विमानतळावर व्हेंडींग मशीन्सपण आहेत. शिवाय नाइट शॉप्स, सुपर मार्केटस मधे पण हे कार्ड मिळते. इटलीमधे टबॅक्समधे (टोबॅको शॉप्स), न्यूजपेपर स्टॉल्सवर मिळत असावे.
hangout इ. असताना गरज आहे का कॉलिंग कार्डची? >> एका महिन्यासाठी नक्कीच गरज आहे. hangout साठी वगैरे इंटरनेटची सोय लागेल. इंटरनेट नसताना (कुठे फिरायला गेल्यावर वगैरे) जर कॉल करायचा असेल तर या सीमकार्डचा नक्कीच उपयोग होइल.
कॉलिंग कार्ड पेक्षा
कॉलिंग कार्ड पेक्षा वरच्यासारखे लोकल सिमकार्ड घेतलेलेच बरे पडेल बहुधा. इटलीचा नाही, पण फ्रान्सचा अनुभव आहे. लोकल कॉल करायची सोय उपलब्ध नसेल, तर कॉलिंग कार्ड म्हणजे अगदी बुडितखाती पैसे आहेत असे दिसून येते. इंटरनॅशनल रोमिंगबद्दलही तेच. मॅट्रिक्स घेऊन फक्त 'मला फोन करा' इतक्यापुरता आउटगोईंग करून मग घरच्यांनी फोन करायचा (मॅट्रिक्सवर इनकमिंग फुकट असल्याने) हाही एक चांगला पर्याय असू शकतो. भारतामधून इंटरनॅशनल कॉल्ससाठी जास्त चांगली डील्स मिळू शकतील मोस्टली.
शर्मिला, इटलीबद्दल माहीत नाही
शर्मिला, इटलीबद्दल माहीत नाही पण आम्ही युकेत लायकामोबाईलच वापरला होता दीड वर्षं. रेट भारतात कॉल्स फक्त एक पेनी अ मिनिट = १०० मिनिटांना एक पाऊंड इतका कमी होता, लायका टू लायका फ्री कॉल्स, इनकमिंग फ्री आणि युकेतल्या नंबरवर मात्र दहा पेन्स अ मिनिट पडत. युकेत कॉल्स करायला आम्ही शक्यतो लँडलाईन वापरायचो. आपसांत फ्री कॉल्स आणि भारतात तासनतास बोलणं ह्यामुळे लायका खूपच स्वस्त पडलं आम्हाला.
तिथल्या टेस्को सारख्या कुठल्याही नेहेमीच्या ग्रोसरी शॉपमध्ये टॉप अप कार्ड मिळायचं.
लायकाचा हा प्लॅन आम्ही युके एंबसीच्या आतूनच घेतला होता. भारतातून सिम घालून गेलो, तिथे एअरपोर्टवर उतरल्या-उतरल्या फोन अॅक्टिव्हेट झाला. तर तुम्हीही एंबसीत चौकशी करा. एंबसीत चांगले डील मिळून शकेल. एअरपोर्टवरही त्यांचे स्टॉल्स असतात पण इंडियातूनच अॅक्टिव्हेट करुन गेल्यास निश्चिंती राहते.
फक्त फोन भारतीय असल्याने वेगळा अॅडॅप्टर आठवणीने घेऊन जा. तो तसाही ठेवावाच लागतो देशाबाहेर कुठेही गेले तरी
स्काईपही वापरता येईल
स्काईपही वापरता येईल की...फुकटच आहे.
स्काइप वा हँगआऊटसाठी इंटरनेट
स्काइप वा हँगआऊटसाठी इंटरनेट नाही का लागणार फोनवर? मोबाइल डेटा कनेक्शन वगैरे?
सगळीकडे वायफाय थोडीच असणारे?
नेटसाठीचा प्लॅन पण लागेल ना काहीतरी.
अरे हो! ते माझ्या लक्षातच
अरे हो! ते माझ्या लक्षातच नाही आलं!
खरंय तुझं नीरजा!
धन्यवाद सर्वांना. लायका
धन्यवाद सर्वांना. लायका सीमकार्ड आणि मॅट्रिक्स कॉलिंग कार्ड भारतातून आम्हाला कॉल करण्यासाठी हे दोन पर्याय फायनल केले आहेत.
अगो, इटालियन एम्बसीमधे चौकशी करायला हवी. सांगते मुलीला.
नीरजा व्होडाफोनने इंटरनॅशनल डेटा प्लॅन सजेस्ट केला आहे. पण त्याकरताही लोकल नेट डेटा कार्डचाच पर्याय योग्य वाटला. लायका फोन सीमकार्डसारखेच तेही तिकडे गेल्यावर घ्यावे असा विचार आहे.
नेट आणि वायफाय हे हळूहळू
नेट आणि वायफाय हे हळूहळू बर्याच देशात सार्वजनिक ठिकाणी फुकट होते आहे. बर्याचदा काही मिनिटे फुकट आणि नंतर सशुल्क असे असू शकते. नेटची सोय झाली तर स्काईपप्रमाणे फेसबुक मेसेंजर अॅपवर फुकट व्हॉईस कॉल करता येऊ लागले आहेत.
http://www.androidauthority.com/facebook-messenger-free-calls-now-availa....
इटालीमधे सार्वजनिक ठिकाणी
इटालीमधे सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय फ्री नसते बरेचदा. मुलीच्या तिकडच्या मोडेना युनिव्हर्सिटीमधे आहे फ्री वायफाय. पण होस्ट फॅमिलीकडे आहे का याची खात्री नाही. मेल करुन विचारलं आहे. पण इटालियन लोक मेलला उत्तर देण्याबाबतीत प्रचंड आळशी आहेत. ते उत्तर येईस्तोवर मुलगी तिकडे पोचलेलीही असेल बहुतेक
नेटकरता काय पर्याय आहेत अजून? लोकल नेट डेटा कार्ड हे लायका सीमसारखेच सहज उपलब्ध असते का? व्होडाफोनचा इंटरनॅशनल डेटा प्लॅन महागडा पर्याय आहे.
अभिनंदन. काय कोर्स करते आहे?
अभिनंदन. काय कोर्स करते आहे? एक महिना इटलीत राहणे ही मुंबईतील नवीन ट्रेंड
होउ पाहते आहे. ओळखीतील एक मुलगी आणि एक फॅमिली असे राहायला गेले आहेत.
मुलगी इंटर्न शिप म्ह्णून गेली होती मिलान ला आणि फॅमिली टूरिस्ट म्हणून गेली आहे.
मुलगी इटालियन भाषा शिकत आहे.
मुलगी इटालियन भाषा शिकत आहे. तिला मोडेना युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळाल्याने ती फायनल एक्झाम तिकडे जाऊन देणार आहे.
नेटकरता काय पर्याय आहेत अजून?
नेटकरता काय पर्याय आहेत अजून? >> लायकाच्या सीमकार्डवर डेटा प्लॅनपण आहे. वेगळे पैसे लागतील. कदाचित स्पीड थोडा कमी मिळेल.
शर्मिला, माझा धाकटा दिर
शर्मिला, माझा धाकटा दिर नुकताच फ्लोरेंसहून परत आलाय. त्याच्याकडे चौकशी केली. त्याने TIM चे सीमकार्ड सजेस्ट केलंय. २० युरोचं कार्ड असतं. त्यात १० युरो सीमकार्डाचे आणि १० युरोचा टॉक टाइम. भारतात कॉल करायचे चार्गेस सुरवातीचे (मिनिमम इनिशियल कॉस्ट) १८ सेंट आणि २ सेंट प्रतिमिनीट आहे. त्यामूळे एकाच वेळी जास्त मोठा कॉल केलेला परवडतो, छोटे छोटे जास्त कॉल करण्यापेक्षा.
याशिवाय स्माइलचे कॉलिंग कार्ड भारतात फोन करायला उपयोगी आहे. ५ युरोचे कार्ड आहे बहूतेक ते. त्यावर १५०० मिनीट वेळ आहे. (अर्थात तो म्हणतो त्यावर १५०० मिनीट जरी लिहिलं असलं तरी इतका जास्त वेळ नसतो. पण तरी परवडतं.)
नेट साठी सीममध्येच २जी असेल, ३जी साठी त्यांना वेगळं सांगावं लागेल. स्वस्त आहे हे पण असं तो म्हणत होता.