T-20 विश्वचषक २०१४

Submitted by केदार जाधव on 17 March, 2014 - 02:38

कालपासून टी२० विश्वचषकाला बांग्लादेश मधे सुरूवात झालीये . त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

मुख्य स्पर्धेतील गट खालीलप्रमाणे . प्रत्येक ग्रुपमधून २ संघ पुढे येतील,
१ . इंग्लंड , न्यूझिलंड , अफ्रिका , लंका , (झिम्बाबे/आयर्लंड्/अमिरात्/हॉलंड)
२. भारत , पाक , ऑसीज , विंडीज , (बांग्ला/अफगाण्/नेपाळ/हाँगकाँग)

प्रथमदर्शनी तरी भारताच काही खर दिसत नाहीये Happy
एक तर हा "ग्रुप ऑफ डेथ वाटतोय" आणी ऑसीज अन विंडीज अगदी बॅलेंसड दिसतायत.

आपला घोडा यावेळी ऑसीज . वॉर्नर , फिंच , वॉटसन , Can Top 3 be more aggressive than this ? Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीच युवराज ... २० बॉल्स मधे ११ फक्त खर तर किमान ४० रन्स हवे ..

येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स

युवी आउट

बर झाले आउट झाला

१७ व्या, १८ व्या आणि १९ व्या ओवरला प्रत्येकी चार-चार धावा... आणि विसाव्या ओवरचा पहिला चेंडू डॉट बॉल !

Now I understand how Pak fans must have felt when Misbah was doing Tuk Tuk in 2011 world cup .
I mean it's one thing missing balls , its' other thing not even trying to hit a shot for 15 balls in T20 match .
Almost equal to 1 may be 2 own goals in Football
Sad for Yuvi to end like this .

धोनी रैनाच्या आधि का आला ? रैना मस्त टच मधे आहे, धोनी फारसा खेळलेला नाहिये. युवराजबद्दल काहि न बोलणेच शहाणपणाचे. काय मूर्खपणा होता हा ?

हँग ऑन गाईज. चॅम्पियन्स ट्रॉफीला आपण १२९ डिफेन्ड केले आहेत ना? योगायोगाने स्कोअर तेवढाच.

वाट पाहा. आपण जिंकू. आज भूवी कसा स्विंग करतो अन ऑफस्पिन महत्वाचे ठरणार. तो वर जिद्द हारू नका.

विराटला स्ट्राईकच नाही मिळाली ! अन्यथा १६० मध्ये असतो आपण.

रैना फलंदाजीला आलाच नाही, कोहली शेवटपर्यंत खेळला, धोनी नाबाद आणि तरीही आपला स्कोअर फक्त १३० ... हार्ड टू बिलीव्ह ..
जसे आपण वेस्टैईंडिज आणि पाकिस्तानला हरवले तसे इथे श्रीलंका आपल्याला हरवतील असे सध्यातरी वाटतेय.. आणि तसे झाले तर आज वॉस्सअपवर युवराजच्या नावाचे मेसेज फिरणार असे दिसते.. ज्याचा जबाबदार खरे तर धोनीपण आहे.

आश्विन आणि मिश्रा हे आज आपले ट्रंप कार्ड आहेतच पण वेगवान गोलंदाज सुद्धा की फॅक्टर आहेत.. कारण त्यांनी सुरुवात चांगली करून द्यायला हवी..

130 रन्स फार कमी
20 बाँल मधे 11 रन्स मुर्ख देखील काढणार नाही

कोहली जर त्याच पिच वर खेळू शकतो तर कीमान 20 मधे 20 तर काढ

ना टॉसला, ना खेळपट्टी वा हवामान, ना श्रीलंकेच्या गोलंदाजीला ... ह्या पराजयाचं श्रेय सर्वस्वी आपलंच आहे व तसं तें आपल्यालाच मिळालं पाहिजे !!! Sad

वाइट वाटले.
खरे तर २० षटकात १३० पाहिल्यावरच निराश झालो.
नंतर नुसतेच पहाणे. काय होणार ते वाटलेच होते.
Sad

२० अजून रन्स झाले असते तर

बिनडोक युवी ला पाठवण्या ऐवजी फार्मात असलेल्या रैना ला का पाठवले नाही?
युवी बरोबर धोनी देखील शिव्यांचा हक्कदार आहे

आजची मॅच बघताना भारत - लंका सामन्यांचे ९५ च्या आसपासचे दिवस आठवलेपालंका सगळे काहि परफेक्ट प्लॅन प्रमाणे करत जायची. आपण - एखादा जबरदस्त खेळायचा (बुहुतेक वेळा सचिन) बाकीचे फारसे काहि करायचे नाहित. Sad

२००७ टी२० वर्ल्डकप - धोनी आयडेंटीटी
२०११ वन-डे वर्ल्डकप - धोनी सुप्रीमसी
२०१३ चँपियन्स ट्रॉफी - धोनी अल्टिमेटम
२०१४ टी२० वर्ल्डकप - धोनी बिट्रेयल

लॉर्ड ऑफ द कप्स

२००७ टी२० वर्ल्डकप - फेलोशिप ऑफ द कप (धोनी ब्रिगेड)
२०११ वन-डे वर्ल्डकप - द टू टॉवर्स (सचिन & युवराज)
२०१३ चँपियन्स ट्रॉफी - द रिटर्न ऑफ द किंग (फ्रॉम द लॉस्ट बॅटल ऑफ मिडल पर्थ)
२०१४ टी२० वर्ल्डकप - अ‍ॅन अनएक्स्पेक्टेड जर्नी ( देअर अँड बॅक अगेन)

शेवटच्या कांहीं षटकांत श्रीलंकेने ऑफ स्टंपच्या बाहेर पण 'वाईड बॉल'च्या सीमेवर अचूक गोलंदाजी केली व त्याला आपल्याकडे - कोहलीकडेसुद्धां - उत्तर नव्हतं; कारण टी-२०साठी अप्रचलीत फटके मारण्यासाठी आपण खास सरावच केला नसावा. डि व्हिलीयर्स, डुमिनी सोडाच पण आयर्लंडसारख्या संघांचे फलंदाजही असे फटके मारण्यात वाकबगार वाटत होते. मला वाटतं युवराज इतकाच हा घटकही शेवटच्या ५ षटकांत धांवसंख्या अडकून पडण्यात महत्वाचा ठरला;

समालोचनास नेमका फायनलला मांजरेकर आला तेव्हाच रिझल्ट कळला होता. त्यात धोनीनी गचाळ कॅप्टन्सी केली. श्रीलंका मात्र उत्तम खेळली. व्यवस्थित प्लॅनींग, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण व अप्रतिम गोलंदाजी यावर जिंकली लंका. युवराज एकाही मॅचमधे धड खेळला नाही. सिध्दुसह अनेक लोक त्याची तोंडभर स्तुती मात्र करत होते अगदी मॅच सुरु होई पर्यंत.

<< सिध्दुसह अनेक लोक त्याची तोंडभर स्तुती मात्र करत >> कोहली स्वतःची रेप्यूटेशन एखाद्या पदकासारखी गळ्यात अडकवून सहज मिरवत होता तर युवी आपली रेप्यूटेशन मानेवर ठेवलेल्या ओझ्यासारखी घेवून पार दबून गेलेला होता ! मी आधीं म्हटल्याप्रमाणे युवी ह्या स्पर्धेसाठी मानसिक दृष्टया व फॉर्मच्या अभावामुळे तयार नव्हता असंच वाटत होतं व त्याला आत्तांच मोठ्या स्पर्धेत न घेणं त्याच्याच हिताचं झालं असतं.
सिद्धूबद्दलच बोलायचं [ समालोचक म्हणून, क्रिकेटर म्हणून नव्हे ] तर त्याला त्या क्षणीं जो वाकप्रचार/ म्हण सुचेल ती तो समोरच्या खेलाडूसाठी बिनदिक्कत वापरतो, सामना टी-२० आहे कीं विटी-दांडू आहे याचंही त्याला देणं घेणंच नसावं !! Wink

अगदी अगदी भाऊ. Lol

मांजरेकर ला मात्र खरच विटीदांडु सामन्याकडे पाठवा. आपल्याला तो धार्जीण नाहीये.

कोहलीकडेसुद्धां - उत्तर नव्हतं >>>> भाउ .......तो एकटाच खेळत होता .. उभे आडवे शॉट मारुन आउट झाला असता तर जो स्कोर होणार होता तो सुध्दा झाला नसता म्हणुन त्याने तसे शॉट मारले नाही.. दडपण तर येतेच ना..
१ रन काढुन युवी ला स्ट्राईक दिली तर तो अक्खी ओव्हर रन्स न करता खे़ळुन काढतो त्यापेक्षा उभा राहुन चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न करावे हाच त्याचा पॉईंट असेल

२०१४ टी२० वर्ल्डकप - धोनी बिट्रेयल >>

मला नाही वाटत तसं. धोनीला लगेच शिव्या द्यायची गरज्ञ नाही. मागच्या ५ ही मॅच जिंकताना हे लोकांना वाटलं होतं का?

(टेस्ट मध्ये तो कॅप्टन नको असे मीच म्हणतो, पण टि २०, वनडे मध्ये तो बेस्ट कॅप्टन आहे.)

Pages