T-20 विश्वचषक २०१४

Submitted by केदार जाधव on 17 March, 2014 - 02:38

कालपासून टी२० विश्वचषकाला बांग्लादेश मधे सुरूवात झालीये . त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

मुख्य स्पर्धेतील गट खालीलप्रमाणे . प्रत्येक ग्रुपमधून २ संघ पुढे येतील,
१ . इंग्लंड , न्यूझिलंड , अफ्रिका , लंका , (झिम्बाबे/आयर्लंड्/अमिरात्/हॉलंड)
२. भारत , पाक , ऑसीज , विंडीज , (बांग्ला/अफगाण्/नेपाळ/हाँगकाँग)

प्रथमदर्शनी तरी भारताच काही खर दिसत नाहीये Happy
एक तर हा "ग्रुप ऑफ डेथ वाटतोय" आणी ऑसीज अन विंडीज अगदी बॅलेंसड दिसतायत.

आपला घोडा यावेळी ऑसीज . वॉर्नर , फिंच , वॉटसन , Can Top 3 be more aggressive than this ? Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी चेस !! मजा आली !
स्टेनला असं धुताना पाहून फार फार भारी वाटलं. Happy
रोहितने नेहमीप्रमाणेच क्लासी शॉट्स मारले. रैनाने महत्त्वाची खेळी केली.. आणि कोहली बद्दल काय बोलणार.. सिंपली सुपर्ब !!

कमॉन इंडिया.. आता मलिंगा आणि हेरतलाही धुवा असच!

Congrats , India !
Our batsmen went about the job confidently, clinically. It was an exhibition of superb execution of
of the plan of chasing a target !
Our spin attack is effective but our batting is our trump card !
Dhoni explained after the match that he did not introduce spin early as he wanted to reserve it
specifically for AB D ! "Let him use his force but not our pace " !! Good thinking !

one of the best run chases by India!

i feel sorry for SA... I wanted SA to win the world cup, but not by defeating India... Proud

<< ...but not by defeating India >> I wanted to see India defeat SA but ... in South Africa !!

जिंकले
धांगडतकाक धांगडतकाक
नाचो

रैना महत्वपूर्ण खेळी खेळला युवी आऊट झाला तेव्हा ५८ हवे होते ३८ बाँल मधे पण पठ्ठ्याने ७ बाँल्स मधेच मँच बदली 17-19 रन्स मारून
पार्नेल ची ओव्हर महत्वाची ठरली

>>>>केदार जाधव | 17 March, 2014 - 12:08

कालपासून टी२० विश्वचषकाला बांग्लादेश मधे सुरूवात झालीये . त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

मुख्य स्पर्धेतील गट खालीलप्रमाणे . प्रत्येक ग्रुपमधून २ संघ पुढे येतील,
१ . इंग्लंड , न्यूझिलंड , अफ्रिका , लंका , (झिम्बाबे/आयर्लंड्/अमिरात्/हॉलंड)
२. भारत , पाक , ऑसीज , विंडीज , (बांग्ला/अफगाण्/नेपाळ/हाँगकाँग)

प्रथमदर्शनी तरी भारताच काही खर दिसत नाहीये स्मित
एक तर हा "ग्रुप ऑफ डेथ वाटतोय" आणी ऑसीज अन विंडीज अगदी बॅलेंसड दिसतायत.

आपला घोडा यावेळी ऑसीज . वॉर्नर , फिंच , वॉटसन , Can Top 3 be more aggressive than this ? स्मित>>>

Glorious unpredictability of Cricket!!!!

रैना महत्वपूर्ण खेळी खेळला युवी आऊट झाला तेव्हा ५८ हवे होते ३८ बाँल मधे पण पठ्ठ्याने ७ बाँल्स मधेच मँच बदली 17-19 रन्स मारून
>>>>>>>>>>>>>

थोडा आकडा इकडेतिकडे.. युवराज ऑट झाला तेव्हा चार ओवर चाळीसचे टारगेट ठेऊन गेलेला.. रैना येऊन तुटून पडला ते पुढच्या दोन ओवरमध्ये त्यापैकी तीस आले आणि शेवटच्या दोन ओवरसाठी दहा शिल्लक राहिले..

असो, पण रोहित, रहाणे, युवराज, आणि रैना.. सर्वांनीच आपापली भुमिका चोख बजावली, एकही जण आपली परिस्थिती बिकट करून नाही गेला.

उगाच झक्किगिरी कशाला ?
अहो ते सगळे जुने झाले.
Now I lern a little little ingraji.
मेरेकु वैसा बोले तो थोडा हिंदी बी समजते.
तर आता कुणिहि कुठल्याहि भाषेत (काहीहि) लिहा. Happy
भाउ एक विनोदी चित्र येऊ द्या.
भारतीयांचे अभिनंदन.
आता पुढे काय? मागे श्रीलंकेवर इंग्लंडने जसा विजय मिळवला तसा आता भारतीयांनीहि मिळवावा. पण अगदी तस्सा म्हणजे वाईट क्षेत्ररक्षण करून नव्हे, त्यांच्यासारखी फलंदाजी करून.
रहाणे, शर्मा यांनी आता कोहली धोनी यांना जरा विश्रांति द्यावी. रैना युवराज आहेतच मदतीला.
मिश्राला आज बदडले. त्याने रवीवारी त्याचे उट्टे श्रीलंकेवर काढावे. कुणि म्हणाले वडाचे तेल वांग्यावर तर त्यांना म्हणावे अजापुत्रं बलिं दद्यात!

आता पुढे काय? मागे श्रीलंकेवर इंग्लंडने जसा विजय मिळवला तसा आता भारतीयांनीहि मिळवावा. >> फायनल मधे लंका आहे तेंव्हा इंग्लंड वर विजय मिळवणे अशक्य आहे Lol

जबरी चेस. ऑस्सम ! एकही क्षण इकडे तिकडे घातला नाही. जस्ट टू गुड अ डे.

पुढच्या मॅच मध्ये २२ पैकी ६ स्पेशालिस्ट स्पिनर्स असणार असे दिसते.

<< पुढच्या मॅच मध्ये २२ पैकी ६ स्पेशालिस्ट स्पिनर्स असणार असे दिसते.>> द. आफ्रिकेला लागू होणारं औषध श्रीलंकेलाही लागू होईलच असं नाहीं !
<< म्हणावे अजापुत्रं बलिं दद्यात! >> झक्कीजी, इंग्रजी, हिंदी आनि....संस्कृत पन !!! Wink
<< उगाच झक्किगिरी कशाला ? >> कौतुकानेही म्हटलं असेल हें, कुणीं सांगावं ! -

zakkiji.JPG

भाऊ Happy

जबरी गेम झाली. हायलाईट्स पाहिले. रोहितचे व रहाणे चे फटके मस्त. कोहली भन्नाट खेळला. काय गॅप्स काढल्या आहेत! धोनी चे त्याला विजयी फटका मारू देण्याचे जेश्चर ही मस्त.

<< रोहितचे व रहाणे चे फटके मस्त >> They were also keen on taking ones & twos on every ball;
that was remarkable & that prepared the platform for easy final assault !
[ Could someone please guide me in restoring Marathi font on my PC ? I am not comfortable
here discussing in English - feeling as if batting without Abdo pad !]

They were also keen on taking ones & twos on every ball;
that was remarkable & that prepared the platform for easy final assault ! >> भाऊ don't want to brag about it, but ... Lol कालच्या कोहलीच्या खेळीचे एक वैशिष्ट म्हणजे फक्त ३ डॉट बॉल. कदाचित रोटेटिंग स्ट्राईक ची कला त्याने नीट आत्मसात केली आहे असे म्हणता येईल.

Could someone please guide me in restoring Marathi font on my PC ? >> browser मधे पण नाही जमत आहे का ? windows 7 / 8 ? काय आहे ?व्प्रतिसादावरची मॅकची लिंक वापरून बघा. बहुतेक वेळा ती चालतेच. अगदी क्रोमवरही.

द. आफ्रिकेला लागू होणारं औषध श्रीलंकेलाही लागू होईलच असं नाहीं ! >>>. हो पण विकेटच तशी आहे म्हणून लिहिले. तसेही आपण तीन घेऊन खेळणार. फक्त श्रीलंका कोणा कोणाला घेते ते बघायचे. Happy

द. आफ्रिकेला लागू होणारं औषध श्रीलंकेलाही लागू होईलच असं नाहीं ! >>>. हो पण विकेटच तशी आहे म्हणून लिहिले. तसेही आपण तीन घेऊन खेळणार. फक्त श्रीलंका कोणा कोणाला घेते ते बघायचे >> हेराथ, सेनानायके, मलिंगा, कुलासेकरा नि मॅथ्युज असतीलच.

राईट. पण मॅथ्युज स्पिन कुठे रे.
हेराथ, सेनानायके पक्के असणारच असे वाटते. सोबत मग दिलशान वगैरे असतील गरज पडलीच तर.

श्रीलंकेका फायनल मध्ये आहे पण आपल्याएवढा पॉलिश्ड संघ नाहीये या टुर्नामेंट मध्ये त्यांचा. ते चाचपडले आहेत. आफ्रिका जास्त पॉलिश्ड वाटत होता आणी आहे. आणि आपल्याला १६० + / - दोनदाच करायला मिळूनही आता १८०+ ही सोपेच वाटत आहेत. थँक्स टू द गो गेटर.

----
आपली पिढी भाग्यवान आहे नाही? गावस्करलाही खेळाताना शेवटी शेवटी बघितले, बॅटन पास्ड ऑन टू तेंडुलकर, आपण त्याच्या सोबत वाढलो, इंडियन क्रिकेट महासत्ता झाले आणि कळस चढवायला विराट. बॅटन पास्ड ऑन टू हिम.

<< भाऊ नि झक्कींना विचार. त्यानी आधीचे पण पाहिलेत.>> One certainly can't generalize,
but marked difference in approach & attitude is clearly perceptible in post- Independence
cricket & cricketers; Only Freedom naturally breeds certain qualities !!
<< हो जरूर पण त्यांनी भारतीय क्रिकेट रि डिफाईन नाही केले.>> Despite being at losing end for
decades, they kept the passion for cricket burning in this country; That was no mean achievement !
Asaamiji, thanks for your advice on Marathi font. And I have already conceded the point about ' strike rotation' !!

Only Freedom naturally breeds certain qualities !! >> अहो एव्हढे आधीचे नाहि म्हणत आहे मी पण स्पिनिंग चौकड बघायला मजा आली असते असे वाटते. भारतीय बॉलिंगचा तो सुवर्ण काळ असावा. बॅटींगमधे स्पार्क्स असावेत.

<<स्पिनिंग चौकड बघायला मजा आली असते असे वाटते. >> yes, of course ! Why, otherwise , would I irritate everyone here by always blowing the trumpet of the art of spin bowling !!
But the present era has also produced legends in that area like Abdul Qadir, Murali, Kumble, Warne etc. Personally , however, I consider Prasanna as the all-time greatest exponent of off-spin !
अरेच्चा, अचानक मराठी पुन्हा प्रसन्न झाली माझ्या संगणकावर ! माझ्या इंग्रजीचा धसका घेतला बहुतेक !!
असो, आज जुन्या आठवणी उगाळण्याचा दिवस नसून अंतिम सामन्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा आहे. धोनी आणि कंपनीला शुभेच्छा.

धन्यवाद उदयनजी. पण त्यामुळे नाही फरक पडत. " प्रतिसाद तपासा"वर क्लिक करून उघडलेल्या बॉक्समधे मात्र मराठीत टाईप होतं, जसं मीं आतां केलंय .

दिलशान, संगकारा आणि जयवर्धने या तिघांच्या विकेट्स लवकर घेतल्या तर मागे श्रीलंकन फलंदाजी काहीही नाही आहे

परेरा फुलबाजा आहे पेटला तर पेटला नाहीतर फुस्स..

या सामन्यात श्री लंका देखील मेंडीस, हेरंथ, संघनायके हे तीन स्पिनर्स आणि मलिंगा आणि कुलसेकरा हे फास्टर असे ५ गोलंदाज घेउन खेळतील ..
अश्या वेळी दिलशान संगकारा जयवर्धने परेरा मॅथ्युज, लाहिरु ६ बॅट्स्मन ने उतरावे लागेल त्यात दिलशान चा फॉर्म नाही आहे..

हो जरूर पण त्यांनी भारतीय क्रिकेट रि डिफाईन नाही केले. दोघांनी केले आणि तिसरा करतोय. > बॅटींगच्या बाबतीमधे हे बरोबर आहे. It certainly became more competitive - on the field and off the field as well.

धोनीचा युवराजला रैनाच्या आधी पाठवायचा निर्णय अनाकलनीय आणि निव्वळ मुर्खपणाचा.
विकेट हातात असून मनासारखा स्कोर होत नाहीये...
युवराजला हिटविकेट करायला सांगा कोणीतरी..

Pages