नुकताच ताजा ताजा या मार्गाने कुणी प्रवास केला आहे का? तुमचा अनुभव सांगा. मी ३ वर्श्याच्या मुलाला सोबत घेऊन या मार्गाने जाणार आहे. मला बरेच प्रश्न आहेत. दुबई ला पहिल्यांदा जात आहे तर काही सूचना/सल्ले द्या. EMIRATES ची फ्लाईट आहे.
१. EMIRATES कशी आहे?
२. लेओवर १तास ३५ मी पुरेसा आहे का पुढची फ्लाईट पकडायला?
३.transit visa लागतो का?
४. मध्यंतरी मायबोली वर ऐक लेख होता की दुबई airport वर काही खरेदी टाळा म्हणून. तिथे duty फ्री दुकानात त्या व्यक्ती ने २ वस्तू खरेदी केल्या आणि दुकान दाराने गुपचूप २ अजून वस्तू त्याच्या पिशवीत टाकून त्याला अडकवले. दुबई त चोरी मोठा गुन्हा आहे म्हणून त्या व्यक्तीवर चोरीचा आळ आणून पोलिस आणी कायद्याची भीती घालून त्याच्या कडून भरपूर पैसे उकळले.........अस वाचून आता एखादी तरी chocolate bags घ्यायची की नाही असा प्रश्न पडलाय? कुणी सध्या chocolate खरेदी केली आहे का तिथे? काय अनुभव आलाय?
५. या फ्लाईट ला भारतात कस्टम चा काय अनुभव आहे?
मुलासोबत प्रवास - Washington ते Mumbai via Dubai
Submitted by shweta25 on 26 March, 2014 - 11:20
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Emirates ची service, जेवण आणी
Emirates ची service, जेवण आणी फ्लाईट्स छान आहेत.
दुबई चा एअरपोर्ट पण छान आहे.
१.५ तास पुरायला हरकत नाही (जर बाकी काही करायचं नसेल तर).
माझ्या माहितीप्रमाणे आणी अनुभवाप्रमाणे तरी ट्रन्झिट व्हिसा लागत नाही, पण हे नियम बदलत असल्यामुळे, अधिकृत वेबसाईट वरून निघायच्या आधी खात्री केलेली बरी.
तुमच्याकडे आक्षेपार्ह काही नसेल तर कस्टम ची अनाठाई भिती बाळगू नका (मी हा सल्ला स्वतःला सुद्धा देतोय. फक्त स्वतःचे कपडे घेऊन जाताना देखिल मुंबई एअरपोर्ट वर गणवेशातला माणूस पाहून भिती वाटते... संस्कार... दुसरं काय
)
नवरा आत्ताच एमिरेट्सने
नवरा आत्ताच एमिरेट्सने न्यूयॉर्क-दुबई-बँगलोर गेला होता. ट्रान्झिट व्हिसा लागला नाही. दोन्ही वेळा फ्लाईट डिले होतं. येताना चांगलं तीन तास. होपफुली तुमचं वेळेत असेल. बाकी माहिती नाही काही.
मागच्याच महिन्यात मी भारतात
मागच्याच महिन्यात मी भारतात जाऊन आले.
Emirates ची service, जेवण आणी फ्लाईट्स छान आहेत.
दुबई चा एअरपोर्ट पण छान आहे.
ट्रन्झिट व्हिसा लागत नाही >>+१
१तास ३५ मी पुरेसा आहे का पुढची फ्लाईट पकडायला?>> हो (माझ्याकडेही १.३५ तास होता पुढची फ्लाईट पकडायला)
प्रश्न क्र ४ साठी>> सकाळची वेळ असेल तर तिथे खुप गर्दी असते(होती) त्यामुळे इकडे-तिकडे वेळ न घालवता सरळ गेट गाठावे. मग वेळ उरला असेल तर खरेदी करा.
मी बरेचदा मुंबई - दुबई -
मी बरेचदा मुंबई - दुबई - न्यूयॉर्क प्रवास केला आहे.
ट्रान्झिट विसा लागत नाही. दिड तास पुरेसा आहे. एअरपोर्ट म्हणजे खूप मोठा मॉल आहे. काही त्रास होत नाही.
भारताच्या कस्टमचा काय संबंध येणार? काही येत नाही. एमीरातस खूप चांगली एअरलाईन आहे. तुमचे ए ३८० असेल तर अजूनच चांगले.
मराठी - कनडा ते पार तेलुगु - तामिळ पिक्चरपण विमानात पाहायाला मिळतील. जेवणही नक्कीच चांगले आहे.
एमीरेट्स चांगली फ्लाईट आहे.
एमीरेट्स चांगली फ्लाईट आहे. दिड तासासाठी ट्रांसीट व्हिसाची गरज नाही. डुयटीफ्री दुकानात मि केलीय खरेदी,एकदम व्यवस्थीत आहेत तिथली दुकाने.
मी पर्थ - दुबई- मुंबई असा
मी पर्थ - दुबई- मुंबई असा प्रवास केला आहे एमिरेट्सने. पहिली फ्लाईट अकरा तासांची होती. सिनेमे चांगले होते त्यांचे. जेवणाच्या बाबतीत तरी मला फारसा चांगला अनुभव नाही. दुपारी तिनला निघालेली फ्लाइट ११.३० झाले तरी जेवण दिले नाही मला. विचारल्यावर तुमचे जेवण सापडत नाही असे कारण दिले (व्हेज जेवण होते). नंतर फ्लाइट लँड व्हायच्या आधी १ दिड तास आधी जेवण दिले.
मी एमिरेट्सचा नियमित प्रवासी
मी एमिरेट्सचा नियमित प्रवासी आहे. सेवा उत्तम आहे. आता तर काही फ्लाईट्समधे वॉटर डिस्पेन्सर्स आहेत.
तरीही काही हवे असल्यास हवाई सुंदरीला अवश्य सांगा.
सध्या मुंबईची विमाने दुसरीकडून सोडतात. त्यामूळे गेट आधी बघा. तिथे चालत जायला अवघड वाटत असेल तर मदत मागा. गाडीने पोहोचवतील.
मुलासाठी स्ट्रोलर्स मिळतील.
मी तिथे नेहमीच भरपूर शॉपिंग करतो.. त्यामूळे वर दिलेला अनुभव आला असेल यावर माझा विश्वास नाही.
तिथे अनेकदा चॉकलेट्स वर स्कीम्स असतात ( एकावर एक फ्री वगैरे ) आपण जरी घ्यायला विसरलो तरी ते फ्री
वस्तू आणून देतात. त्या दुकानाबाबत असा अनुभव यायची शक्यता नाही. मला एक सिडी हवी होती ती तर
माझ्या रिटर्न फ्लाईटच्या वेळी तयार ठेवली होती.
वर लिहिल्याप्रमाणे वेळ थोडा असल्याने आधी डिपार्चर गेट गाठा आणि मग हवेच असेल तर शॉपिंग करा.
दुकाने सगळीकडे आहेत.
ट्रांझिट व्हीसा लागत नाही.. भारतातले कस्टम्स देखील या फ्लाईटला सापत्न भावाने वागवत नाहीत.
तूम्हाला मुंबईला उतरल्यावर देखील सोबत मुलगा असल्याने लवकर इमिग्रेशनमधून बाहेर पडता येईल. अरायव्हल फॉर्म मात्र पुर्ण भरून तयार ठेवा.
emirates चे एक वेगळेच
emirates चे एक वेगळेच terminal आहे दुबईला, जर connecting flight emirates च असेल तर प्रश्नच नाहि. बिनधास्त shopping करा कसलहि tention न घेता, दुबईत किंवा airport or malls कुठेहि इतक्या वर्षात काहिहि वाईट अनुभव आलेला नाहि. ईतकच काय जर वेळ आलि तर गणवेशधारीच नाहि तर इतरहि लोक तुम्हाला मदत करतील, इतकि मला खात्रि आहे. तर काय, बिनधास्त या, shopping करा, आणि प्रवासा नंतर इथे आपला अनुभव पण शेअर करा.
कुणी सध्या chocolate खरेदी केली आहे का तिथे? काय अनुभव आलाय?>>>>>> काही खास आहे का
chocolate खरेदी वर म्हणजे काहि वेगळा अनुभव आलाय क? मी मागच्या आठवड्यात गेले होते , kitkat वर offers आहेत. शिवाय खजुर पण खुप आहेत stuff with almond, cashew, वेगळ्या मिठाया (खजुराच्य)
मी फेब्रुवारीमध्येच दुबई वरून
मी फेब्रुवारीमध्येच दुबई वरून आलो. ह्यावेळचे टर्मिनल वेगळेच होते (नवे दिसत होते). दुबईमध्ये मजबूत खरेदी करा, काही होत नाही. सोने खरेदी करणार असाल तर भारतीय कस्टम्सचे नियम बघून घ्या एकदा, नुकतेच सोन्याच्या आयातीबाबत नियमात बदल करण्यात आले आहेत.
वेजिटेरिअन असाल तर एअरपोर्टच्या मॅक्डोनल्डमध्ये वेज बर्गर मिळतो तो खाऊ शकता.
एमिरात्सला वेज जेवण हवेच अशी
एमिरात्सला वेज जेवण हवेच अशी पूर्वसुचना टिकेट्स बूक करतांना केल्यानं प्रॉब्लेम आला नाही. हवाईसुंदरी तत्पर होत्या मदतीला. युएस, लंडन आणि जर्मनीसाठी व्हाया दुबई-एमिरात्सच गेले आहे. ट्रंझिट विसा लागला नाही. एयरपोर्टवर शॉपिंगचाही चांगलाच अनुभव राहिला आहे. खूप गर्दी असते ह्याला प्रचंड अनुमोदन! आपले गेट गाठून मग शॉपिंग केलेली बरी.
गुड टू गो.. मधे बरेच शाकाहारी
गुड टू गो.. मधे बरेच शाकाहारी पदार्थ मिळतात. फलाफल, झत्तार व खबूस असे. फ्रेश फ्रुट सलाड, ज्यूसेस पण मस्त असतात. माझे फेव्ह आहे.
दुबई मुंबई फ्लाईटला आजवर प्रत्येकवेळी रसमलाई होती.
धन्यवाद सर्वांचे तत्पर
धन्यवाद सर्वांचे तत्पर प्रतिसादाबद्दल.... काल तुमचे प्रतिसाद वाचून Emiratsची flight पक्की केली. आता मुलाला दुबईतले chocolates मिळतील अस वाटतय:)
कतारचा , british airways चा
कतारचा , british airways चा अनुभव आहे का कुणाला? स्वस्त दिसत आहे Tickets.आइ वडील येणार आहेत , थोडे थकलेले आहेत नि शिवाय पहिला international प्रवास आहे म्हणुन थोडा research करत आहे. wheelchair assistant मागणार आहे मी पण airlines बद्दल माहिति हि मदत ठरेल.
कतार चांगली आहे. ब्रिटीश
कतार चांगली आहे. ब्रिटीश एअरवेज सो सो.
कतार चांगली आहे. कतार
कतार चांगली आहे. कतार एअरपोर्टवर ट्रान्झिट बसने करायला लागतो. थोडेसे गोंधळात टाकणारे वाटेल पहिल्यांदा प्रवास करणार्या प्रौढ लोकांना. व्हीलचेअर असिस्टन्स घेतलात तर सोपे जाईल. विमानतळावर काम करणारे अगदी सुरक्षा कर्मचार्यांपासून हाटेल पर्यंत सगळे भारतीय उपखंडातले (आणि थोडे फिलिपिनो) दिसतील. त्यामुळे हिंदीत बोलले तरी त्रास होणार नाही.
दोहाचा एअरपोर्ट थोडा
दोहाचा एअरपोर्ट थोडा गैरसोयीचा आहे. नवीन बांधताहेत त्यामूळे विमाने बरीच लांब थांबतात. व बसने नेतात. ट्रांझिट व अरायव्हल वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि नेहमी दोनचार जण गल्लत करतात. ड्यूटी फ्री शॉपिंग काही खास नाहीत. त्यामूळे जर जास्त वेळ थांबायचे असेल तर विचार करा. बाकी विमानातली सेवा मात्र उत्तम आहे.
सध्या एमिरेट्सशी स्पर्धा असल्याने, स्वस्त त्तिकिटे विकताहेत.
मनापासुन धन्यवाद!
मनापासुन धन्यवाद!