T-20 विश्वचषक २०१४

Submitted by केदार जाधव on 17 March, 2014 - 02:38

कालपासून टी२० विश्वचषकाला बांग्लादेश मधे सुरूवात झालीये . त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

मुख्य स्पर्धेतील गट खालीलप्रमाणे . प्रत्येक ग्रुपमधून २ संघ पुढे येतील,
१ . इंग्लंड , न्यूझिलंड , अफ्रिका , लंका , (झिम्बाबे/आयर्लंड्/अमिरात्/हॉलंड)
२. भारत , पाक , ऑसीज , विंडीज , (बांग्ला/अफगाण्/नेपाळ/हाँगकाँग)

प्रथमदर्शनी तरी भारताच काही खर दिसत नाहीये Happy
एक तर हा "ग्रुप ऑफ डेथ वाटतोय" आणी ऑसीज अन विंडीज अगदी बॅलेंसड दिसतायत.

आपला घोडा यावेळी ऑसीज . वॉर्नर , फिंच , वॉटसन , Can Top 3 be more aggressive than this ? Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

The league name you have entered does not exist. Kindly check and try again.

एरर येतोय

५ कुठले नियमित गोलंदाज?? शामी, भुवनेश्वर कुमार, अश्विन, मिश्रा/अरॉन >> अश्विन, जाडेजा, शमी, भुवी हे चार नियमित धरा. रैनाची pratice match मधली बॉलिंग बघता तो सहावा किंवा backup असणार. तेंव्हा पाचवा फिरकी हवा कि फास्त हा प्रश्न आहे. फिरकी घेतला तर मिश्रा घेतला तर टेल वाढते. युवराज घेतला तर तो नीटसा फॉर्ममधे दिसत नाहि. फास्ट हवा म्हणून अ‍ॅरन घेतला तर तो बेभरवशाचा आहे. तेंव्हा बिन्नीला घ्यावे Happy

धवन, राहणे, कोहली, रैना, युवराज, धोनी, जडेजा, बिन्नी, अश्विन, शमी, भुवी.

<<धवन, राहणे, कोहली, रैना, युवराज, धोनी, जडेजा, बिन्नी, अश्विन, शमी, भुवी >> बिन्नीऐवजी मला मिश्राला घेणं अधिक योग्य वाटतं. आतां आश्विनही बर्‍यापैकीं फलंदाजी करतो , त्यामुळें << मिश्रा घेतला तर टेल वाढते >> हें तितकंसं भयावह नसावं ! [ बीन्नी अतिशय उपयुक्त असला तरीही वरच्या स्तरावरच्या सामन्यांत अजूनही कच्चाच वाटतो ]
आज भवानीच्याच सामन्यात पाकिस्तान ! आफ्रिद्रीच्या फिटनेससबद्दल शंका असली तरीही आजच्या सामन्यात तो खेळणार हें जवळ जवळ निश्चितच !!
इंग्लंडचे अली व बटलर ज्या तर्‍हेने ऑफ स्टंपबाहेरचे वेगवान चेंडूही सराईतपणे स्क्वेअर लेग व फाईन लेग या भागात 'रिव्हर्स शॉट' व 'फ्लिक' वापरून टोलवत होते, त्यावरून टी-२० मधे गोलंदाजीची व गोलंदाजांच्या 'टेंपरॅमेंट'ची कसोटीच लागणार आहे. आपल्या गोलंदाजांच्या लक्षांत तर अजूनही निर्णायक षटकांत 'यॉर्कर'चं महत्वही येत नाहीय, याची काळजी वाटते ! Sad

मला हे कधीच कळत नाही की बॅटींग करताना ऑफला नोबॉस असणार्‍या चेंडुला बॅट घालायला का जातात. तसेच ऑफला बाहेर जाऊन लेगला चेंडु वळवत असलेल्या फलंदाजाला आणखी ऑफभारे चेंडु न टाकता मिडल व लेगवर का टाकत नाहीत? Uhoh

आज भारत पाकीस्तान. नखे संपणार. शिव्या कमी पडणार. त्यात आज जुम्मा है!!

चेंडु टाकणे आणि पडणे वेगवेगळे असते..
आणि तसेच चेंडु पडल्यावर किती प्रमाणात वळेल याची गॅरंटी गोलंदाज देखील देउ शकणार नाही..

<< ... ऑफला नोबॉस असणार्‍या चेंडुला बॅट घालायला का जातात.....> > कसोटी सामन्यात हा प्रश्न औचित्यपूर्ण आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात, विशेषतः टी-२० त, एखाद्याही चेंडूवर धांव न काढणे हा गुन्हाच असतो म्हणून.
<< फलंदाजाला आणखी ऑफभारे चेंडु न टाकता मिडल व लेगवर का टाकत नाहीत? >> असा चेंडू वळून लेगसाईडला बाहेर जावून मर्यादित षटकांच्या सामन्यांत तात्काळ 'वाईड' दिला जातो.
[ कांदापोहेजी, तुम्ही माझीच 'फिरकी' तर घेत नाही आहांत ना ! :डोमा:]

भाऊ. अहो वळला तर वाईड बरोबर आहे पण मी स्टंपात म्हणतोय. Happy दुसरे म्हणजे. ऑफच्या बाहेर जाणारा चेंडु अगदी दिसत सतो की वाईड आहे मग तो वाया जातच नाही ना. रनही मिळते व चेंडुही. Wink असो. Proud

काय धुतले ......जबरदस्त........ सगळ्याच बॅट्समनी हात साफ करुन घेतला... तब्बल ३० षटकार संपुर्ण मॅच मधे लागले... त्यातले १९ तर नेदरलँड वाल्यांचे आहेत ....

सगळेच "गेल" भरलेले आहेत वाटते ... एक गेल गेला तर दुसरा तयार.. एका एका ओव्हर्स मधे तर ३ -४ षटकार सलग मारलेले आहेत ते ही ३-४ ओव्हर्स मधेच...

भारताने पाकला १३०वरच रोखलं तर आहे ! जिंकणं कठीण जाऊ नये.
शेवटच्या षटकांत 'फुल-लेंग्थ' चेंडू टाकायला शिकलेत आतां आपले गोलंदाज. त्याच 'स्पेल'मधे एक अप्रतिम बाउन्सरही टाकला शामीने. भारताचं क्षेत्ररक्षण मात्र जरा काळजी वाटण्यासारखंच.
मिश्राला संघात घेतला व त्याने तो निर्णय योग्यही ठरवला !
भारताला शुभेच्छा.

भारताचं क्षेत्ररक्षण मात्र जरा काळजी वाटण्यासारखंच. >> +१

पाकिस्तानने भारताविरुद्ध हमखास खेळणारे सगळे खेळवले आज - मलिक, कामरान, हफिज, आफ्रिदी Happy

धवनचे काय सुरू आहे ? I miss Shaastri commenting "If you stay put, runs will come" Lol

मिश्राला खेळवण्यावरून गांगूली नि गावस्कर ने मजा चालवलेली.

आफ्रिदी हमखास कॅटेगरीतून गेले ४-५ वर्षे बाहेर होता. एशिया कप मधे अचानक परत आला.

स्टंप लाईटिंग, एकदम वरून घेतलेला कॅमेरा अँगल दोन्ही मस्त आहे.

आज धोनीने अमित मिश्राला संधी देऊन माझा शब्द राखला... गूड बॉय धोनी.. Wink
आणि मिश्राने चांगली कामगिरी बजावत माझ्या शब्दाचा मान राखला.. वेल डन मिश्रा .. Happy

युवराज पुन्हा एकदा बोनस विकेट असल्यासारखा गेला. तो कधीतरी मॅचविनरच्या थाटात खेळतो, मान्य, पण त्यासाठी रहाणेला वगळणे सध्याच्या स्टेजला परवडण्यासारखे नाही.
तसेच युवराजच्या बॉंलिंगलाही काऊंट करण्यात अर्थ नाही, खास करून जर आपण तीन स्पिनर आणि रैना ज्याला ट्वेंटीमध्ये गोलंदाज म्हणूनही धोनी चांगल्या प्रकारे वापरतो त्याला खेळवत असल्याने.
युवराजच्या जागी रहाणे आल्यास गरज पडल्यास रहाणे ओपनिंगला आणि शर्मा मिडलऑर्डरला अशी अलटीपलटी करू शकतो.

बघ बाबा धोनी, विचार कर लवकर, पाकिस्तानशी आज जिंकलो तर गाफिल राहू नकोस, विजयी संघ बदलायचा नसतो हि एक मुर्खपणाची अंधश्रद्धा आहे त्याच्या बळी पडू नकोस.

युवराज पुन्हा एकदा बोनस विकेट असल्यासारखा गेला. तो कधीतरी मॅचविनरच्या थाटात खेळतो, मान्य, पण त्यासाठी रहाणेला वगळणे सध्याच्या स्टेजला परवडण्यासारखे नाही.
तसेच युवराजच्या बॉंलिंगलाही काऊंट करण्यात अर्थ नाही, खास करून जर आपण तीन स्पिनर आणि रैना ज्याला ट्वेंटीमध्ये गोलंदाज म्हणूनही धोनी चांगल्या प्रकारे वापरतो त्याला खेळवत असल्याने. >> +१. आजची अकरावी ओव्हर महाग पडलेलीच तशी. त्याचा फॉर्म बघता राहाणे च्या ऐवजी युवी कठीण वाटते फक्त युवी ची balling एक option आहे म्हणून त्याला उचलले जात असावे.

थाटात जिंकलो. थॅंक्स टू कोहली-रैना ...
या दोघांचा फॉर्म भारताची फार मोठी जमेची बाजू ठरणार या स्पर्धेत असे दिसतेय.
मिश्रा मॅन ऑफ द मॅच. भारतीय उपखंडाबाहेरील देशांशी खेळताना त्याच्या कडून आणखी अपेक्षा राहतील.
त्याच्या कॉम्पिटीशनमुळे आश्विन सुद्धा आपण संघात अष्टपैलू म्हणून नाही तर आधी एक गोलंदाज म्हणून आहोत यावर लक्ष केंद्रीत करेल..
पुढचा सामना वेस्टईंडिजच्या बिगगन्स समोर आहे ना, टॉस जिंकलो तर त्यांनाही चेस करणेच उत्तम राहील
चलो, शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज.

जिंकले ! अभिनंदन.
आज अजमलची आपल्याला वाटणारी भिती घालवण्याचं काम बहुधा धवनवर सोपवलं होतं व त्याने तें व्यवस्थित व दणक्यात पार पाडलं. तरी पण त्याच्या नंतरच्या 'स्पेल'मधे रैना व कोहलीने त्याला योग्य तो मान देवून स्वतःची परिपक्वताच सिद्ध केली !

जिंकले. आजवर कुठल्याही वर्ल्डकपमधे पाकिस्तानने आपल्याला हरवले नाही. हा रेकॉर्ड असाच कायम राहू देत.

मजा आ गया.

Pages