राकट देशा, कॅनियनच्या देशा - युटाह (Utah) - प्रकाशचित्रे
नुकतीच आम्ही कोलोरॅडो स्प्रिंग्स कोलोरॅडो, मोआब युटाह आणि रॉकी माउंटन नॅशनल पार्क, कोलोरॅडो ची ट्रीप करून आलो. त्यातल्या मोआब, युटाह (Utah) मधली काही प्रकाशचित्रं.
मोआब हे युटाह राज्यातलं एक टुमदार गाव. कोलोरॅडो नदीच्या काठावर वसलेलं, युरॅनियम आणि पोटॅशच्या खाणींमुळे प्रसिध्दीस आलेलं. इथून जवळच पोटॅश कंपनीचा एक कारखाना पण आहे. आता जवळ जवळ सगळ्या खाणी बंद आहेत आणि पर्यटन हा महत्वाचा व्यवसाय बनलाय. मोआबच्या पश्चिमेला कॅनियनलँडस् नॅशनल पार्क आणि पुर्वेला आर्चेस नॅशनल पार्क आहे.
कॅनियनलॅंडस् म्हणजे कोलोरॅडो नदीने लाखो वर्षांपासून निर्माण केलेलं कॅनियन्सचं जाळं. त्याचे ३ भाग आहेत, आयलंड इन द स्काय, नीडल्स आणि मेझ. त्यातला आयलंड ला गाडी घेउन जाता येते. नीडल्स आणि मेझ हे फारसे अॅक्सेसीबल नाहीत. आम्ही फक्त आयलंडचा भाग केला. पण नीडल्स हा भाग खूप सुंदर आहे असं ऐकलंय.
आयलंड इन द स्काय -
कँडलस्टीक -
व्हाइट रीम - ग्रँड व्हयू पॉइंटहून दिसणारी -
व्हाइट रीम - दुसर्या एक ठिकाणाहून -
मेसा आर्च -
या आर्चला जाण्यासाठी थोडी (१० मि.) पायपीट करावी लागते. हौशी फोटोग्राफर्स इथं सुर्योदयाच्यावेळी फोटो काढण्यासाठी येतात (मे मध्ये ५.३०-६ लाच सुर्योदय होतो तर लोक ४.३०-५ पासून मोक्याची जागा धरून बसलेले असतात). मी पण दुसर्या दिवशी ५ ला यायचे ठरवलं होतं पण ते काही शक्य नाही झालं.
मेसा आर्चमधून दिसणारं दृष्य -
या आर्चच्या वाटेवर काही मस्त फुलं होती...
तिथं आम्हाला हे पण भेटले...
कॅनियनलँडस् मधून बाहेर पडल्यावर तिथून जवळच डेड हॉर्स पॉइंट स्टेट पार्क आहे. पुर्वीच्या काळी काउबॉइज घोडे पाळत. चांगले घोडे निवडून बाकिच्या नको असलेल्या घोड्यांना ते इथे सोडून देत. इथे पाण्याची कमतरता असल्याने ते राहिलेले घोडे थोड्या दिवसात मरून जात. म्हणून जागेचे नाव. इथून कोलोरॅडो नदी आणि कॅनियन खूप सुंदर दिसतात. याच कॅनियन मध्ये बर्याच हॉलीवूड सिनेमांचे चित्रीकरण झालंय जसे की थेल्मा अँड लुइस, मिशन इंपॉसिबल १ (टॉम क्रूझचा स्टंट).
तिथेच ही एक सुंदर जागा आहे...
इथून बाहेर पडलं की थोड्याच अंतरावर आर्चेस नॅशनल पार्क आहे. वार्यानं आणि पाण्यामुळं दगडांची झीज होउन खूपश्या नैसर्गिक आर्चेस (कमानी) आणि आकार तयार झालेत.
पार्क अवेन्यू -
नॉर्थ विंडो -
वेगळ्या अँगलनं -
डबल आर्च -
आर्च इन द मेकिंग - पूर्ण आर्च तयार होउ पर्यंत त्याला वॉल आर्च म्हणतात.
फियरी फर्नेस - व्यवस्थीत उन पडलं असेल तर एखादी भट्टी लावली आहे असं दृष्य दिसतं
फियरी फर्नेस (जवळून) -
डेलिकेट आर्च - हे सगळ्यात मुख्य आकर्षण. असं म्हणतात की this is the most photographed arch in the world. इथं जायला जवळ जवळ २-२.५ मैलाचा बर्यापैकी दमछाक करणारा ट्रेक करून जावं लागतं. अगदी वर गेल्याशिवाय ही कमान दिसत सुध्दा नाही. पण कमानीचं दर्शन झाल्यावर प्रत्येक मिनिट अगदी वसूल. मेसा आर्च जशी सुर्योदयाच्यावेळी चांगली दिसते तशी ही कमान सुर्यास्ताला. मी पोहोचलो तेव्हा जवळ जवळ २०-२५ फोटोग्राफर्स मोक्याच्या जागा धरून बसले होते. मला मात्र सुर्यास्तापर्यंत थांबता नाही आले (५ मिनिटातच चुकला).
१.५ तासात हा ट्रेक करून आल्यानं एकदम दमून गेलो. त्यामुळं दुसर्या दिवशी सकाळी मेसा आर्चला जायचा केलेला प्लॅन रद्द केला. त्याऐवजी आम्ही कॅनियनलँडस् ची जीप टूर घेतली. आमच्या गाइडनं एकदम छान माहिती सांगत कॅनियनमधून खालून सुरु करून आम्हाला कॅनियनच्या वर आणलं. पूर्ण मातीचा आणी मधे मधे बर्यापैकी अवघड चढ असा रस्ता होता.
वाटेत दिसणार्या दगडांचे आकार बघून दक्षिण भारतातल्या मंदिरांची आठवण येत होती.
जीप टूर संपल्यावर लगेच हॉटेलवर जाउन चेक आउट केलं. खूप भूक लागली होती म्हणून हॉटेलवाल्यानं शिफारस केलेल्या मोआब ब्रूअरी मध्ये जेवण केलं. तिथली व्हेज चिली मस्त होती. बाकिचे पदार्थपण मस्त होते. तिथून परत डेनवरला जाताना कोलोरॅडो नदीच्या किनार्याने जाणारा scenic byway घेतला. तिथून दिसलेले हे टॉवर्स (मी नाव विसरलो)
तिथून डेनवर पर्यंतचा रस्तासुध्दा खूप छान आहे. नंतर २ दिवस डेनवर मध्ये थांबून घरी परत आलो. लवकरच भारतात परत जात असल्यानं आमची अमेरिकेतली ही शेवटचीच ट्रीप होती जी एकदम मस्त झाली. परत जर संधी मिळाली तर कॅनियनलँडस् मधले नीडल्स आणि युटाह मधले ब्राइस आणि झायन्स नॅशनल पार्क बघायचेच असं सध्या ठरवलंय.
ट्रीपचे डीटेल्स -
दिवस १ -इंडियानापलिस - डेनवर (विमानानं), कोलोरॅडो स्प्रिंग्स
दिवस २ - कोलोरॅडो स्प्रिंग्स, पाइक्स पीक, रॉयल गॉर्ज
दिवस ३ - तिथून ड्राइव्ह करून मोआब
दिवस ४ - कॅनियनलँडस् (अर्धा दिवस) आर्चेस (अर्धा दिवस)
दिवस ५ - कॅनियनलँडस् जीप टूर, डेनवर
दिवस ६ - रॉकी माउंटन नॅशनल पार्क, डेनवर डाउनटाउन
दिवस ७ - कूर्स (Coors) ब्रूअरी, इंडियानापलिस ला परत
ट्रीपचं सगळं प्लॅनींग www.tripadvisor.com ची मदत घेउन केलं
वॉव, मस्त
वॉव, मस्त आहेत सगळे फोटो! डेलिकेट आर्च तर सहीच.
माहिती पण चांगली दिली आहेस. जायला हवं इथे.
मस्त आहे
मस्त आहे वर्णन. तो नदीबाजूचा रस्ता बहुतेक खूप प्रसिद्ध असावा. तो बांधला त्याबद्दलची डीव्हीडी मी मधे पाहिली होती. तो बांधणार्या डिजाइनर ने नदीप्रमाणेच वळणेवळणे घेत जाणारा बांधला, तो ही असा की तो त्या नैसर्गिक दृश्याचाच भाग वाटतो. तू त्याच रस्त्याबद्दल लिहीलेस का माहीत नाही. त्याचे फोटो का नाही टाकले?
कॅनियन ची भव्यता मात्र फोटोत कधीच नीट येत नाही असे मला वाटते. तेथे बघताना जे वाटते ते फिलिंग नंतर तोच फोटो बघताना येत नाही.
मस्तच आहेत
मस्तच आहेत फोटो .. मुलीला घेऊन ट्रेक केला डेलिकेट आर्च चा?
वाह मस्तच
वाह मस्तच फोटो व धावते वर्णन!
जायची उत्सुकता लागली आता!
कधी जावं? आयडिअल सिझन वगैरे?
www.bhagyashree.co.cc/
सही. कधी
सही.
कधी जावं? आयडिअल सिझन वगैरे? >> तुला रॉकी मध्ये स्किईंग करायचे तर डिंसे, जाने., नाहीतर जुन, जुलै सोडून कधीही. १२० वगैरे असते तिथे.
व्वा!!
व्वा!! सुंदर फोटो आणि वर्णन
वर्णन आणि
वर्णन आणि प्रकाशचित्रं आवडली. मस्त!
मस्त
मस्त वर्णन, आणि फोटो तर लाजवाब...
अगणीत सिनेमातुन या कॅनियनचे दर्शन झाले आहे, प्रत्यक्ष बघण तर फारच exciting असणार.
आम्हाला फोटोतुन दर्शन दिल्याबद्दल घन्यवाद.
फारच सुंदर
फारच सुंदर फोटो आणि वर्णन सुद्धा
सुंदर
सुंदर प्रकाशचित्रे आणि तितकेच छान वर्णन!
-------------------------------------------------------------
'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'
मस्तच.
मस्तच. याचे नाव बदलून मॅकानाज गोल्ड देता आले तर बघा. त्या चित्रपटानंतर कायम मनात कोरला गेलेला भाग म्हणजे ग्रँड कॅनयन.
वा! मस्त
वा! मस्त फोटो आणि भटकंतीचे वर्णन.
वा! सुरेखच
वा! सुरेखच मनिश..
धन्यवाद
धन्यवाद मंडळी.
फारेंड.. तो रस्ता एवढा प्रसिध्द आहे की नाही हे माहिती नाही. मला tripadvisor वर कुठे त्याबद्दल विशेष माहिती दिसली नाही. आमच्या जीप टूर वाल्या गाइडनं त्याबद्दल मला सांगितलं. तिथले फारसे फोटो नाही काढले, कारण २-३ दिवस इतके फोटो काढले होते की यावेळी ती सिनरी फक्त अनुभवायची असं ठरवलं होतं. शिवाय एखाद्या उंच ठिकाणाहून काढले तरच ते फोटो चांगले आले असते.
बाकी कॅनियनची भव्यता आणि फोटोबद्दल तुला अनुमोदन.. आपण जे बघतो ते फोटोमधे कधीच कॅप्चर नाही करू शकत.
सशल.. मुलीला घेउन ट्रेक करायचा प्लॅन होता. त्यासाठी थोडं लवकरच निघालो होतो. दिवसभर फिरून तिची बॅटरी संपत आली होती. त्यामुळे गाडी पार्क केल्या केल्या तिचं रडणं चालू झालं आणि उचलून घे म्हणून बसली. म्हणून मग बायको आणि मुलीला गाडीतच बसवून मी एकटाच जाउन आलो. पण लहान मुलांना घेउनपण तो ट्रेक करता येतो. मला तिथं बरेच लोक लहान मुलांना घेउन जाताना दिसले.
bsk... कधी जावं? आयडिअल सिझन वगैरे? >> स्प्रिंग आणि फॉल सगळ्यात चांगले. तापमान जास्त नसतं. तसंही बहुतेक सगळ्या ठिकाणांपर्यंत गाडीने जाता येते (आयलंड आणि आर्चेस मध्ये). लाँग वीकेंड सोडून गेलेलं सगळ्यात चांगलं.
केपी .. मला पण हे सगळं बघताना मॅकेनाज गोल्डची खूप आठवण येत होती. घरी आल्या आल्या DVD मागवून मॅकेनाज गोल्ड परत एकदा बघितला. कदाचित तो पण याच कॅनियन मध्ये चित्रित केला असेल.
मनीष सही
मनीष
सही आलेत फोटो एकदम. १ आठवडा ट्रीप केलीत म्हणजे खूप भटकंती केली असणार. मी अजुन ग्रँड कॅनियन बघीतले नाहीये पण त्या सगळ्या दगडांचे रंग आणि आकार मला फार आवडतात फोटोत सुद्धा. हे तुझे फोटो बघुन पण तसच वाटले.
धन्स रूनी.
धन्स रूनी. एका आठवड्यात खूप भटकंती केली. ६-७ दिवसांत १८०० मैल ड्राइव्ह झाला
अरे जबरीच !
अरे जबरीच ! मॅकेनाज गोल्ड आणि इतर सर्व वेस्टर्न डोळ्यांसमोर आल्या ! व्वा !!
***
I get mail, therefore I am.
मस्त फोटो
मस्त फोटो आहेत. वर्णनपण छान केले आहेस, मनीष. तो डेड हॉर्स पॉइंट आहे तसाच दिसणारा अजून एक पॉइंट आहे ग्रॅन्ड कॅन्यन च्या जवळ... हॉर्स शू बेन्ड म्हणून... मस्त आहे तो पण... हा फोटो..
हॉर्स शू
हॉर्स शू सही आहे सचिन.. फ्लॅगस्टाफच्या आसपास आहे?
मनिष..
मनिष.. फोटोमधे या भागाची भव्यता व नॅचरल ब्युअटी मस्तच पकडली आहेस. पण फोटो व प्रत्यक्ष अनुभव याबाबतीत अमोलला १००% अनुमोदन! पण मनिष....ग्रँड कॅनिअनच्या एवढ्या जवळ जाउन तिथे का नाही गेलास?:(
ग्रँड कॅनिअनला जेव्हा मी प्रथम भेट दिली तेव्हा त्याची भव्यता बघुन मीही निसर्गाच्या त्या किमयेपुढे व सुंदरतेपुढे आपोआपच नतमस्तक झालो होतो. मीच काय.. कोणीही नतमस्तक होइल असाच नजारा आहे त्याचा... आम्ही १९९८ मधे साउथ रिमवरुन..ब्राइट एंजल ट्रेल वरुन खाली कॉलोराडो नदिवरच्या फँटम रँच पर्यंतची हाइक केली होती.. खाली जायला तिन साडेतिन तास लागले पण वर यायला तब्बल १२ तास लागले! .... एक अविस्मरणीय अनुभव! त्याबद्दल कधीतरी लिहीन.
कॉलोराडो स्प्रिंगमधे गार्डन ऑफ गॉड्स पाहीले की नाही?(अर्थान कॅनिअनलँड व ग्रँड कॅनिअन पुढे ते काहीच नाही:)) कॅनन सिटीवरुन रॉयल गॉर्जमधुन २ तासाची ट्रेन राइड आहे.. अरकॅन्सास नदिच्या काठाकाठाने. ती राइड व रोयल गॉर्जमधला अरकॅन्सास रिव्हरवरचा रिव्हर राफ्टिंगचा अनुभव जबरदस्त.. या वेळेला घेतला नसलास तर पुढच्या वेळेला चुकवु नकोस... तसेच तुम्हाला एकाच आठवड्यात एवढी सगळि मस्त मस्त ठिकाणे करायची असल्यामुळे वेळ मिळाला नसेल.. नाहीतर रॉकी माउंटन नॅशनल पार्कला एक दिवस जाणे न्याय्य होत नाही... तिथल्या बेअर लेक ट्रेल हेडच्या आजुबाजुलाच १०-१२ ट्रेक्स आहेत.. त्यातला माझा आवडता.. अल्बर्टा फॉल्स ट्रेक!आणि मोठा व कठीण ट्रेक पाहीजे असेल व वेळ असेल तर मिकर्स पार्कवरुन लाँग्स पिकचा ट्रेक अविस्मरणिय!तसेच एस्टिस पार्कवरुन वर जायला ट्रेल रिज रोड हा पेव्ह्ड रोड मस्तच आहे पण फॉल रिव्हर रोड हा कच्चा रस्ता जास्त सिनिक आहे..
रुनी.. ग्रँड कॅनिअनची वारी प्रत्येकाने एकदा तरी केलीच पाहीजे असे माझे ठाम मत आहे. फोटोवरुन तुला त्या कॅनिअनची भव्यता व जॉ ड्रॉपिंग ब्युअटीची कल्पना येणार नाही.डेनव्हरपासुन ड्राइव्ह करुन अॅरिझोनाला गेलीस तर उत्तमच.. डेनव्हर ते ग्रँड जंक्शन हा इंटरस्टेट ७० वरचा २५० मैलाचा ड्राइव्ह तुला सबंध रॉकी माउंटन रेंज छेदुन घेउन जातो... तो सबंध डोंगरामधला २५० मैलाचा हायवे म्हणजे एक सिव्हिल इंजिनिअरिंगची कमाल आहे.. खासकरुन डेनव्हर ते ग्लेनवुड कॅनिअन चा रस्ता... कॉलोराडो नदी कधी हायवेच्या या बाजुला तर कधी त्या बाजुला.. आणि ग्लेनवुड कॅनिअनमधे हायवे ७० वर बर्याच सिनिक स्पॉट्सवर एक्झिट्स आहेत.. कॉलोराडो नदिकिनारी.. पिकनिक साठी...
आणी एक.. मला वाटत मॅकेनोज गोल्डच शुटींग युटाह, अॅरिझोना व ओरेगॉन अश्या वेगवेगळ्या ठिकाणी झाले आहे(आणी बरेचसे स्टुडिओ मधे:) )
मनिष .. माझे प्रतिसादाचे पोस्ट खुपच मोठे झाले.. सॉरी!.. पण तु जिथे गेला होतास तिथे मी अनेक वेळा जाउन आलो आहे व ती सगळी ठिकाणे माझी आवडती ठिकाणे आहेत.. त्यामुळे लिहील्याशिवाय राहवले नाही.
मनिष,
मनिष, सुरेख फोटोग्राफी !!
सचिन , हॉर्स शू बेंडचा फोटोही जबरदस्त आहे.
मुकुंद,
मुकुंद, प्रकाश.. धन्यवाद...
मुकुंद.. ग्रँड कॅनियन मी आधीच बघितले आहे (२००५ मध्ये). तेव्हा वेळ कमी असल्याने कॅनियनमध्ये खाली जाउन नाही येउ शकलो. पण तू ते नतमस्तक होण्याबद्दल लिहिलंयस ते अनुभवलंय. कितीही बघितलं तरी समाधान होत नाही.
तुझ्या त्या ट्रेलबद्दल वाचायला आवडेल.. (लवकर लिही )
गार्डन ऑफ गॉड्स बघितले.. पण ते कॅनियनलँडस् समोर काहीच नाही..
रॉयल गॉर्जला ती ट्रेन राइड नाही घेतली. पण इन्क्लाइन्ड रेल्वेनं खाली जाउन आलो. तू म्हणालास तसं वेळ खूप कमी होता आणि बरंच काही बघायचं होतं त्यामुळं ठरावीक गोष्टीच बघून आलो. परत जर संधी मिळाली तर परत कोलोरॅडो आणि युटाहची ट्रीप नक्कीच करणार आहे. ग्रँड कॅनियनमधला ट्रेक पण करायचाय. डेनवर ते मोआब पर्यंतचा रस्ता खरंच खूप मस्त आहे आणि तू म्हणालास तसं सिव्हिल इंजिनिअरिंगची कमाल आहे.
रॉकी माउंटनला पण आमच्याकडे वेळ फार कमी होता त्यात डेनवरहून इस्टेस पार्कला जाताना (पीक टू पीक सीनिक बायवे) ट्रॅफिक जॅममुळे तिथं पोहोचायला वेळ लागला. शिवाय तेव्हा बरेचसे ट्रेक बंद होते स्नोमुळं. आणि ३ वर्षाच्या मुलीला घेउन हे सगळं करणं सहज शक्य नव्हतं.
आणि एवढ्या चांगल्या पोस्टसाठी सॉरी काय? ही ठीकाणंच अशी आहेत की कितीही पाहिलं आणि लिहिलं तरी कमीच...
अतिशय
अतिशय सुंदर फोटोस आणि वर्णनही.
परत एकदा ग्रेंड कॅनयनला भेट देण्याची इछा होतेय :).
सुन्दर
सुन्दर अनुभव
धन्यवाद
सही ! शब्दच
सही ! शब्दच नाहीत. धन्यवाद सफर घडवल्याबद्दल !
छानच
छानच
छानं! मी
छानं!
मी फिनिक्स वरून पहाटे निघालो आणि जितका पाहून होईल तितका ग्रँड केनिऑन पाहिला. खरचं जवळ जाईपर्यंत असे वाटले नव्हते की हे स्थळ इतके भव्य असेल.
तिथे मी पहिल्यांदाच कॅकटसच्या आत पाखरांनी केलेली घरटी पाहीली. वाटेत सॅडोनाचे सुर्यास्त आणि सुर्योदय पाहून डोळे दिपून गेले होते.
I can not describe how much I loved Arizona and surroundings. Within two days I turned wheatish to black. The bridge 66 is great. After I came back to Singapore, the gloomy sky made me so sick that I did not look outside for rest of the few days.
छान फोटो
छान फोटो आणि वर्णनही
-------------------------------------------------------------------------
जो संपतो तो सहवास, आणि ज्या निरंतर रहातात त्या आठवणी
अतिशय
अतिशय नयनरम्य, फोटो बघताना असे वाटते की आपणच तिथे उभे आहोत. एकंदरीत उत्तमच.
जबरी! हो मलाही हे पाहुन
जबरी! हो मलाही हे पाहुन मॅकॅनीज गोल्डच आठवला. डोळ्याचे पारणे फिटत नाही फोटो पहाताना, मग प्रत्यक्षात काय होत असेल!
Pages