झी मराठी - सा रे ग म प - सूर नव्या युगाचा

Submitted by मंजूडी on 28 January, 2014 - 02:02

झी मराठी वाहिनीवर सा रे ग म पचे नवे पर्व सुरू झाले आहे - सूर नव्या युगाचा!

यावेळी फक्त १४ स्पर्धक निवडून ही स्पर्धा चालू केलेली आहे -
महेश कंटे, श्रीनिधी घटाटे, कौशिक देशपांडे, जयंत पानसरे, भाग्यश्री टिकले, जुईली जोगळेकर, मनोज क्षिरसागर, रसिका गानू, संज्योती जगदाळे, प्रल्हाद जाधव, शंकर गिरी, मृण्मयी पाठक, रेश्मा कुलकर्णी, गणेश मेस्त्री

परीक्षक आहेत अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशी, तर सूत्रसंचालन करतोय अभिजीत खांडकेकर.

दर सोमवार आणि मंगळवार रात्री साडेनऊ ते साडेदहा झी मराठी वाहिनीवर - "सा रे ग म प - सूर नव्या युगाचा"

पुनःप्रक्षेपण - मंगळवार आणि बुधवार दुपारी चार वाजता आणि शनिवारी रात्री साडेनऊ वाजता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या कार्यक्रमाच्या संपूर्ण टायटल सॉन्गचे Lyrics मिळतील का ?? पहिल्या दिवशी अवधुतने सर्व स्पर्धकांबरोबर गायलं होतं. अप्रतिम Composition,श्रवणीय संगीत आणि कमालीचे सुंदर शब्द आहेत. ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी खालील लिंकवरून नक्की ऐका

http://www.youtube.com/watch?v=sqmJNCa7avk

दोन्ही भाग बघितले. तीर्थ विठ्ठल, का रे दुरावा, चुपके चुपके रात दिन, गोंधळ (जयंत पानसरे) ही गाणी आवडली. बाकी ठिकठाक वाटली. बरेच स्पर्धक तयारीचे वाटतात. नमक इस्क का पण चांगलं होतं.

सूत्रसंचालक, ढोलकीवादक, व्हायोलीन हे काही माझ्यासाठीचे धनबिंदू इतर काही फालतू / उदासिन / ऋणबिंदूंवर मात करतील अशी आशा. Proud

कार्यक्रमातील स्तुतीला किती महत्व द्यायचे हे ओळखणारे पुढे जातात. <<< Srd :). आणि पहिल्याच दिवशी चाबुक आला होता की!

तीर्थ विठ्ठल, का रे दुरावा, चुपके चुपके रात दिन, गोंधळ (जयंत पानसरे) ही गाणी आवडली. बाकी ठिकठाक वाटली. बरेच स्पर्धक तयारीचे वाटतात. नमक इस्क का पण चांगलं होतं.>> +१००

मंजूडी....

"..तरीही कार्यक्रमाचे सादरीकरण बाकी कुठल्याही वाहिनीवरच्या अश्या प्रकारच्या कार्यक्रमापेक्षा अव्वल असते..."

~ हे आवडले. सादरीकरण छान असले की मग प्रेक्षकाला किमान ते लक्षण त्या कार्यक्रमाकडे खेचून नेते.

अंदाज पुढच्या आठवड्याचा..

शेवटचे ३
जुईली जोगळेकर
कौशिक देशपांडे
भाग्यश्री टिकले - (बहुतेक पहिली एक्झिट)

सर्वात पहिल्या काही एक्झिटमध्ये गानू आणि घटाटे असाव्यात असा अंदाज वाटतोय......

आज येत्या आठवड्याचं शूटिंग सुरू आहे.... लेट्स सी.....!!! रात्री कळेलच..... (आधी लिहून उत्सुकता वाया घालवणार नाही इतरांची Proud )

माझ्यामते घटाटे पहिली उडेल....

टिकले ही गाते उत्तम पण लिटिल चँप्सला पण तिचा प्रस्तुतिकरणातला काँफिडन्स कमीच होता आनि आताही कमीच आहे..टिकले मॅडमना काँफिडन्स वाढवावा लागेल.

शेवटी हा प्लॅटफॉर्म प्रस्तुतिकरणाला महत्व देणारा आहे..... "जसराज जोशी" हे त्याचे उत्तम उदाहरण जो इतक्या चांगल्या इतर गायकांना मागे टाकून जिंकला हिंदी सरेगमप.....

मला प्रल्हजाढजाधव जाम आवडला..... चुपके चुपके त्यच्याकडून म्हणजे सरप्र।ऑज होते एकदम!!!! जियो दोस्त......!!!

भुंग्याशी सहमत… मुलींमध्ये घटाटे आणि मुलांमध्ये कुडाळचा गणेश मेस्त्री ज्याने कालच्या एपिसोडमध्ये गाणं मधूनच थांबवून अवधूतचा अपमानास्पद ओरडा खाल्ला आहे. त्याच्याबरोबर ऑडिशनला आलेला त्याचा मित्र त्याच्यापेक्षा नक्कीच चांगला होता. मेस्त्री नंतर बहुदा कौशिक देशपांडे असेल.

माझ्या काही शंका. ४८ स्पर्धकांमधुन अंतिम १२ स्पर्धक निवडायचे होते, बरोबर? पण अंतिम १२ स्पर्धकांमध्ये ७ मुली (स्त्री) आणि ५ मुले (पुरुष) होते. सगळ्या स्पर्धकांना डयुएट गाण्यासाठी (२+२) हे नक्कीच अपुर्ण होते. म्हणुनच त्यांच्या सोयीसाठी त्यांनी आणखी दोन पुरुष स्पर्धक निवडले.
पण मी अगोदर लिहिल्याप्रमाणे १४ स्पर्धकांपैकी ८ स्पर्धक याअगोदर कुठल्यातरी वाहिनीवर वारी करून आलेले आहेत. अंतिम ५ मध्ये नविन ६ मधले नविन कोणी असतिल का ही शंकाच आहे. सारेगमप ज्युनियर मध्ये आलेल्या चौघीजणी (श्रीनिधी घटाटे, भाग्यश्री टिकले,जुईली जोगळेकर आणि संज्योती जगदाळे) अंतिम ५ मध्ये आल्यास नवल नक्कीच नाही. म्हणजे अंतिम विजेती सारेगमप ज्युनियर मधलीचं असेल ना?

खरंतर मृण्मयीसूरात्त आणि आवाजात सरस आहे.... पण सर्व प्रकारची गाणी तिने गायला हवीत ...... जगदाळे उत्तामच आहे.....
पण जोगळेकर कुलकर्णी गानू ही आडनावं अंतिम विजेतेपदापर्यंत पोचण्याची शक्यता कमीच जरा मराठी सारेगमप मध्ये Sad ......

जगदाळे कॅन बी डार्क हॉर्स......

जोगळेकर कुलकर्णी गानू ही आडनावं अंतिम विजेतेपदापर्यंत पोचण्याची शक्यता कमीच जरा मराठी सारेगमप मध्ये

>> +१

भुंगा... कशाला उगाच लोकांच्या डोक्याला भुंगा लावतो आहेस..

अनपेक्षित म्हणजे.. कोणीतरी आधीच टीव्हीवर झळकलेल्यांपैकी कोणी तरी बाहेर गेले असणार..

भुंग्याची मेव्हणी कोण आहे? तीच आऊट झाली का?

तो भाग अधिकृतरित्या प्रकाशित होईपर्यंत कृपया धीर धरा Proud

तो भाग अधिकृतरित्या प्रकाशित होईपर्यंत कृपया धीर धरा
>>>>>>>>

धागा लेखकच्या सूचनेचा मान राखा Happy

हिम्सकूल..... आता पुढच्या रिझल्ट्सना असे उल्लेख टाळेन रे...... काळजी नसावी Wink

कौशिक देशपांडेला का घेतले हेच मला पटले नाही. तो आधीच झी हिंदी - सारेगमप आणि सोनी - इंडियन आयडल मध्ये येऊन गेला होता ना? मग तिसरा चान्स?
झी मराठी - सारेगमप ज्युनियरमध्ये येऊन गेलेल्या (श्रीनिधी घटाटे, भाग्यश्री टिकले, जुईली जोगळेकर आणि संज्योती जगदाळे) चौघीना तर केवळ पुर्वपुण्याई वर घेतले असावे. ज्युनियरमध्ये चमकल्या असल्या तरी त्या अजुनही मोठयांच्या सारेगमप मध्ये गायला योग्य वाटत नाहित.
६ नविन स्पर्धक आणि ८ आधीच्या कार्यक्रमात येऊन गेलेले. बहोत नाइंसाफी है. Happy

अंतिम १४ मध्ये डोंबिवलीचे कौशिक देशपांडे आणि रेश्मा कुलकर्णी हे दोन स्पर्धक असुनही फक्त रेश्मा कुलकर्णीच्या अभिनंदनाचे फलक डोंबिवलीत लागले आहेत. त्या बिचाऱ्या कौशिक देशपांडेचे कोणीच कौतुक करत नाही आहे. Happy

मस्त धागा.....

मला अस वाटत कि या पर्वातील गायकांचे गळे जास्त मंजुळ नसले, तरी प्रशिक्षणामुळे बर, चांगलं गातात.
पाहण जास्त नाही होत, पण तरी जेव्हा पाहते तेव्हा गाणी ऐकून मस्त वाटत.

माझ्या पोस्ट्स दिसत नाहीयेत का? माझ्या प्रश्नांना कोणी उत्तर का देत नाहीये?

१. अंतिम १२ चे १४ कसे झाले?
२. गेल्या आठवड्यात मार्क नसताना रिझल्ट कसा लागला? (अनपेक्षित म्हणजे कोणीतरी उत्तम गाणारा/री गेलं असावं हा माझा अंदाज )

१. अंतिम १२ चे १४ कसे झाले?>>> माझ्या मेमरी नुसार, १२ झाल्यावर पण आपापसात (जज, आयोजक इ. मधे काही चर्चा होऊन अजून २ जणांची निवड केली होती)

२. गेल्या आठवड्यात मार्क नसताना रिझल्ट कसा लागला? (अनपेक्षित म्हणजे कोणीतरी उत्तम गाणारा/री गेलं असावं हा माझा अंदाज )>>> भुंग्याने सोडलेला भुंगा हा गेल्या आठवड्यातील परफॉर्मन्स वर नसून ह्या आठवड्याचे शुटिंग झाले ते पहाण्याचा/त्यातील निकाल कळण्याचा योग त्याला "सासर कृपेने" आल्यामुळे आहे.

रिझल्ट शुटिंगच्या दरम्यान लागलाय आणि त्याला कळलाय. ऑफिशिअली ते भाग आज उद्या आपल्याला पहायला मिळतील

Pages