निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
पलक, या धाग्याप्रमाणेच
पलक,
या धाग्याप्रमाणेच भाज्याही छान वाढतील.
मला प्रा. घाणेकरांचे पुष्पदरी ( व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ) असे छान पुस्तक मिळाले.
ट्रीज ऑफ पुणे पण आणलेय. अजून वाचायचेय पण वरवर चाळता त्यात काही गोष्टी खटकल्या. आसुपाल या झाडालाच अशोक असे नाव दिलेय. खरा अशोक / सीता अशोक पुण्यात नाही का ?
क्रॅब अॅपल ( सुवर्णपत्र ) चे फळ खाद्य असते असे लिहिलेय. ते फळ भारतात फारसे दिसत नाही. पण कोल्हापूर भागात आवर्जून खाल्ल्या जाणार्या अळूच्या फळाचा मात्र खाद्य असा उल्लेख नाही.
चिकूच्या रंगाचे पण आकाराने लहान असे हे फळ उन्हाळ्यातच मिळते. गोडसर कडवट अशी वेगळीच चव असते त्याची. पुण्यात कधी दिसले नाही विकायला ते.
दिनेशदा, तुम्ही उल्लेख केलेले
दिनेशदा, तुम्ही उल्लेख केलेले अळू फळ डोंबिवलीत मिळते उन्हाळ्यात, माझ्या लहान बहिणीला खूप आवडते.
अशी फळे आपण खात राहिली
अशी फळे आपण खात राहिली पाहिजेत. म्हणजे त्यांची झाडे टिकतील.
घाणेकरांच्या पुस्तकात उमललेल्या खर्या ब्रम्हकमळाचा फोटो आहे. मोठ्या पांढर्या पाकळ्यांच्या आत आणखी गर्द जांभळी फुले दिसताहेत. बाकी फोटोही मस्त आहेत.
गेले कुठे सगळे?
गेले कुठे सगळे?
@दिनेश, पुण्याच्या एम्प्रेस
@दिनेश, पुण्याच्या एम्प्रेस गार्डन मध्ये खर्या अशोकाची एक सुंदर वाटिका आहे. पुष्कळ झाडे आहेत तिथे अशोकाची.
आप॑ण नेहमी कुत्र्या मांजराचे
आप॑ण नेहमी कुत्र्या मांजराचे वैर असते असे वाचतो पण माझ्या कॉलनीतल्या आमच्या गल्लीतला एक कुत्रा आहे तो मांजरांचा रक्षणकर्ता आहे. माझ्या घराच्या दोन्ही बाजुला गल्ल्या आहेत. उजवी मांजरांची आणि डावी कुत्र्यांची. कुत्र्यांच्या गल्लीच्या बाजुची घरे कित्येक वर्षे रिकामी होती. दोन वर्षांप्रुवी तिथे लोक राहायला आले. लोक आल्यावर त्यांच्या आडोशाला काही मांजरींनी आपले बस्तान तिथे बसवले आणि मग त्यांची बाळंतपणे सुरू झाली. पिलांना जराशे हातपाय फुटले की ती येतात रस्त्यावर. आणि हा रस्ता तर कुत्र्यांचा.. याच्यावर मांजरीची पिल्ले कशी वाचणार??? तर हा एक ग्रेट कुत्रा कायम मांजरांच्या पिल्लांवर लक्ष ठेऊन राहतो. पिल्ले खेळत राहतात आणि हा शेजारी लोळत पडतो पहा-यावर. दुसरे कुत्रे जवळ आले की त्यांना हुसकावतो. एखादे पिल्लु जरा लांब जायला लागले की भुंकुन त्याला परत बोलावतो आणि घरात जाऊन बसायला सुनावतो. गेले दोन वर्षे त्याच्या हाताखालुन किती बॅची गेल्या पिल्लांच्या देव जाणे....
काल रात्री ऐशु त्याला उरलेले चिकन द्यायला गेली तर त्याने त्यातले थोडे चिकन उचलले आणि दुर बसलेल्या एका कुत्रीला नेउन दिले. तिला काहीतरी आजार आहे, पडुनच असते ती. ह्याने आधी तिला खायला घातले आणि नंतर स्वतः खाल्ले.
सुप्रभात
सुप्रभात लोक्स!!!!
राजगिर्याचे तुरे

अरेव्वा.... राजगिर्याचे तुरे
अरेव्वा.... राजगिर्याचे तुरे इतके सुंदर असतात??? माहित नव्हतं हे.
वा.. सुंदर रे जिप्स्या...
वा.. सुंदर रे जिप्स्या...
जागू, तु दिलेला फोटो बघून मी
जागू, तु दिलेला फोटो बघून मी मिरच्यांच्या बिया टाकल्या रुजायला. पण अजून झाड आलं नाही. :(.
तुती म्हणजेच मलबेरी ना ? स्लर्प !!!!
खाली काळा तरी चमकणारा समुद्र, त्यावर दुबईची झळाळती रोषणाई आणि त्यावर चंद्राचे बिंब व सोबत अनेक चांदण्या... अप्रतिम नजारा.> दिनेशदा, भारीच.
राजगिर्याचे तुरे, भारी ह....
राजगिर्याचे तुरे, भारी ह.... मस्त.
जिप्सी भारीच आहेत तुरे. मी
जिप्सी भारीच आहेत तुरे.
मी ठाण्याच्या झाडांच्या प्रदर्शनातून पालकाचे बी आणलय. बघूया कितपत यश येतय.
लाल भोपळी मिरच्यांचे पण बी आणलय. त्याकरता काही टिप्स आहेत का? त्या मुंबईच्या हवामानात वाढतात ना?
साधने, कमाला आहे. किती पुण्य
साधने, कमाला आहे. किती पुण्य कमावतोय ना?

जिप्स्या, प्रवेशपुष्प छानच. हळदीकुंकु वाटतयं.
प्रवेशपुष्प?? आता हे काय
प्रवेशपुष्प?? आता हे काय असते यार??
रच्याकने, राणीबागेतले मुंबई महापालिकेचे प्रदर्शन पार पडले काय?? मला जायचेय या वर्षी.
राणी बागेतली झाडे फुलली असतील. तीही या निमित्ताने पाहायची आहेत आणि सुप्रसिद्ध बी. मेरवान आणि कंपनीला भेटही द्यायची आहे.
(एका दगडात मी किती पक्षी मारणार आहे??? पक्षी राहिले दुर, दगड फुटायची वेळ यायची...
)
धन्यवाद लोक्स राणीबागेतले
धन्यवाद लोक्स
राणीबागेतले मुंबई महापालिकेचे प्रदर्शन पार पडले काय?? मला जायचेय या वर्षी.>>>>अजुन जाहिरात आली नाही. मी विचारून सांगतो.
राणी बागेतली झाडे फुलली असतील. तीही या निमित्ताने पाहायची आहेत आणि सुप्रसिद्ध बी. मेरवान आणि कंपनीला भेटही द्यायची आहे.>>>>>+२
जिप्स्या, साधना या दिवसात
जिप्स्या, साधना
या दिवसात उर्वशी पण फुलली असेल. राणीच्या बागेत ३ झाडे आहेत. ते प्रदर्शन बहुतेक फेब्रुवारी / मार्च ( आपल्या वसंत ऋतूमधे ) असते.
राजगिर्याचे तूरे छानच.
याच कूळातली कोंबड्याची अनेक झाडे कमला नेहरू पार्कात असतात. राणीच्या बागेत गेलास तर तिथेही जा.
( आणि वाटेत न्यू यॉर्कर, कुल्फीवाला, बाबूलनाथचा ऊंधीयूवाला यांना भेट द्या. मेरवानजीचे केक सकाळीच मिळतात. ते पार्सल करून घ्या. )
प्रवेशपुष्प?? आता हे काय असते
प्रवेशपुष्प?? आता हे काय असते यार??>>>>>>>>>.अग त्याने नि.ग. वर खूप दिवसांनी ह्या फ़ोटोसहीत प्रवेश केला ना? म्हणून म्हटल प्रवेशपुष्प.
वा मस्तच आहेत राजगिरा-तुरे.
वा मस्तच आहेत राजगिरा-तुरे.
मग बेत ठरव की. मी तुला
मग बेत ठरव की. मी तुला कालपासुन फोनेन म्हणतेय.. पण नुसते म्हणतेयच.. बेत ठरव स.कु.स.प. मी आहेच.
मेरवानजीचे केक सकाळीच मिळतात.
मेरवानजीचे केक सकाळीच मिळतात. ते पार्सल करून घ्या. )
आणि काय? अंगोल्याला पाठवायचे काय ??
आणि काय? अंगोल्याला पाठवायचे
आणि काय? अंगोल्याला पाठवायचे काय ?? स्मित>>>>>>>>>.एक एक घास बाजूला काढून बाकीचे संपवा
एक एक >>> असे किती एक काढावे
एक एक >>> असे किती एक काढावे लागतील?
साधनाची १५.२५ची पोस्ट -
साधनाची १५.२५ची पोस्ट - गेल्या जन्मी सज्जन माणूस असावा.
एक एक >>> असे किती एक काढावे
एक एक >>> असे किती एक काढावे लागतील? >>>>माधव,
खा रे तुम्हीच. तुम्ही खाल्ले
खा रे तुम्हीच. तुम्ही खाल्ले काय नि मी खाल्ले काय.. सारखंच.
हिरा, त्या ट्रीज ऑफ पुणे या पुस्तकात बर्यात त्रुटी राहिल्यात असे शांकलीने पण सांगितले.
साधना, तो कुत्रा, त्यांच्यातला संत असणार.
माधव, पालक उगवतो नक्की. (
माधव, पालक उगवतो नक्की. ( त्या बिया बघून शंका येते, पण उगवतो. ) आपल्याकडे पावसाळ्यात लावला तर पाने मोठी होतात.
रावी सुक्या मिरच्यांच्या बिया
रावी सुक्या मिरच्यांच्या बिया टाकल्या तरी उगवतील.
जिप्स्या राजगिर्यांचे तुरे मस्तच. मळ्याच्या मळ्या मंदी कोण ग उभी असे गाण गात होतास का त्या मळ्यात?
गाण गात होतास का त्या
गाण गात होतास का त्या मळ्यात?>>>>हो
त्या मळ्यात माझ्या गळ्यात कॅमेरा होता. 
माळ्याच्या गळ्यामंदी कोण गं
माळ्याच्या गळ्यामंदी कोण गं उभी (कॅमेरीण)
फोटो काढते मी रावजी
रावजी क्लिक नका ना करु
ढापेल कुणीतरी (वॉटरमार्क नसल्यास)
:कैच्याकै: जिप्स्या
या मळ्यात माझ्या गळ्यात
या मळ्यात माझ्या गळ्यात कॅमेरा होता >>> बघा जिप्स्याचा फोकस कसा बदललाय. आधीचा जिप्स्या भरपूर फोटो काढायचा मळ्याचे आणि इथे द्यायचा. आता फक्त एकच ! बोला सियावर योगचंद्र की.....
Pages