निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
दिनेश चा कढीपत्ता.. वॉव..सो
दिनेश चा कढीपत्ता.. वॉव..सो स्वीट!!!!
बाली ट्रिप मस्त झाली ना??? आपा काबार??
सुम्सुम , गाडोगाडो , ताहू, तेंपे ट्राय केलं कि नाही???
मी ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य
मी ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केले तिथे तिथे माझी अशी ओळख राहिली तर आयूष्याचे सार्थक झाले असे वाटेल मला. >>>>> असेच घडणार दिनेशदा तुमच्याबाबत -आणि मुंबईतील कित्येक झाडे तर तुम्हाला मिस करत असतील आत्ता - तुम्ही आफ्रिकेत वास्तव्याला असल्याने ....
दिनेशदा, शशांकजीना अनुमोदन.
दिनेशदा, शशांकजीना अनुमोदन.
वॉव....दिनेशचा
वॉव....दिनेशचा कढीपत्ता.......मस्तच.
शशांकला मोदक!
बालीच्या फोटोंची (माहितीसुद्ध्हा) वाट् पहातोय आम्ही.
हे पोस्ट चांगी, सिंगापूर
हे पोस्ट चांगी, सिंगापूर हून.
बाली ट्रिप मस्तच झाली. भरपूरच भटकलो. आता दोन दिवस मुंबईत खरेदी... मग अंगोला.. आणि मग मायबोली आहेच.
मी ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य
मी ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केले तिथे तिथे माझी अशी ओळख राहिली तर आयूष्याचे सार्थक झाले असे वाटेल मला. >>> दिनेश, तथास्तु
>>मी ज्या ज्या ठिकाणी
>>मी ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केले तिथे तिथे माझी अशी ओळख राहिली तर आयूष्याचे सार्थक झाले असे वाटेल मला. >>>>> कित्ती सुंदर!
दिनेशदा... पुण्यात कधी येताय???
मी ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य
मी ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केले तिथे तिथे माझी अशी ओळख राहिली तर आयूष्याचे सार्थक झाले असे वाटेल मला.>>>+१
परवा आकाशात या अश्या रेघोट्या
परवा आकाशात या अश्या रेघोट्या मारल्या गेल्या होत्या. जेट गेल्यावरच अश्या रेघोट्या ओढल्या जातात ना?
मानुषीताई, मस्तच आहे फोटो.
मानुषीताई, मस्तच आहे फोटो.
ओह अन्जू ....थॅन्क्स!
ओह अन्जू ....थॅन्क्स!
मकर संक्रांतीच्या सर्व नि.ग.
मकर संक्रांतीच्या सर्व नि.ग. करांना हार्दिक शुभेच्छा.
आमच्या झाडावरची तूती.
आमच्या झाडावरची तूती.

वॉव... किती रसरशीत दिसतायत
वॉव... किती रसरशीत दिसतायत तुती! तोंपासु.
किती रसरशीत दिसतायत तुती!
किती रसरशीत दिसतायत तुती!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला. सर्वांना शुभेच्छा.
जागू किती क्युट आणि गोडुली दिसतायत तूती.
ओ!!! वॉव... शहतूत पण आहे
ओ!!! वॉव... शहतूत पण आहे तुझ्याघरी.... ग्रेट!!!
मकर संक्रांतीच्या सगळ्यांना
मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खुप खुप शेभेच्छा!....
जागु, तुती मस्तच!!!
मानुषी, फोटो मस्त, कमाल
मानुषी, फोटो मस्त, कमाल आहे...
सुसकाळ रोज संध्याकाळपासून
सुसकाळ
रोज संध्याकाळपासून हिचा घमघमाट असतो आणि सकाळी सडा.

तुती अग्दी तोंपासु. रातराणी
तुती अग्दी तोंपासु. रातराणी काय बहरलीये.
मानुषी, जागु, मस्त फोटो.
मानुषी, जागु, मस्त फोटो.
४/५ दिवसांपूर्वी कॅनडा गीज
४/५ दिवसांपूर्वी कॅनडा गीज ची एक प्रचंड मोठी ़ झुंड अगदी घरासमोरच असलेल्या प्रचंड मोठ्या गवताळ प्रदेशात उतरली होती. (मायग्रेटेड)अगदी शेकड्यांनी. आणि त्यांचे अत्यंत तार सप्तकात कंटिन्युअस समूहगान चालू होतं.
साधारण बदकासारखेच पण मान थोडी लांब. आणी पाय इतके सुंदर.....मोरपंखी रंगाचे, फताडेच.
एकच काम चा ल्लं होतं. सगळे खाली मुंडी करून गवतात चोची घालघालून ...कुरूकुरू चरत होते.२/३ दिवस खूप पाऊस पडून गेल्याने संपूर्ण गवताळ प्रदेश ओला कच्च झाला होता.
आता हे गवतच खात होते की त्यात काही कीट्क निर्मिती झाल्याने .....किडे खात होते. महिती नाही.
शशांक, दिनेश, ़जागू, साधना............???????????
सगळ्यात मजा.....हा रस्ता पायवाट आहे......जो मेट्रोकडे जातो आणि सदैव रहदारीचा. पण यांना काही भीति नव्ह्ती. अगदी सगळॅकडे मुक्त संचार. आणि एकमेकांशी अगदी अधिकारवाणीने गप्पा छाट्त खादाडी चाललेली.
दुसर्या दिवशी त्याच रस्त्यावर हिरवी विष्ठा खूप ठिकाणी पड्लेली. गायीम्हशींची असावी तसा रंग. आधी वाट्लं कुत्र्याची की ़ काय......पण इथे सगळी कुत्री पाळीवच. आणि त्यांनी रस्त्यात केली तर मालक ते उचलून नेतो.
आणि गायी म्हशी कुठ्ल्या यायला रस्त्यावर? (काय आपलं नगर हाय काय ह्ये आँ?).......
मग लक्षात आलं की आदल्या दिवशी चर चरून .....हे करून ठेऊन जनता पुढल्या प्रवासाला गेली.
खूप फोटो आणि व्हिडिओ ़ क्लिप्स घेतल्या आहेत.
डकवीन इथे.
फ्लेमिंगो बघायाला , भिगवणला
फ्लेमिंगो बघायाला , भिगवणला कोण कोण येणार आहे? हात वर करा. (आणि आता सांगा)
मानुषी, फ़ोटो , फ़ोटो, फ़ोटो.
१७ तारखेला पहाटे खुप सुंदर
१७ तारखेला पहाटे खुप सुंदर दृष्य बघितले. बहुतेक पोर्णिमेच्या आसपासची तिथी होती. चंद्र क्षितिजाजवळ होता पण उजाडायला अवकाश होता. दुबईला विमान उतरताना खुप तिरके झाले होते त्यामूळे खाली काळा तरी चमकणारा समुद्र, त्यावर दुबईची झळाळती रोषणाई आणि त्यावर चंद्राचे बिंब व सोबत अनेक चांदण्या... अप्रतिम नजारा.
बालीला... अनेक देवळे, बोटॅनिकल गार्डन, बर्ड पार्क, ज्वालामुखी..असे बरेच भटकलो... एकेक करुन फोटो टाकतो.
शिवाय अनोखी फळे, फुले आणि
शिवाय अनोखी फळे, फुले आणि झाडेही बघितलीच..
जागू, याच झाडावर रेशमाचे किडे पोसतात. तूला प्रयोग करता येईल. मानुषी या अशा हवेतल्या रेघा इतक्या
संख्येने क्वचितच दिसतात. हवा फार स्थिर होती म्हणायची. आणि आकाराने मोठे पक्षी सहसा माणसांना घाबरत नाहीत. नैरोबीत तर चंदनेश्वर पक्षी भर ट्राफिक जॅममधून पायी फिरतात, गाडीच्या काचेवर आपल्या भल्या मोठ्या चोचीने टकटकही करतात.
त्या पक्ष्यांना विचारायचे
मानुषी.. फोटो टाक ना..कसलं गोड दृष्य दिसलं असेल..
साधना... काश मै भी आ पाती.. जौ दे.. तूच फोटो टाक बरं इथे
मानुषी, मस्त फोटो ! खूप मजा
मानुषी, मस्त फोटो ! खूप मजा चाललेय तर.....
दिनेशदा, छान भटकन्ती चालू आहे.
चंदनेश्वर पक्षी भर ट्राफिक
चंदनेश्वर पक्षी भर ट्राफिक जॅममधून पायी फिरतात, गाडीच्या काचेवर आपल्या भल्या मोठ्या चोचीने टकटकही करतात......दिनेश इन्ट्रेस्टिंग माहिती. आणि हो... बाली फोटो आणि लेखाची
वाट बघतोय
.,' अहो, आमच्या वाटेवरून तुम्ही का चालले आहा?..चलो बाजू हटो..'.... वर्षू...... :स्मितः
शोभा :स्मितः.... टाकतेय फोटो.
मी ह्या १६ धाग्याना॑ inspire
मी ह्या १६ धाग्याना॑ inspire होउन कारले, मेथी, टोमॅटो, पालक, गवार, हिरवी मीरची लावली आहे, अजुन सगळी रोप॑ बालक रुपात आहे. मोठी झाली की फोटो टाकेन.
Pages