निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुचाची माझी बालपणीची लाडकी फुल. मला शालेय जीवना नंतर पुण्यात न्याहाळायला मिळाली. त्यांचा मनमुराद सुगंध इतक्या वर्षांनी घेताना मन बालपणीत ओढ घेत होत. आता आईकडे फक्त ह्याची लहान झाडे आहेत. कधी त्याला फुले लागतील असे झाले आहे. त्यातले एक झाड मी माझ्या घरीही नेऊन लावणार आहे. Happy अजुन लिहायला चालले होते पण हात थांबत नाहीत. म्हटल सावकाशीने ह्यावर आठवणींचा एक लेखच लिहावा.

माझी पण खूप आवडीची ... माझ्या ऑफिसच्या वाटेवर एक झाड आहे... सडा पडलेला असतो ...मी गुच्छ बनवुन ऑफिसला घेउन येते सध्या ... मी लहानपणी ह्याची वेणी बनवाय्चे .... आता अजिबात लक्षात येत नाही कसे ते ...

जागू, सुगंध दरवळला. मी दररोज सकाळी ज्या रस्त्यावरून जाते, तिथेच ह्याचे झाड आहे. काही अंतरावरूनच फ़ुले फ़ुलल्याचा संकेत मिळतो. आणि रस्त्यावर आणि गाड्यांवर फ़ुलांचा सडा असतो. Happy

हे प्राची मी नाही विसरलेय. तिन प्रकारे वेणी येते मला ह्याची. एक सिंगलची, दुसरी डबलची आणि तिसरी चटईची. अरे मला फुलच मिळत नाहीत नाहीतर मी फोटो काढून शिकवले असते. तरी मधुमालतीची फुले मिळाली की मी दाखवते कशी करायची ते. Happy

माझ्या ऑफिसच्या खिडकीबाहेर असलेल्या वडाला ( Ficus bengalensis ) इतकी लालचुटुक फळे लागलीएत की ती खाण्यासाठी त्यावर बुलबुल, कोकीळ, कावळे, धनेश, तांबट, साळुंक्या वगैरे इतक्या प्रकारचे पक्षी येताहेत की कोणीही येणारा-जाणार थबकून पहातोच की कुठला नवीन पक्षी दिसतोय हा....

काल तर जवळ जवळ ८-१० कोकिळ (नर) बसले होते आणि बुलबुल, तांबट यांना उगाचच हाकलत होते...

धनेश तर इतका विचित्र ओरडतो की सगळ्या परिसरात तो कर्कश्श आवाज भरुन रहातो - मग कुठुनसे खूप कावळे येतात आणि त्या धनेशच्या जोडीमागे लागतात, त्यांना पळवून लावतात ...

शशांकजी पक्षांच्या सभेचे स्थान असेल ते >>>>> एक बरंय की त्यांच्यात निवडणुका नसतात ..... नाहीतर ???? Happy Wink

मी निसर्गाच्या गप्पा अगदी पहिल्या भागापासून वाचते आहे, खूप आवडतं मला ईथे वाचयला, नवनविन गोष्टी पाहायला मिळतात . आज पहिल्यांदाच प्रतिसाद देते आहे . आणी दिनेशदा काय माहितीचा साठा आहे हो तुमच्या कडे . १ न॑बर

अजुन खुप हुशार लोक आहेत इथे सगळेच खुप ग्रेट आहात.. मस्त ......

जागू फुलांचा सुगंध दरवळला इथे, माझी आई ह्या फुलांची सुंदर वेणी करायची.

स_सा, मस्त फुले आहेत.

पलक म्हणते ते बरोबर आहे, इथे खूप ग्रेट आणि हुशार माणसे लिहितात त्यामुळे खरंच ज्ञानात भर पडते, विविध फोटोमुळे डोळ्यांनापण तृप्ती मिळते, मलापण इथे येऊन वाचायला आवडते, माहितीचा खजिना आहे इथे. कधी कधी स्वतःची लाजपण वाटते अरे आपल्याला काहीच माहिती नाही असे वाटते.

धन्यवाद, आपल्याकडे असलेली माहिती शेअर करणाऱ्या सर्वांना.

जागु, बुची / आकाश-मोगरा, मस्त. नागपूर ला बरीच झाडं आहेत ह्याची.

शशांक जी, काय मस्त वाटत असेल ना पक्ष्यांची मेहफील बघायला?
वडाचे फुल फार दुर्मीळ असते, ज्या क्षणी दिसले त्याला नमस्कार करावा, लक्ष्मी प्रसन्न होते
अस माझे बाबा सागंतात.

पलक,
इथे नियमित लिहित रहा. आम्हाला निसर्गप्रेमी लोक आवडतात. आणि इथे सर्वचजण छान छान लिहित राहतात.

धनेश बालसंगोपन करण्यात एक्स्पर्ट असतो. त्याच्यासारख्या निष्ठेने क्वचितच कुणी पक्षी हे काम करतो.
त्यामूळे त्याची पिल्ले जगण्याचे प्रमाण जास्त असते. ( कोकणात त्याची शिंगचोच मिळाली तर आवर्जून
बाळंतिणीच्या खोलीत ठेवतात. ) सिंगापूरला त्याला प्रत्यक्ष हात लावायची संधी मिळाली होती.
पापणीवर केस असणारा तो एकमेव पक्षी आहे. ( असे तिथे सांगितले होते. )

शांकली,
करोला पब्लिकेशन पुणे यांच्यातर्फे इंगळहाळीकरांची काही नवीन पुस्तके गेल्या वर्षी येणार होती,
त्यात ट्रीज ऑफ पुणे असे एक पुस्तक होते. माझ्या गेल्या भेटीपर्यंत तरी आली नव्हती. कधी वेळ
मिळाला तर चौकशी करणार का ?

वडाचे फुल फार दुर्मीळ असते, ज्या क्षणी दिसले त्याला नमस्कार करावा, लक्ष्मी प्रसन्न होते
अस माझे बाबा सागंतात. >>>>>> सायली पातुरकर, कृपया दिनेशदांचा हा खालील लेख जरुर वाचणे ---
http://www.maayboli.com/node/23879 उंबरातले किडे-मकोडे
या कुळातील (वड, उंबर, इ. फायकस कुळातील) कुठल्याच झाडाला फुले येत नाहीत .... बाकीची माहिती त्या लेखात दिलेलीच आहे.....

आभार शशांक,
फ्लोरा अँड फॉना ऑफ सिंहगड आणि कोस्टल प्लांट्स ऑफ वेस्टर्न इंडिया अशी पण पुस्तके अपेक्षित होती.

दिनेश दा, अप्रतिम माहिती,वाचुन थक्क व्हायला झाल. हा लेख परत परत वाचते आहे.
खरच मी खुप लकी आहे तुमच्या सारख्या माहान लोकांच्या संपर्कात आले.

धन्यवाद शशंकजी.....

जागू नक्की दाखव वेणी करुन ....
माझ्याकडे मी सध्द्या भरपूर भाजी लावली आहे ... काकडी, कारले, टोंमॅटो, कोबी, मेथी, कोथिंबीर, कांदा, पुदिना, भोंगी मिरची.. इति.....
..पण भोंगी मिरची जगेल असे वाटत नाही आहे... :(...

नविन घरी (रेंटेड) शिफ्ट झालोय,,, इथे घरी झाडाच्या कुंड्या लावायला खुप जागा आहे... फ्लॉवर बेड आहेत प्रत्येक गॅलरीला...
जुन्या ६-७ कुंड्या आहेतही.. झेंडु, तुळस, ब्रह्म कमळ, मोगरा, गुलाब.. अशी झाड आहेत.. पण नव्या ठिकाणी जागा असुनही थेट सुर्यप्रकाश येत नाही .. आधिची झाड ओके आहेत.. नवी भाज्यांची रोपे लावायची आहेत...
कोणती लावावी?
म्हणजे टोमॅटो, वांगी कारलं .. अशी कुठली?

नवी भाज्यांची रोपे लावायची आहेत...
कोणती लावावी? >>>>> दिनेशदाच सांगू शकतील नीट ...... कारण थेट सूर्यप्रकाश येत नाहीये म्हणताय !!

आनंदी, सूर्यप्रकाश हवाच. निदान तीन चार तास तरी हवा.
नाहीतर झाडे नीट वाढत नाहीत. चहा कॉफीसारखी काही झाडेच सावलीत वाढू शकतात.
मनिप्लांट हे पण एक ऑप्शन आहे.
कदाचित मार्च नंतर सूर्यप्रकाश यायची शक्यता आहे. त्यावेळी भाज्या लावता येतील.
सध्या गाजराचे वरचे काप खोचून बघा. तग धरायची शक्यता आहे. त्याची पाने आणि फुलोरेही सुंदर असतात.

जागू - या धाग्याच्या सुरुवातीचा फोटो आणि यंत्र पूजनाची महत्ता हे सगळं एकदम काढून का टाकलंस ???

सुंदर होतं सगळं ते आणि समयोचितही ....

सध्या या धाग्याकडे पहायला कोणाकडे वेळ दिसत नाही बहुधा .....

काल सकाळी सकाळी मला आमच्या ऑफिसच्या ग्राउंड फ्लोअरवरुन फोन आला - ताबडतोब खाली या.. एक पक्षी पडलाय इथे....
असे काही पक्षी- प्राणी दिसले की ऑफिसमधल्या बहुतेकांना वाटतं की - या "पुरंदरे"प्राण्याच्या लगेच लक्षात येईल - याला काय झालंय ते ... Happy Wink
मी ही लगेच गेलो खाली तर एक कोकिळा बसली होती जमिनीवर.... आपल्या पायावर बसलेल्या त्या कोकिळेला पाहूनच मला हुश्श वाटले - मी तिच्या आसपास जाऊन निरीक्षण करु लागलो की कितपत लागलंय ते ... एक - दोन पिसे ही पडली होती तिची ... मी जवळ जाऊ लागलो तर ती भितीने खुरडत खुरडत लांब जाऊ लागली .... मग मी जागेवरच थांबलो - व आसपासच्या लोकांनाही जरा दूर जा म्हणून सांगितले - एखाद दोन मिनिटातच तिने पंख हलवून बघितले व समोरच्याच वडाच्या झाडावर कशीबशी जाऊन बसली..

बराच वेळ तिथे बसून होती ती - मग केव्हातरी उडून गेली असावी...

आमच्या येथील बिल्डिंग्जना बाहेरुन आरश्यासारख्या काचा लावल्यात त्यामुळे सकाळी अनेक पक्षी त्यावर चोची मारत बसतात व मग अनेक घायाळही होतात - तशीच ही कोकीळा घायाळ होऊन पडली असावी असं अनुमान मी काढलं ....

Pages