निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छे शशांक, त्यांच्या पायाशी देखील बसायची लायकी नाही माझी. त्यांच्या ५० वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी फिल्म पण बीबीसीने काढलीय.. ती बघून, जगावे तर असे वाटून गेले.

जागू, आपल्या मिरच्यांची एवढी सवय झालेली असते ना आपल्याला. अंगोला हा पहिला देश जिथे त्या मिळत नाहीत. तश्या बर्‍याच प्रकारच्या मिळतात पण ती चव नाही. तरी बरं मला भाजी / आमटी मिळून अर्धी मिरचीच लागते.

प्रिती, मेथीची पाने कच्ची खाल्ली तरी फार कडू लागत नाहीत. रोप जरा मोठे होऊ द्या.

शोभे पाळीव काय गं हे फु पा?? फोटो>>>>>>>>>>>>पाळीव नाही. सकाळी घरात आलेले होते. आणि जास्त उडता येत नव्हते. म्हणून त्याला मध देण्यात येत आहे. Happy

आणी पाम वर काय आहे?? मध?? >>>>>>>>>>>>>>>> मी ’पाम ट्री’ शोधत बसले. Proud

.. आम्हीही कधी जमेल तसे तुमची गाठ-भेट घेऊन शेखी मिरवू - सुप्रसिद्ध प्राणी, वनस्पती वगैरे शास्त्रज्ञ दिनेशदांबरोबर घालवलेला क्षयज्ञ जंगलातील एक दिवस ..<<<<<<<<<<<<<<<< अनुमोदन! Happy

पुण्यात एका गेटला अशी छोट्या छोट्या कुंड्या लाउन पुर्ण गेट निसर्गमय केला आहे.

दिनेशदा मग तिथे मिर वापरतात का तिखटासाठी

छे गं. मिरे तरी कुठे होतात. आपल्यासारखे मसाले नसतातच आफ्रिकेत. उत्तर आफ्रिकेत ( जो भाग भूमध्य समुद्राच्या जवळ आहे ) तिथे काही मसाले वापरतात. झांजिबार ( टांझानिया ) मधे उत्तम मसाले होतात.
त्यांच्या जेवणात मसाले असतात. इथिओपिया, केनयातही काही प्रमाणात मसाले, जास्त करून मिरच्या
वापरतात. पण एरवी मीठाशिवाय काही नसतेच.
००००००००००००

मी हल्ली काही वेगवेगळ्या फिल्म्स बघत होतो त्यात एक बाब सहज लक्षात आली. एखादा पक्षी घ्या, प्राणी घ्या, त्याला काही कौशल्यं वारश्यानेच मिळालेली असतात. चित्त्याला वेगात पळायला, माकडांना तोल संभाळायला, सुगरणीला घरटे बांधायला... शिकवावे लागत नाही.

सर्व मानव जातीला येतं असं कुठलही कौशल्य / हुनर ( अन्न गिळण्याशिवाय ) नाही. अगदी पोहणे, गाणे सोडा,
पण नीट चालणे, बोलणेही आपल्याला जमत नाही. एखाद्या लहान गटाला असे एखादे कौशल्य असेलही पण
सर्व मानवजातीला मात्र ते नाही. आणि म्हणे आम्ही प्रगत Happy

खरे आहे दिनेशदा.
त्या पक्षा प्राण्यांची, कमाल वाटते.
मुग्यांचे रांगेत चालणे, सुगरणीचा खोपा, कावळ्याचे काड्यांचे घरटे, बुलबुलचे छोट्या काड्यांचे घरटे, आगमाशिचे घर, बिळे सगळ सगळ किती कौशल्याच काम असत.

जागू,
मी कालच ऑस्ट्रेलिया जवळ असलेल्या भल्या मोठ्या प्रवाळाच्या बेटांबद्दलची एक फिल्म बघत होतो.
अगदी ती बेटे कशी निर्माण झाली त्यापासून रोज रात्री तिथे काय नाट्य घड्ते ते दाखवलेय.
तिथल्या छोट्या छोट्या जीवांनी नवीन नवीन गोष्टी शिकून घेतल्यात. तिथला शार्क जमिनीवर चालू शकतो.
गरज पडल्यास आपल्या मेंदूचा काही भाग तात्पुरता बंद करू शकतो.
गोगलगाय एका माशाला भूल देऊन, अख्खा गिळून टाकते.
इतकेच नव्हे तर एकाजागी वाढणारे प्रवाळ एकमेकांच्या हद्दीसाठी चक्क रासायनिक युद्ध लढतात.

http://www.youtube.com/watch?v=b_d3LFvc8HQ

लहान मुलांना भूगोल / जीवशास्त्र शिकवताना अवश्य दाखवाव्यात अश्या फिल्म्स आहेत या.

दिनेशदा -तुम्ही ज्या फिल्म्स इथे सांगत असता त्या बघताना खरोखर भान हरपून जाते ...

कालच मी ती इव्हॉल्यूशन ऑफ स्पीड किती तरी वेळ पहात होतो - केवळ अमेझिंग .....

आता ही नवीन सांगत आहात तीही पाहिन ...

जागू - छोट्या छोट्या कुंड्या लाउन पूर्ण गेट निसर्गमय केलेला मस्तचे... काय काय आयडिया लढवतील ना... ग्रेट ...

शशांक,
थोडे विषादाने लिहितोय. पण आपल्याकडे असा अभ्यास का होत नाही आणि झाला तर तो आपल्याकडच्या
सामान्य लोकांसाठी का सहज उपलब्ध होत नाही ?

भीमाशंकरची शेकरू खार, आपल्याला फक्त ऐकून माहीत असते. तिचा जीवनपट असा का चित्रीत होत नाही.
सोलापूरजवळ नान्नज गावी माळढोकांचे अभयारण्य आहे. ( तिथेही आता ते मोजकेच उरलेत ) गेल्या १० वर्षात
मी मायबोलीवर त्यांचा फोटो बघितल्याचे आठवत नाही.

चंद्रपूरला काही सारस उतरतात. पाच फुट उंच असलेला हा देखणा पक्षी. कुणाच्याच कॅमेराला दिसू नये ?

( आणि ती हार्ड डिस्क बघायला सवड मिळाली कि नाही ? त्यात अश्या बर्‍याच फिल्म्स आहेत. आता लिहितोय त्या पण रेकॉर्ड करून ठेवल्याच आहेत. )

दिनेश दा एव्होल्यूशन ऑफ स्पीड खुपच भन्नाट आहे. मी पोरांना पण दाखवला. खुप मस्त मस्त लिंक्स
देता तुम्ही.आज पण दोन लि़ंक्स दिसतायेत! छान, आज दिवस चांगला जाणार. बघुन प्रतिक्रीया देते.

दिनेशदा मी मागे इथे आणि महाबळेश्वरच्या फोटोच्या धाग्यावरही शेकरूचा फोटो टाकला होता. मला खुप छान दर्शन झाले २-३ दिवस शेकरूचे महाबळेश्वरमध्ये.

धुक्यामुळे फोटो नीट नव्हते आले.

चितमपल्लींनी त्यांच्या एक जुन्या पुस्तकात माळढोक आणि सारसांबद्दल लिहिलेले. ते लिखाण वाचुन हे दोन्ही पक्षी तेव्हाच गडपले असे मला वाटलेले. त्यामुळे आता ते असतील की नाही शंकाच आहे.

आता सगळे संदर्भ आठवत नाहीत पण बहुतेक गेल्याच आठवड्यात रेडिओ १००.७ वर एका माळरानात माळढोकाची एक जोडी एका हौशी संशोधकाला दिसली असा उल्लेख होता. पाहणा-याने लोकेशन मुद्दाम सांगितले नाही कारण मग कॅमेरा घेऊन लोकांच्या झुंडी तिथे लोटतील आणि त्या रेट्यात ती जोडीही नष्ट व्हायला वेळ लागणार नाही अशी त्याला साधार भिती वाटली.

आजच्या सकाळ टुडे मध्ये घोरपडीबद्दल वाचले.

घोरपड सुमारे तासभर पाण्याखाली राहू शकते. पाण्यातील सजीवांवरही घोरपडी उपजीवीका करतात. मासे, मगरींची अंडी त्यांची नवजात पिल्ल यांना आपले भक्ष बनवतात. म्हणून पाणथळ ठिकाणांजवळ जिथे घोरपडी आहेत तिथे जवळ्पास मगरी आहेत असा अंदाज बांधला जातो.

सायली,
मुलांना मुद्दाम दाखवायला हव्यात या क्लीप्स.
यू ट्यूबवर बीबीसी एच डी डॉक्यूमेंटरीज असे सर्च केले तर बरेच काही मिळेल.

साधना,
अतुल धामनकरांच्या महाराष्ट्रातील वन्यजीवन मधे हे दोन्ही पक्षी त्या ठिकाणी आहेत असे लिहिलेय. सारस तर मोठ्या गायी म्हशींना पण हाकलू शकतो. महाराष्ट्रात तो चंद्रपूरमधेच फक्त दिसतो.

जागू,

आपल्याकडे मॉनिटर लिझार्ड नाही दिसत बहुदा. केनयात भरपूर आहेत त्या. त्यातही अनेक प्रकार आहेत.
ते लोक मारून खातातही. शेपटी चवदार असते म्हणे.
सौदी अरेबियातही ( वाळवंटात ) त्या आहेत. तिथे त्याना द्ब्ब म्हणतात. आणि अर्थातच त्या खातातही.

त्या शेकरू आहेत त्या मी गोव्यात बघितल्या होत्या. डिचोली ते सांखळी या रस्त्यावर जे जंगल आहे त्यात.
मायबोलीकर गिरीराज रोज असा प्रवास करायचा. अजूनही मला त्या दिवसांची आठवण येते.
( खरं तर महाराष्ट्रात त्या आता दुर्मिळ झाल्या आहेत. ) तरी त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. बीबीसी चित्रण करते त्यावेळी अगदी घरट्यात कॅमेरा ठेवून चित्रण करते.

आपल्याकडे मॉनिटर लिझार्ड नाही दिसत बहुदा

मॉनिटर लिझार्ड म्हणजे घोरपड असे डिक्शनरीत वाचलेय. आपल्याकडे भरपुर आहेत या घोरपडी. आमच्या कॉलनीत आहेत, माझ्या ऑफिसात पण एक आलेली गेल्या वर्षी. मी पाहिलेली Happy

शेकरू मी निलगिरीच्या जंगलातही पाहिलेत. जागु, त्या भिमाशंकरला भरपुर दिसतात हे मीही ऐकलेय. पण इतरत्रही दिसतात. या एका झाडावरुन दुस-या झाडावर सहज उडी मारतात म्हणुन फ्लाईंग स्क्विरल असेही म्हणतात.

केनयातल्या लिझार्ड नक्षीदार असायच्या. काळ्या रंगावर पिवळी, केशरी नक्षी असायची. सतत जीभ आतबाहेर करत असतात. त्यावरूनच त्यांना भक्ष्याचा अंदाज येतो. डोळे आणि कान मात्र तेवढे तीक्ष्ण नसतात.

त्या शेकरू म्हणे, क्वचितच जमिनीवर उतरतात. सगळे जीवन झाडांवरच जगतात.
पतंगासारखे "पंख" पसरून उडणार्‍या आणखी वेगळ्या.

मी ते वर उल्लेख केलेलं पुस्तक आहे ना, ते पण छान आहे.
महाराष्ट्रातील सर्व अभयारण्याची सूची, तिथे कसे जायचे, काय बघायचे हे तर आहेच शिवाय वन्यजीव कायदा
पण बर्‍याच सविस्तरपणे दिलाय.
आपल्याला शेड्यूल १ / २ वगैरे नुसते ऐकून माहीत असते. या पुस्तकात त्याबद्दलही सविस्तर लिहिलेय.

वॉव, शेकरू ,सारस, मॉनिटर लिझार्ड क्या क्या...

शोभे.. ,'मी ’पाम ट्री’ शोधत बसले' Lol Lol

मला पाम ला मराठी शब्द च आठवेना एकदम, हथेली च आठवत राहिला... Uhoh

सुप्र निगकर्स
मस्त स्नोफॉल एन्जॉय करतीये.
साधारण संध्या. ५ वाजता अंधार पडतो. दिवस खूप छोटा आहे.
पण निसर्गा. ची अद्भुत रूप न्ह्याहाळण्यात मजा येतेय.
आणी मुख्य म्हणजे हवामान खात्याचे अंदाज अगदी पर्फेक्ट !
सुरवातीची बर्फुलं ( हलक्या फ्लरीज) अगदी हळूवार स्वता:भोवती गिरक्या घेत घेत अगदी निवांत तिरक्या तिरक्या
रेषेत खाली येतात. मग जरा जोर वाढला ़ की मात्र स्नोचे चांगले मोठाले चन्क्स अग्दी सरळ. रेषेत खाली येऊन धराशायी होतात.

ह्ळूह्ळू संपूर्ण सभोवताल बघता बघता सफेद होऊन जातं. गुपचुपच!
हे जर रातोरात झालं तर बातमी या कानाची त्या कानालाही कळंत नाही. इतका गुपचुप हा प्रकार चालतो, :स्मितः
नाहीतर आपला पर्जन्यराजा ़ कसा ताशेवाजंत्र्यासह येतो!
बाहेर पार्क केलेल्या गाड्यांवर बर्फ पड्तो आणी मग एकेक गाडी निघून गेल्यावर
वरून छान स्प्रेपेन्टीन्ग केलेल्या आकॄत्यांनी भरलेलं एक भलं मोठं चित्र दिसतं .
बाकी सगळं पांढरं धोप आणी निघून गेलेल्या वाहनांचे रिकामे काळे चौकोन.
लहानपणी वहीवर पिंपळ्पान ठेऊन वरून चाळण आणी ब्रशने केलेलं स्प्रे पेन्टींग आठवलं?

मला पाम ला मराठी शब्द च आठवेना एकदम, हथेली च आठवत राहिला... >>>>>>>.तळवा, तळहात. Happy

मानुषी, काय मस्त वर्णन केलस ग! चित्र अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं. Happy

Thanks Dinesh

बाकी सगळं पांढरं धोप आणी निघून गेलेल्या वाहनांचे रिकामे काळे चौकोन.
लहानपणी वहीवर पिंपळ्पान ठेऊन वरून चाळण आणी ब्रशने केलेलं स्प्रे पेन्टींग आठवलं?>>>
मानुषी, कसलं मस्त वर्णन केलस. अगदी डोळ्यासमोर उभे राहीले ते काळे चौकोन Happy

Pages