निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
अनिल७६ छान लेख!
अनिल७६
छान लेख!
आणि ह्या आठवड्यात अचानक मी
आणि ह्या आठवड्यात अचानक मी लावलेलं जरबेराचं रोप जाळून गेलं. त्या कुंडीतली माती उकरून पाहिली तर त्यात काही बारीक बारीक किडे आणि पांढऱ्या अळ्या(?) दिसल्या. तुळशीच्या कुंडी मधली माती उकरली होती तेव्हा पण असेच किडे दिसले होते.
मला अशी शंका आहे की ही वाळवी असावी. तर ह्या वाळवीवर काय उपाय करता येईल? >>>>> कुंडीतील माती पूर्णपणे बदलणे, नवीन माती टाकण्याआधी कुंडी नीट साफ करुन, कडक उन्हात वाळवून मगच वापरणे.
मानसी / सरीवा तसेच प्राची - स्वागतम् , सुस्वागतम् ......
सध्या पुण्याच्या आसपास ही
सध्या पुण्याच्या आसपास ही मार्खामियाची झाडे फुललेली दिसताहेत.... (सर्व प्र चि आंतरजालावरुन...)
बोटॅनिकल नाव : Markhamia lutea
वा. शेंगा आवडल्या.
वा. शेंगा आवडल्या. पाकळ्यांचा रंग आणि पोतही आवडला. असा ड्रेस कित्ती छान दिसेल.
अगं नाही दिसतं छान असल्या
अगं नाही दिसतं छान असल्या रंगाचा टॉप (किमान मला तरी :फिदी:)
जेंव्हा मी ऑफिसात घातलेला,तेंव्हापासुन माझे सगळे टीममेट्स मला लिंबू लिंबू म्हणुन चिडवतात
रिया उपक्रम खुप खुप छान आहे.
रिया उपक्रम खुप खुप छान आहे. मी ही करेन पुढच्या वर्षी!!!
कल्पनेसाठी धन्स गं!
आपट्याची पाने (गड्डी) आणायची आणि दुसर्या दिवशी जवळ्जवळ सगळे केरात जाते आणि नंतर त्या झाडाकडे बघवत नाही 
लोकांकडे दुर्लक्ष करावे...
लोकांकडे दुर्लक्ष करावे... आपल्याला जे आवडते ती आपली फॅशन.
मी काल शेजारच्या डोंगरावर
मी काल शेजारच्या डोंगरावर फिरायला गेलेले तेव्हा सुरवातीलाच एकजण कांचनाच्या फांद्यांचा मोठ्ठा भारा घेऊन जाताना दिसला. नंतर बघते तर उतरणारे लोक हातात आपट्याच्या फांद्या घेऊन उतरताहेत. वाटेत ठिकठिकाणी आपट्याची लहान झाडे आहेत, ती सगळी ओरबाडलेली होती.
हातात फांद्या घेऊन डोंगर उतरणारे लोकांनी एरवी पेडोंको बचाव हा नारा देत असतात. तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर डोंगरावरची लहान झाडे तोडुन त्याचे इंधन म्हणुन वापर करणारी बेलापुर गावातली गरीब जनता असते. गरीबांनी दोन वेळचे अन्न शिजवण्यासाठी झाडे तोडायची नाहीत हा त्यांचा आग्रह आहे पण त्याचवेळी आपट्यची पाने वाटणे आता कालबाह्य करायला हवे हे त्यांच्या लक्षातही येत नाही.
शशांकजी तुमचा मेसेज उशीरा
शशांकजी तुमचा मेसेज उशीरा पाहीला आणि अतिशय पटला. ह्यावर्षी खरी आपट्याची पाने वाटली पण आमच्याच पाठच्या झाडाची त्यामुळे झाड ओरबडण्याचा प्रकार न करताच.
पिवळी फुले सुंदरच आहेत.
रिया तुझा उपक्रम अतिशय आवडला. पुढच्या वर्षी वटपौर्णिमा व दसर्यालाही अशी प्रतिकात्मक वड व आपट्याच्या पानांचा प्रसार आपण नक्कीच करुया.
शांकली गार्डनमधली फुले सुंदर आहेत.
धन्स लोक्स मी काल कोणाकडुनच
धन्स लोक्स


मी काल कोणाकडुनच आपट्याचे पान घेतले नाही. वाटत तर मी नाहीच!
लोकांना सांगितलं की मला मनापासुन शुभेच्छा द्या.अशी पानं वाटल्याने निसर्गाचा र्हास होतो.. काही जण कुत्सीत हसले. काहींनी तोंड देखलं बर बर म्हणलं आणि काहींना खरच पटलेलं वाटलं. आम्ही इथुन पुढे वाटणार नाही असं एक दोन चिमुरड्या म्हणल्याही
देव करो आणि त्यांनी दिलेला शब्द पाळो .पुढच्या वर्षी पासुन आणखी एकाने जरी हे ठरवलं तरी मी खुष!
एक काका तर मला म्हणे झाडांचं काय घेऊन बसलीयेस? आपण पानं विकत घेणं बंद केलं तर त्या लोकांच पोट कसं भरणार


त्यांना म्हणलं त्या लोकांना इतरही बिझनेस करता येतीलच की आणि तुम्हाला खरच त्यांना मदत करायचीये तर दुसर्या कुठल्या रुपात करा.
पण त्यांनी मला 'फार शहाणी आहेस टाईप्स लूक दिला
जाऊ देत. गेले उडत
पुढच्या वर्षी पासुन आणखी
पुढच्या वर्षी पासुन आणखी एकाने जरी हे ठरवलं तरी मी खुष! >>> ती एक मी नक्कीच आहे गं!
सुप्रसिद्ध साहित्यिक कै श्री
सुप्रसिद्ध साहित्यिक कै श्री व्यंकटेश माडगुळकर यांनी वर्णन केलेली एक व्यक्तिरेखा - "तात्या" आपल्यापैकी बर्याच जणांनी वाचली असेल. झाडाची पाने तोडणे वा निसर्गाला त्रास देणे याबाबत हा तात्या विलक्षण संवेदनशील असतो.
उदा. -
मंगळागौरीला जी पत्री वहातात - त्यासाठी तो पोरीबाळींना दम देत असे - जेवढी लागतात तेवढीच घ्या उगाचच जास्त तोडायची नाही - झाडाला त्रास होतो.
लाजाळूच्या झाडाबरोबर कोणी ती पाने मिटवण्याचा खेळ खेळत असेल तर तात्याला ते अजिबात आवडत नसे.
पायवाटेच्या आसपासच्या गवतातून कोणी पोर जर ते गवत तुडवत गेले तर तात्या पार त्या पोराला दोन दणके घालत असे.
सर्वात ह्रदयद्रावक वर्णन केलंय ते मेंढ्याच्या टकरीने दगड फोडणे - या प्रसंगात. गावोगावी जी मंडळी वेगवेगळी जनावरे घेऊन फिरत असतात, त्यांचे खेळ करुन त्यावर पोट भरत असतात - त्यापैकी मेंढ्याच्या टकरीने दगड फोडणे असा एक खेळ असतो. तात्याला ते पहावत नाही की त्या मेंढ्याला किती त्रास होत असेल या प्रकरणात म्हणून तात्या सरळ त्या दगडासमोर उभा रहातो व त्या धावत येऊन दगड फोडणार्या मेंढ्याचा वार स्वतःवर घेतो व जबर जखमी होतो ....
.....हे सगळे व्यक्तिचित्रण मुळातूनच वाचण्यासारखे आहे - माडगुळकरांनी त्यांच्या खास शैलीत ते असे काही चितारले आहे की आपण वाचताना अवाक होऊन जातो....
अशी अनेक मंडळी नक्कीच असतील ज्यांना या झाडांबद्दल, प्राण्यांबद्दल कमालीचे प्रेम असते - त्यांना काही इजा होऊ नये त्याकरता ते स्वतः तर काळजी घेतातच पण इतरांनाही ही काळजी घ्यायला शिकवत असतात.
(या वेगवेगळ्या सणांना जे कोणी झाडांची पाने, फांद्या ओरबाडतात त्यामुळे या गोष्टीची सहजच आठवण झाली.)
अरे वा ! अभिनंदन.. गेले ४
अरे वा ! अभिनंदन..
गेले ४ दिवस आमच्याकडे ढग दाटून आलेत त्यामूळे नेट गंडलय. ( कोण हसलं ते ? आँ )
आजपण रडत खडत चाललय.
सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा !
दसर्याच्या दुसर्या दिवशी
दसर्याच्या दुसर्या दिवशी फुलबाजारात किंवा तिथल्या उकिरड्यावर बघावे. तोडलेल्यापैकी किमान ६० % डहाळ्या तश्याच पडलेल्या असतात. एक प्रथा ( मूळात आपट्याची पाने शमीला पर्याय म्हणून वापरतात ) म्हणून एखादे पान देणे ठिक आहे पण अशी कत्तल नको.
आपट्याच्या पानांबाद्द्ल शशांक
आपट्याच्या पानांबाद्द्ल शशांक यांनी योग्य म्हटलेय, माझे बहिण-भाऊ आणतच नाहीत मी अगदी थोडी पाने आणते आणि देऊन उरलेली पाने एका डब्यात ठेवते, पोटाच्या विकारावर उपयोगी असतात म्हणून कधी काढा वगैरे केला मुलाला बरे नसेल तर त्यात आपट्याची पाने घालते इतर गोष्टींबरोबर.
आता पुढच्यावर्षी पाने न आणता शुभेच्छाच देईन.
रिया तुझा उपक्रम छान आहे.
ही आमची बाग..
ही आमची बाग..
वा.................
वा.................
कळस भारीच आहे बाग... शशांक
कळस भारीच आहे बाग...
शशांक मस्त आहेत फोटो. त्या फुलांच नाव दिल्याबद्द्ल धन्यवाद
वॉव, कळस - कसली मस्त बाग आहे
वॉव, कळस - कसली मस्त बाग आहे .........
सध्या अजून एक झाड पिवळ्या फुलांनी बहरलेले सगळीकडे दिसते - ते आहे तिकोमा / टिकोमा
Common name: Yellow bells, Yellow trumpet, Yellow-Elder • Hindi: Piliya पीलिया • Kannada: Koranekelar • Tamil: Sonnapatti • Telugu: Pachagotla • Bengali: Chandaprabha • Marathi: Ghanti ful घंटी फुल
Botanical name: Tecoma stans Family: Bignoniaceae (jacaranda family)
(सर्व प्र चि आंतरजालावरुन साभार)
माझ्या ऑफिसात पण आहे
माझ्या ऑफिसात पण आहे तिकोमा... फोटो टाकते नंतर
खुप फोटो पेन्डींग आहेत टाकायचे.. वेळ मिळत नाही अपलोड होत नाहीत इ.इ. कित्ये क कारणे आहेत.
माझ्या घरी अॅडेनियम बहरलाय. त्या चेही फोट टाकते...
१६व्या भागानिमित्त सर्वांचे
१६व्या भागानिमित्त सर्वांचे अभिनंदन!!!!
नामसाधर्म्यामुळे उडालेल्या गोंधळाचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. असाच काहीसा गोंधळ फुलांच्या नामसाध्यर्मामुळेही होत आहे. सध्या शहरातील विविध भागात ब्रह्मकमळे फुलत आहेत; पण ही खरी ब्रह्मकमळे नसून, फड्या निवडुंग जातीतील एक प्रकार आहे. खरे ब्रह्मकमळ हिमालयात 10 हजार फूट उंचीवर उगवते.
शहरात फुलणारी ही फुले आकर्षक आहेत. एका रात्रीत ती मोठ्या संख्येने येतात. एका-एका झाडाला 10-20 फुलांपासून 60-70 फुलेही येतात. त्यामुळे त्याचे अप्रूप वाटते. फुले पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. पण, या फुलाबद्दल आत्मीयता निर्माण झाली आहे ती नामसाधर्म्यामुळे. ब्रह्मकमळाला विशेष महत्त्व आहे, पण हे खरे ब्रह्मकमळ नव्हे, असे श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ""दोन्ही झाडांच्या जातीही वेगळ्या आहेत. खरे ब्रह्मकमळ हिमालयात उगवते. त्याचा वास उग्र असतो. फुललेल्या फुलाचा वास घेतल्यास भोवळही येऊ शकते. तर, पावसाळ्यात शहरात येणारे फुलांचे झाड हे "फड्या निवडुंग" प्रकारातील परदेशी झुडूप आहे. पण इथे मोठ्या प्रमाणात रुजल्याने आता इथलेच झाले आहे. कुणाला कोणत्या नावाने ओळखले जावे, हे आपल्याला ठरवता येत नाही. शहरातील या फुलांना ब्रह्मकमळ नाव कधी पडले सांगता येत नाही, पण नामसाध्यर्मामुळे नागरिकांना हेच खरे ब्रह्मकमळ आहे, असे वाटते.''
(सकाळ, सोमवार, 2 जुलै 2012)
अजून एक पिवळ्या फुलांचे झाड
अजून एक पिवळ्या फुलांचे झाड सध्या खूप बहरात आहे - काशिद (माहिती - http://flowersofindia.net/ येथून साभार व सर्व प्र चि आंतरजालावरून साभार )
Common name: Siamese Senna, Siamese cassia • Hindi: Seemia, Kassod कसोद • Marathi: Kassod • Kannada: Sima tangedu, Hiretangedi, Motovolanyaro • Tamil: Manjal konrai, Manje-konne, Chelumalarkkonrai • Malayalam: Manjakonna, Manjakonnei • Telugu: Sima tangedu, Kurumbi
Botanical name: Senna siamea Family: Caesalpiniaceae (Gulmohar family)
Synonyms: Cassia siamea
http://www.saveranibagh.org/B
http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php या लिंकवर मुंबईच्या राणीच्या बागेतील सर्व झाडांची यादी आहे (इथल्या सर्व जाणकारांना माहिती असेलच हे - जे कोणी नवीन तेथे जाणार असतील त्यांच्या उपयोगी पडेल हे )
मस्तच शशांकजी! जागु हि लिंक
मस्तच शशांकजी!
जागु हि लिंक वरती टाक गो.
कळस, तुमची बाग खूप छान दिसतेय
कळस, तुमची बाग खूप छान दिसतेय
अजून एक पिवळ्या फुलांनी
अजून एक पिवळ्या फुलांनी बहरलेले झाड किंवा झुडुप - तरवड (माहिती www.flowersofindia.net/ येथून साभार व सर्व प्र चि आंतरजालावरुन साभार)
Common name: Glaucous Cassia, Scrambled Egg Tree, Golden Senna, Singapore Shower, Sunshine Tree, Sulphur-flowered senna • Marathi: Motha farvad • Kannada: Adavi tangadi, Bettadavare, Hannorpe • Konkani: सरपुली Sarpuli
Botanical name: [Senna surattensis (Burm.f.) H.S.Irwin & Barneby] Senna surattensis Family: Caesalpiniaceae (Gulmohar family)
Synonyms: Cassia surattensis
मस्त आहेत ही पिवळी
मस्त आहेत ही पिवळी फुले/////
पण ही आता का फुललीत?? वसंतागमनी पिवळा रंग बहरतो ना?????
धन्यवाद शशांकजी. खरे तर
धन्यवाद शशांकजी. खरे तर तुमच्या एका प्रतिसादातील उल्लेखामुळे माझे या गप्पांकडे लक्ष वेधले गेले.सहज माहिती म्हणून-'सारिवा' हे अनंतमूळ या वनस्पतीचे पर्यायी नाव आहे.
कळस फार सुंदर आहे बाग तुमची.
कळस फार सुंदर आहे बाग तुमची. तुम्ही भरपूर मेहनत घेता ह्या बागेवर हे कळून येतच आहे.
शशांकजी सुंदर आहेत फुले.
माझ्या घरातही काही पिवळी फुले
माझ्या घरातही काही पिवळी फुले फुलताहेत. आज उद्याकडे फोटो टाकतो.
( पण कुणालाच ते फुल ओळखता येणार नाही याची खात्री आहे मला. )
Pages