दिनांक : - १० / १० / २०१३
टेन / टेन तेंडुलकर..........
क्रिकेत जगताचा देव.... आजच्या दिवशी १०/१० चा मुहुर्त पकडुन "निवृत्त" झाला. वन डे आणि टी२० मधुन तर सचिन आधीच निवृत्त झालेला परंतु कसोटी मधे खेळत होता. मुंबई मधे होणारी २०० वी कसोटी खेळुन निवृत्त होण्याचा मानस त्याने बीसीसीआय ला पत्र लिहुन कळवला
सचिन चे पत्र बीसीसीआय ला : सौजन्य महाराष्ट्र टाईम्स
भारतासाठी क्रिकेट खेळणं हे माझं स्वप्न होतं आणि हे स्वप्नच मी गेली २४ वर्षे प्रत्यक्ष जगत आलो आहे. मी वयाच्या ११ व्या वर्षापासून क्रिकेटच्या मैदानावर आहे. त्यामुळे क्रिकेटशिवाय माझं जग असेल याची कल्पनाच मी करू शकत नाही. माझ्या देशाचं प्रतिनिधीत्व करण्याची आणि जगभरात खेळण्याची जी संधी मला क्रिकेटमुळे मिळालीय हा माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे. आता माझं सगळ लक्ष माझ्या २०० व्या कसोटीकडे लागलं आहे. ही कसोटी माझ्या घरच्या मातीत खेळून थांबावे, असेच मला मनापासून पाटतेय... असं मनाला भिडणारं निवेदन सचिनने आपल्या पत्रातून केलं आहे.
विच्छा माझी पुरी झाली!
सचिन खरंच भरपूर क्रिकेट खेळून तृप्त झाला आहे. त्यामुळेच त्याने त्याच्या यशस्वी वाटचालीत सगळ्यांनाच वाटेकरी करून घेत आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्याची कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. क्रिकेट हा माझ्या हृदयाचा ठोका आहे आणि वर्षानुवर्षं हा माझा श्वास ताजातवाना ठेवण्यात मला सगळ्यात जास्त सहकार्य बीसीसीआयकडून मिळालं. सदैव माझ्या पाठिशी राहणारे, मला समजून घेणारे आणि कधीही कसलीही अडी न ठेवणारे माझे कुटुंबीयही माझ्या धन्यवादास तेवढेच पात्र आहेत. सर्वात शेवटी आणि सर्वात जास्त आभार मी माझ्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे आणि माझं सुयश चिंतणाऱ्यांचे मानेन. त्यांच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांच्या बळावरच मी यशाचं शिखर गाठू शकलो, असेही सचिनने आपल्या पत्रात नमूद केलंय.
...................................
आज क्रिकेट च्या एका दशावतारी पर्वाचा शेवट झाला.......
८७ च्या WC. पासून cricekt
८७ च्या WC. पासून cricekt कळायला लागलं. त्यानंतर २४ वर्षे सतत माझं cricket वेड हे त्याच्याच
अवती भवती फीरत राहीलं. माझ्या वयाच्या बहुतेक सगळयांचच.
कुठलीही match असो २ प्रश्न नेहेमीचेच असयचे..
१) सचिन खेळतोय का अजुन?
२) सचिन चे कीती झाले?
पण सचिन योग्य वेळी थांबतो आहे असं वाटतं..
देर आये दूरूस्त आये....
देर आये दूरूस्त आये....
सचिनने पत्रकार परिषदेत का
सचिनने पत्रकार परिषदेत का जाहीर केली नाही निवृत्ती? खूप जपून ठेवावा असा प्रसंग झाला असता चाहत्यांसाठी...
आनंदयात्रीना अनुमोदन.
आनंदयात्रीना अनुमोदन.
एका जगज्जेत्याला
एका जगज्जेत्याला निरोप...........
वर्ल्ड कप सुरू असताना खालील लेख क्रिकइन्फोवर प्रसिद्ध झाला होता..........'सचिन इफेक्ट'वर प्रत्येकाने वाचावा असा अतिशय उत्कृष्ट लेख....
http://www.espncricinfo.com/magazine/content/story/509803.html
माझं cricket वेड हे
माझं cricket वेड हे त्याच्याच
अवती भवती फीरत राहीलं. >>>>>>> अगदी अगदी.
मैने तो आजके बाद क्रिकेट नही
मैने तो आजके बाद क्रिकेट नही देखुंगी
मी फक्त सचिनसाठीच मॅच बघायचे
एका पर्वाचा अंत झाला. क्रिकेट
एका पर्वाचा अंत झाला. क्रिकेट म्हणजे तेंडुलकर एवढचं माहिती होतं पूर्वी. साहेबांचा खेळ तर नुसता पाहतच बसावा असा. ९१-९२ पासून साहेबांच खेळ पाह्तोय, एकेक इनिंग्स सुरेख असायच्या.
गोलंदाजी-क्षेत्ररक्षणात पण माहिर होते. जंटलमन क्रिकेटर एकदम.
कितीही वादविवाद झाले, त्याच्या खेळाबद्द्ल, ग्रेटनेस बद्दल, मॅचविनर बदल तरी सर्वोत्कृष्ट क्रिकेटर्स पैकी एक आहे हे मान्य करावे लागेल. २४ वर्षं सतत उत्तम कामगिरीचे प्रदर्शन करणं अवघड असतं. माझ्या दृष्टीने तो देवापेक्षा 'सखा/प्रेरणास्थान.. तेंडल्या' होता/आहे/
पण नंतर उतरती कळा लागली जे साहजिक आहे. पण वाईट एवढचं वाटतयं की त्याला निवृत्ती घेण्यासाठी दबाव यायची वेळ यावी लागली.
शेवटी एवढचं की 'तेंडल्या' नसणार आत्ता कसोटी संघात.
फिक्सिंगमुळे क्रिकेट पाहणे
फिक्सिंगमुळे क्रिकेट पाहणे आणि खेळण सोडूनच दिलेलं. आता पूर्ण विराम मिळाला.
माझं cricket वेड हे त्याच्याच
माझं cricket वेड हे त्याच्याच अवती भवती फीरत राहीलं. >>>++११ मि तर सचिन खेळत असेल पर्यंतच क्रिकेट पाहायचि .
फेसबुक वरुन सभारः- सचिन आज
फेसबुक वरुन सभारः-
सचिन आज ऐकलं
तू निवृत्त होणार..
पण तुला कल्पना आहे का?
पुढे काय काय होणार?
गल्ली-क्रिकेट बंद होणार
मैदानातला जल्लोष संपणार
टी.व्ही वर क्रिकेट नाही लागणार
कुणी शंभर नंतर शंख नाही वाजवणार...
ऐक सचिन,
तुझ्या नंतर काय होणार?
कुणाला फलंदाजाच स्वप्न नाही पडणार
तूला बाद केल म्हणून
कुणी मैदानात नाही रडणार
कुणाच शतक पाहायला
ट्रेन नाही थांबणार
कुणी ९९ वर असताना श्वास
नाही थांबणार
ऐक सचिन,
तुझ्या नंतर काय होणार?
कुणी कुणाला कॉपी नाही करणार
तुझ्यासारखे फटके कुणास नाही जमणार
रिचर्डसनना मीच खेळतोय अस
नाही वाटणार
लाराला आपला मुलगा असा व्हावा नाह
खरतर विराट,धोनी ,युवराज खेळतील खूप
सुंदर
पण ते कोणासाठी जिंकणार ?
ऐक सचिन,
तुझ्या नंतर काय होणार?
शेवटच्या सामन्यात खेळशील तेव्हा
चेंडू आपोआप तुझ्याजवळ येणार
bat तुला बिलगणार..
सीमारेषा मुक्याने हुंदके देणार..
सारे मैदान उभा राहणार..
तुला सलाम ठोकणार...
अन क्रिकेट...क्रिकेट इतिहास
जमा होणार...
फारच भावनाविवश करणारी बातमी
फारच भावनाविवश करणारी बातमी आहे. निवृत्ती हा फार मोठा शब्द आहे माझ्यासाठी. निदान सचिनच्या बाबतीत तरी. जेव्हा सचिन मास्टर ब्लास्टर होता तेव्हा अवघा विशितला होता.. नंतर झंझावातासारखा खेळला, सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि आता राजासारखा निवृत्त होतोय. खरंतर लता, सचिन, अमिताभ हे लोक कायम आपल्या अवतीभवती खेळत, गात, अभिनय करत असावेत असं वाटतं. कारण त्यांच्यावरचं रसिकांचं प्रेम हे अलोट आहे आणि त्यामूळे यांना अमरत्व प्राप्त झालं आहे. त्यांची कारकिर्द कधी काळी संपेल हे मनाला पटत नाही.
know सचिन, know
know सचिन, know क्रिकेट....
no सचिन, no क्रिकेट...
गिरी हे एफबी वर टाकू का? (आय
गिरी
हे एफबी वर टाकू का?
(आय मीन ढापू का ? )
@ सुनटुन्या अगदी
@ सुनटुन्या
अगदी "फिक्सिंगमुळे क्रिकेट पाहणे सोडूनच दिलेलं. आता पूर्ण विराम मिळाला." हेच म्हणातला आलो होतो...