मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - रांगोळी" १७ सप्टेंबर

Submitted by संयोजक on 31 August, 2013 - 10:08

मोठ्ठी मोठ्ठी घरं, सारवलेलं अंगण आणि त्यावरची सुबकशी रांगोळी.. यथावकाश घरं आटोपशीर झाली, अंगणं हरवली, रांगोळीही काढण्या ऐवजी चिकटवता यायला लागली... पण रांगोळीची सुबकता कधीच कमी झाली नाही.

याच सुबकतेला माबोकरांसमोर मांडा आणि खेळा खेळ झब्बू रांगोळींचे.

नेमकं करायचंय काय? तर तुम्ही काढलेल्या, पाहिलेल्या,प्रसंगी बनवलेल्या देखील रांगोळींचे फोटोज इथे टाकायचेत आणि एकमेकांना झब्बू द्यायचेत.

हे लक्षात ठेवा :
१.फोटो ओरिजनल हवा, एडिट केलेला किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.

आजचा विषय - रांगोळी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

फरशीवर रांगोळी छान दिसावी म्हणुन काव वापरतात जयु... काव तुळशीवृंदावन रंगवण्यासाठी देखील वापरतात. ती पावडर / खडा स्वरुपात मिळते. पाण्यात कालवुन कापडी बोळ्याने वै. आपण ती लावु शकतो Happy

ठाण्यात गुढीपाडव्याच्या आदल्या संध्याकाळी न्यू इंग्लिश स्कूलचे मैदान, गावदेवी मैदान इत्यादी ठिकाणी संस्कार भारतीच्या मोठमोठ्या - अगदी मैदानभरून मोठ्या रांगोळ्या काढतात. त्यातलीच ही एक रांगोळी.

rangoli - 1.jpg

Pages