अंकुश सावंत कालपासूनच उदास होतो. सालाबाद प्रमाणे याही वर्षी दहीहंडी उत्सव आलेलो. तेच्या आवशीन अंकुशाक कधी दहीहंड्येक जावूक दिल्यान नाय. “बाकीच्यान्का चार चार प्वारा आसत, माजो एकलोच आसा” ह्या तिचा म्हणणा. अंकुश शिकलो, मोठ्या कंपनीत सायेब झालो तरी तेच्या मनातलो सल काय जावूक नाय. भायेर लाऊडस्पीकरवरून “मच गया शोर” गाणा लागला की भूतूर अंकुश पाण्याभायेरल्या मासोळीसारखो फडफडायचो. अंकुश ल्हान असताना सावतीन तेका तेच्या मामाकडे धाडून देयची. अंकुशचो मामा चाळ्येत नाय तर येका कोलनेत रवायचो. थयसर ह्या दहीहांडेचा धुमशान नवता. आतापन चेहरो पाडून बसलेल्या तेका बघान सावतीनीने त्वांड सोडल्यान.
“शिरा पडो मेल्याच्या तोंडार. चाळीस वरशाचो बापयो झालो तरी ह्येचो थिल्लरपणा जावूक नाय. सोता दोन पोरांचो बापूस झालंस, आतातरी अक्कल शिक्. सुखासुखी जीव कित्या धोक्यात घालुचा. काय हात-पाय मोड्लो तर किती भारी पडतला?”
“दहीहंड्येक गेलो नाय तर काय हात मोडूचो रवलो? दोनी हातांका येक-येकदा प्लाष्टर पडूचा ता पडलाच ना?” अंकुशने आपली बाजू मांडूचो प्रयत्न केलो.
“मेलो त्वांड वर करान ब्वालता. सरळ रस्त्यांन जाताना हात मोडून घेतस, तर हंडयेर चडान काय मोडून घेतला आस्तास?”
सावतीन बोलायला कोणाक हार जावची नाय. अंकुशचो बापूस देवमाणूस. तो आवशी-लेकराच्या भांडणात कदी पडूक नाय. कदी परसंग पडलोच तर बायलेची बाजू घ्यायची तेका म्हायती.
“तो गायकराचो बंडू आठ म्हयने लोळोगोळो होवून पडलो होतो. मेलो तेवा तो पण सुटलो आनी तेच्या घरातले पण सुटले.” सावतीन तीची बाजू सोडूका तयार नवती.
“खालच्या चौकाक तेचा नाव दिल्यांनी. अमर झालो बंडू. नायतर तीशीमदे टीबी नायतर एड्स ने काय कमी पोरगे मेले हयसरले?”
“जल्ला मेला लक्षान, मरान अमर होवचा आसा हेका. दर वर्षाक पेप्रात बातमी येता. ४ मेले, १७ जख्मी झाले. काय म्हणान ह्यो अघोरीपणा करुचो.” सावतीन कळवळली.
“काय म्हणान लोका एवरेस्ट चढतत? काय म्हणान पावसाळ्यात ट्रेकिंग करतत? थयसर नाय जीव धोक्यात जात?” अंकुश ने एकदम वर्मार बोट ठेवल्यान. सावतीनीचो लाडको जावई ट्रेकिंग करता ह्येचो तिका खूप अभिमान होतो. “दर दिवशी १७ लोका लोकल खाली मरतत तर काय लोकल ने जावचा नाय?” अंकुशचो आवाज चढलो.
अंकुशची बायको भायेर येवून सासयेक भूतूर घेवून गेली. शब्दान शब्द वाढतलो आनी कोनी पड घेवचा नाय ह्या तिका अनुभवान म्हायत होता. अंकुश आतल्या आत धुमसत रवलो.
दर वर्षी दहीहंड्येच्या आधी-नंतर पेपर भरून जातत. हंड्येच्या थरापेक्षा बक्षिसाची रक्कम जास्त उंच होते. पोराबाळांच्या जीवावर राजकारणी स्वताची प्रसिद्धी करून घेतत. पण फक्त तेंका दोष देवून चालाचा नाय. मायझये राजकारणी नेते तर आयत्या बिळावरचे नागोबा. पण तेनी बक्षिसा नाय लावली तरीपण आदी दहीहंडी मंडळा होती आनी पुडेपण रवतली. रवतलो ६-७-८ थर लावचो थरार. या सपक अळणी आयुष्यामध्ये थोडो बदल होतलो. या हंडयेर चढणारे कोनी कुरिअर बॉय आसा तर कोनी हॉस्पिटल मधे वार्ड बॉय, कोनी शिपाई आसा तर कोनी रिक्षावालो. आंड कुटलेल्या बैलासारखे गप्-गुमान मान खाली घालून संसाराचो गाडो ओढणाऱ्या या लोकांका त्यांच्या जिवंतपणाची जाणीव फक्त अशा सणामधून तर व्हता. उच्चभ्रू समाज कितीपण टीका करांदे, ही लोका अशीच दहीहंडी चडतली आनी अशीच गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत वेडीवाकडी नाचतली.
अंकुशचो पाच वर्शाचो पोरगो टीवी समोर बसलेलो.
“रे बाळा, दहीहंडी बघूक येतस?” अंकुशने विचारलं
“नाय पप्पा, शीन-चान चं पिच्चर लागणार आहे.”
“अरे चल, तुला कृष्णाची गोष्ट सांगतो. तो कशी मस्ती करायचा आनी त्याची आई कशी त्याला शिक्षा करायची ते सांगतो. बाहेर बघ कशी धमाल चालू आहे.”
भगवी टी-शर्ट घालून आनी डोक्याला रिबीन बांधून दोघेही बाहेर पडले.
“चल तुला आपली संस्कृती दाखवतो” पोराला खांद्यावर घेत अंकुश म्हणाला. मुंबईच्या प्रदुषित हवेत पण त्याने एक मोठठा मोकळा श्वास घेतला.
दही हंडी
Submitted by व्यत्यय on 30 August, 2013 - 02:47
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<तेच्या आवशीन अंकुशला कधी
<तेच्या आवशीन अंकुशला कधी दहीहंड्येक जावूक दिल्यान नाय.> अंकुशाक हवे का? मुंबईत माझ्या कानांवर पडलेल्या मालवणीच्या तुटपुंज्या बळावर विचारायचे धाडस करतोय.
शेवट आवडला
शेवट आवडला
“चल तुला आपली संस्कृती
“चल तुला आपली संस्कृती दाखवतो” >> खरा असा ... माका आवडलो.
छान!
छान!
ह्या रत्न खंय दडुन ह्रवलेला?
ह्या रत्न खंय दडुन ह्रवलेला?
धन्यवाद
धन्यवाद
(No subject)
टग्या, मेल्या मस्त लिवलंस.
टग्या, मेल्या मस्त लिवलंस.
अंकुशाक हवे का >> बरोबर मयेकर
मस्त. शेवटाक मालवणी इसारलो
मस्त. शेवटाक मालवणी इसारलो काय अंकुश?
लय भारी
लय भारी
आवडली!
आवडली!