नवीन मराठी चित्रपट-'दुनियादारी'

Submitted by मी मधुरा on 17 December, 2012 - 11:10

'दुनियादारी' नावाचे सुहास शिरवळकरांचे पुस्तक होते. त्यावर आधारित एक नवा मराठी चित्रपट घेऊन संजय जाधव येणार असल्याचे कळले आहे.
त्यात 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' मधला 'घना/घनश्याम' उर्फ स्वप्नील जोशी असून सई ताम्हणकर आणि उर्मिला कानेटकर या दोघी देखील असल्याची बातमी कळली आहे. सध्या त्या चित्रपटाच शुटींग सध्याच चालू झाल आहे. ह्या चित्रपटाची कथा कॉलेज वयीन मुलांची असून लव त्र्यान्गल ची कथा आहे.

१९ जुलै २०१३ ला हा सिनेमा येणार आहे.
आशा आहे, कि मराठीतला हा सिनेमा तरी चांगली करमणूक करेल.....!!!!

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरणु, छोटी धन्यवाद!!!

बाकिचे,

सिनेमा अजुनहि हाउसफुल आहे. या वरुन ठरवा काय ते!!! Proud Proud

संपुर्ण शहरात एकच सिनेमा हॉल मधे एखादा दुसरा शोच चालु आहे .. मग हाउसफुल्ल नाही होणार का ?

वर तो चित्रपट सुप्रसिध्द सुशि यांच्या कादंबरीवरुन बेतलेला आहे... मराठी माणुस बघणारच अश्या चित्रपटाला...

असा ही मी हा टिव्हीवर आल्यावर बघेन........ पोट सुटलेला स्वप्निल आणि थोराड सई थिएटर च्या मोठ्या पडद्यावर जरा जास्तच अति वाटतात त्यापेक्षा.........छोट्याश्या टिव्हीच्या स्क्रिन वर बघितला तर थोडा कमी जाड दिसेल स्वप्निल आणि सई.. Wink
.
.
खास त्यासाठी मला बाजुवाल्याच्या घरी जाउन बघावा लागेल...त्यांच्या कडे छोट्यास्क्रिन चा टिव्ही आहे ना....

आम्ही गरिब माणस Sad चुकुन मोठ्या स्क्रिन चा टिव्ही घेतला )

Biggrin

संपुर्ण शहरात एकच सिनेमा हॉल मधे एखादा दुसरा शोच चालु आहे .. मग हाउसफुल्ल नाही होणार का ?>>>> काल अभिरुची ला रेग्यूलर ५ शो सोडून १ शो जादा होता....तरीही हाउसफुल्ल....सिटी प्राईड कोथरूड चे दुपारचे दोन्ही शो हाउसफुल्ल.....राहूल चे ही दुपारचे दोन्ही शो हाउसफुल्ल.....

दुनियादारी नका वाचु.
फक्त त्याची प्रस्तावना वाचा.
सुशीनी अल्फा मराठी वर आलेल्या सिरियलीचेही वाभाडे काढलेत..

थोडी आकडेवारी-
दुनियादारी रिलीज झाला त्यादिवशी चित्रपटगृहचालकांनी पुण्यात जेमतेम १४ शो लावले होते. त्यानंतर च्या वीकेंडला, आणि नंतरच्याच्या आठवड्यात हाऊसफुलच्या रेट्यामुळे ती संख्या ६८ शोपर्यंत वाढली. आता दुनियादारी रिलीज होऊन दोन आठवडे झाल्यानंतरही ४४ खेळ प्रतिदिन चालू आहेत. मराठीच काय, पण हिंदी चित्रपटसंदर्भातही असं उदाहरण गेल्या काही वर्षांत तरी मला आठवत नाही. आठवत असेल तर सांगा.

तुलनेसाठी हे बघा- चेन्नई एक्सप्रेसचे एक आठवड्यानंतर अंदाजे १०० शो चालू आहेत. (बजेट, स्टारकास्ट, फॅन फॉलोईंग, वितरण व्यवस्था- या सार्‍या बाबतीत चे.ए. कित्येकपट जास्त आहे, भव्य आहे- हे लक्षात घ्यायला हवं).

दुनियादारीबद्दल खूप लिहून बोलून झालंय, त्यामुळे नो कॉमेंट. पण बॉक्स ऑफिसवर असा करिश्मा एखाद्याच सिनेम्याच्या वाट्याला येतो, हे जरी लक्षात घेतलं, तरी मराठी सिनेम्याचं वातावरण सुधारायला (मोठे निर्माते आणि बॅनर्स येतील, वितरकांचा आणि चित्रपटगृहचालकांचा माईंड्सेट बदलेल, जास्त प्रेक्षक वळतील.. इ.इ.) मदत होईल हे नक्की. लोक वाचायला प्रवृत्त होऊन पुस्तकांचा खप वाढणे, सिनेम्याच्या बाबतीत इतर भाषांच्या तुलनेत सतत असलेला एक प्रकारचा न्युनग्ण्ड कमी होणे, गेला बाजार लेखकांना आणि सुप्रसिद्ध कथा-कादंबर्‍यांना चांगले दिवस येणे- यासारखे बोनस. Happy

साजिरा सहमत...
काल पुन्हा पाहिली मी दुनियादारी.. दुसर्‍यांदा.. अर्थात फुल्ल हाऊस.. आमच्याकडच्या एक्स्ट्रा तिकिट ब्लॅक केले असते तरी तिप्पट किंमतील्ला गेल्या असत्या.. थिएटरमध्ये टाळ्या शिट्ट्या गोंधळ अनुभवणे हे सुख तर होतेच.. पण एक अभिमानाची गोष्ट इथे आवर्जून सांगू इच्छितो.. चक्क अमराठी प्रेक्षक देखील दुनियादारी करायला आले होते. Happy

स्वप्निल जोशीला बघणे,,तेही कॉलेजकुमारच्या वेषात (४०-४५ चा बाप्या) ही शिक्षा सोडली तर चित्रपट छान आहे.

हिंदी आणि रीजनलचे प्रेक्षकांची तुलना करन कठीण आहे.
मराठी सिनेमाचा प्रेक्षक फक्त मराठी आणि फारतर महाराष्त्रातील काही अमराठी. पण हिंदीचे पुर्ण देशभरचे. तरीही दुनियादात्रीने चांगलाच बिझीनेस केला.

http://www.youtube.com/watch?v=aawe47NVybU

ज्यांना पहायचा आहे आणि पाहता आलेला नाही त्यांनी आणि ज्यांनी पाहिलेलाच नाही त्यांच्याकरता!!! पहा...नेट वर आलाय.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/duniyadari-influences-makita-na...

सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार - दुनियादारी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - संजय जाधव दुनियादारी
सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून) - अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी (दुनियादारी) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - सई ताम्हणकर (दुनियादारी), सहाय्यक अभिनेता - हृषिकेश जोशी (आजचा दिवस माझा), सहाय्यक अभिनेत्री - सई (अनुमती)

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र! Sad

duniyadari-influences-makita-na...>>>>
ये तो होनाही था.... Happy

सहाय्यक अभिनेत्री - सई (अनुमती)
>> यांना सहाय्यक अभिनेत्रीसाठी अनुमतीमधली सई दिसली पण सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी अनुमतीतील विक्रम गोखले नाही दिसले का?

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - सई ताम्हणकर (दुनियादारी), ??

७२ मैल नावाचा एक चित्रपट पाहिला ... दुनियादारी च्या ओंगळ सई पेक्षा त्यामधली स्मिता तांबे ची भुमिका सशक्त होती..

.म्हणजे हे पुरस्कार फक्त झी च्या चित्रपटांसाठीच होते कि काय?>>> आता एवढबी सन्त्र सोलुन द्यु होय.
अहो पुरस्कार देणारे तेच आहेत.
मग वर्चस्व त्यांचच राहणार की...