साम्यस्थळे :
१) केवळ उच्च दर्जाचे तंत्र वापरले की पटकथेत आणि दिग्दर्शनात कितीही माती खाल्ली तरी चालते याविषयी चित्रकर्ते ठाम असणे
२) गाजलेल्या पात्रांच्या (पक्षी : तात्या विंचू आणि superman) पूर्वपुण्याई वर प्रेक्षकांना गृहीत धरणे आणि यापूर्वीच्या कामगिरीवर बोळा फिरवणे
३) पहिल्या वीसेक मिनिटातच सिनेमा सोडून जाण्याची उबळ आणणे
४) खलनायकांचा महाभुक्कड मुंडी-मृत्यू : तात्या विंचूच्या मृत्युसाठी 'भुवयांच्या मधोमध' वगैरे गोष्टींची गरज असताना तो जनरल मुंडी कापून मरतो आणि दुसरीकडे अंतराळभर फिरून येउन आणि superman ने झॉड झॉड झोडल्यानंतर सुद्धा जिवंत असलेला झॉड अखेर फक्त superman कडून मुंडी मुरगळून घेऊन मरतो. हर हर !!!
५) दोन्हीकडे हिरो शेवटी किती वरखाली करतात याची गणती नाही.
६) दोन्ही सिनेमात हिरोला अभिनय करता यावा असा आग्रह / अट / निकड अजिबात नाही. ("चांगला दिसतो आहेस. लई झाले. चल राहा उभा कॅमेऱ्यासमोर" - इति दिग्दर्शक )
फरक :
१) झपाटलेला फक्त हजार स्क्वेअर फुटात उरकलाय आणि man of steel त्रिलोकात आणि त्रिकालात घुमवून आणतो.
२) झपाटलेला मध्ये लक्ष्यासारख्या उत्कृष्ट माणूस नसल्यामुळे आपण हळहळतो (तेव्हढाच बुडत्याला काडीचा आधार झाला असता ) आणि दुसरीकडे रसेल क्रो सारखा उत्कृष्ट अभिनेता इतका टिनपाट रोल का करत आहे म्हणून हळहळतो. खरे म्हणजे क्रोच्या जागी आपले अनिल धवन, किरण कुमार किंवा आलोकनाथ असते तरी फरक पडला नसता असा रोल आहे हा.
३) झपाटलेला २ मराठी असल्याने त्यावर टीका (किंवा अनुल्लेखाने मारणे ) अटळ आणि Man of Steel ची सर्वांकडून स्तुती मस्ट
*********************************************************************************************************************
झपाटलेला पाहण्यापूर्वीच तो वाईट आहे हे कळले होते पण मराठी सिनेमाचा झेंडा खांद्यावर घेतला असल्याने सिनेमा चुकवणे शक्य नव्हते. (प्रत्यक्षात तो वाईटच्या ही खालच्या दर्जाचा निघाला हा भाग अलाहिदा (3D इफेक्ट मात्र खरच झकास आहेत)). पण नोलानच्या सिनेमा कडून मात्र ही अपेक्षा नव्हती (भले तो दिग्दर्शक नसेना का). खरे म्हणजे या सिनेमाच्या टीमच्या किंवा location च्या दीडशे कि. मी. परिघात सुद्धा तो फिरकला असेल यावर विश्वास बसत नाही हा सिनेमा पाहून. रसेल क्रो मेल्यानंतर ये जा काय करतो, DNA च काय एकत्र करून ठेवलेले असतात, crypton वासी डोक्यावरच्या कवचाची काढ घाल काय करतात, मधेच डोळ्यातून सोयीने लेजर काय सोडतात, मिल्ट्रीवाला एलियन बाईशी चाकूने काय लढायला बघतो, superman ला घेऊन काय जातात, झोपवतात काय, तो जागाच काय होतो, त्याला पृथ्वीवासियांचे उमाळेच काय येतात, पडणाऱ्या बिल्डिंगा लोक Imax मध्ये 4 D सिनेमा पाहिल्यागत शेजारी उभे राहून बघत काय बसतात, एलियन्समध्ये किस केल्यावर वेगळेच काहीतरी होते वगैरे काहीतरी superman काय बरळतो, मधेच सैनिक बाई superman ला सेक्सी काय म्हणते.... भयाण !!! संबंधच नाही काही ..
मस्त तौलनिक अभ्यास आहे. तरीपण
मस्त तौलनिक अभ्यास आहे. तरीपण पण इथली मंडळी मॅन ऑफ स्टील लयी भारी म्हणतील , काय करणार ....... १५० वर्ष ........
गावरान कथेमध्ये अस्सल
गावरान कथेमध्ये अस्सल गावरानपणा आणणे कठीण असतं ,भुताटकीच्या चित्रपटात प्रेक्षकांना घाबरवणारी अस्सल भुताटकी दाखवणंही कठीण .
अभ्यास चांगला आहे. अवांतर :-
अभ्यास चांगला आहे.
अवांतर :- चित्रपट समिक्षा या विषयाचे प्राध्यापक त्यांच्या विद्यार्थ्यांना म्हणतात," अरे कधीतरी अभ्यास करा रे, नुस्तेच चित्रपट बघता" ...
बाय द वे, तुम्ही पण चित्रपट विषयात पदवी वगैरे घेताय की काय
तौलनिक अभ्यासासाठी केलेली
तौलनिक अभ्यासासाठी केलेली निवड भारी
(No subject)
(No subject)
(No subject)
जबरी !! >>प्रत्यक्षात तो
जबरी !!
>>प्रत्यक्षात तो वाईटच्या ही खालच्या दर्जाचा निघाला हा भाग अलाहिदा (3D इफेक्ट मात्र खरच झकास आहेत)<<
- अनुमोदन !!
टिपी म्हणून वाचायला मजा आली.
टिपी म्हणून वाचायला मजा आली.
झपाटलेला मी अजून बघितला नाहीये त्यामुळे त्या विषयी काही लिहू नाही शकत पण सुपरमॅनचे म्हणाल तर ते कॉमिक्स मधले सुपर हिरो कॅरॅक्टर आहे त्यात रियॅलिटी किंवा रियॅलिटीच्या जवळ जाणारे लॉजिक शोधून कसं चालेल?
मी जुन्या सुपरमॅनचा फॅन आहे त्यामुळे जुन्या सुपरमॅनला जो एक लाईट एंटरटेनमेंटचा फील होता तो मी मिस केला ह्या चित्रपटात. खुप डार्क झालाय खरा सिनेमा पण नोलनचे सहसा पोट्रेयल तसच असतं पण ग्राफिक्स तुफान आहेत. मला तर बघायला मजा आली सुपरमॅन.
@विजय देशमुख : पदवी वगैरे
@विजय देशमुख : पदवी वगैरे नाही हो, पण जरुरी पेक्षा जास्त चिकित्सा करून मापं काढायची खोड जडलीये...
@वैद्य बुवा : मी पण टीपी म्हणूनच लिहिले असले तरी नोलान कडून असा कचरा अपेक्षित नव्हता.
आणि डार्क वगैरे तर मला अजिबातच वाटला नाही (त्याचा ड्रेस तेवढा डार्क आहे).
सुपरहिरो म्हणून येणाऱ्या गोष्टींना मला काही म्हणायचं नाहीये पण मी म्हटलेले मुद्दे टाळून / सुधारूनसुद्धा त्यांना सुपरहिरोपणा दाखवता आला असता की !(स्पायडरमॅन ब्याटमॅन नव्हते का दाखवले )
पहिला झपाटलेला पाहिला आहे.
पहिला झपाटलेला पाहिला आहे. वरचे दोन्ही पाहिलेले नसल्याने ते पाहून मग हे वाचायला हवे परत. मजेदार दिसते
बरोबर आहे दामले, मी बहुतेक
बरोबर आहे दामले, मी बहुतेक सुपरमॅन फॅन असल्यामुळे आवडून घ्यायचा प्रयत्न करतोय (आणि इतरांनाही पटवून द्यायचा निष्फळ प्रयत्न करतोय) असं वाटतय. नोलनचा इन्सेप्शन बघून काय भारी वाटलं होतं?! सुपरमॅन बघून असं एकदम माईंड ब्लोईंग फिलींग वगैरे नाही आलं. तुम्ही लिहिलेत तसेच मुद्दे (अचाट) स्टार ट्रेक वगैरे मध्ये सुद्धा निघतील फक्त फरक मांडणीचा आहे. स्टार ट्रेक नी जेवढी मजा आणली आणि जेवढी अपेक्षित होती तेवढी मजा ह्या सुपरमॅननी नाहीच आणली.
त्यापेक्षा जुने सुपरमॅन बघायला जास्त मजा येइल. तेव्हाचे ग्राफिक्स इतके भारी पण नव्हते पण मस्त बिल्ड केलाय सिनेमा.
अजून झपाटलेला २ पाहिला
अजून झपाटलेला २ पाहिला नाहीये! पण सुपरमॅनवाल्या सगळ्या मुद्द्यांशी सहमत
'खरे म्हणजे क्रोच्या जागी आपले अनिल धवन, किरण कुमार किंवा आलोकनाथ असते तरी फरक पडला नसता असा रोल आहे हा' >>>>> अगदी अगदी....मी लहानपणी इन्डियन सुपरमॅन पाहिला होता...पुनित इसार सुपरमॅन आणि धर्मेन्द्र त्याचा बाप! तेच आठवलं मला!
दोन्ही बघितले नाहीत, बघायची
दोन्ही बघितले नाहीत, बघायची इच्छा नव्हती पण आता टिव्हीवर लागले तर मुद्दाम बघेन बहुतेक
धन्यवाद फारेन्ड. तुझ्या धमाल
धन्यवाद फारेन्ड. तुझ्या धमाल सिनेपरिक्शणा मधुन स्फूर्ति मिळालिये मला
(No subject)