Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 3 July, 2013 - 05:24
हि कला फार दुर्मिळ आहे.ह्या कलेचे मुळ राजस्थान राज्यातील.
आपले रोजचे वर्तमान पत्र पाण्यात रात्रभर भिजवुन,दुसर्या दिवशी मिक्सीतुन त्याची पेस्ट बनवुन त्यात गोंद,सिरेमीक पावडर घालुन मग ह्या कलेचा अविष्कार केला जातो.थोडी हट्टी आणि किचकट पण अप्रतिम रुप घेणारी ही कला बघा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुपच छान.
खुपच छान.
छानच वाटतय, कस केलं ते लिहा
छानच वाटतय, कस केलं ते लिहा ना.
खुप सुबक जमलंय. खुप कष्टाचे
खुप सुबक जमलंय.
खुप कष्टाचे काम आहे हे. माझा उत्साह टिकला नाही
मस्त. डिटेलवार कृती लिहा
मस्त. डिटेलवार कृती लिहा
खुप छान..
खुप छान..
सुरेख.
सुरेख.
मस्तच .. खुपच सुंदर
मस्तच .. खुपच सुंदर
सुंदर! कस केलं ते लिहा
सुंदर!
कस केलं ते लिहा ना.>>>>>>>>>>>+१
मस्त
मस्त
फारच अप्रतिम आणि सफाईदार काम.
फारच अप्रतिम आणि सफाईदार काम. मस्त.
सुंदर. फक्त पेपर मॅशे
सुंदर.
फक्त पेपर मॅशे टेक्निकचे मूळ राजस्थानात नाही. या कलावस्तूचे रंगरूप राजस्थानी नक्षी वापरून बनवले आहे हे मान्य.
प्राचीन इजिप्त, प्राचीन पर्शिया, प्राचीन भारत, प्राचीन चीन, प्राचीन जपान अश्या सर्व ठिकाणी हे टेक्निक वापरून बनवलेले मुखवटे, छोट्या बॉक्सेस, ट्रे व इतर डेकॉर डिटेल्स आढळतात.
सुंदर.
सुंदर.
सही आहे हे!
सही आहे हे!
अप्रतिम
अप्रतिम
मस्त. डिटेलवार कृती लिहा
मस्त. डिटेलवार कृती लिहा >>++++१११
खूप सुंदर . कसे केले ते लिहाल
खूप सुंदर . कसे केले ते लिहाल का कृपया?
अप्रतिम बनवलंय. वॉलहॅंगिंग
अप्रतिम बनवलंय. वॉलहॅंगिंग आहे का?
रच्याकने, तुमचा आयडी नक्की काय आहे ते कळत नाहीये.
नी, माहितीबद्दल धन्यवाद.
रच्याकने, तुमचा आयडी नक्की
रच्याकने, तुमचा आयडी नक्की काय आहे ते कळत नाहीये. > बहुतेक क्रिएटिव्ह माउ .
क्रिएटिव्ह माउ मस्तच, कसे केले हे पण समजून घ्यायला आवडेल.
मस्तच. माझे काका हे पेपर
मस्तच.
माझे काका हे पेपर मॅश(बरोबर का ?) करायचे. त्यांनी मला असा केलेला एक सुंदर बोल(बाऊल) भेट दिला होता.
अर्थातच हे तू वर दाखवलेलं अप्रतीमच!
अप्रतीम!!!!
अप्रतीम!!!!
सुरेख दिसतंय!
सुरेख दिसतंय!
सुस्वागतम माऊ तुझी कला आता
सुस्वागतम माऊ
तुझी कला आता मायबोलीकरांना बघायला मिळणार तर ..
मस्त्
मस्त्
रच्याकने, तुमचा आयडी नक्की
रच्याकने, तुमचा आयडी नक्की काय आहे ते कळत नाहीये. > बहुतेक क्रिएटिव्ह माउ .
>>> ओह. धन्स सामी.
सुरेख बनवले आहे. मस्त.
सुरेख बनवले आहे. मस्त.
अप्रतिम.
अप्रतिम.
सुरेख!
सुरेख!
पेपर मॅशी कशी
पेपर मॅशी कशी बनवायची??
साहित्यः
१) ८ ते १० वर्तमान पत्रे
२) बबुल गोंद १- १/२वाटी
३) चॉक पावडर किंवा सिरेमीक पावडर गरजेपुरती
४) पोस्टर्स रंगःपांढरा,
५)इंक रंगः पिवळा,ब्राउन,हिरवा,लाल ,केशरी (कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानात )मिळतात.
६)सोनेरी रंग (गोल्डन )
७) पेन ची रिफील (शाई नसलेली) नक्षीकामा करीता
८) जरुर वाटल्यास फेविकॉल घ्यावा.(optional)
९) लाकडाचे कटिंग्ज.विविध आकाराचे उदाहरणार्थ उंट,हत्ती,फोटो फ्रेम, किंवा तुम्हास हवी तशी.
१०)वॉर्निश
११)ब्रश
सर्वप्रथम ६-७ पेपर्स रात्री पाण्यात भिजवणे.दुसर्या दिवशी कडक उन्हात वाळावयास ठेवणे.अगदी दोन ते तीन दिवस लागतात.कापसासारखी झाली तर उत्तम नाहीतर उन्हात न ठेवता लगेच मिक्सीतुन क्रश करुन घेणे.त्या मिश्रणात हवी तेव्हढी म्हणजे गरजेपुरती चॉक पावडर किंवा सिरेमीक पावडर घालणे.जेव्हढा पेपरचा पल्प असेल तेव्हढा बबुल गोंद टाकणे.बबुल गोंदाचे बाजारात तुकडे मिळतात.त्यांना थोड्या पाण्यात आधी भिजवुन ठेवावे.म्हणजे तो पाण्यात आपोआप विरघळतो आणि लिक्विड फोर्म तयार होतो.नंतर थोडा अंदाजे फेविकोल घालणे.()हवा असल्यास)) आता हे संपुर्ण मिश्रण चांगले मळुन घेणे.
कटींग केलेल्या फ्रेम्सवर म्हणजे उंट,हत्ती किंवा कि-चेन होल्डर्स चे कट्टिंग्ज. सुताराकडुन कापवुन घेउन त्यावर मॅशी ने बनवलेले डीझाईन्स चिपकवणे.म्हणजे गोल किंवा अंड्याचा आकाराचे मोठे-छोटे गोळे किंवा पानांचे,वेलींचे आकार घ्यावेत.ही तयार केलेली रचना सुकावयाला ठेवणे.
पहिला दिवसः पांढरा [पोस्टर]कलरचा हलका हात लावणे.नंतर पिवळा इंक कलरब्रशने फिरवणे.
दुसरा दिवसः चॉकलेटी (ब्राउन )कलर[इंक कलर]चा हात फिरवणे.
तिसरा दिवसःसॉक्स थोडा ओला करुन मग पुर्ण पिळुन घेउन त्याने हलकेसे दिलेल्या रंगावर फिरवायचा.
मग हव्या त्या फुलांना ,पाकळ्यांना आणि वेलींना हिरवा+लाल+केशरी रंग द्यायचा.तेही इंक कलर च घ्यावे..
चौथा दिवसः पुन्हा एकदा हलके पुसुन घेणे.आता गोल्डन टचिंग द्यावे.त्यासाठी सोनेरी रंगाचे आणि पांढर्या रंगाचे कोन बनवुन घेणे मग त्याने सुंदर वर्क करावे. थोडा वेळ सुकवावे .शेवटी वरुन वॉर्निश लावावे.
अशा प्रकारे तुमची पेपर मॅशीची कलाकृती तयार होइल.
हाच प्रकार वापरुन माझ्या
हाच प्रकार वापरुन माझ्या लेकीने (वय वर्ष साडे चार) माळ बनवली आहे. अजुन रंगवली नाहीये. मग टाकीन फोटो. टीव्हीवर मॅडशो मधे दाखवले होते.
अप्रतिम ...
अप्रतिम ...
Pages