श्री.जगदीश चव्हाण सर,
चित्र रंगावली आणी इतर सर्व प्रकारच्या रांगोळ्यां मधिल एक मोठ्ठं नाव...माझी यांची ओळख आमचा १ व्यवसाय-मित्र,जो त्यांचा विद्यार्थी आहे,त्याच्यामुळे झाली.गेल्या वर्षी पहिल्यांदा मी सरांच्या आणी त्यांच्या शिष्यवर्गाने काढलेल्या उत्तमोत्तम रांगोळ्या पाहिल्या आणी मन भारावुन गेलं आमचा मित्र त्याच प्रदर्शनात माझीपण १ फुलांची रांगोळी व्हावी म्हणुन म्हणाला होता आणी गेल्या वर्षी मी कामांच्या फुल्ली लोडेड सिझनमधे जेव्हढा वेळ मिळेल त्यात जमेल तशी रांगोळी काढली पण होती.या वर्षी मात्र चव्हाण सरांनी सुमारे महिनाभर आधी मला अवर्जून प्रदर्शनाची तारिख/वेळ इ.सर्व काही सांगितलं आणी,''तुंम्ही फुलांची रांगोळी काढायचीच आहे'' असं आग्रहानी बजावलं देखिल. हा आग्रह निश्चितपणानी माझा हुरूप वाढवणाराच होता...मलाही अश्या प्रकारे एखाद्या प्रदर्शनात सहभागी व्हायचा/व्यक्त व्हायचा अनुभव हवाच होता...त्यामुळे सारा योग जुळून आला आणी मी देखिल काल तिथे माझी थोडिशी कला सादर केली.
काल दिनांक ५ रोजी या चित्र रंगावली प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता झालं. अभिनेती स्पृहा जोशी ह्या प्रमुख पाहुण्या होत्या. या चित्र रांगोळ्यांचं वैशिष्ठ्य म्हणजे,प्रथम दर्शनीच मनाची पकड घेण्याची विलक्षण ताकद त्यांमधे आहे.तसच जो प्रकार एरवी ब्रश/खडू/पेन्सिल इ.माध्यमातूनच व्यक्त होतो...तो रांगोळ्या आणी रंगछटां मधुन साकार करण हे अतिशय जिद्द आणी कलात्मकतेचं काम आहे.गेली २० वर्ष चव्हाण सर ही कला जोपासत वाढवत आहेत. आज त्या निमित्तानी इथे काही चित्र रंगावल्या शेअर करतो... बाकि आपणा सर्वांनी या व इतर रांगोळ्या प्रत्यक्ष पहाण्यासाठी प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी...
आणी शेवट ही आमची उद्घाटनीय-फुलांची रोंगोळी
=====================================================================
रांगोळी-चित्रांचे भव्य प्रदर्शन
दिनांक ५ मे ते ७ मे रोजी,वेळ- सकाळी ९ ते रात्री ९.
ठिकाण-घोले रोड आर्ट गॅलरी, म.न.पा.क्षेत्रीय कार्यालयाचे जवळ...
महात्मा फुले संग्रहालया समोर...घोले रोड,पुणे(बालगंधर्व चौक ते एफ.सी.रोड रस्ता)
प्रवेश-विनामूल्य...
======================================================================
धन्यवाद. खूपच छान. तुमची
धन्यवाद. खूपच छान. तुमची रांगोळी तर सुरेखच आलीय. पुणेकर लाभ घेतीलच दर्शनाचा.:स्मित:
व्वा! सुंदर!
व्वा! सुंदर!
मस्तच
मस्तच
अ.आ सुंदर आहे तुमची फुलांची
अ.आ सुंदर आहे तुमची फुलांची रोंगोळी आणि ईतरही रांगोळ्या.
मस्त.
मस्त.
अप्रतिम !! फर सुंदर रांगोळ्या
अप्रतिम !! फर सुंदर रांगोळ्या आहेत.
अप्रतिम!! ५, ६ ७, ८, ९ आणि ११
अप्रतिम!! ५, ६ ७, ८, ९ आणि ११ प्रचंड आवडल्या.
आतिशय सूरेख
आतिशय सूरेख
आहाहा.. किती सुर्रेख!!! व्हॉट
आहाहा.. किती सुर्रेख!!! व्हॉट अन आर्ट!! अमेझिंग!!!!
पराग , तूही टॅलेंटेड आहेसच.. मैने विट्नेस किया है
काय भन्नाट रांगोळ्या
काय भन्नाट रांगोळ्या आहेत..... अप्रतिम
सुंदर आहेत रांगोळ्या. यांचे
सुंदर आहेत रांगोळ्या. यांचे फोटो थेट वरून घेता आले असते तर फार छान झाले असते.
भन्नाट रांगोळ्या आहेत बाबा.
भन्नाट रांगोळ्या आहेत बाबा. रांगोळ्या आहेत असे वाटतच नाहि.
मस्त
मस्त
मस्त!!
मस्त!!
भारी!
भारी!
सुंदर
सुंदर
अप्रतिम
अप्रतिम !............................
मस्तच...
मस्तच...
मला दिसत नाही
मला दिसत नाही
@मला दिसत नाही>>> दुसर्या
@मला दिसत नाही>>> दुसर्या मशिनवरून(P Cवरुन) पहा... कदाचित दिसतील
येथे /तिकडे येऊन गेलेल्या
येथे /तिकडे येऊन गेलेल्या सर्वांचेच आभार....
अप्रतिम... खुपच छान.
अप्रतिम... खुपच छान.
अतिशयच सुन्दर, आभारी आहोत
अतिशयच सुन्दर,
आभारी आहोत ,,प्रदर्शनास भेट देणे पुण्यात रहात नसल्या ने अशक्य पण येथे आल्याने शक्य झाले.