विपुतल्या रेसिप्या २ - बाळ बटाट्यांची भाजी - अर्थात् अलकामावशीची भाजी

Submitted by मंजूडी on 31 March, 2013 - 08:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बाळ बटाटे - पाव किलो
कांदे - २ मोठे
तमालपत्र - १
वाटलेली हिरवी मिरची - साधारण चमचाभर (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त)
किसलेलं आलं - साधारण चमचाभर (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त)
जिर्‍याची पूड - १ चमचा
चिंचेचा कोळ - एक चमचा
हळद, तेल, मीठ, साखर(मी घालते)
साजूक तूप - दोन चमचे
लाल तिखट - अर्धा चमचा (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त)

क्रमवार पाककृती: 

या आयडीला कोणाकोणाच्या विपुतच रेसिप्या लिहिण्याची खोड आहे, निषेध करूनही काऽही उपयोग नाही. या आयडीची विचारपूस करताना त्या रेसिप्यांवरचे प्रश्न आमच्या नजरेस पडतात मग कितीही नाही म्हटलं तरी मूळ रेसिपी आणि उत्तरे शोधण्यासाठी विपौड्या मारण्याचा मोह आवरत नाही. विपौड्या मारण्याची खोड आम्हांला याच आयडीमुळे लागली असे मानायला हरकत नाही.

आता ह्या रेसिपीची प्रमाणं काही त्या विपूमधे लिहिलेली नव्हती, सगळं आम्ही आमच्या अंदाजानेच घेतलं, पण भाजी मात्र त्या आयडीने लिहिल्याप्रमाणे अफाट चवीची झाली. मग त्या आयडीचे आणि रेसिपीच्या मूळ स्रोताचे आम्ही जाहिर आभार मानले, तर बाकी लोकं आम्हाला योग्य विपूचा पत्ता विचारू राहिली. आता ती विपुतली रेसिपी तशी मागे पडली आहे. विपुची पानं उलटता उलटता लोकांचा भाजी करण्याचा उत्साह सरायचा, त्यापेक्षा म्हटलं की ही भाजी लिहूनच टाकूया. ही भाजी लिहिण्यासाठी परवानगी मागण्याचे पुण्यकर्म एका प्रिय मैतरणीने केले आहे, तिचे आभार! तसेच ही भाजी विपूत ठेवणारीचे आभार! तसेच ही भाजी (कुठेतरी का होईना) लिहिण्याचे काम करणारीचे अनंत आभार!

तिच्याच शब्दांत आता पुढे भाजीची रेसिपी:

बारके बटाटे उकडून. (त्यांची सालं काढावी लागत नाहीत.)
किसलेला कांदा, तेजपान, किसलेलं आलं, वाटलेली हिरवीमिरची, हळद तेलात घालून परतायचं. यात उकडलेले बटाटे घालायचे. अगदी जरासा चिंचेचा कोळ आणि मीठ घालायचं. व्यवस्थीत परतून भाजलेल्या जिर्‍याची पूड वरून घालायची. जितका पातळ रस्सा हवा तितकं पाणी घालायचं. उकळू द्यायचं. आता सगळ्यात मस्त भागः चमचाभर (किंवा भाजीच्या क्वांटिटीनुसार) साजुक तूप कडकडीत गरम करून त्यात तिखट घालायचं आणि पोळलेलं हे तिखट्+तूप लागलीच उकळत्या भाजीत ओतायचं. अफाट चविची भाजी होते!

आभार: अलकामावशी

वाढणी/प्रमाण: 
तीन माणसांसाठी एका वेळेला.
अधिक टिपा: 

रबडी-पुरीबरोबर ही अशी भाजी झकास लागते.

alakamavashi bhaji 3 edited.jpg
माहितीचा स्रोत: 
मृण्मयी. विपौड्या. सायो
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे इकडे माझ्यासाठी आमंत्रण होतं होय .. बघितलंच नाही ..

सिंडरेला +१ ..

मूळ रेसिपीत दिलेल्या फोटोत रस्सा एकदम मिळून आला आहे पण रेसिपीत काही दिसत नाही मिळून येण्याला कारण घडेल असं? बेसनाव्यतिरीक्त काय घालता येईल? भाजीतलाच एखादा बटाटा कुस्करायला हवा .. Happy

रस्सा थोडा पातळ झाला तर कांदा खाली बसतो. म्हणून वरचा तवंग मिळून आल्यासारखा वाटतो. बटाटा कुस्करण्याची आयडिया चांगली आहे.

व्हेरिएशन म्हणून दाटपणाला डाळीचं पीठ ठीक आहे, पण फारच वेगळी चव येईल.

सिंडरेला यांनी कृपया आपल्या भाजीचा फोटो डकवावा.

सिंडी, सशल, मूळ कृती म्हणजे कुठली नक्की? Biggrin

आमच्याकडे भाजीच्या अंगासरशी रस्सा हवा असतो त्यामुळे मी जास्त पाणी नाही घालत.

पूनमचा प्रश्न अवघड आहे. अलकामावशींची कसोटी आहे.

कांदा वगळून भाजी करायची असेल तर रस्सा दाट होण्यासाठी एकदोन बटाटे कुस्करावे लागतील. आणि कांदा वगळला तर चवीत फरक पडेलच.

कांद्याशिवाय बाबभा केली आणि हळद पण वगळली तर तो एक नवा प्रकार होइल - ऊपासाची बाबभा Happy

यात दाटपणासाठी वाटलेले खोबरे घालता येइल Happy

अलकामावशींना कोणीतरी विचाराल का, की कांदा नाही घातला तर चालेल का? चवीत खूप फरक पडेल का?>>>> मि केलि तेव्हा कांदा नाही घातला ( खर म्हनजे मि कांदा घालायचे विसरलि ) पण चव आवडली.

हा माझा फोटो .. एक दोन मॉडिफिकेशन्स् आहेत मूळ रेसिपीमध्ये .. Wink

mRu bhaji.jpg

अर्धा कांदा परतून वाटला, अर्धा बारीक चिरून घातला,म्बाळ बटाटे नसल्याने नेहेमीचे मोठे बटाटे डाईस करून घातले, बटाट्याबरोबर मका आणि मटारचेही दाणे घातले .. शेवटी थोडी कसूरी मेथीही घातली (मला कांद्याच्या ग्रेव्हीत कसूरी मेथीची चव फारच आवडते म्हणून) .. तवंग आणण्यासाठी जी लाल तिखट पोळून घालायची फोडणी आहे ती तेलात केलेली आहे आणि फोडणी एकदम नावापुरतीच आहे, लाल तिखटही कारण आधीच हिरव्या मिरचीचा तिखटपणा बर्‍यापैकी होता ..

भाजी एकदम टेस्टी! धन्यवाद! Happy

(चल शुरू हो जा! :फिदी:)

सशल फोडणी नावापुरतीच?? Uhoh मग काय मजा म्हणूनच तुझी भाजी मिळमिळीत वाटतेय.
तसच सगळ्या पदार्थांना तू कोथिंबीरीनी झाकून टाकतेस त्यामुळे नीट नजरानजर होत नाही Proud

तसच सगळ्या पदार्थांना तू कोथिंबीरीनी झाकून टाकतेस त्यामुळे नीट नजरानजर होत नाही >> Rofl

हे आलू मटर आहे. सशल अलकामावशीला काय वाटेल इसका तो खयाल किया होता!

आज केली होती. मस्त झाली. एकही व्हेरिएशन केले नाही मी. मंजूच्या भाजीपेक्षा ग्रेव्ही मात्र थोडी कमी गोरी झाली होती.
नवर्‍याचे म्हणणे चिकनच्या ग्रेव्हीसारखी ग्रेव्ही लागतेय (याचाच दुसरा अर्थ त्याला आवडली!)
धन्स मंजूडी, धन्स अलकामावशी आणि त्यांची भाच्ची! Happy

सिंडी, काय तोंपासु दिसतेय भाजी Happy

मृ च्या 'बारके बटाटे उकडून. (त्यांची सालं काढावी लागत नाहीत.)' ह्या वाक्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं दिसतंय. माझ्या आळशी स्वभावामुळे अशी वाक्यं चटकन नजरेत भरतात Wink शिवाय सालासकट बटाट्यांनी earthy, rustic चव येते ती मला फार आवडते त्यामुळे तशीच भाजी केली. बटाटे मायक्रोवेव्हमध्ये थोड्या पाण्यात घालून खुटखुटीत शिजवले आणि मग मोठ्या आचेवर तांबूस रंगावर परतले.

Baal-batate bhaaji.jpg

अगो, फोटो कातिल!!

सिंडीच्या भाजीचा फोटो मावशी करायची त्या भाजीसारखा दिस्तोय.

अमेय यांच्या भाजीचा फोटो, 'अंडाकरी' म्हणूनही खपेल. Light 1

भारी फोटो आहे अगो Happy

मी पण थोडे तळून घेतले होते बटाटे. मला सालं असलेले बटाटे आवडत नाहीत म्हणून सोलून घेतले.

सिंडीच्या भाजीचा फोटो मावशी करायची त्या भाजीसारखा दिस्तोय >>> या बया इश्श गं बाई इश्श Proud

मंजूडी, हो Happy पण अजून तिच्याइतका चांगला फोटो काढणे जमत नाही ( घरात प्रकाशयोजना नीट नाही आणि कॅमेराही बदलायला झालाय Wink )

लालूने मागे फूड फोटोग्राफीच्या ट्रिक्स आणि टिप्स म्हणून ही लिंक दिल्याचं आठवतंय.
तिचे फोटो स्पेशल दिसतात नेहमीच. Happy

(मृण, ही सशलच्या भाजीइतकी अवांतर पोस्ट नाहीये. :P)

मी केली होती एकदा कांदे चॉपर मधून काढून. आणि चिंचेऐवजी आगळ.
अमेयने अंडीच घातली आहेत. बदल चांगला आहे.
पौ कायपण विचारते. कांद्याचीच तर ग्रेव्ही आहे!
अगो, फोटो चांगला आलाय. बाळं अजून जरा ग्रेव्हीत बुडवायची ना.. ग्रेव्हीत उजेड पडला की खरा रंग दिसत नाही. ट्रिकी आहे ते जरा, द्रव पदार्थामुळे चकाकी येते.

Pages