
बाळ बटाटे - पाव किलो
कांदे - २ मोठे
तमालपत्र - १
वाटलेली हिरवी मिरची - साधारण चमचाभर (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त)
किसलेलं आलं - साधारण चमचाभर (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त)
जिर्याची पूड - १ चमचा
चिंचेचा कोळ - एक चमचा
हळद, तेल, मीठ, साखर(मी घालते)
साजूक तूप - दोन चमचे
लाल तिखट - अर्धा चमचा (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त)
या आयडीला कोणाकोणाच्या विपुतच रेसिप्या लिहिण्याची खोड आहे, निषेध करूनही काऽही उपयोग नाही. या आयडीची विचारपूस करताना त्या रेसिप्यांवरचे प्रश्न आमच्या नजरेस पडतात मग कितीही नाही म्हटलं तरी मूळ रेसिपी आणि उत्तरे शोधण्यासाठी विपौड्या मारण्याचा मोह आवरत नाही. विपौड्या मारण्याची खोड आम्हांला याच आयडीमुळे लागली असे मानायला हरकत नाही.
आता ह्या रेसिपीची प्रमाणं काही त्या विपूमधे लिहिलेली नव्हती, सगळं आम्ही आमच्या अंदाजानेच घेतलं, पण भाजी मात्र त्या आयडीने लिहिल्याप्रमाणे अफाट चवीची झाली. मग त्या आयडीचे आणि रेसिपीच्या मूळ स्रोताचे आम्ही जाहिर आभार मानले, तर बाकी लोकं आम्हाला योग्य विपूचा पत्ता विचारू राहिली. आता ती विपुतली रेसिपी तशी मागे पडली आहे. विपुची पानं उलटता उलटता लोकांचा भाजी करण्याचा उत्साह सरायचा, त्यापेक्षा म्हटलं की ही भाजी लिहूनच टाकूया. ही भाजी लिहिण्यासाठी परवानगी मागण्याचे पुण्यकर्म एका प्रिय मैतरणीने केले आहे, तिचे आभार! तसेच ही भाजी विपूत ठेवणारीचे आभार! तसेच ही भाजी (कुठेतरी का होईना) लिहिण्याचे काम करणारीचे अनंत आभार!
तिच्याच शब्दांत आता पुढे भाजीची रेसिपी:
बारके बटाटे उकडून. (त्यांची सालं काढावी लागत नाहीत.)
किसलेला कांदा, तेजपान, किसलेलं आलं, वाटलेली हिरवीमिरची, हळद तेलात घालून परतायचं. यात उकडलेले बटाटे घालायचे. अगदी जरासा चिंचेचा कोळ आणि मीठ घालायचं. व्यवस्थीत परतून भाजलेल्या जिर्याची पूड वरून घालायची. जितका पातळ रस्सा हवा तितकं पाणी घालायचं. उकळू द्यायचं. आता सगळ्यात मस्त भागः चमचाभर (किंवा भाजीच्या क्वांटिटीनुसार) साजुक तूप कडकडीत गरम करून त्यात तिखट घालायचं आणि पोळलेलं हे तिखट्+तूप लागलीच उकळत्या भाजीत ओतायचं. अफाट चविची भाजी होते!
आभार: अलकामावशी
रबडी-पुरीबरोबर ही अशी भाजी झकास लागते.

सगळ्यांच्या भाज्या वेगवेगळ्या
सगळ्यांच्या भाज्या वेगवेगळ्या दिसताएत. मला मूळ कृतीतली सगळ्यात जास्त आवडली.
करून बघितली. छान झाली.
करून बघितली. छान झाली. धन्यवाद.
अरे इकडे माझ्यासाठी आमंत्रण
अरे इकडे माझ्यासाठी आमंत्रण होतं होय .. बघितलंच नाही ..
सिंडरेला +१ ..
मूळ रेसिपीत दिलेल्या फोटोत रस्सा एकदम मिळून आला आहे पण रेसिपीत काही दिसत नाही मिळून येण्याला कारण घडेल असं? बेसनाव्यतिरीक्त काय घालता येईल? भाजीतलाच एखादा बटाटा कुस्करायला हवा ..
रस्सा थोडा पातळ झाला तर कांदा
रस्सा थोडा पातळ झाला तर कांदा खाली बसतो. म्हणून वरचा तवंग मिळून आल्यासारखा वाटतो. बटाटा कुस्करण्याची आयडिया चांगली आहे.
व्हेरिएशन म्हणून दाटपणाला डाळीचं पीठ ठीक आहे, पण फारच वेगळी चव येईल.
सिंडरेला यांनी कृपया आपल्या भाजीचा फोटो डकवावा.
सिंडी, सशल, मूळ कृती म्हणजे
सिंडी, सशल, मूळ कृती म्हणजे कुठली नक्की?
आमच्याकडे भाजीच्या अंगासरशी रस्सा हवा असतो त्यामुळे मी जास्त पाणी नाही घालत.
अलकामावशींना कोणीतरी विचाराल
अलकामावशींना कोणीतरी विचाराल का, की कांदा नाही घातला तर चालेल का? चवीत खूप फरक पडेल का?
पूनमचा प्रश्न अवघड आहे.
पूनमचा प्रश्न अवघड आहे. अलकामावशींची कसोटी आहे.
कांदा वगळून भाजी करायची असेल तर रस्सा दाट होण्यासाठी एकदोन बटाटे कुस्करावे लागतील. आणि कांदा वगळला तर चवीत फरक पडेलच.
कांद्याशिवाय बाबभा केली आणि
कांद्याशिवाय बाबभा केली आणि हळद पण वगळली तर तो एक नवा प्रकार होइल - ऊपासाची बाबभा
यात दाटपणासाठी वाटलेले खोबरे घालता येइल
मी पण केली, छान झाली होती पण
मी पण केली, छान झाली होती पण फोटु बिटू नाही काढला. पुन्हा करेन तेव्हा काढेन आता फोटो
अलकामावशींना कोणीतरी विचाराल
अलकामावशींना कोणीतरी विचाराल का, की कांदा नाही घातला तर चालेल का? चवीत खूप फरक पडेल का?>>>> मि केलि तेव्हा कांदा नाही घातला ( खर म्हनजे मि कांदा घालायचे विसरलि ) पण चव आवडली.
हा आमच्या बा.ब. भाजीचा फोटो:
हा आमच्या बा.ब. भाजीचा फोटो:
हा माझा फोटो .. एक दोन
हा माझा फोटो .. एक दोन मॉडिफिकेशन्स् आहेत मूळ रेसिपीमध्ये ..
अर्धा कांदा परतून वाटला, अर्धा बारीक चिरून घातला,म्बाळ बटाटे नसल्याने नेहेमीचे मोठे बटाटे डाईस करून घातले, बटाट्याबरोबर मका आणि मटारचेही दाणे घातले .. शेवटी थोडी कसूरी मेथीही घातली (मला कांद्याच्या ग्रेव्हीत कसूरी मेथीची चव फारच आवडते म्हणून) .. तवंग आणण्यासाठी जी लाल तिखट पोळून घालायची फोडणी आहे ती तेलात केलेली आहे आणि फोडणी एकदम नावापुरतीच आहे, लाल तिखटही कारण आधीच हिरव्या मिरचीचा तिखटपणा बर्यापैकी होता ..
भाजी एकदम टेस्टी! धन्यवाद!
(चल शुरू हो जा! :फिदी:)
सशल फोडणी नावापुरतीच?? मग
सशल फोडणी नावापुरतीच??
मग काय मजा म्हणूनच तुझी भाजी मिळमिळीत वाटतेय.
तसच सगळ्या पदार्थांना तू कोथिंबीरीनी झाकून टाकतेस त्यामुळे नीट नजरानजर होत नाही
HH माझं निरूपण वाच की सगळं ..
HH माझं निरूपण वाच की सगळं ..
मी माझ्या प्रकारे सात्विक, हेल्दी व्हजन केलेलं आहे ..
सशलची भाजी दिसायला चांगली आहे
सशलची भाजी दिसायला चांगली आहे पण ही बाळ बटाटे भाजी नाहीच मुळी. त्यामुळे टिका करता येत नाही.
तसच सगळ्या पदार्थांना तू
तसच सगळ्या पदार्थांना तू कोथिंबीरीनी झाकून टाकतेस त्यामुळे नीट नजरानजर होत नाही >>
हे आलू मटर आहे. सशल अलकामावशीला काय वाटेल इसका तो खयाल किया होता!
सिंडीच्या भाजीचा फोटो मस्त!
सिंडीच्या भाजीचा फोटो मस्त!
आज केली होती. मस्त झाली.
आज केली होती. मस्त झाली. एकही व्हेरिएशन केले नाही मी. मंजूच्या भाजीपेक्षा ग्रेव्ही मात्र थोडी कमी गोरी झाली होती.
नवर्याचे म्हणणे चिकनच्या ग्रेव्हीसारखी ग्रेव्ही लागतेय (याचाच दुसरा अर्थ त्याला आवडली!)
धन्स मंजूडी, धन्स अलकामावशी आणि त्यांची भाच्ची!
सिंडरेला, थोडी भाजी मिळेल
सिंडरेला, थोडी भाजी मिळेल का हो? कस्ला जीव्घेणा फोटो आहे!
सिंडी, काय तोंपासु दिसतेय
सिंडी, काय तोंपासु दिसतेय भाजी
मृ च्या 'बारके बटाटे उकडून. (त्यांची सालं काढावी लागत नाहीत.)' ह्या वाक्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं दिसतंय. माझ्या आळशी स्वभावामुळे अशी वाक्यं चटकन नजरेत भरतात
शिवाय सालासकट बटाट्यांनी earthy, rustic चव येते ती मला फार आवडते त्यामुळे तशीच भाजी केली. बटाटे मायक्रोवेव्हमध्ये थोड्या पाण्यात घालून खुटखुटीत शिजवले आणि मग मोठ्या आचेवर तांबूस रंगावर परतले.
वाहवा अगो!! मस्त दिसते आहे
वाहवा अगो!! मस्त दिसते आहे भाजी.
लोलाकडून फूड फोटोग्राफीची यशस्वी प्रेरणा घेतलेली दिसतेय.
अगो, फोटो कातिल!! सिंडीच्या
अगो, फोटो कातिल!!
सिंडीच्या भाजीचा फोटो मावशी करायची त्या भाजीसारखा दिस्तोय.
अमेय यांच्या भाजीचा फोटो, 'अंडाकरी' म्हणूनही खपेल.
भारी फोटो आहे अगो मी पण थोडे
भारी फोटो आहे अगो
मी पण थोडे तळून घेतले होते बटाटे. मला सालं असलेले बटाटे आवडत नाहीत म्हणून सोलून घेतले.
सिंडीच्या भाजीचा फोटो मावशी करायची त्या भाजीसारखा दिस्तोय >>> या बया इश्श गं बाई इश्श
मंजूडी, हो पण अजून
मंजूडी, हो
पण अजून तिच्याइतका चांगला फोटो काढणे जमत नाही ( घरात प्रकाशयोजना नीट नाही आणि कॅमेराही बदलायला झालाय
)
सगळ्यांच्याच बाबभा मस्त
सगळ्यांच्याच बाबभा मस्त दिसतायेत.
लालूने मागे फूड
लालूने मागे फूड फोटोग्राफीच्या ट्रिक्स आणि टिप्स म्हणून ही लिंक दिल्याचं आठवतंय.
तिचे फोटो स्पेशल दिसतात नेहमीच.
(मृण, ही सशलच्या भाजीइतकी अवांतर पोस्ट नाहीये. :P)
सगळे फोटो जबरी आहेत! मृण्मयी,
सगळे फोटो जबरी आहेत!
मृण्मयी, तुझ्या अलकामावशींना हा बाफ आणि प्रतिक्रिया नक्की दाखव!
सर्व बाब आणि इतर भाज्यान्चे
सर्व बाब आणि इतर भाज्यान्चे फोटो मस्त!
अरे वा मस्तच फोटो! अगो, कांदा
अरे वा मस्तच फोटो!
अगो, कांदा वाटून घेतलास वाटतं तू ही ..
मी केली होती एकदा कांदे चॉपर
मी केली होती एकदा कांदे चॉपर मधून काढून. आणि चिंचेऐवजी आगळ.
अमेयने अंडीच घातली आहेत. बदल चांगला आहे.
पौ कायपण विचारते. कांद्याचीच तर ग्रेव्ही आहे!
अगो, फोटो चांगला आलाय. बाळं अजून जरा ग्रेव्हीत बुडवायची ना.. ग्रेव्हीत उजेड पडला की खरा रंग दिसत नाही. ट्रिकी आहे ते जरा, द्रव पदार्थामुळे चकाकी येते.
Pages