कुणी वसंत घ्या...

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता: 
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत: 
हं!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२,४ भाज्या, एखाद दोन अ‍ॅपेटायझर्स, २०,२५ पोळ्या, भात, एखादी स्वीट डिश बास आहे. आणखी कितीसं मेलं जेवण लागतंय ३ लोकांना Proud

अहो टेक्सासवाले, आम्ही आउट्साईड बॉक्सच थिंक करतो म्हणून मागे भाकरी, गुळाच्या पोळ्याही ठेवल्या होत्या. सिंडी तर
दरवेळी आम्ही नको नको म्हणत असताना उकडीचे मोदक, पुरणपोळ्या, चिरोटे असं काय काय हट्टाने बनवून आणते. शिका काहीतरी Proud

दरवेळी आम्ही नको नको म्हणत असताना उकडीचे मोदक, पुरणपोळ्या, चिरोटे असं काय काय हट्टाने बनवून आणते. शिका काहीतरी >> बरं मग नेक्स्ट टायमाला तू नको नको म्हटलं तरी ती जे काय आणेल ते घे आणी मला पोस्ट कर हा का ना का.

च्च च्च. मी व्हेजी हो देसाइ, त्यामुळे माझ्या बॉक्साबाहेर बसून केल चिप्स, कुसकुस तबुले, किन्वा सॅलड, तोफु लसान्या असलं काय्तरी खाइन बापडी

काय हे देसाइ, तसं हौ नये म्हणून आम्ही गटगतच नाही. जरा म्हटलं १००० पोस्टींना हातभार लावावा तर असे रुसताय काय! Light 1

च्च, शूम्पी, एकमेकां साह्य करु म्हणतच १००० पोस्टी पाडायच्यात. तेव्हा असे मानापमान बाजूला ठेवा बरं Wink

मला मिळाले की.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मीच खाईन ना.. Happy

बंदी आहे आणायला.. एयरपोर्टवर भरून ठेवलेल्या बाटल्या बघितल्या नाहीत का? वाईट वाटतं, पण काय करणार? थोडं बरं वाटावं म्हणून खाईन झालं.. Happy

EWR Terminal B , International Arrival...
तिथे 'काय काय आणू नये' ते सगळे पदार्थ बाटल्यांमधे भरून ठेवलेले आहेत.. आणि तिथे विचारतात,
'हे आणले का? ... ते आणले का? ...' इत्यादी..

हा घ्या मेनू-

टेस्ट भी है हेल्थ भी वाले आप्पे - मोठ्यांसाठी
विपूतले आप्पे - लहान मुलांसाठी
तांदूळ - उडीद आप्पे - इतरांसाठी
बाळ बटाटे रस्सा
नेहमीचे भरले वांगे विथ सांबार मसाला
भात, चपाती इ.

हवो किंवा झक्कींची दारुच प्या, काही भलतेसलते पिऊन बाटू नका.

वसंताचं नाव बदलून "आप्पा" ठेवावं लागेल मग Lol
बरं माझा न्हेमीचा ड्वायलाक मारते- " पोळीभाजी कशाला, जरा मस्त चटपटीत स्नॅक्स चा मेनू ठरवू "
इतर या बोलण्याकडे दुर्लक्ष करून नेहमीप्रमाणे पोळ्याभाज्याच कन्फर्म करतात ते एक जऊ द्या. Happy

पाव भाजी वगैरे ठेवा. मला पण दर वेळी तेच ते पुरण पोळी आणि उकडीचे मोदक करुन आणायचा कंटाळाच आला आहे.

सायो, तुच ग बाई तुच माझी सख्खी मैत्रिण Wink

Pages