Submitted by मी कल्याणी on 31 March, 2013 - 22:15
पापणीतल्या स्वप्नांना
आशेची साथ दे..
अंतरीच्या भावनांना
सप्तसुरांचा नाद दे..
आकाशातल्या चांदण्यांना
सुगंधी श्वास दे..
ओंजळीतल्या पाखरांना
भरारीचा ध्यास दे...
इंद्रधनुच्या सतरंगांना
आनंदाची साथ दे..
नादमयी सप्तस्वरांना
मोहक हास्याने दाद दे..
सप्तर्षीच्या त्या तेजाला
निरांजनाची वात दे..
सत्यस्रुष्टीतील स्वप्नांना
मनापासून साद दे.....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुन्दर!!
सुन्दर!!
धन्यवाद सचिन
धन्यवाद सचिन
मनापासून प्रतिसाद देते
मनापासून प्रतिसाद देते
उमटो निनाद चहुकडे...................
सुरेख भावना..
सुरेख भावना..
सुरेख.
सुरेख.
खुप सुन्दर ...
खुप सुन्दर ...
छान आहे.
छान आहे.
मस्तच........... कल्याणी
मस्तच........... कल्याणी
वा! छान कविता <<<आकाशातल्या
वा! छान कविता

<<<आकाशातल्या चांदण्यांना सुगंधी श्वास...
आणि
सप्तर्षीच्या त्या तेजाला निरांजनाची वात... >>> मस्त कल्पना