विपुतल्या रेसिप्या २ - बाळ बटाट्यांची भाजी - अर्थात् अलकामावशीची भाजी

Submitted by मंजूडी on 31 March, 2013 - 08:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बाळ बटाटे - पाव किलो
कांदे - २ मोठे
तमालपत्र - १
वाटलेली हिरवी मिरची - साधारण चमचाभर (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त)
किसलेलं आलं - साधारण चमचाभर (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त)
जिर्‍याची पूड - १ चमचा
चिंचेचा कोळ - एक चमचा
हळद, तेल, मीठ, साखर(मी घालते)
साजूक तूप - दोन चमचे
लाल तिखट - अर्धा चमचा (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त)

क्रमवार पाककृती: 

या आयडीला कोणाकोणाच्या विपुतच रेसिप्या लिहिण्याची खोड आहे, निषेध करूनही काऽही उपयोग नाही. या आयडीची विचारपूस करताना त्या रेसिप्यांवरचे प्रश्न आमच्या नजरेस पडतात मग कितीही नाही म्हटलं तरी मूळ रेसिपी आणि उत्तरे शोधण्यासाठी विपौड्या मारण्याचा मोह आवरत नाही. विपौड्या मारण्याची खोड आम्हांला याच आयडीमुळे लागली असे मानायला हरकत नाही.

आता ह्या रेसिपीची प्रमाणं काही त्या विपूमधे लिहिलेली नव्हती, सगळं आम्ही आमच्या अंदाजानेच घेतलं, पण भाजी मात्र त्या आयडीने लिहिल्याप्रमाणे अफाट चवीची झाली. मग त्या आयडीचे आणि रेसिपीच्या मूळ स्रोताचे आम्ही जाहिर आभार मानले, तर बाकी लोकं आम्हाला योग्य विपूचा पत्ता विचारू राहिली. आता ती विपुतली रेसिपी तशी मागे पडली आहे. विपुची पानं उलटता उलटता लोकांचा भाजी करण्याचा उत्साह सरायचा, त्यापेक्षा म्हटलं की ही भाजी लिहूनच टाकूया. ही भाजी लिहिण्यासाठी परवानगी मागण्याचे पुण्यकर्म एका प्रिय मैतरणीने केले आहे, तिचे आभार! तसेच ही भाजी विपूत ठेवणारीचे आभार! तसेच ही भाजी (कुठेतरी का होईना) लिहिण्याचे काम करणारीचे अनंत आभार!

तिच्याच शब्दांत आता पुढे भाजीची रेसिपी:

बारके बटाटे उकडून. (त्यांची सालं काढावी लागत नाहीत.)
किसलेला कांदा, तेजपान, किसलेलं आलं, वाटलेली हिरवीमिरची, हळद तेलात घालून परतायचं. यात उकडलेले बटाटे घालायचे. अगदी जरासा चिंचेचा कोळ आणि मीठ घालायचं. व्यवस्थीत परतून भाजलेल्या जिर्‍याची पूड वरून घालायची. जितका पातळ रस्सा हवा तितकं पाणी घालायचं. उकळू द्यायचं. आता सगळ्यात मस्त भागः चमचाभर (किंवा भाजीच्या क्वांटिटीनुसार) साजुक तूप कडकडीत गरम करून त्यात तिखट घालायचं आणि पोळलेलं हे तिखट्+तूप लागलीच उकळत्या भाजीत ओतायचं. अफाट चविची भाजी होते!

आभार: अलकामावशी

वाढणी/प्रमाण: 
तीन माणसांसाठी एका वेळेला.
अधिक टिपा: 

रबडी-पुरीबरोबर ही अशी भाजी झकास लागते.

alakamavashi bhaji 3 edited.jpg
माहितीचा स्रोत: 
मृण्मयी. विपौड्या. सायो
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो रावी. मी फोटोतल्या भाजीत बटाटे उकडून साले काढून वापरले आहेत, भाजीत चिंचेचा कोळ घातल्याने साखरही घातली आहे, वरून कोथिंबीर पेरली आहे, आणि मिरचीचं वाटण घातल्याने हात राखूनच लाल तिखटाचा वापर केला आहे.

उसगावातल्या ज्यांनी ज्यांनी ही भाजी करून पाहिली त्यांनी कांदा किसूनच केली का ही भाजी? असल्यास कुठल्या प्रकारचा कांदा वापरला? कारण ईथे बरेचदा कांदा किसून अथवा कच्चाच मिक्सर मधून वाटून ग्रेव्हीत घातला तर ग्रेव्ही कडवट लागते.

प्रॅडी, चांगली शंका .. Happy

मी फार कमी वेळा कच्चा कांदा वापरते रेसिपीत .. परतून घेतलेला च बरा .. Happy

मीही करून बघेन लवकरच ... बटाट्याबरोबर आणखी काय घालता येईल ज्यामुळे भाजी जास्त पोषक होईल ह्याचा विचार करते आहे .. Happy

मी पांढरा, पिवळा, लाल असा घरात असेल तो कांदा वापरते. भाजी कडवट झाली नाही.

हळद पावडरीऐवजी ओली हळद मिरचीबरोबर वाटून घातली तर वेगळी आणि छान चव येते.

पाणी न घालता केलेली कोरडी भाजी पण सही लागते. यात चिंचेऐवजी आमचूर पावडर घालायची.

चिंच फार कमी घालायचीय. कांद्याच्या गोडसरपणामुळे त्यातला आंबटपणा जाणवणार नाही इतकीच. त्यामुळे साखर घालावी लागत नाही.

विपौड्या >>>>>>
गेले काही दिवस विपौड्या म्हणजे काय असावं असा विचार चालला होता. कळ्ळं बरं आजच!
असो........मंजूडी भारीये हं रेस्पी! आणि वाचायला मजा आली.

उद्या ६ लोकांसाठी ही भाजी करण्याचा विचार आहे. किती बटाटे घ्यावेत? राजमा, तुपजीर्‍याची फोडणी असलेले वरण आणि एक कोशिंबीर असे इतर पदार्थ जोडीला आहेत. किती बटाटे घ्यावेत?

कांदा किसुनच घ्यावा का? की बारीक चिरलेला चालेल? (आमचे हे कांदा एकदम मस्त कापतात.)

केली केली बाळ बटाट्यांची भाजी केली. बेफाम अफाट चविष्ट झाली. अलक मवशीला आमचे धन्यवाद देणे.
कांदा किसला नाही. कंदा, आलं मिरच्या फु प्रो वर फिरवल्या. (कमी कटकट हा मोटो असल्याने )
फोटो चा प्रयत्न केला आहे पण ती कला वश नसल्याने प्रतिमेपेक्ष प्रत्यक्ष सुंदर होते हा विश्वास बाळगा

Curried Baby Potatoes.jpg

मी पण करुन पाहिला. चव एकदम मस्त!! पण मला वाटते माझा रस्सा जरा जास्तच पातळ झाला होता.
सृष्टीची कल्पना चान्गलि आहे.. तान्द्ळचे पीठ वरुन लावता येईल, पण बेसन लावायचे असल्यास ते कान्द्या बरोबर परतावे लगेल का?
मृण्मयी, nice tips... सुकी भाजी पन करुन पाहिन..

Lol

शूम्पे, सशल काय म्हणेल ते नंतर बघू, पण भाजी अगदी अशीच, तुझ्या फोटोतल्यासारखी दिसायला हवी. Happy

>>शूम्पीने टाकलेला फोटो म्हणजे सशलला खुले आमंत्रण आहे >> आ बैल मुझे मार>> जास्तीत जास्त कय म्हणेल सशल? कोथिंबीर नाही घातली? भाजी गॅसवर असतानाच काढला फोटो. आपापली घालून खा

मृण्मयी, बरं झाल बै सांगितलस ते Proud

बरोबर मी जबराट छोले पण केले होते.

बरं आज मी पण केली होती ही भाजी . तु-फा-न भारी लागते. पुरी सोबत जास्त छान लागेल असे वाटले. सर्व संबंधितांना धन्यवाद Happy

तूप घातल्यामुळे अंमळ सात्विक चव आली भाजीला Wink

तान्द्ळचे पीठ वरुन लावता येईल, पण बेसन लावायचे असल्यास ते कान्द्या बरोबर परतावे लगेल का?>> नाहि मि फोडनिला देताना दोन्ही पीठ वाटीत थोड्या पाण्यात मिक्स करुन घातलि ..उकळी आल्यावर बटाटे घातले..

उद्या ६ लोकांसाठी ही भाजी करण्याचा विचार आहे>> सॉरी वत्सला, मी आज वाचला हा प्रतिसाद. तुझी भाजी एव्हान करून वाढून चट्टामट्टा करून झाली असेल.

सगळ्यांचे फोटो मस्त. म्हणजे भाजीचे.

मंजुडी, अगं सॉरी काय म्हणते! Happy
त्या दिवशी साधारण १७-१८ बटाट्यांची भाजी केली होती.
सगळ्यांना खुप आवडली! सोपी आणि वेगळ्या छान चवीची भाजी आहे ही.
फक्त आमचे हे कांदा चिरण्यात एक्सपर्ट असल्याने मी एकदम बारीक चिरलेला कांदा वापरला.
वरुन तुपाची चळचळीत फोडणी अगदी साध्या भाजीला एकदम मस्त चव आणते!

भाजी करून पाहिली. वेगळी चव आहे. मला आवडली, घरच्यांना मसालेदार / झणझणीत वाटली. भाजी मुरल्यावर जास्त छान चव लागते असा माझा अनुभव.

Pages