Submitted by गोगो on 26 December, 2012 - 04:54
मला बँगलोरमध्ये टू व्हीलर घ्यायची आहे कुठली टू-व्हीलर चांगली आहे? काय काय बाबींचा विचार करून घ्यावी? कृपया मार्गदर्शन करावे.
(या विषयावर आधिच धागा असेल तर हा डिलीट करेन... मला दिसला नाही.)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्याकडे अॅक्टीवा, वेगो व
आमच्याकडे अॅक्टीवा, वेगो व स्कुटी आहे त्यामुळे तिन्हींचा अनुभव गाठिशी आहे. किंमत, स्पेअर पार्ट्स, अॅव्ह्रेज इ. ची तुलना केल्यास व हायवे वरून लांब अंतर रोज कापायचे नसल्यास स्कुटी बेस्ट वाटते मला. स्वस्त आणि मस्त व हलकी. अॅक्टीव्हा मलादेखील ओव्हर्रेटेड वाटते.
मी अॅक्टिव्हा चालवली
मी अॅक्टिव्हा चालवली आहे.
मख्खन.., बुन्गाट, जबरी
प्लेजर चालवली तर त्याचा बॅलन्सच जमेना सुरवातीला.
रोज बाइकची सवय असल्याने.
बाकी सगळ्याच स्कुटरेट्स ची किमंत मला जास्त वाटते.
त्या पैशात जास्त अॅव्हरेज देणारी बाइक येइल.
इब्लिस आमची प्लेजरपण ३-४
इब्लिस आमची प्लेजरपण ३-४ वर्षात येकदा पण पंक्चर झालेली नाहीये.
अॅक्टिव्हा होते का पंक्चर??
अॅक्टिव्हा होते का पंक्चर??
अहो गाडी आहे म्हणजे पंक्चर
अहो गाडी आहे म्हणजे पंक्चर व्हायचीच त्याशिवाय गाडी चालवण्यातलं चॅलेंज कसं अनुभवणार?
आणि पंक्चर न होणारी गाडी म्हणजे मला गोमुत्र न देणारी गाय किंवा शेण न देणारी म्हैस वाटते.. कै अर्थैकै?
दक्षे
दक्षे
दक्षे ट्युबलेस टायर असेल आणि
दक्षे
ट्युबलेस टायर असेल आणि तुमचा रस्ता चांगला असेल तर गाडी पन्क्चर होणार नाहीच की.
नंदिनी, होंडाच्या डिओचा विचार
नंदिनी, होंडाच्या डिओचा विचार कर. आता साधारण ५०K-५५K पर्यंत एकूण मिळून किंमत असावी.
अॅक्टिवा द बेस्ट गाडी आहे. पण कमीत कमी चार महिने वेटिंग आहे. अॅविएटर पण अॅक्टिवाचंच वर्जन म्हणता येईल, फक्त ती उंच आहे आणि पेट्रोलची टाकी अॅक्टिवापेक्षा मोठी आहे. मला उंचीचा प्रश्न नव्हता त्यामुळे मी अॅविएटर घेऊन टाकली.
योगेश, होन्डा कंपनीनेच ओव्हरहाईप केलेली आहे अॅक्टिवा. विनाकारण चार-चार महिने वेटिंग. बाकी डिओ, अॅविएटर आठवड्याभरात मिळतात.
गाडीच्या वजनाची चिंता करणार्यांसाठी एक अनुभवाची सूचना - दक्षिणा म्हणाली त्याप्रमाणे अॅक्सलरेटर दिला की गाडीचं वजन शून्य रस्त्यांवरून सामान आणि लहान मुलांना घेऊन फिरताना कमी वजनाच्या, हलक्या गाड्या शक्यतो घेऊ नका. या गाड्या घसरण्याचे प्रमाण जास्त असते. आणि एकदा ग्रीप आली/ ट्रिक कळली की कितीही जड गाडी असली तरी सहज स्टँडला लावता येते.
ट्युबलेस टायर असा काही प्रकार
ट्युबलेस टायर असा काही प्रकार नसतो. टुबमध्ये एक सोल्युशन असते ते छिद्रात जाऊन बसते व एकदम हवा जात नाही हळू हळू जाते तोवर तुम्ही पंक्चरालयात गाडी नेऊ शकता !
One novel feature of the
One novel feature of the Honda Hero Pleasure designed to improve its safety and reliability is its puncture-resistant tuff-up tire tubes. These provide a ceramic layer that cushions the air component in the tube, helping to resist punctures from sharp objects.
<<
(जमेल तेव्हा त्या बुकलेटचा स्कॅन टाकेन इथे.) हे असलं काही तरी आहे. कन्येला सासरेबुवांनी ही गाडी गिफ्ट म्हणून दिली होती, तेव्हा त्यांनी या पंक्चरबद्दल सांगितलं होतं. त्यांची प्लेझर त्यावेळी ४-५ वर्षांची होती, अन 'अजून हवादेखिल भरलेली नाही' असे सांगितले होते.
रस्त्याच्या कंडीशनबद्द्ल म्हणाल तर आनंदी आनंदच आहे.
हे इंटरेस्टिंग फीचर वाटलं म्हणून इथे लिहिलं. तसे मी स्वतः टू व्हीलर वापरायची सोडून जमाना झालाय. अन होंडा किंवा हीरो कंपनी मला कोणतेच कमिशन देत नाही
अॅक्टीव्हा स्किड होतात असा
अॅक्टीव्हा स्किड होतात असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे माझ्या मते -
१. अॅक्सेस - १२५
२. प्लेझर
३. वेगो
वाकडी तिकडी चालवली तर
वाकडी तिकडी चालवली तर अॅक्टिव्हाच काय कोणतीही गाडी स्किड होतेच.
त्यातल्या त्यात लॉजिक असं आहे की मोठे टायर असलेल्या टूव्हिलर्स शक्यतो घसरत नाहीत, छोट्या चाकाच्या गाड्या घसरू शकतात. उभट आकार असलेल्या गाड्या (बेस लाईन बारिक स्कुटी/लूना) या गाड्यांचे बॅलन्स फार चांगले नसतात (माझ्या मते) थोडी हेवी गाडी बॅलन्स च्या दृष्टीकोनातून मला बरी वाटते.
अक्षयकुमारची नवीन अॅक्टीवाची
अक्षयकुमारची नवीन अॅक्टीवाची अॅड आत्ताच पाहीली. ६० अॅवरेज आहे असं दाखवतायेत.
अॅक्टीवा धुड आहे नुसते.
अॅक्टीवा धुड आहे नुसते.
आता साधारण ५०K-५५K पर्यंत
आता साधारण ५०K-५५K पर्यंत एकूण मिळून किंमत असावी.
>> एवढे बजेट नाहीये. ३० पर्यंत असेल तर उत्तम.
नंदिनी, चेन्नैत स्कूटी पेप ऑन
नंदिनी, चेन्नैत स्कूटी पेप ऑन रोड ३८ हजार दाखवत आहेत.
TVS exel घ्या .50 च एवरेज
TVS exel घ्या .50 च एवरेज ,हलकी फुलकी. यनीबडी क्यॅन ह्यॅन्डल
इब्लिस , मी माझ्या युनिकॉर्न
इब्लिस ,
मी माझ्या युनिकॉर्न मध्ये पण गेले ५ वर्ष हवासुद्धा भरली नव्हती .
तुम्ही लिहिलय तसच puncture-resistant tuff-up tire tubes आहे त्यात पण .
सुमेधाव्ही - शहरातल्या
सुमेधाव्ही - शहरातल्या ट्रॅफिकमधे स्टॅंडवर लावताना काढताना वजन कमी असलेली गाडी सोयीची पडते>>> होना म्हणूनच हलकी गाडी हवी. आणि गाडी पडली तरी कोणाच्या मदतीशिवाय उचलायला यायला हवी
इब्लिस - प्लेझर नामक गाडी पंक्चर होत नाही>>> खरं की काय? मज्जाच आहे मग. हे मी पहिल्यांदाच ऐकतीये
स्पेस साठी ओन्ली स्कूटी. एकदम सुंदर. ग्यास सिलिंडर मावेल अशी एकमेव गाडी. हीपण आहे अजूनही घरी.>>> स्कूटीकडे कल वाढतोय
आ*** बापू, अ*** बापू, इ.इ. च्या भक्तांचाही सुळसुळाट दिसतो मला बर्याच शहरांत..>>>
उभट आकार असलेल्या गाड्या (बेस
उभट आकार असलेल्या गाड्या (बेस लाईन बारिक स्कुटी/लूना) या गाड्यांचे बॅलन्स फार चांगले नसतात <<
सायकलीपण जरा डुबर्या शेपच्या असतात नं? :दिवे:
टफ अप ट्युब्ज होन्डाच्या
टफ अप ट्युब्ज होन्डाच्या जवळपास सगळ्या गाड्यांना असतात. तेही पंक्चर होतात, फक्त प्रमाण (तुलनेने) कमी असते. "पंक्चर न होणारी गाडी" रबरी चाकांत मिळत नाही. भारतात तरी.
धागाकर्ता / कर्ती ला स्कूटर हवी आहे. वर दिलेले सगळेच पर्याय उत्तम आहेत. सहा महिन्यांपुर्वी मीसुद्धा बायकोसाठी चांगल्या स्कूटरच्या शोधात होतो. मी होन्डाचा फॅन आहे. स्वतः युनिकॉर्न वापरतो. त्यामुळे होन्डाच्या स्कूटर्सकडेच कल होता. पण तरीही, बराच रिसर्च केल्यावर टीव्हीएस विगो घेतली.
विगोचे प्लस पॉईंट्स-
- उंची आणि वजन- स्त्री ग्राहकांसाठी अत्यंत आदर्श. (स्कूटीइतकी हलकी नाही, अॅक्टिव्हाइतकी जड नाही.)
- फुल्ल मेटल बॉडी (अन्य पर्याय ? फक्त अॅक्टिव्हा आणि वेस्पा.)
- फ्युएल कॅप सीटच्या बाहेर. (अन्य पर्याय- रोडिओ / स्कूटी स्ट्रीक)
- १२ इंची टायर्स. दोन्ही. (अन्य- फक्त अॅव्हीएटर. तेही फक्त पुढचे चाक.)
- बॉडी बॅलेन्स टेक. (हे गिमिक नाही. विगोचे वेट डिस्ट्रीब्युशन सर्वोत्तम आहे.)
- मेन स्टॅन्डवर लावायला सर्वात सोपी. अगदी सर्वात ! (टीव्हीएसने पेट्न्ट घेतलंय त्या डिझाईनचं.)
- मायलेज ४५-५०. (यात काही विशेष नाही, सर्वच देतात.)
विगोचे मायनस पॉईन्ट्स-
- इंजिन सुझुकी अॅक्सेस / स्विशसारखे पावरफुल नाही. (११० सीसी- म्हणजे अॅक्टिव्हाइतके आहे.)
- इंजिन होन्डा किंवा सुझुकीच्या गाड्यांइतके स्मूथ / रिफाईन्ड नाही.
किंमत-
५५,८००. (बजेटपुर्वी.)
सर्वांचे आभार. ज्ञानेश
सर्वांचे आभार. ज्ञानेश मुद्देसूद तुलनेसाठी धन्यवाद. ज्यांना अशाप्रकारे एकापेक्षा अधिक गाड्या चालवण्याचा अनुभव असेल त्यांनी अशीच तुलना केली तर मला निर्णय घेणे खुपच सोपे जाईल.
माझी अॅक्सेस १२५ आहे , मस्त
माझी अॅक्सेस १२५ आहे , मस्त गाडी !
माझी अॅक्सेस १२५ आहे , मस्त
माझी अॅक्सेस १२५ आहे , मस्त गाडी !>>> ४ .५ वर्षे वापरतोय उत्तम
शेवटी Wego बुक केली. एक
शेवटी Wego बुक केली. एक आठवड्यात मिळेल. :-):-):-)
hero maestro हि गाडि कशी
hero maestro हि गाडि कशी आहे?कोणी वापरली आहे का? आमच्याकडे प्लेजर आहे महीन्यातुन एकदातरि नियमाने पंक्चर होते
आमच्याकडे प्लेजर आहे
आमच्याकडे प्लेजर आहे महीन्यातुन एकदातरि नियमाने पंक्चर होते>>> कित्येक प्लेजर वाले तर म्हणतात घेतल्यापासुन हवा देखील भरली नाही...
@प्राची :अभिनंदन ! मी वेगो ३
@प्राची :अभिनंदन ! मी वेगो ३ वर्षापासून चालवतो आहे..मस्त अनुभव आहे ..
गाडीची उंची थोडी जास्त आहे ..चालकाची उंची ५.२" तरी असणे गरजेचे आहे..
आमच्याकडे प्लेजर आहे
आमच्याकडे प्लेजर आहे महीन्यातुन एकदातरि नियमाने पंक्चर होते>>> कित्येक प्लेजर वाले तर म्हणतात घेतल्यापासुन हवा देखील भरली नाही...>>>>>>>> हो.. माझीपण प्लेजर आहे. गेले ५ वर्षे वापरते आहे.. काही प्रॉब्लेम नाही.. एकदा सुध्धा पंचर नाही झाली..
अविगा >> कुणीतरी मुद्दाम
अविगा >> कुणीतरी मुद्दाम करतंय का ते पहा...
Pages