“सगळं होतंय ना मनासारखं
मग झालंय काय चेहेरा पाडायला ?”
प्रश्न तेच पुन्हा पुन्हा...
“सुख बोचतंय..... दुसरं काय...”
उत्तरंही तीच.... त्यांचीच
पण बोलणार नाही मी...!!
का सगळं बोलून दाखवायचं...
का सगळं उघडून दाखवायचं...
मीच माझं कुलूप उघडायचं,
आणि वेदनांचं प्रदर्शन करायचं.
मग प्रत्येकाची सहानुभूती ओसंडून वाहणार
मीच ती गोळा करायची
माझ्यासाठी....... ??
छे; कशाला.....
मी नाहीच बोलणार....
......
नकोय मला बिचारेपण
नकोय सहानुभूती
गोंजारतेय हल्ली व्यथांनाच
जपतेय त्यांची intensity
बरं चाललंय हो आमचं
हल्ली चांगले मित्र मिळणं सुद्धा कठीण झालंय
पण हा दोस्त टिकलाय बराच
बघू किती दिवस देतोय साथ
सध्या तरी रमलेय त्यात
अहो, उसंतच देत नाही तो
बाकी काही करायला
म्हणून तर शिकलेय आजकाल
दु:खालाच गोंजारायला
ट्रेनिंग घेतेय सध्या चेहेरा हसरा ठेवण्याचं.
“प्रॅक्टीस कर... नक्की जमेल” म्हणाला तो
त्यात काय एवढं .....
मी आणखी काही वेदना देतो.
कित्ती सोप्पंय ..!!.
मी सगळं त्याचं अगदी मनापासून ऐकते
मज्जा येतेय....
निघतेय सोलवटून,
रक्ताळलेय...
पण प्रत्येक थेंबाला आस
आणखी नव्या दु:खाची.
बाकी पाश सारे सुटलेत...
तुटलेत...
कधी......
कळलंच नाही
मीच तोडलेत... ????
की तेच घाबरलेत.....
तुझ्या माझ्या यारीला...
बरंच झालं,
आता नाही येणार प्रश्न कुणाचे
नाही द्यावी लागणार उत्तरंही.
आत राज्य तुझंच...
प्रत्येक डाव तुझाच
खेळ तुझी खेळी
माझी फक्त अळी मिळी गुपचिळी !!
जयश्री अंबासकर
जयवी, कवितेतली इन्टेन्स भावना
जयवी, कवितेतली इन्टेन्स भावना अन प्रचि..
ले.शु.
मला फार आवडली ही रचना.
मला फार आवडली ही रचना. धन्यवाद.
भारती, बेफी.........धन्यवाद
भारती, बेफी.........धन्यवाद
खरं तर वेगळीच कविता लिहायला घेतली आणि वेगळीच उतरली.
मग जी उतरली नाही ती कुठे
मग जी उतरली नाही ती कुठे गेली? ह घ्या
ती कविता उतरलीच नाही....
ती कविता उतरलीच नाही....
झर झर आलेल्या भावना व शब्द
झर झर आलेल्या भावना व शब्द .सुंदर
कुठलाही आक्रोश न करता व्यक्त
कुठलाही आक्रोश न करता व्यक्त झालेलं स्वगत !
लै भारी !
विक्रांत, राजीव......
विक्रांत, राजीव...... शुक्रिया
नरेंद्र दाभोळकर बनून वाचाविशी
नरेंद्र दाभोळकर बनून वाचाविशी वाटली वरचे चित्र बघितल्यावर. मग स्टुडंट ऑफ द इअर बनून वाचाविशी वाटली खालचे चित्र बघितल्यावर. नंतर मात्र कवयित्रीचे नाव वाचले आणि जयुताईंचा पंखा बनून वाचली!
धन्यु उमेश
धन्यु उमेश
(No subject)
आता नाही येणार प्रश्न
आता नाही येणार प्रश्न ..........माझी फक्त अळी मिळी गुपचिळी !! >>>> छानच.
धन्यवाद उल्हासजी
धन्यवाद उल्हासजी