Submitted by सदाफटिंग on 6 February, 2013 - 22:01
सौंदर्य म्हणून मुर्ती ठीक आहे. पण त्यात देवत्व हे विशिष्ट समाजाचे पोट पिढ्यानपिढ्या भरावे यासाठी आणले गेले. दगड हा दगडच असतो. दगडात देव आहे का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>> पण त्यात देवत्व हे
>>>> पण त्यात देवत्व हे विशिष्ट समाजाचे पोट पिढ्यानपिढ्या भरावे यासाठी आणले गेले. <<<<
विशिष्ट समाज म्हणजे "पाथरवट" म्हणायचे आहे का? की बामणे (नेहेमीप्रमाणे? ) ?
त्यान्च्या पोटाच्या काळजीकरता हे देवत्व नक्कीच आणले/समजले गेलेले नाहीये!
तुमच्या आगा ना पिछा अन शेन्डा ना बुडखा धर्तीच्या विधानाचा तीव्र निषेध. असले विधान ख्रिस्त्यान्च्या तोन्डून बरेचदा ऐकले आहे. इथे वाचायला मिळेल असे वाटले नव्हते. असो.
हिन्दू धर्माप्रमाणे, देव चराचरात आहे, नूसती मूर्तिच नव्हे, तर केवळ स्वच्छ धुतलेल्या धोन्डयाला शेन्दूर फासला, तरी पूर्ण सश्रद्ध व्यक्तिस त्यात देवत्व आढळते. तेव्हा "सुन्दर मूर्तिद्वारे" लोकान्च्या पिढ्यान्पिढ्याच्या पोटापाण्याच्य व्यवस्थेबद्दलची उठाठेव केली नाहीत तरी चालेल. असोच.
(च्यायला हल्ली दगडात अत्युत्कृष्ट कोरीव काम करणारे आख्ख्या देशात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत शिल्लक असतील, अन यान्ना पडलीये विशिष्ट समाजाच्या पोटभरणीची काळजी, अन ते ही स्वतःच्या खिशातून दमडाही खर्चावा लागत नाहीये, तरी! खरोखरच यान्ना एखाद्या मूर्तिची किंमत मोजायला लागली तर दुसर्या समाजान्चे खाणेपिणे/अन्न/पोटपाणी काढत किती आकाशपाताळ एक करतील काय की )
(पुनःश्चः दुसर्यान्चे पोट कशाकशाने भरताना पाहून जर आपले "पोट दुखायला" लागले तर सरळ पोटदुखीचे औषध घ्यावे, ते ही अॅलोपॅथीचे! उगाच आयुर्वेदिक उपचारान्प्रमाणे, असल्या पोटदुखीबद्दल वरल्या पोस्ट/वाक्यासारखे सार्वजनिक "वमन" करू नये, बर्का! अन हे औषधोपचार वेळेत करावेत, नैतर दुसर्याच्या कमाईतला हिस्सा खंडणीरूपाने जबरदस्तीने मागण्याच्या दाऊदी ठगादीकांसारख्या वर्तणूकीकडे केव्हा वळले जाल याचा नेम नाही )
(विशेष सूचना: मी कृती/कर्म/शिक्षणाने विश्वकर्मा पूजक "पाथरवट" अर्थात मूर्तिकारही आहे अन जन्म/कर्म/धर्माने "ब्राह्मणही" आहे - अन एकदा का "ब्राह्मण" असे म्हणले की मग स्वतंत्ररित्या अजुन "हिन्दू" हा शब्द (सरकारि फॉर्मव्यतिरिक्त) कुठेही वापरायची गरज नस्ते असे माझे मत ते अध्यार्हृतच अस्ते.)
limbutimbu च्या वक्तव्याचे
limbutimbu च्या वक्तव्याचे प्रचंड अनुमोदन!
मला एक जुनी कथा आठवली.
मला एक जुनी कथा आठवली. तुमच्यासारखाच एक राजा असतो. मुर्तीत देव नसतो कारण ती मातीची आणि दगडांची असते वगैरे म्हणणारा. एकदा त्याच्या आईवडीलांची तसबीर त्याच्या हातात देऊन म्हटल की गड्या, थुंकून दाखव याच्यावर. म्हणाला, शक्य नाही. तर त्याला म्ह्टल, गड्या, कागद आहे तो, कलर फासलेला. थुंकायच सरळ आणि टाकायचा बंबात. तुम्ही थुंकाल ?
परमेश्वर कुणी पाहीला नाही, पण या जगाच रहाटगाडगं चालवणारा कुणीतरी एक सर्वशक्तीमान आहे अशी जर संकल्पना असेल तर त्यात काय गैर आहे ? त्याचं प्रतिक म्हणून जर कुणाला स्वतःच्या श्रद्धेतून एखादी मुर्ती घडवाविशी वाटली तर ती सर्वस्वी त्याची इच्छा आहे. तुम्हाला तो दगड वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घरातले सगळे दगड, कागद द्या नर्मदेत टाकून. त्यासाठी बाफ काढायची काय गरज ?
ज्याची श्रद्धा त्याला देव
ज्याची श्रद्धा त्याला देव दिसतो ज्याची नाही त्याला दगड दिसतो.
तुमचं काय त्याप्रमाणे तुम्हाला दिसेल. ते तुम्ही बघा आणि म्हणा.
बाकी ज्याचं त्याच्यापाशी.
कौतुकच्या पोस्टीला कानामात्रावेलांटीसकट अनुमोदन.....
हपण त्यात देवत्व हे विशिष्ट
हपण त्यात देवत्व हे विशिष्ट समाजाचे पोट पिढ्यानपिढ्या भरावे यासाठी आणले गेले.
>> चुकतय तुमचं. वेगवे गळ्या संस्कृतीत, वेगवेगळ्या कालखंडात दगडातलं दैवत्व पुजलं गेलं.
संस्क्रुती = भारतीय नव्हे, इतरही. खूप जुन्या जुन्या. थोडा अभ्यास वा ढवा .. असा फुस.
कौतुकची पोस्ट आवडली..
बादवे, देव दगडात आहे का ह्याचं उत्तर हवं आहे, हे गृहित धरून् देतेय -
हो. जर देव आहे ह्यावर विश्वास ठेवणार असाल तर तो दगडातही आहे ह्याची खात्री बाळगा..
कौतुक शिरोडकर | 7 February,
कौतुक शिरोडकर | 7 February, 2013 - 10:53 नवीन
मला एक जुनी कथा आठवली. तुमच्यासारखाच एक राजा असतो. मुर्तीत देव नसतो कारण ती मातीची आणि दगडांची असते वगैरे म्हणणारा. एकदा त्याच्या आईवडीलांची तसबीर त्याच्या हातात देऊन म्हटल की गड्या, थुंकून दाखव याच्यावर. म्हणाला, शक्य नाही. तर त्याला म्ह्टल, गड्या, कागद आहे तो, कलर फासलेला. थुंकायच सरळ आणि टाकायचा बंबात. तुम्ही थुंकाल ?
<<
अत्यंत घिसापिटा अन चुकीचा दृष्टांत.
संदर्भात चुकीचा आहे.
इब्लिसराव, चला आता चुका सांगा
इब्लिसराव, चला आता चुका सांगा पाहू.
>>इब्लिसराव, चला आता चुका
>>इब्लिसराव, चला आता चुका सांगा पाहू.
येस सांगा यात काय चुक आहे ?
लिंबूटिंबू व कौतुक शिरोडकर
लिंबूटिंबू व कौतुक शिरोडकर यांच्या पोस्टींना अनुमोदन
महेश व कौतुक, कुणाकडून अपेक्षा करताय?
लिंबूटिंबू व कौतुक शिरोडकर
लिंबूटिंबू व कौतुक शिरोडकर यांच्या पोस्टींना अनुमोदन
दगडावर दगडाने फेकलेला अत्यंत
दगडावर दगडाने फेकलेला अत्यंत दगड लेख अन दगडाने दिलेला अत्यंत दगड प्रतिसाद.
धोंडाप्रिय येऊकामी...
हाय रे देवा पुन्हा एकदा
हाय रे देवा पुन्हा एकदा नॄसिंह अवतार घ्यावा लागेल या हिरण्याला दगडातला देव दाखविण्यासाठी. बस बाकी काही लिहीत नाही.
देव चराचरात आहे.
>>धोंडाप्रिय
>>धोंडाप्रिय येऊकामी...
कोणत्याही धाग्यावर येऊन प्रतिसाद फेक करायची मोकळीक असताना नावात विचारता कशाला ? येउ का मी ?
कौतुक खरं सांगीतलस.. उदाहरणही
कौतुक खरं सांगीतलस.. उदाहरणही अचुक दिलस..
देव मानावा कि नाहि हे ज्याच्या त्याच्या मनावर..
लिंबूटिंबू व कौतुक शिरोडकर
लिंबूटिंबू व कौतुक शिरोडकर यांच्या पोस्टींना अनुमोदन
नैतर दुसर्याच्या कमाईतला
नैतर दुसर्याच्या कमाईतला हिस्सा खंडणीरूपाने जबरदस्तीने मागण्याच्या दाऊदी ठगादीकांसारख्या वर्तणूकीकडे केव्हा वळले जाल याचा नेम नाही
तुनच्या त्या सेना तरी काय दुसरे करतात?
ठग परवडले... सरळ तोंडावर सांगतात, आम्ही ठगच आहोत म्हणून
सदादगडींग, तुझी बुद्धी
सदादगडींग, तुझी बुद्धी दगडासारखी झाली आहे ? प्लास्टीक प्लॅस्टर आफ पॅरिस ,कागद, धातू, लाकुड यांच्यापासूनही देव बनवले जातात, या प्रत्येकावर एक धागा काढ
@महेश, येऊकामी हे जपानी नाव आहे.
लिंबूटिंबू व कौतुक शिरोडकर
लिंबूटिंबू व कौतुक शिरोडकर यांच्या पोस्टींना मनापासून अनुमोदन
१. 'आईबापाचा' फोटो असणे व
१. 'आईबापाचा' फोटो असणे व त्यावर थुंकणे यात 'आईबापाचा' अपमान करणे ही क्रीया येते. त्यावर न थुंकण्याचे कारण तुमच्या मनात आहे. त्या 'फोटो' मधे नाही.
२. त्याच प्रमाणे देव दगडात आहे, हे तुमच्या 'मनात' आहे.
३. तो देव उदा. ख्रिश्चनाचा/मुसलमानाचा/कुणा नरभक्षक आदीवास्याचा असेल, तर तुम्ही बिनदिक्कित थुंकू शकाल, किंवा याच लॉजिकने हिंदू देवाच्या मूर्ती मुसलमान आक्रमणकर्ते पूर्वी फोडत, त्यांचा विध्वंस करीत. त्यापूर्वी 'यज्ञातल्या' देवाला ध्वस्त करणारे राक्षस हेच काम करीत. तो माणूस वा राक्षस दगडात देव आहे म्हणून त्याला नष्ट / भ्रष्ट / अपमानित करण्यापासून थांबत नसे.
उगा या लॉजिक मधे आईबाप आणले की भावनिक फाटाफूट सुरू होते. दगडात 'देव' आहे ही फक्त भावना आहे. दुसरे काहीही नाही.
अन,
४. मुख्य म्हणजे तुम्ही अमुक (आईबापाच्या फोटोवर थुंकणे) करून दाखव असे म्हटले व ते मी केले नाही(कारण आईबापाच्या प्रतिकाचा अपमान न करण्याची माझी इच्छा), याचा अर्थ दगडात देव आहे असे सिद्ध होत नाही.
कदाचित त्याच कुण्या नरभक्षक आदिवासीच्या धर्मात मूर्तीवर थुंकणे ही सर्वोच्च पूजा असेल तर तुमची आयडिया पंक्चर होते की!
५. याउप्पर थुंकून दाखविले, तर माझ्या आईबापांचा अपमान करण्यापेक्षा, तुमचे भ्रम दूर करण्याचा प्रयत्न इतकेच साध्य होईल. त्याने दगडात देव येणार नाहीच, फक्त 'तुमच्या' मनातल्या श्रद्धांना तडा जाऊन माझ्याबद्दलही घृणा तुमच्या मनात उत्पन्न होईल.
तात्पर्यः
धागाकर्ते जेंव्हा म्हणतात, 'दगडात देव आहे की नाही'? तेव्हा या प्रश्नाचे उत्तर 'नाही, तो मनात आहे, व दगडातही असेल अशी "श्रद्धा" आहे. फोटो वा मूर्ती हे प्रतिक.' इतकेच होते.
लिंबाजीराव मधेच तुच्छतेने ख्रिश्चन धर्माचा उल्लेख करून गेलेतच की त्यांच्या पोस्टीत.
अन ज्या कावळ्या कुत्र्यांना वा गावात विमनस्क फिरणार्या वेड्यास देव फिव इ. कन्सेप्ट नसते ते बिनदिक्कीत शेंदूर फासलेल्या दगडांचाही वापर विजेच्या खांबाचा वा गांधीबाबाच्या पुतळ्याचा करावा, तितक्याच निर्विकारपणे करतातच की.
पण त्यात देवत्व हे विशिष्ट
पण त्यात देवत्व हे विशिष्ट समाजाचे पोट पिढ्यानपिढ्या भरावे यासाठी आणले गेले.>>>>>>अरे अकलेच्या बटाट्या सद्या ,दगडाला देव बनवणारे आणि त्यावर पोट भरणारे कधिच सिलिकॉन व्हॅलित गेलेत. तिथे ते डॉलरमध्ये खेळत असतात .पण दगडाला देव मानणारे अजुनही आहे तिथेच आहेत.
कुणीही येतो तुम्हाला सांगतो, कि हा दगड आजपासून देव आहे. मुर्ख लोक नारळ दुध पैसे वाहतात आणि बक्कळ दक्षिणा देऊन मोकळे होतात यात दोष कुणाचा? ज्याची अक्कल गहाण पडलेली असते त्यालाच जग मुर्ख बनवते
मनुष्यापेक्षा शंभरपट जास्त ताकद असलेला गजराज माणसाची ओझी वाहतो ,कारण अक्कल गहाण टाकणे किंवा अजिबातच अक्कल नसणे
good answer
good answer
कौतुक शिरोडकरांचे 'अगदी
कौतुक शिरोडकरांचे 'अगदी पहिले' विधानः
>>>मला एक जुनी कथा आठवली. <<<
आठवली याचा अर्थ 'येथे चाललेल्या चर्चेमुळे त्या कथेचे स्मरण झाले'!
याचा पुढचा अर्थ असा की ही कथा एखादा सिद्धांत म्हणून त्यांनी तेथे दिलेला नाही. त्या कथेचे नुसते स्मरण झालेले आहे. त्यामुळे,
>>>अत्यंत घिसापिटा अन चुकीचा दृष्टांत.<<<
हे विधान लागू होत नाही.
आता यातही एक गोची आहे. सिद्धांत आणि दृष्टांत या शब्दांचे अर्थ पूर्ण भिन्न आहेत. या कथेत कोणताही दृष्टांत नाही.
पुढे:
ज्या कथेचे स्मरण झाले त्यातील तथ्य किंवा त्या कथेचा सारांश जो त्यांना किंवा वाचकाला अभिप्रेत असावा तो हाच की:
'मनातील भावना महत्वाची'
त्यामुळे हे खालील विधानः
>>>तात्पर्यः
धागाकर्ते जेंव्हा म्हणतात, 'दगडात देव आहे की नाही'? तेव्हा या प्रश्नाचे उत्तर 'नाही, तो मनात आहे, व दगडातही असेल अशी "श्रद्धा" आहे. फोटो वा मूर्ती हे प्रतिक.' इतकेच होते.<<<
हे शिरोडकरांचेच विधान एलॅबोरेट केल्याप्रमाणे आलेले आहे.
बेफिकीर........सट्यॅक् !!!!
बेफिकीर........सट्यॅक् !!!!
>>@महेश, येऊकामी हे जपानी नाव
>>@महेश, येऊकामी हे जपानी नाव आहे.
कृपया संदर्भ देणार का ? मुळात जपानी भाषेत "ये" असे अक्षरच नसल्याने शंका आहे.
महेश, येउकामी या शब्दाची फोड
महेश,
येउकामी या शब्दाची फोड 'येऊ का मी?' अशी नसून 'येऊ कामी' अशी आहे. आपला आय डी कामी येणार हा दृढ आत्मविश्वास ठायी ठेवूनच त्यांनी प्रतिसादांमधून थैमान व शिरकाण सुरू केलेले आहे. काही घटिका 'जपानी व्युत्पत्ती' या शब्दांमुळे अॅडमीनांचा गोंधळ होईल हे माहीत असल्याने त्या घटिकांमध्ये जमेल तितकी मुंडकी उडवण्याचा त्यांचा प्लॅन असावा
धन्यवाद इब्लिसराव. थुंकणे हि
धन्यवाद इब्लिसराव.
थुंकणे हि क्रिया उदाहरणादाखल आहे. फक्त हे सिद्ध करण्यासाठी की ते प्रतिक आहे, त्याबद्दल असणारी भावना मनात आहे, त्या कागदात आणि दगडात पहायला गेलं तर तो कागद आणि दगड आहे. हे तुमच्यापर्यंत पोहोचल. आनंद आहे.
१, २, मान्य
३. हे ही मान्य. पण परमेश्वराला माऊली मानलं जातं, मायबाप मानलं जातं. परमेश्वरानंतर जर कोण वंदनीय असतील तर मायबाप. गणेशाच्या कथेत तर मायबापाचा दर्जा परमेश्वराच्या वर मानला गेला आहे. शेवटी तुम्हीही हे म्हणताय की ही भावना आहे आणि मी काही वेगळं म्हणालो नाही.
४. तुम्ही 'ते करा' असं इथे म्हणणं नाही. तुम्ही 'ते का करत नाही ?' याचं कारण समजून घ्या ही अपेक्षा आहे. त्यासाठी उदाहरणाचा दाखला. शास्त्रीय भाषेत प्रत्येक गोष्ट ' बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' अशीच असते ना... इथे देव दाखवता येणार नाही पण निदान त्या मागे असलेली भावनेची एखाद्या समंजस माणसाला जाणिव करून देता येते.
कदाचित त्याच कुण्या नरभक्षक आदिवासीच्या धर्मात मूर्तीवर थुंकणे ही सर्वोच्च पूजा असेल तर तुमची आयडिया पंक्चर होते की!>>>>> ही आयडीया त्यांच्यासाठी, ज्यांना थुंकणे या प्रक्रियेतील नेमकी भावना माहीत आहे. नरभक्षक लोकांसाठी मी "थुंकू नका" ही आयडीया वापरेन. शेवटी ज्याला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत समजवायचं. तरीही कळलं नाही तर मग तो भला तसा मी भला.
५. तुम्ही फार बुवा मटेरियालिस्टीक झालात. तुमच्या थुंकण्याने फक्त इतकचं सिद्ध होईल की तुम्ही 'हो नाम्या आणि सांगकाम्या' आहात. 'दुध उतू जाईल तेव्हा लक्ष ठेव' म्हटल तर 'दुध उतू जाईपर्यंत लक्ष ठेवाल, पण गॅस बंद करणार नाही. कारण सांगितलं त्याचा सरळ अर्थ घेतला, बिटवीन द लाईन्स पोहोचलच नाही तर काय करावं ?
तात्पर्यः
धागाकर्ते जेंव्हा म्हणतात, 'दगडात देव आहे की नाही'? तेव्हा धागाकर्ता मुर्ख आहे हा अर्थ होतो. त्याला इतकही कळत नाही की देव कशातही नाही आणि देव सगळ्यात आहे. धागा काढण्याचा साधा सरळ अर्थ आहे की लोकांना डिवचावं आणि आग लावत बसावं. त्यातही जर चर्चा करायची असेल तर मग बिनदिक्कतपणे येऊन स्वतःच मत नीट मांडावं, त्याला थोडा अभ्यासाचा आधार द्यावा. इथले हिंदू इतकेही 'ढ' नाहीत की चर्चेला माघार घेतील. हा धर्म नेहमी विस्तारत गेलाय कारण इथे प्रत्येक नव्या गोष्टीसाठी चर्चेला नेहमी वाव मिळत राहीला आहे. तो संकुचित राहीला नाही.
लिंबाजीराव आणि माझी पोस्ट या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे यावर लिंबाजीराव बोलतील.
बेफिंप्रमाणे नै तिथे बाप
बेफिंप्रमाणे नै तिथे बाप काढण्याचे काम, शिरोडकर, तुम्ही तरी करू नका असे नम्रपणे सुचवितो.
मूर्तीत देव आहे का? याच्याशी आईबापाच्या फोटोवर थुंकशील का? याचा काय संबंध?
बाकी तुम्ही अन तुमचे देव, चालू द्या!
ता.क.
>> ही आयडीया त्यांच्यासाठी, ज्यांना थुंकणे या प्रक्रियेतील नेमकी भावना माहीत आहे. नरभक्षक लोकांसाठी मी "थुंकू नका" ही आयडीया वापरेन.<<
ती 'आयडिया' आहे हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद!
जपानी भाषेत 'ये 'अक्षर नाही!
जपानी भाषेत 'ये 'अक्षर नाही! महेश, आपण जपानी भाषेचे अभ्यासक आहात काय?
(No subject)
बाकी महेश, यामाहा, यामासाकी
बाकी महेश, यामाहा, यामासाकी मझॅक, टोकियो हे शब्द कोणत्या भाषेतले आहेत?
Pages