"टेबल नंबर २१ ?. हे कसलं नाव?. सिनेमाच नाव कस आकर्षक पाहिजे .नावावरूनच बघावासा वाटला पाहिजे ".अशी माझ्या सारखीच सगळ्यांची प्रतिक्रिया होत असणार. नक्की .पण बघितलाच पाहिजे..तलाश पेक्षा सुद्धा भारी आहे इ इ मला सांगितलं गेल्याने सिनेमाला गेले आणि मनात विचारांची खळबळ घेऊनच बाहेर आले. नावावरून काहीच न समजणारी पण जर कोणी विचारलं काय आहे या फिल्म मध्ये बघण्यासारख ? तर उत्तर असेल काय नाही बघण्यासारख . सिनेमाटोग्राफी / संवाद /डिरेक्शन / फायटिंग/स्पेशल इफेक्स या सगळ्या दृष्टीने आपण ( बॉलीवूड ने )खूप भरारी मारली आहेच .पण विषयाच नाविन्य /विषयामधली विविधता या बाबतीत आपण बरेच पाठी आहोत अस कुठे तरी जाणवत होत . पण २०१२ मधे आलेल्या हिंदी सिनेमाकडे दृष्टीक्षेप टाकला तरआत्ता हे चित्र बदलायला लागल आहे.नक्कीच टेबल नंबर २१ मध्ये हेच आहे विषयाच नाविन्य आणि उत्कृष्ट सदिरीकरण
आता टेबल २१ विषयी
विवान आणि सिया या कपल ला फिजी बेटाची फ्री ट्रीप मिळते /ते फिजी बेटावर जायला निघतात आणि सिनेमा सुरु होतो . दोघेही फिजी बेटावर पोचतात . त्यांच्या लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाच गिफ्ट म्हणजेच ही फिजी बेटाची ट्रीप असते. ट्रिप परेश रावल नी स्पोन्सार केलेली असते. त्या निमित्ताने परेश रावल ची एन्ट्री होते .आणि सुरु होतो एक थरारक गेम शो. परेश रावल त्या दोघांना एक रियालिटी फ्री गेम ची ऑफर देतो जो गेम जिंकल्यावर त्यांना २१ करोड रुपये मिळणार असतात. विवान ची नोकरी गेलेली असते त्यामुळे त्यांना पैशाची जरुरी असतेच.अशा परिस्थितीत ते त्या गेम शो ची ऑफर स्वीकारतात. त्यांच्या कडून कॉनट्रक साईन करून घेतलं जात/नियम समजावले जातात आणि खेळाची सुरवात होते. श्वास रोखून धरणाऱ्या खेळाची सुरवात . विवान आणि सिया ज्या वेगाने त्या गेम मध्ये गुरफटत जातात त्याच वेगाने प्रेक्षकही गुरफटत जातात. आणि पुढे काय पुढे काय ?. सिनेमा सस्पेन्स असल्याने त्याचा शेवट मी सांगणार नाही .पण जरूर जरूर बघण्यासारखा सिनेमा आहे एवढ मात्र नक्कीच सांगेन. सगळ्यांनी एकदा तरी पहिलाच पाहिजे असा.
परेश रावल च्या अभिनयाबद्दल वादच नाही . तो आहे म्हणून लोक हा सिनेमा पहायला जातील. पण राजीव खंडेलवाल आणि टीना देसाई यांची पण कामगिरी तितकीच आश्वासक आहे. राजीव खंडेलवाल ला आपण आमिर ( २००८) मध्ये कदाचित बघितलं असेल. जर हटके फिल्म्स असतात त्याच्या आणि टीना देसाईचा कदाचित हा पहिलाच सिनेमा असावा. पण तिच्या अभिनयात अजिबात नवखेपणा नाहीये. सिनेमाची पकड कुठेही सुटत नाही .सिनेमाचा शेवट तर खूपच विचार करायला लागणारा आहे / चकित करणारा आहे .अमिरचा "तलाश" जसा एक सस्पेन्स सिनेमा म्हणून आपण बघितला तसाच एक सस्पेन्स थ्रिलर म्हणून या सिनेमाला पण प्रेक्षकांनी दाद दिलीच पाहिजे . तरच या नवीन नवीन बुद्धिमान लोकांना काहीतरी वेगळ आणि चांगल देण्याचा हुरूप येईल. सिनेमाच डिरेक्शन "आदित्य दत्ता" च आहे. एकदम नवीन आणि फ्रेश डिरेक्टर. . तेव्हा लोक हो टेबल २१ ला जरूर भेट द्या
टेबल नंबर २१- थरारक
Submitted by सुजा on 9 January, 2013 - 12:22
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मोकिमी वाचला रिव्ह्यू
मोकिमी वाचला रिव्ह्यू विकिपेडिया वर..
मला स्वताला शेवट खूपच
मला स्वताला शेवट खूपच अनपेक्षित वाटला . अजिबात अस काही असेल अस वाटल नव्हत >>> अनुमोदन...
खुप छान आहे चित्रपट... UTV action var asto madhun madhun
शेवटपर्यंत खरंच थरारक. शेवट
शेवटपर्यंत खरंच थरारक. शेवट गंडल्यासारखा वाटला.
Pages