Submitted by निंबुडा on 15 January, 2013 - 05:24
इथेच एका बीबी वर 'जिह्वा' ह्या आकारान्त स्त्रीलिंगी शब्दाचे सप्तमी चे एक वचन लिहायचे होते. तेव्हा 'माला' शब्द मनातल्या मनात चालवून पाहिला आणि लक्षात आले की अधले मधले विसमरणात गेले आहे. मग गंमत म्हणून 'देव' आणि 'वन' शब्द चालवून पाहिले. बरीचशी रुपे आठवली. मग चाळाच लागला. आत्मनेपदी, परस्मैपदी, उभयपदी; इ, वहे, महे इ. असे सर्व एका मागोमाग आठवायला लागले. शाळेत संस्कृत (तिसरी भाषा म्हणून) शिकतानाच्या आठवणी जाग्या झाल्या. त्या सर्वांना उजळणी देण्यासाठी हा बीबी. तुम्हाला जे आठवतेय ते तुम्ही ही लिहा.
संस्कृत वर्ग चालू असतानाच्या आठवणीही लिहूया!
+++++++++++++++++
इथे काही जणांनी आधी संस्कृत सुभाषितांची संग्रहमालिका लिहिली आहे. इथे लिंक्स देत आहे.
संस्कृतमधील सुभाषिते मराठीत
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वरमेको गुणी पुत्रो न च
वरमेको गुणी पुत्रो न च मूर्खशतान्यपि ।
एकश्चन्द्रस्तमो हन्ति न च तारगणोऽपिच ॥
अर्थः शंभर मुर्ख पुत्रांपेक्षा एकच गुणी पुत्र असलेला चांगला. एकच चंद्र संपुर्ण आकाश उजळवण्यासाठी पुरेसा असतो, हजारो चांदणे नाही.
दानं भोगो नाशस्तिस्रो गतयो
दानं भोगो नाशस्तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य ।
यो न ददाति न भुङ्क्ते तस्य तृतीया गतिर्भवति ॥
अर्थ: दान, भोग (उपभोग घेणे), नाश (विनाश पावणे) या तीन प्रकाराने संपत्ती जात असते. जो दान देत नाही आणि उपभोगही घेत नाही त्याची संपत्ती तिसर्या प्रकाराणे जाते (नाश पावते).
इथे भो भवति (८ प. प.) आणि दा ददाति (३ प प) असे धातू आहेत ना?
भुङ्क्ते हा आ.प धातू आहे ना?
कसला भन्नाट चाललाय धागा
कसला भन्नाट चाललाय धागा
मस्त.
आन्दू, हा गुण माहित नव्हता तुझा!
वर कुणीतरी विचारलय, अजुन इतक्या जणान्ना संस्कृत मधे इन्टरेस्ट आहे.....! अहो ही मायबोली आहे, अन इथे तर्हतर्हेचे तज्ञ लोक उपस्थित असतात.
वरदा, पुस्तके आणून बेसिकच आधी शिकतो.
संस्कृतदिपिकाचे सॉफ्टवेअर मागेच डाऊनलोड केलय, पण वरील बेसिकच कळत नसल्याने गति आली नव्हती.
सर्वान्ना धन्यवाद.
गा.पै. दोला म्हणजे झोपाळा
गा.पै.
दोला म्हणजे झोपाळा (बहुतेक, खात्री करून पुन्हा सांगेन)
त्यावरूनच मराठित 'हिंदोळा' हा शब्द आला असावा.
'दोलायमान स्थिती' हा शब्दही 'झोपाळ्यावर असताना एकदा इकडे एकदा तिकडे अशी स्थिती असते' त्यावरून आला आहे.
धन्यवाद,
चैतन्य
भुङ्क्ते हा आ.प धातू आहे
भुङ्क्ते हा आ.प धातू आहे ना?
>> उभयपदी आहे.
भुनक्ति / भुङ्क्ते असा चालतो.
मस्त धागा. कधी कधी अचानक
मस्त धागा. कधी कधी अचानक शाळेत शिकलेली सुभाषिते आठवतात, वेळ मिळेल तसे टाईप करेन.
देव शब्द वाचताना छान वाटले . अगदी शाळेत गेल्यासारखे .
रामो राजमणी ..वाचले की लग्नातील मंगलाष्टके आठवतात.
खालील वाक्य संस्कृतमध्ये कसे
खालील वाक्य संस्कृतमध्ये कसे लिहायचे?
"मायबोलीवर संस्कृतच्या धाग्यावर चांगले प्रतिसाद येत आहेत आणि सर्वजण त्यात मनापासुन भाग घेत आहेत."
संस्कृत मधील माझे सगळ्यात
संस्कृत मधील माझे सगळ्यात आवडते म्हणजे नाटके. आम्हाला अकरावी आणि बारावी मिळून बहुतेक सगळ्या महत्त्वाच्या नाटकांचे उतारे होते आणि ते शिकवत शिकवतांना शिकविणर्या जोशी बाई पूर्ण नाटकच उलगडून सांगत. स्वप्नवासवदत्तम , कादंबरी, मृच्छकटीकम (म चा पाय मोडता येत नाहीये ). शाकुंतल......
माझे आवडते स्वप्नवासवदत्तम,
सर्वात पहिल्यान्दा शिकलेले
सर्वात पहिल्यान्दा शिकलेले सुभाषित :
नमस्ते शारदे देवी
वीणा पुस्तक धारिणी
विध्यारंभ करिष्यामी
प्रसन्नातू चसासदा ( काही पुस्तकात 'प्रसन्ना भव सर्वदा' आहे )
(टायपिंग मिस्टेक्स सुधारायला मदत करा)
संस्कृत भाषा दिन केंव्हा
संस्कृत भाषा दिन केंव्हा असतो? आणि संस्कृत भाषेचे वर्णन करणारे एक सुभाषीत आहे
' अमृतवाणी संस्कृत भाषा , नैव क्लिष्टा न च कठिणा ' हे संपुर्ण सुभाषीत मिळू शकेल का?
अमोल केळकर
मला इथे भेटा
मृच्छकटीकम् (मातीची गाडी) यात
मृच्छकटीकम् (मातीची गाडी) यात एके ठीकाणी कवी शूद्रक एका पावसाळी दिवसाचे वर्णन करत आहे (दुर्दीनवर्णनम्).. तिथे येणार्या सर्व सुभाषितांमधे ईतकी नादमयता, नाट्यमयता, नानाविध उपमा आहेत की बस.. कवी तो पाऊस अक्षरशः उभा करतो.
त्यातलेच एक सुभाषितः
उन्नमती नमती वर्षती गर्जती मेघः करोsति तिमिरौघम।
प्रथमश्रीरिव पुरुष: करोsति रुपाण्यनेकाsनि॥
अर्थः वर जातात, खाली येतात, गरजतात , पाऊस पाडतात आणि कधीकधी हे मेघ पूर्ण अंधार सुद्धा करतात. पहिल्यांदाच श्रीमंती प्राप्त झालेल्या माणसाप्रमाणे (मेघ) अशी अनेक रुपे धारण करतात.
@ अमोलः
@ अमोलः http://sanskritdocuments.org/atul/geet/naiva.html ही लिंक बघ रे.
सुरससुबोधा विश्वमनोज्ञा, ललिता ह्रुद्या रमणीया ।
अमृतवाणी संस्कृत भाषा , नैव क्लिष्टा न च कठिणा॥
मस्त चालू आहे हा धागा... इथे
मस्त चालू आहे हा धागा...
इथे नियमित हजेरी लावणार.
यात्र्या, तुझा हा गुण माहित नव्हता. ग्रेट!
आपल्याला अभ्यासक्रमात ज्या प्रकारे संस्कृत शिकवलं जायचं त्यावरून त्या भाषेबद्दल आवड निर्माण होणं जरा कठीणच होतं.
एक छान सुभाषित अर्धवट आठवतंय (तिसरी ओळ काय आहे? काही शब्द चुकत असतील तर ते ही सांगा.)
सम्पूर्णकुंभो न करोति शब्दम्
अर्धघटो घोषमुपैति नूनम्
---------------------------
जल्पन्ति मूढास्तू गुणैर्विहीना
एक सुभाषित जे माबोवरच्या
एक सुभाषित जे माबोवरच्या बर्याच आयडींना (विशेषतः डुआयना) लागू पडेल असे,
नलिकागतमपि कुटिलम् न भवति सरलम् शुनः पुच्छम् |
तद्वत खलजन हृदयम् बोधितमपि नैव याति माधुर्यम् ||
@ लंपन - धन्यवाद
@ लंपन - धन्यवाद
ललिता-प्रीति >> सम्पूर्णकुंभो
ललिता-प्रीति >>
सम्पूर्णकुंभो न करोति शब्दम्
अर्धघटो घोषमुपैति नूनम्
विद्वान कुलिनो ना करोती गर्वम
जल्पन्ति मूढास्तू गुणैर्विहीना
गापै, दोलास्विवोपविशन्ति हा
गापै, दोलास्विवोपविशन्ति हा संधी सोडवा या प्रश्नात केवळ एक स्वतंत्र शब्द म्हणुन आला होता,
त्यामुळे तो असा का आहे हा संदर्भ माहिती नाही.
हा शब्द जिव्हा आहे की जिह्वा?
हा शब्द जिव्हा आहे की जिह्वा? >>
गामा,
जिह्वा बरोबर. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. हेडर मध्येही दुरुस्ती करत आहे.
काव्यशास्त्रविनोदेन कालो
काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छती धीमताम
व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा
वयम् पंचाधिकम् शतम् असा एक
वयम् पंचाधिकम् शतम् असा एक पाठ होता, कोणाला आठवतो का?
सुभाषितांबरोबर त्यांचा अर्थही
सुभाषितांबरोबर त्यांचा अर्थही टाकुयात का खाली? म्हणजे सर्वांना समजेल?
पेरू, मी वर दिलेल्या
पेरू, मी वर दिलेल्या सुभाषिताचा अर्थ सहज समजेल असे वाटते, नसेल तर लिहू का ??
एकोsहम् असहाय्योsहम्
एकोsहम् असहाय्योsहम् कृशोSहमपिरीछिदः I
स्वप्नेSप्येवंविधा चिन्ता मृगेन्द्रस्य न जायते II
अर्थ : मी एकटा आहे, मला कोणाचे सहाय्य नाही, मी कृश आहे अशी चिंता सिंहाला स्वप्नातसुध्दा वाटत नाही.
उगाच एक माहिती. (धाग्यावर
उगाच एक माहिती. (धाग्यावर सुभाषितसंकलन करू इच्छिणार्या मित्रांसाठी)
संस्कृत विकी
मयेकर गुरुजींकडून साभार!
अल्पाक्षररमणीयं य: कथयति
अल्पाक्षररमणीयं य: कथयति निश्चितं स खलु वाग्मी |
बहुवचनमल्पसारं य:कथयति विप्रलापी स: ||
अर्थ
थोडक्यात; सुंदर शब्दात आणि नेमक असं जो वर्णन करतो, त्याला खरोखर वाग्मी [भाषाप्रभू] असं म्हणतात. पुष्कळ घोळवून; तथ्य कमी असलेल बोलेल तो [फक्त] बोलघेवडा असतो.
क्रुपया मधला क्रु कसा टाइप
क्रुपया मधला क्रु कसा टाइप करायचा?
सुभाषितांबरोबर त्यांचा अर्थही
सुभाषितांबरोबर त्यांचा अर्थही टाकुयात का खाली? म्हणजे सर्वांना समजेल?
>>
मला वाटते टाकूया.
मी वर दिलेल्या सुभाषिताचा अर्थ सहज समजेल असे वाटते, नसेल तर लिहू का ?? >>
महेश, शाळेत ज्यांना संस्कृत शिकायला होते, त्यांना अंदाजाने समजू शकेल. पण मला वाटते मराथी सोडून बाकी माध्यमांत शिकलेल्या वा मराठीतच शिकलेल्या पण संस्कृत न शिकलेल्या लोकांना कदाचित जड जाईल स्वतःच अर्थ लावून घ्यायला. अर्थ माहीत असेल तर लिहूया की!
(मी मागील प्रतिसादांमध्ये जी सुभाषिते लिहिली आहेत, त्यांचा अर्थ करते थोड्याच वेळात अपडेट!)
एक प्रश्नः संस्कृत सुभाषितांचा संग्रह असा धागा आहे का इथे आधीच? मी कालच शोधायचा प्रयत्न केला होता, पण वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते ह्या लेखमालिकेचे दामोदरसुत ह्यांनी लिहिलेले ४ भाग सापडले.
फक्त सुभाषितांचा संग्रह करण्यासाथी एक वेगळा धागा उघडूया का? त्या धाग्यावर सर्व सुभाषिते - अर्थासकट - एकत्र राहतील. दामोदरसुतांच्या वरील लेखमालिकेची लिंकही तिथे देता येईल. आणि आताच्या धाग्यावर फक्त संस्कृत बद्दलची चर्चा. कुणाचे काय मत आहे?
कृ kRu
कृ kRu
धन्यवाद इब्लिस आणि हो, ती
धन्यवाद इब्लिस आणि हो, ती संस्कृत विकिची लिंक पण छान आहे.
निंबुडा, चालेल.
रच्याकने, कोणाला क.भू.धा.वि., क.वि.धा.वि., व.का.धा.वि. आठवते आहे का?
लोकहो, एक शंका.. कस्तूरि
लोकहो, एक शंका..
कस्तूरि जायते कस्मात्? को हन्ति करिणां शतम्?
भीरु: कुर्वीत किं युद्धे? मृगात् सिंहः पलायते |
इथे 'मृगात् सिंहः पलायते'' म्हणजे हरीण सिंहापासून दूर पळते असाच अर्थ आहे ना?
मग मृग ची पंचमी कशी? सिंह चे पंचमी पाहिजे ना?
Pages