Submitted by Adm on 2 January, 2013 - 03:18
यंदाच्या वर्षीचे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (PIFF) १० ते १७ जानेवरी दरम्यान होणार आहे. नावनोंदणी (तिकिटविक्री) सध्या सुरु आहे. यंदा पहिल्यांदाच PIFF ला जाणार असल्याने एकंदरीत खूप उत्सुकता आहे.
अधिक माहिती http://puneinternationalfilmfestival.com/index.html ह्या वेबसाईट वर मिळेल.
बाकीही काही मायबोलीकर PIFFला जाणार आहेत.
तर हा धागा PIFF बद्दल, बघायच्या चित्रपटांबद्दल, पाहिलेल्या चित्रपटांबद्दल चर्चा करण्यासाठी.
कुठले चित्रपट बघावे ह्याबद्दल जाणकारांनी इथे नक्की लिहा.. आमच्या सारख्यांना ते उपयोगी पडेल.
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा मस्त...
अरे वा मस्त...
http://m.timesofindia.com/ent
http://m.timesofindia.com/entertainment/bollywood/news-interviews/Pune-I...
यंदा मराठी चित्रपट स्पर्धाविभागात 'संहिता' आणि 'पुणे ५२' हे मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेले चित्रपट दाखवले जातील.
चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या वेळा कळल्या की इथे लिहीनच.
आंतरराष्ट्रीय चित्रपट
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधे एकाच वेळेला ३-४ उत्तम चित्रपट चालू असण्याची शक्यता असते. अश्या वेळेला शक्यतो हावरटासारखे परदेशी चित्रपट बघून घ्या. ते परत बघायला मिळत नाहीत कधी. भारतीय चित्रपट मिळू शकतात. मराठी आणि हिंदी सोडून दिलेत तरी चालतील ते येतातच रिलीज होऊन.
आंतरराष्ट्रीय चित्रपट
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधे एकाच वेळेला ३-४ उत्तम चित्रपट चालू असण्याची शक्यता असते. अश्या वेळेला शक्यतो हावरटासारखे परदेशी चित्रपट बघून घ्या. ते परत बघायला मिळत नाहीत कधी. + १०००
कितीतरी चांगले चांगले चित्रपट मी नेटवर धुंडाळून पुन्हा पहायचा प्रयत्न केला...नाहीच मिळाले...आणि त्या माहोलमध्ये चित्रपट बघणे हा एक वेगळाच अनुभव आहे...
जसा दरवर्षी सवाई महोत्सव तसाच हा...
चुकवु नये असा...
आंतरराष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय स्पर्धाविभागातील महत्त्वाचे चित्रपट -
१. कूर्मावतार - गिरीश कासारवल्ली
२. ला देमोरा ( द डिले)
३. ला सिर्गा (द टोरोप)
४. पेले अखेर (द लास्ट स्टेप)
५. अराफ
६. द फिफ्थ सिझन ऑफ द इयर
७. बार्बरा
पहिल्या तीन दिवसांचं
पहिल्या तीन दिवसांचं वेळापत्रक -
http://www.puneinternationalfilmfestival.com/pdf/schedule.pdf
या वर्षी कंट्री फोकस हंगरी
या वर्षी कंट्री फोकस हंगरी आहे....
त्या विभागात कोलॅरॅडो किड चांगला वाटतोय
बाकी ग्लोबल सिनेमामध्ये
बॉडी ऑफ वॉटर, हेला डब्ल्यू, दुसर्या महायुद्धावर आधारित सायलेन्स, व्हायकिंग योध्यावरचा वालहला रायझिंग, बॉडीगार्डस अँड अॅसासिन्स असे काही चित्रपट चांगले वाटत आहेत
कुणी सिटी प्राईड कोथरूडला असता का...मी बहुतांशी चित्रपट तिकडेच पाहतो
मुक्ता आर्टस् निर्मित व
मुक्ता आर्टस् निर्मित व सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर दिग्दर्शित ’संहिता’ या चित्रपटाचा उद्या, ११ जानेवारी, २०१३ रोजी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रीमियर होणार आहे. मिलिंद सोमण, उत्तरा बावकर, राजेश्वरी सचदेवा, ज्योती सुभाष, देविका दफ्तरदार हे चित्रपटातील कलाकार, निर्माते सुभाष घई व सर्व तंत्रज्ञ यावेळी उपस्थित असतील.
मायबोली.कॉम या चित्रपटाचे माध्यम प्रायोजक आहेत.
मायबोली माध्यम प्रायोजक असलेला, रत्नाकर मतकरी दिग्दर्शित 'इनव्हेस्टमेंट' हा चित्रपटही यंदा महोत्सवात दाखवला जाणार आहे.
सर्वांना सादर आमंत्रण
आशुचँप, आजपासून मी, अरभाट,
आशुचँप,
आजपासून मी, अरभाट, पराग, अतुल, मीन्वा नक्की तिथे असू.
संहिताला उद्या नाही येता
संहिताला उद्या नाही येता येणार.
रविवारी पण आहे तेव्हा पहायचा प्रयत्न करेन.
लोकहो,, कुठले मुव्ही पहावे ह्या बद्दल नक्की नक्की लिहा इथे.. कारण इतके चित्रपट आहेत की कुठला पहावा हे ठरवताना गोंधळायला होणार आहे.
पराग, शक्यतो world
पराग,
शक्यतो world competition य विभागातले चित्रपट पहा. त्यातून वेळ उरला तर काही tribute/retro पहा.
बहुतेक चित्रपटांचे रेटिंग imdb वर असतात. ३ दिवसांचं वेळापत्रक मिळालं आहेच. सगळ्या सिनेमांचे रेटिंग बघून ठरवता येतं..
एन्जॉय. पहिली दोन वर्षं
एन्जॉय. पहिली दोन वर्षं पुण्यात असल्याने हावरटासारखे सिनेमे बघून घेतले होते. आता जमत नाहीच
वोक्के, तिथे आलो की फोन
वोक्के, तिथे आलो की फोन टाकतो....एकत्र बघुया एखादा तरी चित्रपट
उद्या मी हे सिनेमे पाहणार
उद्या मी हे सिनेमे पाहणार -
सकाळी ९ - Silence
सकाळी ११.२० - White Lions
दुपारी २.३० - संहिता
दुपारी ४.३० - कूर्मावतार
संध्याकाळी ६.१५ - Kuma
IMDBचा फार उपयोग होत नाही, कारण महोत्सवातल्या चित्रपटांचं रेटिंग फार्फार गरीब असतं. गूगल करून परीक्षणं वाचणं, महोत्सवाशी संबंधितांचा सल्ला घेणं, हे उत्तम.
संहिता मला पण पहायचाय
संहिता मला पण पहायचाय
Kuma पर्यंत पोचू शकलो तर मी
Kuma पर्यंत पोचू शकलो तर मी येईन. नाहितर आज war witch बघणार.
अर्र्र्र्र्र देशाबाहेर
अर्र्र्र्र्र देशाबाहेर असण्याचा हाच तर तोटा आहे
देशमुख साहेब, आम्ही देशात
देशमुख साहेब, आम्ही देशात असून्पण तोटा आहेच आमचा.
जे कुठले सिनेमा बघाल त्याविषयी मायबोलीवर अवश्य लिहा लोक्स
नंदिनी +१
नंदिनी +१
आत्तापर्यंत पाहिलेल्यातले
आत्तापर्यंत पाहिलेल्यातले कुमा आणि रोझ खूप आवडले.
कुमा म्हणजे सवत.. व्हेनिसमध्ये रहाणार्या टर्की फॅमिलीत घडणारी ही गोष्ट मस्त फुलवली आहे. सुन म्हणून लग्न करून आणतात पण सासरी आल्यावर कळतं की ती खरतर सवत आहे. पुढे त्या दोघींमधलं नातं कसं वळणं घेत जातं ते मस्त दाखवलं आहे.
रच्याकने.. मुख्य हिरवीन टेनिसपटू अॅना इव्हानोविक सारखी दिसते.. त्यामुळे सँटीची आठवण झाली..
रोझ.. दुसर्या महायुद्ध संपल्यानंतरच्या काळातला आहे. पोलंडमध्ये घडतो. टिपीकल महायुद्धोत्तर वातावरण आणि घटना.. प्रचंड अंगावर आला हा..
नंतर पाहिलेला The towrope पण ठिक होता.. अति संथ होता फक्त.. आणि अॅबरप्टली संपला..
अबाबा , एका दिवसात ५ सिनेमे
अबाबा , एका दिवसात ५ सिनेमे पाहणार !
IMDB बद्दल चिन्मयशी सहमत. ते
IMDB बद्दल चिन्मयशी सहमत. ते फसवे असू शकते. ते बहुतेकदा हॉलिवूड मेनस्ट्रीमच्या हिशोबाने केलेले असते.
मी 'संहिता'पासून सुरूवात
मी 'संहिता'पासून सुरूवात केली. त्याच दिवशी गिरीश कासारवल्लींचा 'कुर्मावतार' आणि नंतर ऑस्ट्रियाचा 'कुमा' बघितला.
काल 'इनहेरिटर्स ओफ द अर्थ' (टि.व्ही.चंद्रन), 'स्टॉप्ड ऑन ट्रॅकहॉल्ट (जर्मनी), 'व्हाईट लायन्स' (सर्बिया) हे बघितले.
आज 'द लास्ट स्टेप' नावाचा अप्रतिम इराणी सिनेमा बघितला. दुपारी अजून बघेन.
मस्त छान वाटतंय. वेगवेगळ्या देशांतल्या सिनेमांचे आशय-विषय, हाताळणी, वातावरण.. हे सारं एकाच वेळी बघायला मिळणं ही मोठी गोष्ट वाटली.
विस्तृत लिहा जरा.
विस्तृत लिहा जरा.
जड सिनेमे बघितल्यानंतर डोकं
जड सिनेमे बघितल्यानंतर डोकं थोडं रिलॅक्स करायचं असेल तर मटेरियल पहा लोक्स.. काल लास्ट स्टेप आणि रोझ बघितल्यावर हा सिनेमा बघणं छान वाटलं.. बाकी सविस्तर नंतर..
Hell W बघावा का? कोणी काही
Hell W बघावा का? कोणी काही सांगू शकेल का?
आज 'पुणे ५२'चा पुण्यातला
आज 'पुणे ५२'चा पुण्यातला पहिला खेळ. दुपारी २.३० वाजता. सिटीप्राइड कोथरुडला. सर्वांनी जरूर या.
संध्या. ७.१५ वाजता 'मटिरीयल'सुद्धा आहे. तिथेच.
अरे! भारीच की! मंडळी,
अरे! भारीच की!
मंडळी, पाहिलेल्या परदेशी सिनेमांबद्दल सविस्तर लिहा.
नंदीनी :- नक्किच लिहेन. खरं
नंदीनी :- नक्किच लिहेन. खरं तर एका कोरियन चित्रपटात आम्ही (म्हणजे Inha Universityचे परदेशी विद्यार्थ्यणणुन्,)काम केले आहे, प्रेक्षक म्हणुन, त्याचा सविस्तर अनुभव लिहेन म्हणतो.
बघु कधी जमते ते.
तुर्तास आमची एन्ट्री http://www.youtube.com/watch?v=fR-8mLcZrQA बघु शकता
इथे बरिच मन्डळी आहेत, त्यात आम्ही पण एक.
मुक्ता... Hella W चा परत शो
मुक्ता...
Hella W चा परत शो असेल तर नक्की नक्की बघावा... फारच सुंदर आहे.. ! मी बालक पालक ला जागा नाही मिळाली म्ह्णून Hella W ला गेलो आणि आता वाटतय की बरं झालं बालक पालकला एंट्री नाही मिळाली ते..
Pages