singapore transit/tourist visa बद्दल माहिती हवी आहे

Submitted by saakshi on 3 January, 2013 - 05:33

नमस्कार!
ऑस्ट्रेलियाला जाताना सिंगापूरला ५-६ तास थांबणार असू तर तिथे फिरण्यासाठी transit visa/tourist visa काढावा लागतो का?
लागत असल्यास किती वेळ लागतो? काय प्रक्रिया असते?
कोणी सांगू शकेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साक्षी,

५/६ तास आयटनरी मधे दिसले तरी प्रत्यक्षात तेवढे मिळत नाहीत. आणि बाहेर गेलो तर परत इमिग्रेशन वगैरे सोपस्कार करायला वेळ लागतो. त्यामूळे तेवढा वेळ एअरपोर्टवर काढला तर छान. एअरपोर्टवरच बटरफ्लाय पार्क आहे, दुकाने तर आहेतच. नुसते ट्रांझिटमधे असाल तर व्हीसा लागत नाही. ( बाहेर गेलात तर लागेल.)

रोहन, तुम्ही जी लिन्क दिली आहे त्यामधे भारताच्या विसा संदर्भात माहिती दिलेली आहे. सिंगापूरच्या नाही.

सिंगापूर एअरपोर्टची वेबसाईट पहा त्यामधे बरीच माहिती मिळेल.
एअरपोर्टमधुन सिटी साईट सिईन्ग ची बस असते त्यासाठी विसा लागत नाही बहुतेक.

साक्षी यांनी दुसर्‍या एका धाग्यात ऑस्टेलियाबद्दल विचारणा केली आहे ह्यावरून अनुमान करु शकतो की त्या सिंगापुर मार्गे सिडनी येथे जाणार आहेत. तसे असेल तर तुम्हाला त्यासाठी ट्रांझिट विझा लागणार नाही. दिनेशदा म्हणत आहेत त्याप्रमाणे विमानतळाच्या बाहेर पडलात तरच लागेल.

सर्वांना धन्यवाद Happy

५/६ तास आयटनरी मधे दिसले तरी प्रत्यक्षात तेवढे मिळत नाहीत. आणि बाहेर गेलो तर परत इमिग्रेशन वगैरे सोपस्कार करायला वेळ लागतो. त्यामूळे तेवढा वेळ एअरपोर्टवर काढला तर छान. एअरपोर्टवरच बटरफ्लाय पार्क आहे, दुकाने तर आहेतच. नुसते ट्रांझिटमधे असाल तर व्हीसा लागत नाही. ( बाहेर गेलात तर लागेल.)>>>> दिनेशदा, बाहेर जावे असा विचार करतोय.

साक्षी यांनी दुसर्‍या एका धाग्यात ऑस्टेलियाबद्दल विचारणा केली आहे ह्यावरून अनुमान करु शकतो की त्या सिंगापुर मार्गे सिडनी येथे जाणार आहेत. तसे असेल तर तुम्हाला त्यासाठी ट्रांझिट विझा लागणार नाही. दिनेशदा म्हणत आहेत त्याप्रमाणे विमानतळाच्या बाहेर पडलात तरच लागेल.>>> हो सिडनीला जाताना सिंगापुर मार्गे जाणार आहे.

सिंगापूर एअरपोर्टची वेबसाईट पहा त्यामधे बरीच माहिती मिळेल.>>> धन्स बघते.

बाहेर जायला ५/६ तास पुरेसे नाहीत. एखादा दिवस मुक्काम करता आला तर बघा. भारतीयांना व्हीसा लागतोच. पण तो लगेच मिळतो. मी मुंबईलाच घेतला होता.
बुकिंग क्वांटासचे नाही ना ? त्या एअरलाईनचा भयानक अनुभव आहे.

जर तुम्ही सिंगापूर एअरपोर्टमधे ५ तासांपेक्षा जास्त असाल तर सिंगापूर दर्शनची फ्री सोय आहे.
(कदाचित विसा आवश्यक आहे यासाठी.)

http://www.changiairport.com/at-changi/leisure-indulgences/free-singapor...

मी एकदा तब्बल आठ तास थांबलो होतो एअरपोर्टमधे, त्या दिवशी नेमका काही कारणाने या ट्रीप बंद होत्या. Sad

आत्ताच सिंगापूर एअरपोर्ट्ची साइट बघितली, जर तुमचा transit time ५ तासांपेक्षा जास्त असेल तर तिथे २ सिंगापूर सिटी टूर्स आहेत त्यापैकी एक निवडून फिरून येऊ शकतो. Happy

बाहेर जायला ५/६ तास पुरेसे नाहीत. एखादा दिवस मुक्काम करता आला तर बघा. भारतीयांना व्हीसा लागतोच. पण तो लगेच मिळतो. मी मुंबईलाच घेतला होता.
बुकिंग क्वांटासचे नाही ना ? त्या एअरलाईनचा भयानक अनुभव आहे.>>> दिनेशदा बुकींग येत्या आठवड्यात करणार आहे. लक्षात ठेवेन.

जर तुम्ही सिंगापूर एअरपोर्टमधे ५ तासांपेक्षा जास्त असाल तर सिंगापूर दर्शनची फ्री सोय आहे.
(कदाचित विसा आवश्यक आहे यासाठी.)>> विसा आवश्यक नाहिये. माझ्या ८ तासाच्या ब्रेक मधे फ्री सिंगापूर दर्शन करुन दिल होत (सिंगापूर एअरपोर्टमधेच त्यांनी अनाउन्स केल) सीक्युरीटी म्हणुन आपला पास्पोरर्ट ते त्यांच्या कडे ठेऊन घेतात

मला सिन्गापुर मलेशिया अशी ट्रिप प्लान करायची आहे. आम्ही ३ कपल्स आहोत. सोबत २ मुले पण आहेत. लहान मुले असल्यामुळे र्टुर कस्टमाईझ्ड असावी असा विचार आहे.
ज्या साठी मला काही गाईडन्स हवा आहे, जसा की..
टुर कशी असावी?
हॉटेल्स कश्या प्रकारे बूक करावीत.?
पैशान्चा अपव्यय किन्वा फसवणुक कशी टाळता येइल.?
बजेट, हॉटेल, सोयिचे ठिकाण, जेवण ह्याबद्दल कुणी माहिती देउ शकेल काय?

आमची पहिलीच विदेश वारि, म्हणुन काहि सुचना असल्यास खूपच मदत होइल.
सुमारे ७ दिवसाचे प्लान करावयाचे योजत आहे.
आपल्या अमुल्य सूचनांच्या प्रतिक्षेत आहे.

जाणकारानी मदत करावी.

मेकमायट्रिप चे पॅकेजेस बघा, लहान मुलं आहेत सोयीचे पडेल. बर्‍यापैकी leisurely sight-seeing आहे, VISA तेच करून देतात, ब्रेकफास्ट, डिनर देतातच कधी लंच पण असते पॅकेजमधे. स्वस्तपण आहे केसरीपेक्षा.

For hotel reviews check tripadvisor. For itinery planning also its good. Hotel booking is usually cheaper from hotel sites unless some other travel facilitator provides it with some deal. check this site for other site seeing deals.

http://www.citytours.sg/funveetour.html