डेटा वेअरहाऊसिंग

Submitted by रीया on 4 November, 2012 - 06:01

मला डेटावेअरहाऊसिंगबद्दल माहिती हवी आहे. अगदी बेसिक पासून सर्वच!
नेमकी काय टेक्नॉलॉजी आहे, कोणती पुस्तके, वेबसाईट्स रेफेर करावी ईत्यादी.
नव्या प्रोजेक्ट मध्ये डेटावेअरहाऊसिंगवर काम असून माझं या बाबत ज्ञान अगदी शुन्य आहे.
काही कारणांमुळे हा प्रोजेक्ट टाळता येणार नाही.
प्लिज गाईड करा

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिया टेंशन आणि तगमग कळाली.. नविन टेक्नॉलॉजी ऐकुन तुम्ही भांबावून गेलेल्या दिसता. मी टेक्नॉलॉजी आणि रोल खुप शिफ्ट मारले आहेत. बर्‍याच वेळा आपण खुप लोकांना विचारुन खुप रिसोर्स घाई घाईने चाचपडुन, भराभर शिकण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ घोळ होतो. बेसिक वर लक्ष केंद्रित करा, १० वेळा बेसिक घासुन पुसुन घ्या. एकदा बेसिक क्लिअर झाले की एक्सपर्ट लेवल सोपी जाते. सुरवातीलाच मोठा घास घेण्याचा प्रयत्न करु नका. कुठल्यही टेक्नॉलॉजीचे बेसिक कॉन्सेप्ट क्लीअर झाले की उरतात ती ते कॉन्सेप्ट इम्लिमेंट करणारी टूल्स.

बेसिक बेसिक बेसिक... Happy आणि म्हणुनच सी, बेसिक आणि कोबोल ह्या भाषा अजुन अभ्यासक्रमात आहेत. Happy

शुभेच्छा !
नवीन नवीन करत जावे. ज्या वेगाने गप्पांसाठी किबोर्ड चालतो त्याच वेगाने प्रत्यक्ष भेटीत गप्पा व्हाव्यात म्हणून काही प्रोग्राम लिहीता येईल का ? एखादं टॅब अ‍ॅप्लिकेशन ज्यामुळं टॅबवर टाईप केलं कि मुखावाटे शब्द आणि स्माईली बाहेर पडतील असं ? चाचांना आयटी बायटी काही कळत नाही. समजेल असं सांगा. चाचांना समजलं कि चाचीला पण समजावून सांगतील ते.

रिया तुला गूडलक. डेटा वेअरहाऊसिंग काही रॉकेट सायंस नाही. ही संधी आहे अजून एक बाण भात्यात जमा करण्याची, आजिबात सोडू नको.
वेगळी वाट चालायला मिळत असेल तर नक्की जावे, ईमानेईतबारे प्रयत्न आणि कष्टं टाकावेत झालं. >> +६३२

रच्याकने , सगळीकडेच असला प्रकार चालतो.. माझ्याही टीम मधे सध्या २ टेस्टर्स घेतलेत (अनुभवः २ वर्ष) असलेले.. आम्ही सध्या त्यांना ओरॅकल शिकवतोय..

चर्चा छान. Happy
पण त्यातही रियाला कच्चा लिम्बु म्हणण्याचा चान्स घेतलाच लोकानी. Wink Light 1

बेस्ट लक रिया. Happy
शिकशील आरामात.

मेधा, चमन आणि इतरांच्याही बर्‍याच पोस्टींना अनुमोदन Happy

अमित Happy

सेन्या, झकोबा Proud

वेक्स +१

सत्यजित नविन टेक्नॉलॉजीपेक्षाही टीममधल्या इतर ९ जणांचं दडपण आलयं
पण मला जमेल याची खात्री आहे
बरीच मदत होतेय
बेसीक्स पहायला सुरुवात केलीये
बाकी सपोर्टसाठी धन्स Happy

अवनी Happy
धन्स! Happy

>>पण त्यातही रियाला कच्चा लिम्बु म्हणण्याचा चान्स घेतलाच लोकानी.
निंबुडा, निंबुडा, निंबुडा !!!

रीया, तुला बेस्ट लक! कुठलाच न्यूनगंड वा भीडस्तपणा न बाळगता तू इथे लिहून शिकायची तयारी दाखवलीस त्याबद्दल तुझं कौतुक वाटलं. लगे रहो!!

काही पोस्टी वाचून छान करमणूक झाली.

रीया, तुला बेस्ट लक! कुठलाच न्यूनगंड वा भीडस्तपणा न बाळगता तू इथे लिहून शिकायची तयारी दाखवलीस त्याबद्दल तुझं कौतुक वाटलं. लगे रहो!!
>>
Happy
धन्स! जमत नाही तर शिकायलाच हवं ना! Happy
जमत नाही ही चुक नसते न शिकणं ही चुक असते Happy
(इती आमच्या मातोश्री Proud )

फोर्ट्रान चे फ्लो चार्ट तयार करता आले, तर पुढे कुठलेच लॉजिक, कठीण जात नाही..

मेधा, तरीही मी असहमत आहे. ते ट्रेनिंग पुर्ण झाल्याशिवाय, ( शिवाय परिक्षेत पास झाल्याशिवाय / इन्स्टिट्यूट्चे सभासदत्व घेतल्याशिवाय / सी.ओ.पी. घेतल्याशिवाय ) कुणीही सी.ए, म्हणून काम करु शकत नाही / सही करु शकत नाही / स्वतःला सी.ए. म्हणवूनही घेऊ शकत नाही.

आणि, सी.ओ.पी...चा उल्लेख लायसंस म्हणून करणे, मला व्यक्तीश: पटलेले नाही. अर्थात आमच्या क्षेत्राबाहेरच्या कुणालाही, यामागची भावना समजणे शक्य नाही. त्यामूळे माझ्यातर्फे पूर्णविराम. चालू द्या.

ते ट्रेनिंग पुर्ण झाल्याशिवाय, ( शिवाय परिक्षेत पास झाल्याशिवाय / इन्स्टिट्यूट्चे सभासदत्व घेतल्याशिवाय / सी.ओ.पी. घेतल्याशिवाय ) कुणीही सी.ए, म्हणून काम करु शकत नाही / सही करु शकत नाही / स्वतःला सी.ए. म्हणवूनही घेऊ शकत नाही.

आणि, सी.ओ.पी...चा उल्लेख लायसंस म्हणून करणे, मला व्यक्तीश: पटलेले नाही.
>>>

मेधा हेच म्हणतेय की << ट्रेनिंग पुर्ण झाल्याशिवाय कुणीही सी.ए, म्हणून काम करु शकत नाही >> Happy

सी.ओ.पी. हे लायसन्सच आहे. सी.ए. म्हणून प्रॅक्टिस करायची असेल तर सी.ओ.पी. घ्यावंच लागतं. आणि, आता आमच्याइथे कोणीही अनुभवी सी.ए. नेमला तर त्याच्याकडून सी.ओ.पी. सरेंडर केल्याचे पत्र घेतले जाते Happy

बर्‍याच वेळेस तज्ञ व अनुभवी लोकांची पद्धत धोपट मार्गा सोडू नको अशी असते. ज्यावेळेस नेहमीच्या पद्धतीने प्रश्न सुटत नाहीत त्यावेळेस टीम मध्ये एखादी लॅटरल विचार करणारी व्यक्ति असणे आवश्यक असत. हे नविन व्यक्ति करू शकते. आउट ऑफ द बॉक्स विचार हे टेक्नॉलॉजी कमी माहित असलेल्या व्यक्तिकडून येण्याची शक्यता जास्त असते कारण त्यांच्या विचार करण्यावर टेक्नॉलॉजीच्या मर्यादांचे बंधन नसते. एखाद्या चाकोरीबाहेरच्या कल्पनेचा किंवा अद्द्ययावत तंत्रज्ञानाचा पाठपुरावा करण्या इतपत उत्साह, काहितरी प्रूव करण्याची गरज व नविन शिकण्याची उमेद अनुभवा इतकीच महत्वाची.

सो डोन्ट वरी रिया. यू विल ब्रिंग व्हॅल्यू टू द टेबल.

हाय लोक्स
इन्फॉर्मेटिका वर काम सुरू आहे माझं
मस्त चाललय Happy
डेटावेअरहाऊसिंग जास्त आवडतय उलटं Happy

पुन्हा एकदा मदत हवी आहे.

माझ्या वर्कफ्लो मध्ये एक टास्क आहे जे एक युनिक्स स्क्रिप्ट चालवतय आणि काही कंडिशन्स चेक करतय.
आता ती कंडिशन फेल झाली की टास्क फेल होतय आणि त्यामुळे वर्कफ्लो सुद्धा.
मला हे अस नकोय. टास्क फेल झाली पाहिजे, वर्कफ्लोव सक्सीड झाला पाहिजे पण डेटाप्रोसेसिंग होईला नकोय
काय करता येईल?
(फेल पॅरेंट इफ थिस टास्क फेल ला अनटिक केलं तर अस होऊ शकेल का?)
महागुरु, हिम्स आणि अमित शी संपर्क साधलाच आहे पण तरी याही धाग्यावर असावं म्हणून इथे लिहितेय ....

मदत करा Happy

नमस्कार .

मलाही एक मदत हवी आहे .

माझ्या १ टीबी हार्ड दिस्कवर बराच डेटा टॅब , सीएसव्ही फॉरमॅट मधील डेटाफाईल्स मधील आहे .

मी तो एस ॑क्यु एल वापरुन कसा अ‍ॅक्सेस करु शकेन ??

( सध्या मला तो एक्सेल ओपन करावा लागतो .:( किव्वा आर नावाच्या फ्री सॉफ्टवेयर मधे ओपन करुन अ‍ॅक्सेस करावा लागतो Sad )

रिया,
टास्क फेल झाल्यावरही वर्क फ्लो का continue झाला पाहिजे?
इन्फॉर्मेटिका स्पेसिफिक मला माहिती नाही पण प्रत्येक इटीएल किंवा वर्क फ्लो मॅनेजमेंट टुल मधे असे सेटींग असतेच. तुम्ही म्हटल्याप्रमाणे तो चेकबॉक्स अनटिक करुन बघा.
दुसरा एक उपाय, युनिक्स स्क्रिप्ट रन करत असाल तर स्क्रिप्टच्या शेवटी रिटर्न कोड द्या. उदा. ०- सक्सेस, १-वॉर्निंग आणि २- फेल. इटीएल मधे तो रिटर्न कोड तपासा आणि जेव्हा वर्क फ्लो थांबायलाच हवा त्यावेळी युनिक्स मधुन २ पाठवा नाहीतर ० किंवा १.

सविस्तर मेल मधुन लिहिनच

गिरीजा,
mySQL इन्स्टॉल करुन तो डाटा लोड करु शकतेस. किंवा MS Access वापरुन multiple files वर डेटा स्टोअर करता येईल. दोन्ही मधुन तुला SQL वापरुन data analysis करता येईल.
mySQL प्रमाणे Oracle express पण वापरु शकतेस. पण तुला सगळा डेटा लोड करण्याचे थोडे कष्ट घ्यावेच लागतील.
Oracle मधे external table असा कन्सेप्ट आहे पण त्यांच्या फ्री व्हर्जन मधे आहे का नाही माहिती नाही.
तिसरा उपाय म्हणजे प्रत्येक csv file साठी ODBC connection तयार करुन वापरता येईल पण किचकट प्रकार आहे.

ह्म्म्म
तो बॉक्स अनटिक करणं प्रोजेक्टच्या ठरवलेल्या स्टँडर्ड्समध्ये बसत नाहीये. त्यामुळे ते करता नाही येणार नाही बहुदा.
टास्क फेल झालं तरी वर्कफ्लो रन होईला हवा ही रिक्वायर्मेंट आहे Uhoh
कशासाठी कोणास ठाऊक Uhoh

युनिक्ससाठी धन्स Happy
पण हे मी आताही करतेय खर तर. हवी ती कंडिशन ट्रु न झाल्यास एक्झिट. पण जमत नाहीये ये
अजुन काही करता येण्यासारखं आहे का?
ईमेलच्या प्रतिक्षेत Happy

इथे कोणी घरुन काम करत आहे का?

मी १ महिना क्लाईंट साईड ला होती पण ते काम पार्ट टाईम या भागात येते [ पार्ट टाईम /फुल टाईम असे दोन भाग]

सध्या घरुन काम करायचे आहे म्हणुन
ही रिक्शा
मी ४ वर्षे व्यवसायिक software tester होती ,
माझ्या कडे QTP 10 , loadrunner , rational robot. अशी testing tools आहेत , तरी कुणाला ,functional, performance testing करायचे असल्यस सांगा.
[तसेच मी ही tools वापरुन बरीच repetative कामे पण करते जसे ली एका folder मधेल सगळ्या files ला रिनेम करणे ,
एक फोर्म मधे १००० users चा डाटा बनवणे]. ई

Pages