Submitted by रीया on 4 November, 2012 - 06:01
मला डेटावेअरहाऊसिंगबद्दल माहिती हवी आहे. अगदी बेसिक पासून सर्वच!
नेमकी काय टेक्नॉलॉजी आहे, कोणती पुस्तके, वेबसाईट्स रेफेर करावी ईत्यादी.
नव्या प्रोजेक्ट मध्ये डेटावेअरहाऊसिंगवर काम असून माझं या बाबत ज्ञान अगदी शुन्य आहे.
काही कारणांमुळे हा प्रोजेक्ट टाळता येणार नाही.
प्लिज गाईड करा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेधा, सी.ए. बद्दलचे विधान
मेधा,
सी.ए. बद्दलचे विधान चुकीचे आहे. सी.ए. फायनल परिक्षा देण्यापुर्वीच आम्हाला ३ वर्षाची आर्टिकलशिप पूर्ण करावी लागते. त्याशिवाय ना फायनल परिक्षा देता येत ना सर्टीफिकेट ऑफ प्रॅक्टीस मिळत.
फक्त याच क्षेत्रातले माझे मत आहे. बाकिच्या क्षेत्राची माहिती नाही.
दिनेश, मी काम करुन अनुभव
दिनेश, मी काम करुन अनुभव मिळ्वणे / ऑन द जॉब ट्रेनिंग या द्रुष्टीने विधान केलंय. कुठल्या क्षेत्रात परिक्षेच्या आधी अन कुठल्या क्षेत्रात परिक्षेच्या नंतर पण लायसंसच्या आधी इत्यादी लिहिलेलं नाहीय.
तेच तर मी सांगतोय मनीष,
तेच तर मी सांगतोय मनीष, मेधा.
हे असं माझ्या फिल्डमधे होत नाही. खूप स्ट्रिंजंट ट्रेनिंग असतं आधी. अन इण्टर्नशिप हे शिक्षणच असते. पूर्ण सुपरवाईज्ड. शाळाच असते ती..
सॉफ्टवेअर लिहिणे इतके कठिण नसले तरी असे व्हायला नको असे वाटते.
मेधाला अनुमोदन. मामी,
मेधाला अनुमोदन.
मामी, ईब्लिस>> तुम्ही रिया जे बनवणार आहे ते प्रॉडक्ट कस्टमरला जसच्या तसं डायरेक्ट हॅंडओवर करणार असं अनुमान का बरं लावावं?
तिच्याकडून सध्या साध्या-सोप्या गोष्टी करवून घेवून तिचे त्याबद्दलचे ज्ञान वाढवून बाकी एक्स्पर्ट लोक तिच्या बेसवर्क वर ईमले बांधतील की.
तिने चांगली प्रगती दाखवली तर महागडा रिसोर्स दुसर्या महत्वाच्या कामावर लावून कॉस्ट कटिंग पण साधता येईल की कंपनीला.
एच आर असल्या टेक्निकल गोष्टीत लक्ष घालत नाही. ज्याने त्याने आपली प्रगती स्वतः साधायची असते.
रिया ने हे काम नाकारून कंफर्ट झोनमध्ये काम करत राहिल्यास कशी साधणार ती प्रगती. मॅनेजमेंटला अशी लोकं आवडत नाहीत आणि त्या लोकांना वेळ निघून गेल्यावर कळते की हा कंफर्ट झोनचा बॅरियर मोडायला आता किती अवघड आहे.
पुढाकार न घेणारे आणि संधी नाकारणारे लोक केवळ बिग पिक्चर न समजल्याने मागे पडतात.
रिया तुला गूडलक. डेटा वेअरहाऊसिंग काही रॉकेट सायंस नाही. ही संधी आहे अजून एक बाण भात्यात जमा करण्याची, आजिबात सोडू नको.
वेगळी वाट चालायला मिळत असेल तर नक्की जावे, ईमानेईतबारे प्रयत्न आणि कष्टं टाकावेत झालं.
अनुभवी व्यक्तींच्या हाताखाली
अनुभवी व्यक्तींच्या हाताखाली ऑन द जॉब ट्रेनिंगला हरकत नसावी. पण त्यासाठी क्लायंटला बिल करणं म्हणजे लुट आहे बॉस! काळजी घ्या.
हे असं माझ्या फिल्डमधे होत
हे असं माझ्या फिल्डमधे होत नाही >> आं ? लहान सहान मटर्निटी होममधल्या नॉर्मल डिलिव्हरीज मिडवाइफ, ईंटर्न्स, किंवा नवीन डॉक्टर्स करत नाहित ? प्रत्येक डिलिव्हरीला पूर्ण वेळ सिनियर ऑब्स्टेट्रिशन असतो का ? त्याने \तिने असायची गरज तरी असते का ? रात्रपाळीला सिनियर डॉक्टर्स असतात की ज्युनिअर्स ?
१० लोकांची टीम असेल तर प्रत्येकाने एक्स्पर्ट असायला हवे असे नाही. अशा एक्स्पर्ट लोकांकडून सोपे , बेसिक कोड लिहवून घेऊन त्यांचा वेळ अन क्लायेंटचा पैसा सत्कारणी लागेल की नवशिक्यांकडून ( कमी बिलिंग रेटमधे ) सोपे मॉड्यूल्स, रिपोर्ट्स लिहवून घेणे चांगले ?
मेधा, तुम्हाला एकदा
मेधा,
तुम्हाला एकदा दवाखान्यातून फिरवून आणायला हवं. (अन तशीच मलाही तुमच्या हापिसात फिरून यायची गरज असेल म्हणा.) पण हे 'हॅण्ड्स ऑन' ट्रेनिंग जरा वेगळं वाटलं इतकेच म्हणतो.
खुप खुप आभार लोक्स सपोर्टमुळे
खुप खुप आभार लोक्स
सपोर्टमुळे आत्मविश्वास वाढतो.
बाकी मला अलोकेट करण हे चांगलं की वाईट हे मॅनेजरला माहितच असेल की.. ते त्याचं काम आहे.....इतके वर्ष तेच करत आलाय तो.. आणि इतके वर्ष टिकून आहे म्हणजे चुका कमी करत असेल अस वाटतय.
तेंव्हा त्याची चर्चा आपण इथे करून काही फायदा तोटा होणार नाहीये. सो ही चर्चा सोडून डेटावेअरहाऊसिंगबद्दल काही मदत करता आली तर पहा लोक्स
तुम्ही रिया जे बनवणार आहे ते प्रॉडक्ट कस्टमरला जसच्या तसं डायरेक्ट हॅंडओवर करणार असं अनुमान का बरं लावावं? >>> +१११
बाकी इब्लिसदादा माझा स्वतःचा
बाकी इब्लिसदादा
माझा स्वतःचा अनुभव सांगू तर मी कॉलेजात जे जावा शिकलेले आणि जे काही वापरून कॉलेजात २ प्रोजेक्ट्स केलेले त्याचा मला २ वर्षात फारसा उपयोग झालेला नाही
नव्याने अनेक गोष्टी शिकाव्याच लागल्यात
आयटी प्रोजेक्ट्स मध्ये
आयटी प्रोजेक्ट्स मध्ये देसीगिरी घुसलीये हे खरय. प्रोजेक्ट बिड करत असताना कॉस्ट मध्ये भारतीय कंपन्या अर्थातच पुढे असतात, चीप लेबर मुळे पण ह्याउपर अननुभवी लोकं (म्हणजे आणखिन कमी पगार) कामावर लावून कामं करुन घेण्यावर पण भर वाढलाय. हे फक्त कधी कधीच खपतं खरं, कारण नंतर फायनल प्रॉडक्ट नीट नाही म्हंटल्यावर कस्टमर ते स्विकारत नाहीत आणि पुढे आणखिन धंदा तर देतच नाहीत.
ह्यात खरं जुनियर लेवलच्या लोकांची काही चुक नाही, त्यांना बिचार्यांना कामं हवी असतात आणि ते प्रयत्न ही करतात. सध्या एकतर इकॉनॉमी इतकी भारी नसल्यामुळे, कस्टमर लोकं कॉस्ट सेविंग वर भर देतायत आणि २)सॉफ्टेवअर मध्ये तरी सगळे देसी प्लेयर (कंपन्या) जोरात आहेत त्यामुळे देसी अॅटिट्युड बोकाळला आहे.
रिया, कॉलेजात अजूनी कोबॉल
रिया,
कॉलेजात अजूनी कोबॉल शिकवतात म्हणे?
>>कॉलेजात अजूनी कोबॉल शिकवतात
>>कॉलेजात अजूनी कोबॉल शिकवतात म्हणे?
होय, एवढेच नाही तर अनेक कंपन्यांमधे अजुनही कोबॉलमधे डेव्हलप केलेल्या सिस्टीम्स वापरतात.
http://www.infogoal.com/cbd/cbdz040.htm
ईब्लिस>> हेल्थकेअर आणि
ईब्लिस>> हेल्थकेअर आणि आयटीमधल्या कामांची तुलना कशी करणार?
हेल्थकेअर मध्ये पेशंट(कस्टमर) आणि त्याचं बरं-वाईट तुमच्या (ईंटर्न किंवा एक्स्पर्ट) छोट्यातल्या छोट्या निर्णयाने किंवा कृतीने लगेचच घडून येऊ शकतं.
आयटीमध्ये डायरेक्ट कस्टमर एन्काऊंटर टेक्निकल लेवलला येत नाही. रिया जे बनवणार ते नंतर दहा ग्रूप्स, मॅनजेर लोक, कस्टमर तपासून, चाचणी घेऊन, जो पर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत त्यात बदल करून घेत राहणार.
कुठलेही प्रॉडक्ट त्याच्या डेवलपमेंट लाईफ सायकल मधून जाते.
जसे औषध तयार करतांना क्लिनिकल टेस्ट्स, एफडीए अप्रुवल वगैरे भानगडी असतात तसे.
कितीही महान सायंटिस्टचे कितीही रिवॉल्यूशनरी प्रॉडक्ट असले तरी ते काही लागलीच बाजारात कस्टमरच्या हातात पोहोचत नाही, तसेच...
मला कोबॉल नव्हतं पण पास्कल
मला कोबॉल नव्हतं पण पास्कल होतं ज्याचा मला कधीही काहीही उपयोग झाला नाही.
शिकवलच का ते माहित नाही
बाकी २ वर्षात मी एटीजी आणि स्प्रिंगवर काम केलं
जे मला कॉलेजात कधीही शिकवलं गेलं नव्हतं...
असो!
महागुरू मस्त आहे ती पिपिटी
बर्याच कन्सेप्ट समजतायेत
अगदी १००% नाही
पण काम सुरू झाल्यावर अगदीच नवीन वाटणार नाही अस वाटतय
कॉलेजात अजूनी कोबॉल शिकवतात
कॉलेजात अजूनी कोबॉल शिकवतात म्हणे? >>> सॉफ्टवेअर डेवलपमेंट समजण्यासाठी कॉबॉल सारखी सोपी दुसरी लँग्वेज नाही.
ती तुम्हाला कामाच्या ठिकाणी वापरायला मिळावी म्हणून शिकवली जात नाही तर तुम्हाला सॉफ्टवेअर डेवलपमेंटसाठीची नजर मिळावी म्हणून.
ती नजर एकदा मिळाली की ईतर नव्या लँग्वेज शिकणे सोपे नाही का?
मला कोबॉल नव्हतं पण पास्कल होतं ज्याचा मला कधीही काहीही उपयोग झाला नाही. शिकवलच का ते माहित नाही >> पास्कल वापरून लॉजिक डेवलपमेंट जमायला लागलं की नाही? कंपायलर कसा काम करतो ते कळाले की नाही? तेवढ्यासाठीच होती ती.
एवढेच नाही तर अनेक कंपन्यांमधे अजुनही कोबॉलमधे डेव्हलप केलेल्या सिस्टीम्स वापरतात. >> १) त्यांना हवी ती niche फंक्शनॅलिटी ईतर प्रॉडक्टमध्ये मिळत नसेल
२) त्यांचे दशकानुदशके असलेले मनुष्यबळ नवीन शिकण्यास ऊत्सुक नसेल, आणि असे मनुष्यबळ बदलणे त्यांना शक्य नसेल.
३) नव्या प्रॉडक्टसाठी त्यांच्याकडे पुरेसे फंड्स नसतील
४) सध्याची प्रणाली तेवढा नफा जनरेट करत नसेल म्हणू तिला बदलवण्याची गरज नसेल.
५) लीगसी प्रॉडक्ट्स बदलवण्याची रिस्क त्यांना घ्यावयाची नसेल.
हजारो कारणे असू शकतात.
पास्कल वापरून लॉजिक डेवलपमेंट
पास्कल वापरून लॉजिक डेवलपमेंट जमायला लागलं की नाही? कंपायलर कसा काम करतो ते कळाले की नाही? तेवढ्यासाठीच होती ती.
>>
अॅग्री!
पण पास्कल होतं ज्याचा मला
पण पास्कल होतं ज्याचा मला कधीही काहीही उपयोग झाला नाही.
शिकवलच का ते माहित नाही >> अरारा ! पास्कल किंवा फोरट्रान सारखी एलिगंट अन तरिही शिकायला सोपी भाषा नाही . एकदा या भाषांमधे लॉजिकली कसे लिहायचे हे समजले की कुठलीही दुसरी भाषा शिकणे अगदी सोपे.
एकदा या भाषांमधे लॉजिकली कसे
एकदा या भाषांमधे लॉजिकली कसे लिहायचे हे समजले की कुठलीही दुसरी भाषा शिकणे अगदी सोपे.
>>
अगदी अगदी!
आम्हाला पास्कल नंतर सी आणि मग सी++ होती
मग व्हिबी आणि मग जावा
कदाचित बेस्ट क्रम होता हा
डिंग्या नाही मारत, पण शुगर
डिंग्या नाही मारत,
पण शुगर फ्याक्ट्रीसाठी कोबॉल वापरून लिहिलेल्या आज्ञावलीच्या फ्रंटेण्ड साठी फॉक्सप्रो (डॉस) वापरून मेन्यू सिस्टीम मी लिहून दिली होती....
रिया तू डेटावेअर हाउसिंगवर
रिया तू डेटावेअर हाउसिंगवर ल़क्ष दे पाहु..:P
वॉव रात्रभरात पन्नास पोस्ट्स. मला वाटलं ट्रेनिंग सुरू झालं का काय
देसीगिरी वगैरे शब्दप्रयोग आता टाळायला हवेत नाहीतर तिथे पण मेड इन चायना पुढं जाईल....बाकी जेणो काम तेणो थाय...
>>पण शुगर फ्याक्ट्रीसाठी
>>पण शुगर फ्याक्ट्रीसाठी कोबॉल वापरून लिहिलेल्या आज्ञावलीच्या फ्रंटेण्ड साठी फॉक्सप्रो (डॉस) वापरून मेन्यू सिस्टीम मी लिहून दिली होती....
ग्रेट, पण हे म्हणजे "प्यार किये जा" वरून "धुमधडाका" बनविल्यासारखे वाटले असेल ना ?
कारण वेगळ्या प्रोग्रामिन्ग स्टाईल मधे तीच functionality बनविली गेली पाहिजे.
महेश, ते ब्याकेण्डला कसे
महेश,
ते ब्याकेण्डला कसे जोडले, अन कसे त्या २८६ च्या गळ्यात मारले तो चमत्कार मी पाहिला आहे. त्या महाण माणसाने एकदा फिलिप्स टेपरेकॉर्डरच्या क्यासेटवर डायरेक्ट डेटा लिहिला होता, अन रीडही करून दाखवला होता मला.
मला जे येत होते तितके करून दिले होते मी. बाकी किडे आमच्या गुरूचे
प्रोग्रामिंग स्टाइल अन
प्रोग्रामिंग स्टाइल अन फन्क्शनॅलिटीचं म्हटलं, तर तिर्हाईत म्हणून मी असे बोलू शकतो, की कोणतीच लँग्वेज वा टूल पूर्णपणे वापरत नाहियेत लोक. अर्धवट थोडंफार वापरून झालं की लगेच पुढचं काहीतरी आणतात, अन बाकीचे त्या वेगात मागे मागे फरफटले जातात.
सॉफ्टवेअर बिना तक्रार काम करीत असेल, तरी हार्डवेअर मार खाते. नवे पार्ट मिळत नाहीत. फॉक्स मधे लिहिलेल्या सॉफ्टवेअर्स साठी प्रिंटाऊट यूएसबीवर येऊ शकत नाही (सहजी) कारण मी लिहिताना एल्पीटी१ ला सांगितलेलं असतं. मग नाईलाजाने नवे लिहावे लागते. ज्याने ते अॅप विकत घेतले होते, अन व्यवस्थित चालतही होते, त्याला फुकट भुर्दंड अन मलाही वैताग.
हे असे तुमच्या या आय्टि मधे का आहे? (अर्धवट खाऊन टाकून दिल्यासारखे?)
(क्युरियस_ इब्लिस)
अहो वेगवान काळाबरोबर गरजा पण
अहो वेगवान काळाबरोबर गरजा पण वेगवान होत असतात कष्टमरांच्या त्यामुळे सतत नविन काहीतरी निर्माण केले जाते.
उदा. तुम्ही तर युएसबी म्हणत आहात, पण समजा कोणाला एका जागी प्रिंट कमांड देऊन प्रत्यक्ष प्रिंट ही साता समुद्रापलिकडच्या प्रिंटरमधुन यायला हवी असेल तर तिथे कोबॉल किंवा फॉक्सप्रो काय करेल ?
(व्हिज्युअल) फॉक्स करू शकते.
(व्हिज्युअल) फॉक्स करू शकते. कोबॉलचे ठाउक नाही. मला येत नाही अजिब्बात
मला अँटिबायोटिक्सबद्दलपण असेच
मला अँटिबायोटिक्सबद्दलपण असेच वाटते इब्लिस, अर्धवट खाऊन टाकून दिल्यासारखे.
एक येतंय न येतंय तोवर पुढची जनरेशन हजर.
प्रत्येकाच्या फिल्डमधलि प्रत्येकाची वेगवेगळी दुखणी.
मला पण इतक्या पोस्ट वाचून ऑनलाईन क्लासेस घेतायत की काय असे वाटले.
खरे आहे @ साती
खरे आहे @ साती
Guys lets come back to Riya's
Guys lets come back to Riya's Requirement
कामातली सवय आणखी काय नाय
इब्लिस, साती, ज्या ज्या
इब्लिस, साती, ज्या ज्या क्षेत्रात संशोधन जास्त जोरात त्या त्या क्षेत्रात हीच परिस्थिती आहे
आय टी, म्युझिक, मेडिसिन, अॅनिमेशन...
रिया . डेटा वेअर हौसिंग बद्दल
रिया .
डेटा वेअर हौसिंग बद्दल आणि टूल्स बद्दल काही लागल्यास नक्की विचार ....
आणि हो अनूभवा वरून सांगतो ... अजून दहा वर्षानी तूला कळेल तुझ्या प्रोजेक्ट मॅनेजरने तूला का घेतले आहे ते.. कारण तू ही त्या वेळेला असेच ३० ते ४० % असेच शिकाऊ उमेद्वार तू मॅनेज करत असलेल्या टीम मघे घेशील...
रीसोर्स पिरामीड, मार्र्जीन वगैरे तुझे परवलीचे शब्द बनतील आणि के आर ए सुद्धा ... गूड लक
Pages