Happy Halloween!!! भुताटकीचा आनंदी सण!!

Submitted by धनश्री on 31 October, 2012 - 13:27

Happy Halloween!!! Boo!!!
आज हॅलोवीन. दरवर्षी ३१ ऑक्टोबरला हा भुताटकीचा आगळावेगळा आनंदी आणि कलात्मक सण अनेक देशांमधे साजरा होतो. सर्वच सणांप्रमाणे आता त्याची धार्मिक पाळंमुळं फारशी उरली नाहीयेत. आणि ती जाणून घेण्यात फार इंटरेस्ट पण नाही. पण हिंदू धर्मात जसं पक्ष-पंधरवडा केला जातो त्याच धर्तीवर इथे पितरांसाठी हॅलोवीन साजरा करण्याची प्रथा सुरु झाली (एका अमेरिकन मैत्रिणीच्या सांगण्यावरून :))

आम्ही आपला एक इव्हेंट म्हणून साजरा करतो. गेल्या काही वर्षांपासून आम्ही भोपळा कोरून त्याची आरास मांडण्यास सुरुवात केली. सुरुवातीला नुसताच भोपळा दारात मांडून येणार्‍या बालगोपाळांना चॉकलेटस देत असू. नंतर मुलगी, स्वरा ३-४ वर्षांची झाली तेव्हा तिने आपण स्मायली फेस का नाही करत असे विचारले. तेव्हा पेंट करून समाधान केले. मग नंतरच्या वर्षी नवर्‍याने नीट अभ्यास करून ऑनलाईन माहिती वाचून चांगली कार्व्हिंग करण्यास सुरुवात केली. आता अलीकडे तो यामधे "माहीर" होऊ लागला आहे असे म्हणल्यास हरकत नाही.

भोपळ्याच्या जाडजूड सालीमुळे थोडी जास्त ताकद लागते. पण एकदा टेक्नीक जमलं की छान कलाकृती बनू शकते. आतल्या बिया/शिरा काढणं, इतर साफसफाई, मदत अर्थात मुलगी हौसेने करते. ही गेल्यावर्षीची काही डिझाईन्स आणि या वर्षीची सजावट सुद्धा. कशी वाटली ते सांगा.

प्रचि १ यावर्षी मुलीचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. तिला पहिल्यांदा स्वतंत्रपणे एक भोपळा करायची परवानगी मिळाली होती. (८वर्षांची आहे ती आता. सो बिग गर्ल ना!!) तेव्हा तिची कल्पना होती २ डोकी असलेला राक्षस. Happy एकाच भोपळ्यावर एका बाजूला हे चित्र कोरले आणि पुढचे चित्र दुसरी बाजू. हे कोरीवकाम संपूर्णपणे तिचे आहे.

प्रचि २

प्रचि ३
ही उलट्या डोळ्यांची हडळ. Happy

प्रचि ४ हे चित्र स्वरानेच काढले असून कोरीवकामासाठी मी थोडी मदत केली आहे. अमेरिकन इंडीयनचे टिकी डिझाईन.

प्रचि ५ "सगळी सजावट भुताटकीची केली तर छोटी मुले आपल्या घरी यायला घाबरतात. तेव्हा काहीतरी क्युट कर." इति स्वरा. ही मुलीची फर्माईश मी पूर्ण केलीय. Happy

प्रचि ६ हा डॉल्फिन जरा आग ओकतोय असं समजायचं बरं का!! डिझाईन आंतरजालावरून साभार.

प्रचि ७ ही चिल्लीपिल्ली गेल्या वर्षी मांडली होती.

प्रचि ८ अजून एक हडळ. कलाकार - अस्मादीक. मला खरंच अजून खूप शिकायचंय पण प्रयत्न म्हणून ठीक आहे असं वाटलं.

प्रचि ९ गेल्या वर्षी केलेली टिकी आकृती.

प्रचि १० यापुढची सगळी डिझाईन्स आंतरजालावरून घेतली आहेत पण कोरीवकाम अर्थात नवरोबांनी केलंय.

प्रचि ११ ही सुधा त्याचीच.

प्रचि १२ हा "बीटलज्युस" बघा कसा खदाखदा हसतोय.

प्रचि १३ हॅरी पॉटर मधला मॅड आय मूडी.

प्रचि १४ माझ्यामते ही सर्वात छान जमून आलेली कलाकृती. लॉर्ड ऑफ द रिंग मधला माय प्रेशश वाला घोलूम!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धने धने, अगं आत्ता पाहिले. कित्ती सुंदर....
स्वरा खरंच मोठी झाली...
खुप खुप अभिनंदन. कलाकारी जबर्दस्त आहे. उद्य चे आणि तुझे अभिनंदन

सगळ्या माबोकरांचे खूप खूप आभार. तुमच्या शुभेच्छा अहोंकडे पास केल्या आहेत. मुलीला पण तिचे कौतुक सांगितले आहे.
काल संध्याकाळी खूप लहान-मोठे बालगोपाळ घरी येऊन गेले. त्यांच्या पालकांनी पण या भोपळ्यांचे कौतुक केले. फोटो काढले. मजा आली.

धन्यवाद. Happy

मस्त जमलेत! माझ्या मुलिच्या शाळेत स्पर्धा असते भोपळा र.न्गवा,कोरा कसाहीसह्जवला तरी चालतो
खुप चा.न्गल्या ए.न्त्रि होत्या सोमवारी प्रची टाकेल.

मस्तच Happy

छान जमलेत सर्व चेहरे... कार्व्हिंग नाईफ मिळते पण ती भोपळ्यावर नाही वापरता यायची, नाजूक कामासाठीच वापरता येते.

Pages