बागेत गेलं हत्तीचं पिल्लू...

Submitted by पुरंदरे शशांक on 7 October, 2012 - 23:35

बागेत गेलं हत्तीचं पिल्लू...

हत्तीचं पिल्लू गेलं नाचत नाचत बागेमधे
खेळत होती मुलं तिथे, खूप खूप मजेमधे

झोपाळा, घसरगुंडी, जंगलजीम पाहून
हे खेळू का ते खेळू, दमले विचार करुन

झोपाळ्यावर बसताच, आला की तो खाली
घसरगुंडी तर काय, पार पार सपाट झाली

सी-सॉवर ठेवताच पाय, फळी गेली मोडून
पिल्लू बिचारे रुसले, नि बसले कोपर्‍यात जाउन

मुलं म्हणाली सोड रे, लपाछपी मस्त खेळू
लप पटकन कुठे तरी आलाच तो बघ मागे बाळू

झाडामागे लपे आपले पिल्लू साधे भोळे
पुढुन दिस्ते सोंड, तर मागे आंग सग्ळे

पिल्लावर आले राज्य, मिटले त्याने डोळे
दोन मिण्टात शोधून सगळे भिडू बाद केले

फेर धरला सगळ्यांनी पिल्लाभोती छान
सोंड छोटी उंचाऊन, पिल्लू घेई तान

चला आता खाऊया आईस्क्रीम गारेगार
गाडीभोवती जमली मग गर्दी फार फार

एक एक कोन हाती घेऊन मुले खूष खूप
पिल्लू उचले आख्खा डब्बा - हा तर माझा स्कूप...

baby%20elephant.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तम!

सुप्रिया, अगो, भारतीताई, अवल, मनिमाऊ, डॅफोडिल्स, विजय आंग्रे, इंद्रधनु - सर्वांचे मनापासून आभार......

मोकिमी - डायरेक्ट पिल्लूच पाठवून दिल्याबद्दल शतशः आभार.....