Submitted by पुरंदरे शशांक on 7 October, 2012 - 23:35
बागेत गेलं हत्तीचं पिल्लू...
हत्तीचं पिल्लू गेलं नाचत नाचत बागेमधे
खेळत होती मुलं तिथे, खूप खूप मजेमधे
झोपाळा, घसरगुंडी, जंगलजीम पाहून
हे खेळू का ते खेळू, दमले विचार करुन
झोपाळ्यावर बसताच, आला की तो खाली
घसरगुंडी तर काय, पार पार सपाट झाली
सी-सॉवर ठेवताच पाय, फळी गेली मोडून
पिल्लू बिचारे रुसले, नि बसले कोपर्यात जाउन
मुलं म्हणाली सोड रे, लपाछपी मस्त खेळू
लप पटकन कुठे तरी आलाच तो बघ मागे बाळू
झाडामागे लपे आपले पिल्लू साधे भोळे
पुढुन दिस्ते सोंड, तर मागे आंग सग्ळे
पिल्लावर आले राज्य, मिटले त्याने डोळे
दोन मिण्टात शोधून सगळे भिडू बाद केले
फेर धरला सगळ्यांनी पिल्लाभोती छान
सोंड छोटी उंचाऊन, पिल्लू घेई तान
चला आता खाऊया आईस्क्रीम गारेगार
गाडीभोवती जमली मग गर्दी फार फार
एक एक कोन हाती घेऊन मुले खूष खूप
पिल्लू उचले आख्खा डब्बा - हा तर माझा स्कूप...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त!!! एकदम क्युट
मस्त!!!
एकदम क्युट
गोड्ड्ड्ड
गोड्ड्ड्ड
मस्त! मस्त! मस्त!
मस्त! मस्त! मस्त!
अत्ता लेकीला वाचुन दाखवली...
अत्ता लेकीला वाचुन दाखवली... खुप आवडली तिला कविता.... खुदुखुदु हसत्येय अजुन
मस्त! हे
मस्त! हे
मस्त
मस्त
मस्तय!
मस्तय!
लाजो, चिमुरी, अंजली, शाम,
लाजो, चिमुरी, अंजली, शाम, चनस, अमेलिया - सर्वांचे मनापासून आभार....
मस्तम!
मस्तम!
मस्तच. खुप छान वाटले.
मस्तच. खुप छान वाटले.
सहीये!!
सहीये!!
एकदम मस्त..!!
एकदम मस्त..!!
अरे वा एकदम छान
अरे वा एकदम छान
मस्त !!
मस्त !!
एकदम गोड कविता. फार आवडली.
एकदम गोड कविता. फार आवडली.
मस्त! आई लहानपणी 'सचिवालयात
मस्त! आई लहानपणी 'सचिवालयात कोल्हा' अशी एक धारावाहिक कथा सांगायची, ते आठवलं :))
मस्त आहे कविता
मस्त आहे कविता
सुप्रिया, अगो, भारतीताई, अवल,
सुप्रिया, अगो, भारतीताई, अवल, मनिमाऊ, डॅफोडिल्स, विजय आंग्रे, इंद्रधनु - सर्वांचे मनापासून आभार......
मोकिमी - डायरेक्ट पिल्लूच पाठवून दिल्याबद्दल शतशः आभार.....
़ किती गोड!!!
़ किती गोड!!!
छान ! अगदी बालपण आल्यासारखं
छान ! अगदी बालपण आल्यासारखं वाटतंय ही कविता वाचून !
फारच सही....मी आज माझ्या
फारच सही....मी आज माझ्या पिल्लाला वाचून दाखवतो
ज्ञाती, बिनधास्त, आशुचँप -
ज्ञाती, बिनधास्त, आशुचँप - मनापासून धन्स......
क्या बात है...
क्या बात है...