Submitted by चैतन्य दीक्षित on 26 July, 2012 - 08:55
हट्ट कोणता करू तुजकडे?
थिट्या मनाची झेप थिटी
फिरून येती मनात इच्छा
भेट हवी मज, हवी मिठी |
आणि हासुनी ओळखशी तू,
देउन जाशी हवे तसे
मंतरल्यासम ते क्षण जाता,
इच्छांचे त्या पुन्हा पिसे |
'थांब थांब तू, नकोस जाऊ'
सांगावेसे तुज वाटे,
त्याच क्षणी अन् सभोवताली
काजळगहिरे तम दाटे |
म्हणून जाशी मिठी छेडुनी
झिणिझिणि वलये गात्रात
अन् पुढल्या भेटीची होते
मनी अनावर सुरुवात |
असंख्य वेळा अशी भेटशी
मिठीत घेशी हळुवार
'थांबवून ठेवावे तुज' ही
इच्छा अपुरी, अनिवार |
हट्ट सांग मी करू कोणता?
थांबशील जो पुरवाया,
थांबशील का अजून थोडी
आज एवढे ठरवाया?
-चैतन्य दीक्षित
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आपाला हट्ट व्यवस्थित मांडला
आपाला हट्ट व्यवस्थित मांडला गेलाय,पुरवला जाण्याची शक्यता अधिक,छान.
छान मीटर मस्त निवडलत या
छान
मीटर मस्त निवडलत या कवितेसाठी
कविता खूप आवडली
बहोत खूब ,मस्त,
बहोत खूब ,मस्त,
क्या बात है चैतन्या.......
क्या बात है चैतन्या....... किती दिवसांनी दर्शन देत आहेस ??
फारच मस्त जमलीये कविता........
प्रतिसाद देणार्या सर्वांचे
प्रतिसाद देणार्या सर्वांचे मनापासून आभार
त्याच क्षणी अन्
त्याच क्षणी अन् सभोवताली
काजळगहिरे तम दाटे |
उपमा आवडली. कविता मस्त आहे.
मीटर मस्त निवडलत या कवितेसाठी
मीटर मस्त निवडलत या कवितेसाठी ...
छान कविता
छान कविता
व्वा चैतन्य .... हट्ट मस्त
व्वा चैतन्य .... हट्ट मस्त मांडलाय...... कविता आवडली.
छान्...........आवडली......
छान्...........आवडली......
ऑर्फी..............घे!
ऑर्फी..............घे! ..............आता वाच अन् मीटर "पकड"!!
हट्ट कोणता करू तुजकडे? थिट्या मनाची झेप थिटी
फिरून येती मनात इच्छा भेट हवी मज, हवी मिठी |
आणि हासुनी ओळखशी तू,देउन जाशी हवे तसे
मंतरल्यासम ते क्षण जाता, इच्छांचे त्या पुन्हा पिसे |
'थांब थांब तू, नकोस जाऊ'सांगावेसे तुज वाटे,
त्याच क्षणी अन् सभोवताली काजळगहिरे तम दाटे |
म्हणून जाशी मिठी छेडुनी झिणिझिणि वलये गात्रात
अन् पुढल्या भेटीची होते मनी अनावर सुरुवात |
असंख्य वेळा अशी भेटशी मिठीत घेशी हळुवार
'थांबवून ठेवावे तुज' ही इच्छा अपुरी, अनिवार |
हट्ट सांग मी करू कोणता? थांबशील जो पुरवाया,
थांबशील का अजून थोडी आज एवढे ठरवाया?
असं काहीतरी वाचायला मिळालं की
असं काहीतरी वाचायला मिळालं की आनंद होतो. (चैतन्य, कविता - मला तरी - किंचित लांबल्यासारखी वाटली. क्षमस्व). पण लय इतकी मोहक आहे की फ्लोमध्ये वाचावेसे वाटत गेलेच.
आपण अधिक लिहा अशी आग्रहपूर्वक विनंती
धन्यवाद
-'बेफिकीर'!
( मराठीतील जुन्या कवितांचीही आठवण झाली - ही स्तुतीच आहे)
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
बेफी, नक्की लिहीन. ही कविताही खूप दिवसांनी झाली. रात्री २:०० ला वगैरे
लिहून पूर्ण होईपर्यंत चैन नव्हतं. आजकाल अशा 'प्रसूतिकळा' फार कमी झाल्यात हो
आजकाल अशा 'प्रसूतिकळा' फार
आजकाल अशा 'प्रसूतिकळा' फार कमी झाल्यात हो <<<<<< याचे तुम्हाला वाईट वाटत आहे ही प्रॉमिसिंग बाब आहे. असे झाले की मी रस्त्यावर उभा राहून खाणाखुणा करणार्यांचे हावभाव तपासतो
मस्त लयबद्ध कविता !
मस्त लयबद्ध कविता !