उंच माझा झोका

Submitted by सानी on 13 March, 2012 - 05:59

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया. Happy

Uncha Maza Zoka-Promo.jpgUncha Maza Zoka-News.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मालिका न बघितल्याने, होणारी (संभव्य) चिडचिड होत नाही आणि ४-५ थेंब ( संभव्य आटणारे ) रक्त वाचते Happy . . . आश्या पद्धतीने आनंदाचा झोका उंच जाउ शकतो . . .

मला टिव्ही गच्चीवरून फेकून देण्याची सुरसुरी येत्ये. ????????>>>>>>> एलसीडी ३२" पेक्षा जास्त असेल तर माझ्या घरी पाठवुन दे Happy

त्यांच्या कष्टाची, मताची, त्या मतासाठी ठामपणे ऊभे राहण्यामागच्या मानापमानांची काहीही जाणिवच नाहीये>> अगं, ह्याभोवती फिरते कुठे आहे सिरिअल मुळात?
त्या जावांची भांडणं, एकमेकींवर दात खाणं ह्या भोवतीच फिरतेय... लोकांना असं सगळं दाखवून टीरपी वाढतो असा ढोबळ नियम ह्या चरित्रात्मक व्यकितेखा घेऊन साकारलेल्या सिरिअलीला नकोच लावायला हवा होता, सुरूवात बरीच चांगली केल्यानंतर, दिग्दर्शन टिपिकल ये रे माझ्या मागल्याच दिसतंय...

कपडेपट आणि मेकअपच्या बाबतीत वरील सर्वांशी प्रचंड सहमत.
सुरुवातीला चांगली वाटत होती. आता काहीच्या काही चालू आहे. काल तो रामागडी चक्क 'मागल्या टायमाला' म्हणाला Happy जो ततपप करत मराठी बोलतोय, तो 'टायमाला' वगैरे कसं बोलेल, ते सुद्धा अलवणातल्या स्त्री शेजारी गप्पा मारत बसून ?
सह्याद्रीवर बहुतेक अजित भुरे आणि भार्गवी चिरमुले यांनी साकारलेली 'आनंदी-गोपाळ' मालिका लागयची. सगळ्याच बाबतीत उंमाझो पेक्षा उजवी होती.

रैना, तरी बरेच दिवस लावलेस सोडायला Wink मला सोडून महिन्याच्या वर झाला असेल. एकदा सोडली की एखादी बारकीशी झलक बघायची ( झुरका घ्यायचीच्या चालीवर वाचावे. ) सुद्धा इच्छा होत नाही असा स्वानुभव Proud

हो ना अगो. Happy
मेलं त्या रमाबाईरानड्यांच्या नावामुळे आणि त्या छान डोळ्यांच्या म.गो.रानड्यांचे काम करणार्‍या नटामुळे इतके दिवस पाहिली. सुपरवैताग.
हो मलापण एकदा सोडल्यावर अजिबात मोह होत नाही पहायचा. आधीही बर्‍याच सोडल्यात.

कोणितरी त्या सुभद्रा काकुच्या तोन्डात बोळा कोन्बा रे. किति ओरड्ते ति. बपरे!!!!!! शूट सम्प्ल्यवर अवज बसत असेल तीचा.
खरच रमाबाई रानडे नि स्वयम्पक घरतल्या कारस्थानावर लिहिलय का एवढा त्यान्च्या अत्मचरित्रात.
सास बहु सेरिअल वतते एक्दम. फ्कत सासु आनि सुना नौवरि घतलेल्य बस.!!!

बरेच दिवस मालिका दिग्दर्शक 'विरेन' म्हणजे कोण ही उत्सुकता होती. वाटलं होतं की आजकाल कुणीही उठून ह्या क्षेत्रात येऊ बघतो तसा असेल कुणी. तर हा 'विरेंद्र प्रधान' असा शोध नुकताच लागला. त्याने पूर्वी मोठ्या चांगल्या नाटकांमधून कामं केली आहेत ना ? नेटवर त्याच्या नाटकांविषयी काही सापडले मात्र नाही. तो 'भाग्यलक्ष्मी' 'वहिनीसाहेब' 'झोका' धारेला कसा काय लागला ? असे काय झाले त्याचे ? Uhoh
अरेरे !

अगो +१
बरेच दिवस लागले की ग रैना तुला मालिका सोडायला. मलाही जवळजवळ २ महिने होतील आता मलिका सोडुन. सोडल्यानंतर अगो म्हणत्ये तशी एकदाही पाहिली नाही. Happy त्यावेळेला महादेव पहाते. Happy जय जय शिव शंकर!!

आमच्याकडे मुलाला ते टायटल साँग आवडतं त्यामुळे ते संपलं की शक्यतो टीव्ही बंद केला जातो किंवा म्युट तरी.>> श्रूती अगदी अगदी! सुरूवातीला मी कविता लाड आणि यमीच्या संवादांसाठी बघायचे. पण नंतर नंतर वीट आला.

श्रूती आणि बागेश्री अगदी अनुमोदन!!!

अवांतरः माझ्या पिल्लूला ते साँग खू आवडतं. सातच महीन्यांचा आहे, तरी ते म्युझिक लागलं की माझ्या तोंडाकडे बघतो.. त्याला वाटतं आपली आईच इतकं सुरेल गातेय. Proud मग लिप मूव्ह्मेंटस कराव्या लागतात. अगदी बोळकं पसरून हसतं. (नवरा मधून मधून चिडवत असतो, तू म्हणून दाखव गाणं हेच काय दुसरं कुठलंच गाणं ऐकणार नाही तो ... Sad )

मला ते वरचे अ‍ॅक्टिलाइफ पण त्या छोट्या मुलीनेच लिहीले आहे असे नेहम्म्मी वाट्ते आणि डोके भंजाळते. मी अ‍ॅक्टिलाइफ ते जाहिरात बघून विकतही घेतले. पण अजून बाटली उघडली नाही.
बरेच दिवस ते अ‍ॅक्टिलाइफ म्हणजे मला लाइफ इन्श्युअरन्स पॉलिसी वाट्त असे.

रमा माहेरी आली तर तिची वहिनी तिला किती टोचून बोलते. टिपिकल किचन पॉलिटिक्स. ह्यातून निघून पुढे कीर्ति मिळवावयाची ते फार अवघड. त्या दोघांचे सह जीवन आता हळू हळू सुरू होत आहे. ते गोड वाट्ते.

मी सुद्धा महिन्याभरापुर्वी ही मालिका बघयची बंद केली....एकदा मालिका बघत होते आणि तिथे जवळच माझा मुलगा(वय व.३) खेळत होता. मधेच त्या बायकांचे भांडण सुरु झाले. ते ऐकून तो जोरात रडायला लागला. त्यानंतर बंदच केली.

कालचा भाग थोड्यावेळ बघावा लागण्याचा वाईट योग होता. तो विरेन्द्र किती भयानक फसव्या विचारांचा आहे हे बघून मन भरून आले. नेहमीच्या मालिकांत पुरुष पात्र स्त्री पात्राला घराबाहेर काढते काल ताईकाकूने कोण्या पुरुषाला घराबाहेर काढले - हा फरक वगळता ती मालिका नेहमीच्या सासू सून याच मार्गाने चालली आहे. रमाबाईंच्या नावाखाली काहीही चालवले आहे.

आज प्रकाशित झालेल्या लोकप्रभा मध्ये 'मराठीची अवस्था मात्र दोलायमान' या लेखात या बाफ वरची एक प्रतिक्रिया संदर्भ म्हणून दिली आहे.

"ठराविक काळ गेल्यावर सगळ्या मालिका एका सपाट ‘वळणावर’ का अडकतात? वास्तवात असं घडतं का? ‘मायबोली डॉट कॉम’ वर एका प्रेक्षकाचं ‘उंच माझा झोका’ बद्दलचं मत वाचलं. त्यात म्हटलंय, ‘यातल्या सगळ्या विडोज अगदी फ्रेश आणि डेझी, गोऱ्यापान दाखवल्या आहेत. चेहऱ्यावर येणारी अवकळा मेकअपने पुसून काढली आहे. सर्व कलादिग्दर्शन अगदी नवे कोरे आहे. विषयाची गरज म्हणून सुद्धा नॉनग्लॅमरस दिसणे निर्माता-दिग्दर्शकांना मान्यच नसते.’ - आणि इतर मालिकांच्या बाबतीतही कलादिग्दर्शनाबाबतीत हे अगदीच खरं आहे."

ही अश्विनीमामींची प्रतिक्रिया असणार.>>अय्या भरत खरेच. मी पहिल्यापासून बाफं वाचून काढला तुझ्याशी भांडायचं म्हणून. कस्चें कांय. तुमचेंच बरोंबर आहे. तेरेकु कैसा मालुम पडा? एनिवेज त्या छोट्या मुलीस सारखे रागवतात ते अगदी बघवत नाही. ती सासूला मिठी मारायला जाते तर सासू पण हिडीस फिडीस करते.

काल बर्याच दिवसांनी ही मालिका बघितली. रमाची सासू म्हणाली की मोरोबा बाबा होणार आहे.

त्या काळी वडीलांना बाबा म्हणायची पद्धत होती का? त्या काळातल्या वडीलांचा उल्लेख सहसा अण्णा, अप्पा, तात्या, भाऊ, दादा, आबा असा ऐकला आहे.

भुंग्या Lol
इथे एक्दम एव्हढ्या नविन पोस्टी बघुन हा धागा उघडण्या आधी मला अगदी वाटलं... एलदुगो वरचे भुंगा आणि पब्लिक ने इथे मोर्चा वळवलेला दिसतोय.
चागलंय ! उंच ठेवा झोका Lol

खुपच मस्त बातमी... Happy तशीही मध्यंतरी थोडे दिवस आवडली नव्हती, पण पाहणे बंद झाले नव्हतेच. आणि सध्या तशी छानच चालूये मालिका. रानडेंचे सामाजिक कार्य वगैरे बर्‍यापैकी दाखवतायत हल्ली आणि नीना कुलकर्णीच्या तोंडी छान संवाद होते. नवीन आलेली शिक्षिका प्रकरणतर चांगलेच मनोरंजक झाले होते. आता स्पृहा आली तर टीआरपी नक्कीच वाढेल, पण मी या छोट्या रमेला मिस करेन, हे ही नक्की.

Pages