यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २७ मे रोजी सुरु होत आहे. पुरूष एकेरीत नेहमीप्रमाणेच नदाल, जोकोविक आणि फेडरर ह्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल.
मार्डी फिश आणि सोडर्लिंग उर्फ सोड्या ह्यांनी ह्या स्पर्धेतून माघार घेतल आहे.
पुरूष एकेरीत नोव्हाक जोकोविकला तर महिला एकेरीत व्हिक्टोरिया अझारेंका ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे. पुरूष एकेरीत जोकोविक आणि फेडरर एका हाफमध्ये आले आहेत तर नदाल आणि मरे एका हाफमध्ये आहेत. महिला एकेरीत सेरेना वि शारापोव्हा अशी उपांत्यपूर्व फेरी रंगू शकते.
मानांकिन खेळाडू सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेर्या अश्या होतील:
जोकोविक वि. त्सोंगा
फेडरर वि बर्डीच
फेरर वि मरे
नदाल वि टिपरार्विच
अझारेंका वि स्टोसूर
बार्टोली वि राडावान्स्का
ना ली वि क्विटोव्हा
सेरेना वि शारापोव्हा.
ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा..
यावेळेस नविन विजेता. नादाल न
यावेळेस नविन विजेता.
नादाल न जिंकल्यास संबंधितांकडून इथेच पार्टी वसूल करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
मी वाट बघत होतो. राफाने रोम
मी वाट बघत होतो.
राफाने रोम आणि माद्रिद दोन्ही ठिकाणी अंतिम फेरीत जोकोला पराभूत करून रँकिंग्जमध्येही दुसरे स्थान मिळवलेले आहे.
विक्रमकाका तुम्ही म्हणताय तसे
विक्रमकाका तुम्ही म्हणताय तसे झाले तर आनंदच आहे... पण शक्यता कमी वाटती आहे.... कारण जोको, नदाल आणि फेडेक्स हे तिघंच एकमेकांना हरवू शकतात.. बाकीचे एखाद्या दिवशी फारच उच्च खेळले तरच हारवतात ह्यांना.. त्यामुळे सेमी मध्ये हे तिघेच दिसायची शक्यता दाट आहे...
ड्रॉ अपडेट केले आहेत. जोको
ड्रॉ अपडेट केले आहेत.
जोको आणि फेडरर एकाच हाफमध्ये...!
टेनिस सोडून इतर चानलवर (उसात)
टेनिस सोडून इतर चानलवर (उसात) दाखवणार आहेत का? टेनिस माझ्याकडे दिसत नाही. यावेळी फकस्त सेमी आणि फायनल जी इतर चानलला दाखवतात तिच दिसणार का?
वेका, इथे
वेका, इथे पहा-
http://gototennis.com/2012/05/22/2012-french-open-tv-schedule/
सही आभार्स लोला .
सही आभार्स लोला .:)
आदमा, उपांत्य नव्हे
आदमा, उपांत्य नव्हे उपांत्यपूर्व फेर्या म्हण वर.
व्हय व्हय.. बदल करतो.. काल
व्हय व्हय.. बदल करतो..
काल ठोसरबाई दुसर्या सेटमध्ये जोरदार खेळल्या !
डेल पोट्रो पण चांगला खेळला.. त्याच्या मागच्या दुखापती संपत नाहीत पण..
कुझनेत्सोवा, इव्हानोव्हिक ठिकठाक...
विक्रमकाका तुम्ही म्हणताय तसे
विक्रमकाका तुम्ही म्हणताय तसे झाले तर आनंदच आहे... पण शक्यता कमी वाटती आहे.... कारण जोको, नदाल आणि फेडेक्स हे तिघंच एकमेकांना हरवू शकतात..>> बरोबर आहे. गेल्या २७ ग्रँड स्लॅम मधे फक्त एकदा या तिघांशिवाय वेगळा विजेता झालाय. तो म्हणजे डेल पोत्रो. पण पराग म्हणतो त्याप्रमाणे तो फारच दुखापत्या आहे. तो, मरे, बर्डीच, इसनेर, बघू काय करतात.
पण एक आहे. फ्रेम्च ओपनलाच दुसरा कुणी तरी जिंकायचे जास्ती चान्सेस.
त्रिविक्रमांचे काका कसे काय
त्रिविक्रमांचे काका कसे काय झाले अचानक ?
राफा छान जिंकला...
शारापोव्हा जोरदार जिंकली !! व्हिनस, अझारेंका पण जिंकल्या.. व्हिनस फारच म्हातारी वाटायला लागली आहे आता...
मर्याच्या विरुद्धचा जपानीपण चांगला खेळतोय..
आमचा घोडा पण पहिली फेरी
आमचा घोडा पण पहिली फेरी जिंकला की राव आणि त्याबद्दल एक अवाक्षरही नाही. किती दुजाभाव 'आपला तो बाब्या....'
सशलने सर्बियातला तळ हलवला का?
तो, मरे, बर्डीच, इसनेर, बघू काय करतात. >>> ईसनर मधेमधे फारच धोकादायक (प्रतिस्पर्ध्यासाठी) खेळ (म्हणजे सर्विस) करतो. पोट्रोबद्दल अजून नेमकं मत बनलं नाहीये, पण ईतर कुणापेक्षाही (सोडर्लिंग नसल्याने आणि मरे असूनही) तोच सगळ्यात वरचढ 'जायंट किलर' वाटतो.
महिला एकेरीच्या सामन्यांच्या अॅनालिसिसच्या वाट्याला अपण जातच नाही.
अय्या, माझी आठवण काढली? मी
अय्या, माझी आठवण काढली?
मी तळ हलवलेला नाही अजिबात .. ज्योको ला झुंजार कामगिरीकरता शुभेच्छा ..
काही लोकांनां असं वाटत आहे की ऑस्ट्रेलियन ओपन चा वचपा काढला जाइल .. दोन आठवड्यात कळेलच काय होतंय ते ..
माझा तळ फक्त आणि फक्त ज्योको कडेच ..
फार दुजाभाव आहे. पण खेळ आहे
फार दुजाभाव आहे.
नाहीतर भारत-अमेरिका, हिंदू, ब्राह्मण, सावरकर इ इ वादांच्या तोंडात मारेल असा वाद होऊ शकतो इथे.
पण खेळ आहे म्हणून लोक खेळीमेळीने घेतात.
वेलकम सशल.
सेरेना हारली
सेरेना हारली
चमन.. तू लिही की तुमच्या
चमन.. तू लिही की तुमच्या बाब्या बद्दल..
हो ना सोड्या नाही यंदा !
लालू मारायचं का तोंडात (ते वाद घालणार्यांच्या) ??
सेरेना हरली !!! आता पोवा बाईंचा मार्गे मोकळा.. फक्त उपयोग केला पाहिजे संधीचा...
सेरेनाच्या मॅचचे हायलाईट्स भारी होते.. गेल्या फ्रेंच ओपनपासून अचानक ड्रॉपशॉट्सचं प्रमाण वाढल्यासारखं वाटतय का ह्या स्पर्धेत.. लोकं रॅल्या खेळून खेळून दमली असावीत!!
सेरेनाची मॅच दुसर्या सेट
सेरेनाची मॅच दुसर्या सेट पर्यंत बघितली... तो सेट संपल्यानंतर ती रडत वगैरे होती... तेव्हाच वाटले की आता काही खरे नाही... हारण्याची पूर्वपीठिका करुन ठेवते आहे... दुसर्या सेट मध्ये टायब्रेकर मध्ये अशक्य टाळता येण्यासारख्या चुका करुन तो सेट घालवला... खरतर टायब्रेकर मध्ये गेला हेच नशीब अशी परिस्थिती एका वेळेस होती.. पण रझानो नवीन असल्यामुळे दडपणाखाली खेळली आणि टायब्रेकर खेळावा लागला... टायब्रेकर मध्ये सुद्धा सेरेनाने अनुभवाचा फायदा घेत ५-२ अशी आघाडी घेतली होती.. पण तिथेच काहीतरी बिनसले आणि मॅचच गेली तिच्य हातून..
पुरुषांमध्ये आत्ता तरी सगळेच सीडेड घोडे जिंकलेले आहेत.. पण रोलँ गॅरोचा इतिहास बघता ह्याच आठवड्यात दोन-तीन तरी सनसनाटी निकाल बघायला मिळतीलच...
महिला दुहेरीत सानिया बाईंची घोडदौड पहिल्याच फेरीत थांबलेली आहे... मिश्र दुहेरीत भूपतीबरोबर काय दिवे लावतात ते बघायचे..
व्हिनसपण हरली.
व्हिनसपण हरली. तिसर्याफेरीच्या पुढे विल्यम्स भगिनी नाहीत असं बर्याअ स्पर्धांनंतर झालं असेल.
इव्हानोव्हिक परत जरा बरी खेळायला लागली आहे का ? तिचं सिडींग १३ आहे.. मधे मधे खूपच ढेपाळली होती.
आना आणि योकोविच दोघं सर्बियन
आना आणि योकोविच दोघं सर्बियन आवडतात.. पण योको आणि फेडेक्स मध्ये अजुनही फेडेक्सच..:)
अझारेंका नवीन फेव्रिट.. अर्थात शेरापोव्हानंतर..
आनाला बरेच दिवस पाहिलंच नाहीये...दुखापती सुरू आहेत का तिच्याही......
पीएसटीला पाहण्यासारखे सामनेच नाहीयेत...नाहीतर व्हिनसला हरताना पाहायला आवडलं असतं. ...तिचं ते उद्धटपणाचं एक प्रकरण झालं तेव्हापासनं ती जास्तच डोक्यात जाते....
व्हिनसला हरताना पाहायला आवडलं
व्हिनसला हरताना पाहायला आवडलं असतं. ...तिचं ते उद्धटपणाचं एक प्रकरण झालं तेव्हापासनं ती जास्तच डोक्यात जाते.... >>>>>
उद्धटपणाचं प्रकरण सेरेनाचं होतं हो..
.दुखापती सुरू आहेत का तिच्याही...... >>> दुखापती थोड्याफार होत्या पण तिने मागे फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर तडकाफडकी कोच बदलला ते महागात पडलं फार..
पीएसटीला पाहण्यासारखे सामनेच नाहीयेत >>>> किनाराच चुकीचा..
उप्स सॉरी...हो हो....एकंदरित
उप्स सॉरी...हो हो....एकंदरित त्या भगिनीच मला डोक्यात जातात....त्यामुळे म्या काय नीट पाहिलं बी नाय..हरले म्हटल्यावर आपण आनंदी.......
हो किनारा काही अर्थाने चुकीचाच....पण आता काय...बरं विकडेजला नाईट कशा मारणार...
अनाने कोच बदलला हे मला नवीन ..
आना हरली. वन स्लॅम वंडर आहे
आना हरली. वन स्लॅम वंडर आहे ही.
आओह... आनाचे ग्रह ठीक
आओह... आनाचे ग्रह ठीक नाहीयेत..;)
लोक्स वोजनियाकीने Match point वरुन Tie break वर दुसरा सेट घेतलाय..:)
Keeping the fingers crossed...
जोकोची मॅच चांगली चालू
जोकोची मॅच चांगली चालू आहे..
सारा इररानी जोरदार खेळली. कुझनेत्सोवाचा धुव्वा झाला पार.
कर्बर की कोण ती जर्मन पण चांगली खेळली. आता इर्रानी वि कर्बर मॅच चांगली होईल.
वॉझनियाकी हरली.. आज डेल पोट्रो वि बर्डीच मॅच चांगली होईल...!
युझनीचं sorri पाहिलं का? जर
युझनीचं sorri पाहिलं का?
जर 'ते'च नेट परत वापरले तरच इव्हानोव्हिच स्पर्धा जिंकेल.
गो सिबुल्कोव्हा!
गो सिबुल्कोव्हा!
सशल आहेत का?
सशल आहेत का?
फडतूस मॅचचे ५ सेट..
फडतूस मॅचचे ५ सेट..
अझारेंका हरली. ... पोव्हाने
अझारेंका हरली. ... पोव्हाने संधीचा फायदा घ्यायला हवा...
़ज्योको ५ सेटर..
बिचारा सेपी मॅच फिनीश करता
बिचारा सेपी मॅच फिनीश करता आली नाही. तिसर्या सेट मधे एक ब्रेक वर असुन मॅच जिंकणं जमलं नाही त्याला.मोठा अपसेट होता होता वाचला.
फेडु कधी कधी इतक्या अनाकलनीय पध्धतीने सर्विस घालवतो की वाटत इथे पण स्पॉट फिक्सिंक आलं की काय?
Pages