..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव तुमच्या कोड्यातला पक्षी गोड वाटत नाही. खिलौना हा शब्द गाण्यात असेल असे वाटतेय.
मोहन की मीरा, योग्य मार्गाने जात आहात. पण योग्य वळण निवडा. गाडी तशी नव्या आणि पॉप्युलर मॉडेलची आहे.

अजाबात न्हाय.
सगळे क्लु एकत्र :
गाण्यात असलेल्या व्यक्तिरेखांची नावे कोड्यात आहेत. (आता अशी नावे हिरो हिरविणींची कोणत्या काळात असत ते आठवा)
प्रसिद्ध संगीतकाराबद्दलचा एक लेख सध्या मायबोलीवर आहे.

जिप्सी, बरोबर Happy तुला एक किलो मोतीचूर लाडू बक्षीस

कोडं क्र. ०३/०६९

'साहेब, एम.व्ही.रोडवरच्या गुलबकावली अपार्टमेन्टला आग लागली आहे. लवकर निघावं लागेल' सहकार्‍याचं हे बोलणं ऐकताच तो ताडकन उठला. त्याच अपार्टमेन्टमध्ये त्याची 'ती' रहात होती.

फायर ब्रिगेडची गाडी तिथे पोचली तेव्हा बिल्डिंग धडाडून पेटली होती. तरी कसाबसा तो पाचव्या मजल्यावर पोचला. तिच्या घराची बेल वाजवयचं भानही त्याला राहिलं नाही. धाडकन दरवजा तोडून तो आत गेला तर बाईसाहेब डाराडूर झोपलेल्या. त्याला हसाव का रडावं तेच कळेना. तिला गदागदा हलवून जागं करत तो ओरडला 'अग काय हे झोपणं? बाहेर आग लागलेली कळली नाही तुला? मी काळजीने अर्धा झालो इथे येईस्तोवर. निदान फोन तरी उचलायचास."

तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं, हसली आणि एक झक्कासपैकी गाणं गुणगुणायला लागली. ते ऐकून तो सगळा राग विसरला. ओळखा पाहू गाणं.

उत्तरः

तेरे कारन तेरे कारन तेरे कारन मेरे साजन
जागके फिर सो गयी सपनोमे खो गयी
आग लगे सारी दुनियाको मै तेरी हो गयी

व्हॅलिड क्लु >> त्या लेखात किंवा त्यावरच्या प्रतिक्रीयांत ते गाणे आहे.

आता तुझ्या कोड्याचा क्लू दे.

बिंगो स्वप्ना Happy
तुला मॅड ओव्हर डोनट्समधले आईस्क्रीम (आज १ तारीख आहे ना Wink )

चित्रकोडे ००३/०७७
हाथोमें मेहंदी हाथोमें....बालोमें फुल
बोल रे मेरी गुड्डी तुझे गुड्डा कबुल

००३/०७८ : ज्योतिंद्रनाथ आणि आशा हे रंगभूमीवरचे प्रतिथयश बालकलाकार. त्यांची अनेक नाटके गाजलेली असतात. आता दोघ तरुण झालेली असतात आणि दोघांत प्रेम उमलू लागले असते. आशा ज्योतिंद्रनाथला प्रेमाने 'जो' म्हणायची. तर जो मुळातच तापट डोक्याचा. आपला प्रेमवीरच समोर असल्यामुळे आशाच्या हातून प्रयोगात चुका घडायला लागल्या आणि मग जो तिच्यावर चिडू लगला. आशाला रंगभूमीपेक्षा जो जास्त महत्वाचा वाटत असतो. शेवटी आशा रंगभूमीवरून निवृत्त होते. तेंव्हा झालेल्या समारंभात पत्रकार तिला निवृत्तीचे कारण विचारतात. ती त्यांना गाण्यातूनच उत्तर देते.

ए तुम्ही सगळे किती भारी आहात
मला एकही गाणं अजिबात म्हणजे अजिचबात कळत नाहीये कोड्यातुन आणि क्ल्युज मधुन पण
सगळ्यांना __/\__

बाप्रे... मै हैरान हुं! Uhoh
जिप्स्या, वॉट्ट अ कोईन्सीडीन्स! :)..आज सकाळपासुन अगदी याच गाण्यासाठी (हाथों में मेहंदी) मी पिक्स जमा करत होते. त्यात तु 'कबुल' शब्दासाठी टाकलेला फोटो डिट्टो घेतलेला, फक्त मेहंदीसाठी मी 'दलेर मेहंदी'चा घेतलेला, किंवा काजोल चा 'मेहंदी लगा के रखना' या गाण्यातलाही सेव्हुन ठेवला होता. गुड्डे गुडीयासाठी राजस्थानी गुडीयाचा खास काढुन ठेवला होता.

माधव,

जो तेरा प्यार न मिलता तो क्यूँ जिये होते
सदा ही मौत की हम आरज़ू किये होते
मिला था एक ही दिल वो भी दे दिया तुझको
हज़ार दिल भी जो होते तेरे लिये होते???

जिप्सी नाही.

आर्या कोणत्या कोड्याकरता उत्तर आहे हे? पण बरोबर नाहीये.

००३/०७५:
क्लू १: ते शास्त्रिय संगीतावर आधारीत गाणे आहे, पण सुवर्णकाळातले नव्हे.
क्लू २: या गाण्याच्या संगीतकारावर एक लेख आत्ताच मायबोलीवर लिहिला गेला.
क्लू ३ (सॉलीड क्लू): २ आणि ३ ही जोडचित्रं आहेत एकच शब्द बनेल त्या दोघांचा.

Pages