"सत्यमेव जयते" भाग ४ - (Does Healthcare Need Healing?)

Submitted by आनंदयात्री on 26 May, 2012 - 14:46

आज २७ मे च्या चौथ्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue04/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम चर्चा!

आयुर्वेद, होमियो, युनानी किंवा निसर्गोपचार शिकुन अ‍ॅलोपथीची सरसकट प्रॅक्टिस करणार्‍या लोकांविषयी पण चर्चा व्हायला हवी होती!

त्या इंग्रजी मेलवर माझी प्रतिक्रिया
Sir,
I have been a big fan or your work, life and principles. I am also a fan of ‘Satyamev Jayate’.
But I was shocked to see the episode on 27th May, 2012. You are an Icon. You should have
thought well and done the homework before doing such a biased show. There are only two
people in the film industry that are being taken seriously by the thinking class of society,SRK, You and Amitabh Bacchhan. So, when you give such a biased and one sided version of a story, it hurts. Speaking about such a thing on a “commercial” TV show is bad. (I am sure you have taken a big amount, only doctor are supposed to do charity and social work, not actors!!! Right!) I want to highlight few important points here. And yes I am qualified to make observations
1. Your guests and audience (the words were almost put in their mouth) said that private
colleges charge a capitation fee of 40 – 50 Lacs for MBBS, you should have also produced some evidence of such practice. Like you call a victim in all your episodes, why not here? And do the same story Engineering, Architecture, Law and MBA colleges, do you think they are clean? Why target doctors alone? कारण तुम्ही प्रत्येक वेळी जीवाशी खेळता यंत्राशी नाही!!
2. You said Since 2001, government opened 31 medical colleges and 106 private institutes were opened. – Please note that today in India, there are a total of 181 Private and 152 Govt Medical colleges. So the number is not as bad s you projected. Don’t project only the time period which suits your story. Either give a complete picture or do not give a picture at all! या तुलनेतून काय जाहिर होते?.
And also, please find out how many of these private colleges are owned by politicians? 95% of Private colleges in India are owned and run by politicians. It is a bloody nexus between
politicians and MCI. The corruption by politicians is to blamed for the mess, not doctors!!!
यावर तुम्ही डॉक्टरानी काय केले?
3. One of your guest (Dr. Gulhati) said that doctors ask for 30% commission from Pharma
companies to write their drugs. That is baseless, over-the-roof and sensationalizin g the matter. That is as true as “Most Leading actors ask newcomers to sleep with them” or “Lawyers take money from both the sides in a legal battle” or “Most chartered accountants teach their clients how to save tax and also pass info to taxman on where his client saved tax”. I know all of you will shout “Where is the proof?”. So are doctors!!! I am not trying to sensationalize things as you did on your show by shading those fake tears, but just trying to project that allegations are easy to make. I know you will say that this was the opinion of
our guest, and not yours. But you provided a platform for these fake allegations.
ही 'फेक अ‍ॅलिगेशन नाही" कारण मी जेव्हा स्वतःच्या चेकप साठी स्वतःच्य टेस्ट करतो तेव्हा देखील रेफेर्ड बाय वर कुठल्या तरी डॉक्टर चे नाव तो पॅथॉलोजिस्ट स्वतःच टाकतो. का??
4. You compared the numbers of Licenses cancelled in England and in India. I must say your
team is quite resourceful and please collect and compare following details also –
a .Number of doctors beaten on duty by goons from various political outfits in government hospitals in UK and India in last 10 years, and also the number of people convicted for such crime. याचा काय संबंध आहे. एकाने शेण खाल्ले म्हणून डॉक्टर ही खाणार का?
b.The Stipend (Salary a post-graduate trainee doctor/intern gets) or Salary and accommodation facilities provided to the doctors of the two countries.
c.The duty hours and working conditions of the doctors of the two countries.
d.The academic and research infrastructure being provided to the medical students.
काय रडगाणे हे??

5. You said that the most brilliant students who take up medicine, should take it only for service to mankind, they should go to other fields if they want to earn. Why? Are we living in imperialism? Are doctors not allowed to earn and spend a good life? You were asking Dr. Devi Shetty whether he can do humanitarian work and Earn at same time? This is like asking Amirkhan or Shahrukh- khan their income and generalizing it for every actor in the industry (Even junior artists). Sir, just as there are only few Khans and Kapoors, There are even fewer Devi Shetty and Naresh Trehan who run their chain of Multi-specialty hospitals spread all over the country. See what it takes to become a doctor and then give such “Geeta- Gyan”.
असंबध्द

a. 5 and half year of MBBS training and 1 more year of Compulsory Rural Internship at Rs. 15000 - 20000 per month. (Any other field eg. Engineering, Management, a person would
become Postgraduate in this much time and start earning double the amount.) If one doesn’t study further, the pay at this step is 22,000 per month.
b. After above 6 and half years of Graduation, 3 more years of Postgraduation, followed again by compulsory rural / Government job for 1 year or pay Rs. 25Lac bond. If one doesn’t study further, the pay at this step is 40,000 per month.
c. After this above 10 and half years, 3 more years of Superspeciality , followed by 1 year of Govt job or a Bond of Rs. 2 Crore. And the seats are so few with tough competition, there tends to be a gap of a year or two in preparing for various entrance exams.
म्हणून हे धंदे करायचे? अगम्य तर्क

6. Why only Doctors are being forced to work in rural and government hospitals after their study? Why only we should pay government if we don’t want to do it? The rural/Govt sector needs help of Engineers, Lawyers, Chartered Accountants and MBAs also. Why aren’t the Engineers sent to rural areas to design and monitor roads and industrials development?
Why aren’t the Lawyers forced to work as Public prosecutors before they can join some big foreign corporate firm? Why aren’t the CAs asked to work in CAG office and various other government financial sectors before joining Multinational Giants? Now government wants that doctors should not immigrate to other countries without asking them. Why? Are the IIT/IIM students stopped before they flee to foreign countries for big fat salaries? So, why us? What is it that government of society has done for doctors that they should repay? They bloody can’t even protect them from goons while on duty.
अन हे ब्लडी वगैरे त्रागा कुणासमोर?? अरे परत इतर व्यावसायिकांशी तुलना विषयाला सोडून होत आहे!!

7. You say that doctors are writing unnecessary and costly medications. Do we decide the price of a drug? Do we manufacture or give license to drug manufacturers? Controlling the price of essential drugs is a government job. We are helpless. Sir, its easy to point fingers. We don’t say that all is well. But all is not well anywhere. Its a different thing creating awareness about dowry or female feticide. But its entirely different to comment on such a technical and complicated issue without getting into the details of it. You have maligned the entire medical fraternity. For every 10 doctors who are doing wrong, there are more than 1000 healers. You owe us an apology!!! This issue is not as simple as you think it is! Please show stories which are unbiased and straight-forwar d. You cannot do justice to such an issue, especially after charging a whooping amount for creating awareness!!! (We hear that Amir has charged 3 crores for episode of satyamevjayate in which he spreads the message to doctors that they should not make money and do social service!!! How sacred!!! I
don’t know if its true, but well, it’s the season of allegations!) “We Doctors may be doing little social service, But at least we are not charging for it!”
पुनः त्रागा!! डॉक्टर लोक परदेशाच्या वार्‍या मेडिकल रेपच्या दयेने करतात ,हे खोटे का?

या हून गिल्टी कॉन्शस चे पत्र काय असू शकेल??

@ झंपी | 29 May, 2012 - 11:23

तर्क काय करतो आहे ते परत समजावून घ्या.

तुम्हाला अर्धी स्टोरी पण नीट ठाऊक नाही. रडत होत्या म्हणजे बरोबर होत्या का आजीबाई? उदा. घरात सासू सुनेच्या भांडणात सासू नेहेमीच रडत असेल तर तिचंच बरोबर असतं का? उद्या डॉक्टरने रडत सांगितलं असतं तर त्या आजीला उद्दाम म्हणाल तुम्ही?
अन हो, झुरळ घातलेलं सूप आणलं, तर मायबोलीवर येऊन 'एक मोठे होटेल' असं लिहीणार नाही मी. आधी तिथे वाजवीन त्याला मग नंतर इथे नावा गावासकट बोंब मारीन. पैसे घेऊन गप बसणार नाही. भाकड गळे काढता येत नाहीत मला.

उगा त्या बिच्चार्‍यांना तमुक झालं, सगळे प्रथितयश डॉक्टर भुक्कड??
सॅम्पल काय खिशात घेऊन फिरत होता का तो डॉक्टर? सँपल लॅबने हरवले आहे. ती लॅब खालच्या मजल्यावर होती ही सर्जनची जबाबदारी कशी?
फालतू जजमेंट देणारे किस्से लिहित जाऊ नका तुमचे नसतील किंवा ऑथेंटिक नसतील तर.

हा होता पहिला मुद्दा
अन दुसरा होता त्या डीलिव्हरी चा.
त्याच्या पैशाबद्दल बोलत होतो. मेन्युकार्ड तिथे आले.
दोन्ही मुद्दे मिक्स झाले अन तुम्ही सूपमधे झुरळ घालून आणलेत Wink
****
@ दक्षिणा | 29 May, 2012 - 12:39
>>>
झंपे थोडं परखड लिहिलयस, त्यामुळे पोष्ट वाचताना तु ओरडून काहीतरी सांगतेयस असा भास होतोय. असो, तुझ्या पोष्टीतल्या कंटेन्ट्सना अनुमोदन.<<<<

@ झकासराव.
वर लिहिलेलं वाचलंत का?
आपण म्हणता की साती संयतपणे बाजू मांडतात.

मी साती नाही, संतापी आहे. फार ऐकून घेतो नेहेमीच डॉक्टर्सना दिलेल्या शिव्या.

झंपी यांनी 'परखड' लिहिले आहे. अन मी ठासून बाजू मांडली की तो आक्रस्ताळेपणा होतो का? यांना कुणी अधिकार दिला जनरली डॉक्टर्सची बदनामी करायचा? जो चोर असेल त्याचे नांव घेऊन लिहा. तिथे का घाबरता? ब्लँकेट सगळ्यांबद्दल बोलले की मी पर्सनली घेणारच. Happy

उदा:
>>दक्षिणा | 28 May, 2012 - 15:54

आता डॉक्टर लोक थोडे बिचकतील पण उडवाउडवीची उत्तरं द्यायला.
कारण गाठ आमिरशी आहे.
<<
>>दक्षिणा | 28 May, 2012 - 15:55

एक इन्स्टंट लॉ का नाही काढत सरकार?
कोणताही वैद्यकिय हलगर्जीपणा दिसला की लग्गेच त्या लॉच्या अंडर केस घालायची डॉक्टरवर.
<<
>>दक्षिणा | 28 May, 2012 - 16:06

दिनेश जनजागृती तर आहेच महत्वाची. but there has to be something to which these fearless doctor will get scared.
<<

हे काय आहे?
एका कुण्या मूर्ख माणसाशी यांचं भांडण झाले असावे. तो डॉक्टर असावा. म्हणून जनरली सगळ्यांच डॉक्टरांना शिव्या? हा कसला संयतपणा? हलगर्जीपणा कसा होतो ते समजतं का तुम्हाला?

यांचे "त्या" डॉक्टरशी भांडण का झाले? टाळी एका हाताने वाजते का?

डॉक्टर नेहेमी आपली रेप्युटेशन जपतो. पेशंट बरा नाही झाला तर माझा धंदा बंद पडतो. मला सरकार पगार देत नाही अन पेन्शन ही नाही. पोट कसं भरू? गिर्‍हाईकाशी उर्मटपणा करायला काय पुणेरी मराठी दुकानदार आहेत का सगळे डॉक्टर्स?

आमच्या प्रोफेशनविरुद्ध तुम्हाला जी बाजू मांडायची ती नीट मांडा. उगा स्पेसिफिक अन सांगोवांगीची उदाहरणे देऊन प्रोफेशन बदनाम करू नका. नाहीतर डॉक्टरांनीही रिक्षावाल्यांसारखं किंवा इतर संपकर्‍यांसारखे रस्त्यावर येऊन लोकांना कोंडीत पकडायची वेळ येईल उद्या.

हा रोख आहे माझा. अन तो असाच राहील. हे कुणी हल्के घ्या, किंवा जड घ्या. आपल्या प्रकृतीस शोभेल तसे घ्यावे.

हा भाग एकांगी वाटला. तसंच विषय समजवण्यासाठी घेतलेली उदाहरणंही प्रभावी वाटली नाहीत.
याच विषयावर 'द प्रिया तेंडुलकर टॉम शो'मध्ये एक भाग सादर केला गेला होता, तो यापेक्षा कितीतरी पटींनी उत्तम झाला होता. एकंदर सार्वत्रिकीकरणाची सवय आपल्याला इतकी झाली आहे, की एखाद्या विषयाला अनेक पदर असू शकतात, हे आपण विसरतो. शिवाय पैसे फक्त आपण कमवायचे, आणि 'समाजसेवा' समोरच्याने करायची, ही वृत्ती आहेच.

'सत्यमेव जयते'च्या पुढच्या दोन भागांमध्ये पुण्यातल्या काही संस्था आणि व्यक्ती झळकणार आहेत. 'तुमच्या संस्थांमधली चांगली दिसणारी माणसं समोर ठेवा', 'ते आजोबा जरा अडखळत बोलतात, त्यांना हटवा तिथून', 'या आजींना जरा चांगली साडी नेसवा', 'तुम्ही हे वाक्य जरा चिडून बोलाल का, म्हणजे जास्त प्रभावी वाटेल', असे प्रकार चित्रीकरणादरम्यान घडले. स्टुडिओतले प्रेक्षकसुद्धा दिसण्यावर निवडले जातात.

@रेव्यु | 29 May, 2012 - 13:17

त्या इंग्रजी मेलवर माझी प्रतिक्रिया<<<<<

तुमच्या प्रतिक्रीयेवर माझी प्रतिक्रीया.

१.
>>कारण तुम्ही प्रत्येक वेळी जीवाशी खेळता यंत्राशी नाही!!<<

पहिली गोष्ट,
डॉक्टर 'खेळतो' हे कुणी सांगितले तुम्हाला? ते काय लहान बाळ अस्ते का? लाडावून ठेवलेले?
अन खेळत असेल तर तुम्हाला कुणी धाक दाखवलाय की त्याच्या कडे जाऊनच ट्रीटमेंट घ्या असा? तुमचा जीव तुमच्या घरी ठेवा. जाऊ नका डॉक्टरकडे.

२.
>>यावर तुम्ही डॉक्टरानी काय केले?<<
असल्या सरकारी निर्णयांविरुद्ध आयएमए काय करत असते जरा त्या आयएमएच्या वेबसाईटवर जाऊन बघा?
(बाकी तुमच्या पोस्ट-निवृत्ती प्राध्यापकीचे रहस्य काय? कोणत्या सरकारी कॉलेजात प्राध्यपक म्हणून आहात, की कुणा पॉलिटीशियनच्या खासगी एम्बीए/इन्जिन्यरिंग कॉलेजात? जरा विचार करून सांगा बरे काका?)
या अस्ल्या खासगी करणाविरुद्ध तुम्ही काय केलंत??

३.
>>ही 'फेक अ‍ॅलिगेशन नाही" कारण मी जेव्हा स्वतःच्या चेकप साठी स्वतःच्य टेस्ट करतो तेव्हा देखील रेफेर्ड बाय वर कुठल्या तरी डॉक्टर चे नाव तो पॅथॉलोजिस्ट स्वतःच टाकतो. का??<<

सर्विसिंगला आलेली गाडी कुठून आली याची नोंद तुमच्या वर्कशॉपमधे ठेवत नाहीत का?
मी टेस्ट ला पाठवलेला पेशंट असल्यावर रिपोर्ट कुणाकडे पाठवायचे हे पॅथॉलॉजिस्टला कसे समजेल?
तुम्ही स्वतः गेला असलात तर Ref by : Self अशी नोंद असते. उगा काहीही टंकू नका.
अन मुद्दलात ती टेस्ट स्वतः करून काय उजेड पाडत असता तुम्ही? ही टेस्ट 'Unnecessary' नसते का?? उगा ४ टेस्टची नांवे ठाऊक झाली की खेळ डॉक्टर डॉक्टर. वा रे वा!

४.
>>याचा काय संबंध आहे. एकाने शेण खाल्ले म्हणून डॉक्टर ही खाणार का?<<

तुम्ही खाल्लेत तर ऑफकोर्स खाणार!
तुम्हाला टंकता येते म्हणून वाट्टेल ते टंकणार का तुम्ही?
अहो काका, तिथे इंग्लंडात जर डॉक्टरला मारहाण केली तर त्या गुंडाचं काय होतं, याचा काही विदा आहे का ते विचारलंय. त्याचा अन तुमच्या शेण खाण्याचा काय संबंध?? ब्लॉगवर तर चांगले इंग्रजीत लिहीता तुम्ही? इथे इंग्रजीत लिव्लंय की??? वाचा जरा पुन्हा?-->

>>4. You compared the numbers of Licenses cancelled in England and in India. I must say your team is quite resourceful and please collect and compare following details also –
a .Number of doctors beaten on duty by goons from various political outfits in government hospitals in UK and India in last 10 years, and also the number of people convicted for such crime. याचा काय संबंध आहे. एकाने शेण खाल्ले म्हणून डॉक्टर ही खाणार का?<<<

खरंच तुमची कीव येऊ लागली आहे हो काका. ज्येष्ठ दिसताहात वयाने. तुमचा उपमर्द होऊ नये याची फार काळजी घ्यावी लागते आहे..

५.
>>म्हणून हे धंदे करायचे? अगम्य तर्क<<

कोणते धंदे?
तुम्ही करता तसे? काय बोलताहात याचा काही विचार?

६.
>>असंबध्द<<
तुमचा संबंधच नाहीये या मेलवर उत्तर द्यायचा. मग असंबद्ध वाटणारच.
तुम्ही तुमचे अन्नोदक कसे कमवावे हे मी सांगीतले/ डिक्टेट केले तर तुम्हाला कसे वाटेल? एका खेड्यातल्या कॉलेजात देतो प्रिन्सिपॉलचा जॉब. येताय सेवा करायला?

७.
>>अन हे ब्लडी वगैरे त्रागा कुणासमोर?? अरे परत इतर व्यावसायिकांशी तुलना विषयाला सोडून होत आहे!!<<

विषय काय आहे?
पुन्हा तेच. तुमचे अन्नोदक कसे कुठे कमवावे हा तुमचा प्रश्न असायला हवा की मी सांगू तुम्हाला ते? समाजसेवा म्हणून येताय का माझ्यासोबत? अजूनही खेडयांत संडास नाहीत बरेच ठिकाणी. चला जाऊन साफसफाई करत जाऊ.
वरचं वाचून आता मला मनातल्या मनात "ब्लडी फूल" म्हटलत ना?? Wink

८.
>>पुनः त्रागा!! डॉक्टर लोक परदेशाच्या वार्‍या मेडिकल रेपच्या दयेने करतात ,हे खोटे का?

या हून गिल्टी कॉन्शस चे पत्र काय असू शकेल??<<

कस्ली जळजळ होतेय! नेक्ष्ट टाईम माझ्याकडे एमार आला, की तुम्हालाही न्यायला सांगेन हो परदेशी.
अहो काका,
जरा गूगल वापरा.
एमारकडून काही घेतले तर काय होते ते शोधा. घेतले तर किती डॉक्टरांवर कशी कारवाई झाली ते बघा.

इतर व्यवसायांत अशी राजरोस लाच, एक्स्पेन्स अकाऊंट्स कसे अन किती असतात, अन त्यांच्यावर अंकुश कोण अन कसा ठेवतो? इस्कटून सांगू का ते? ते शेण खातात म्हणून डॉक्टर्स खात नाहीत. आम्हाला एथिक्स असतात, अन एमसीआय, एमेमसी अन आयएमएही असते. कुणा एका भिकार्‍याने वारी केली म्हणजे त्यात डॉक्टर लोक सगळे येतात का??

***

केवळ डॉक्टर्स प्रत्युत्तर देत नाहीत म्हणून उचलली बोटे अन लागले टंकायला असे करू नये ही विनंती.

आयुर्वेद, होमियो, युनानी किंवा निसर्गोपचार शिकुन अ‍ॅलोपथीची सरसकट प्रॅक्टिस करणार्‍या लोकांविषयी पण चर्चा व्हायला हवी होती!

हे परवडले.. पण काहीच न शिकताही लोक प्रॅक्टिस करतात, त्याचं काय?

कधी कधी पेशंटला, पूर्ण कल्पना न देता, इलाज करणे कसे योग्य असते, त्याचा एक किस्सा.

माझ्या कानाचे स्टॅपेडोक्टॉमी असे ऑपरेशन, डॉ. रविंद्र दिवेकर यांनी केले. माझ्याशी बोलताना, त्यांना बहुतेक मी तेवढा शूरवीर वाटलो नसेन (मी नाहीच) प्रत्यक्ष थिएटरमधे गेल्यावर, भुलतज्ञ डॉक्टर मला म्हणाल्या, सगळ्या ऑपरेशनभर मी तूझा हात धरुन ठेवणार आहे, जरा जरी दुखले तरी माझा हात दाब, मी तूला जास्त भूल देईन. तोपर्यंत ऑपरेशनची भूल म्हणजे पूर्ण बेशुद्धी असेच मला वाटायचे. (म्हणजे ते पिसासारखे हलके हलके वगैरे)

तर हे पूर्ण ऑपरेशन, मला पूर्ण शुद्धीत ठेवूनच झाले. भूल अगदी थोडी होती आणि डॉक्टर पूर्णवेळ माझ्याशी बोलत होते. त्यांनी उच्चारलेले शब्द, मला परत परत उच्चारायला लावत होते. याचे कारण असे कि या ऑपरेशनमधे माझ्या कानात टेफ्लॉनचा एक छोटासा तूकडा बसवला गेला, आणि तो नीट जागेवर बसलाय की नाही, हे ते डॉक्टर तपासत होते.

त्यानंतर, आपल्या दोन कानांना जोडणारी नळी पंक्चर करण्यात आली, (ही नळी आपला तोल संभाळते) त्यावेळी माझा तोलच गेल्यासारखे वाटले आणि ऑपरेशन टेबल एका बाजूला कलंडून मी खाली पडतोय, असे
मला वाटले. त्यावेळी मी भूलतज्ञांचा हात जोरात दाबला. त्यांना याची कल्पना होतीच. त्यांनी हलकेच
माझ्या हातावर थोपटून, आता झालं बरं का, असे सांगितले.

तर सांगायचा मुद्दा असा, जर त्यांनी मला आधी याची कल्पना दिली असती, तर मी ऑपरेशनला तयारच
झालो नसतो. मला अनेक डॉक्टर्स असे भेटले आहेत, कि त्यांना बघितल्याबरोबरच आपले अर्धे दुखणे
गायब होते. यांच्या उपचाराने आपल्याला पूर्ण बरे वाटणार आहे. त्यांना आपले सर्व दुखणे सांगायला पाहिजे,
असा विश्वास वाटणे, मला वाटते खुप महत्वाचे आहे.

दिनेश Happy
मी अगदी लहान असताना कित्तीतरी वर्ष माझ्या नाकातून अनपेक्षितपणे रक्त यायचं. कधीही कुठेही.. i was too small to ask the reason to the doctor आणि त्यांनी कदाचित त्या वेळी काही कारण सांगितलं असेल पण मी विसरून गेले आहे. ते आमचे फॅमिली डॉक्टर होते बी एच कुलकर्णी. त्यांनी मला निव्वळ एक इंजेक्शन दिलं आणि त्यानंतर आजतागायत फक्त एकदा माझ्या नाकातून रक्त आलं. इंजेक्शन म्हणजे फार मोठा इलाज केला त्यांनी, कारण नेहमी ते फक्त गोळ्याच देत असत. फी फक्त रू १०/-
दुसरे डॉक्टर सावंत, ते आणि त्यांचा मुलगा दोघेही प्रॅक्टीस करत. एका खोलित अचानक १०-१२ पेशंट्स घेऊन एकेकाला तपासत. फी एकदम माफक, दुसर्‍या दिवशी बरं वाटलंच पाहिजे. Happy

सध्या भारतात १० रुपये देउन कोथिंबरची जुडी सुद्धा मिळत नाही असे कोणीतरी मला सांगीतले.खरे खोटे कोणी सांगेल काय? मी तर असेही ऐकले आहे की भिकारीसुद्धा १० रुपये घेत नाहीत...

मी तर असेही ऐकले आहे की भिकारीसुद्धा १० रुपये घेत नाहीत...>> कोणत्या भारताबद्दल बोलताय मालक. Happy

कोथिम्बीर जुडीची किमन्त बदलत राहते

अजूनही एवढी कमी फी घेऊन उत्तम इलाज करणारे डॉक्टर आहेत.
दहिसरला एक निकम डॉक्टर आहेत ते फक्त १० रुपये फी घ्यायचे . त्यांचा आदर्श समोर ठेऊन त्यांची डॉक्टर सून फक्त २० रुपये फी घेते स्वताजवळ ची औषधे देते आणि पुन्हा जायची गरज लागत नाही. कायम गर्दी असते दवाखान्यात.
कोल्हापूरचे एक डॉक्टर अजूनही १० रुपये फी घेतात. नाव घरी विचारून लिहीन.

मी तर असेही ऐकले आहे की भिकारीसुद्धा १० रुपये घेत नाहीत..>>>>>>> बरोबर ........ हे तर काहीच नाही...... तुम्ही १० रुपये दिले ना तर ते तुमच्या तोंडावर ५० रुपये फेकुन मारतात..... खरच.... भारतात आला की असे काही करु ना हा............... Lol

उगा स्पेसिफिक अन सांगोवांगीची उदाहरणे देऊन प्रोफेशन बदनाम करू नका.. नाहीतर डॉक्टरांनीही रिक्षावाल्यांसारखं किंवा इतर संपकर्‍यांसारखे रस्त्यावर येऊन लोकांना कोंडीत पकडायची वेळ येईल उद्या. >>>>>>>>>>>>

उद्या ?? परवा, काल, आज केलेले आहेच हे बरेचदा ! तुम्हि स्वतःला डॉक्टर म्हणता आणी हे माहित नाहि ? रुग्ण रुग्णालयात मरत असताना संप केलेला आहे कित्येक डॉक्टरांनी किती तरी वेळा ! स्वतःच्या पेशातील सहव्यावसायिकांना समजावा आधी इबिल्स आणी मग येथे वाद घालायला या! लोक मरत असताना संपावर जाणार्या डॉक्टरांनी जर तुमच्या प्रोफेशनची इज्जत वाढते का ? एक दोन नाहि, हजारो डॉक्टर संपावर जातात. अपवाद नाहिये हा!

चिनूक्सला अनुमोदन.

वैद्यकीय क्षेत्रासंबंधाने आपण सगळे जास्त इमोशनल होऊन विचार करतो. चुकीचं वागणारे डॉक्टर्स असतात त्यांच्याबरोबरच योग्य तो सल्ला देणारे, योग्य तेवढीच फी आकारणारेही डॉक्टर्स असतात त्यांनाही धोपटले जाते १० रू, फुकट तपासणी असली उदाहरणे देऊन.

इब्लीस
खरे लिहिले की किती जळजळ होते हो तुमची?
मी स्वतःच्या टेस्ट ब्लड शुगर व थायरॉईड साठी -त्या कंट्रोल मध्ये आहेत का यासाठी करतो?
बाय द वे -ही पोस्ट तुम्हाला उद्देशून नव्हतीच त्या मुळे माझ्या प्रोफाईल वर जाऊन वाभाडे काढायची गरज नव्हती?
पण आता तुम्ही डॉक्टर आहात हे कळले असते तर कदाचित घाबरून वागलो असतो कारण नंगेसे खुदा भी डरता है.
आता मी मात्र इथे लिहिणार नाही अन तुमचा त्रागा चालू द्या.
कदाचित ती इंग्रजीतील मेल तुमचीच आहे असा माझा संशय -नाही विश्वासच आहे.
अन एखादा पेशंट -सस्पेक्टेड हृदयरोगी असला की त्यामागे कसे हात धुवून लागते याचा अनुभव मला आहे. अगदी घासाघीस करून अहो, एवढ्या किंमतीत करतो-माझ्याकडे या -इथपर्‍यंत. अन मग पुढे प्रामाणिक डॉक्टरांकडून चेक केल्यावर माझ्या बाबतीत काय कळले- की मला घाबरवून फसविले जात होते.
तुमच्या सारख्यांकडून अशा वाभाड्यांची अपेक्षा नव्हती.
अन आधीच्या सीरियल्स मध्ये देखील- भ्रूण हत्येत- नव्हे खूनात - कोण सामील होते? यावर तरी दुमत नसावे.
चूक केली- चिखलात दगड टाकला- माफ करा

चाणक्य. | 29 May, 2012 - 19:13 नवीन

उगा स्पेसिफिक अन सांगोवांगीची उदाहरणे देऊन प्रोफेशन बदनाम करू नका.. नाहीतर डॉक्टरांनीही रिक्षावाल्यांसारखं किंवा इतर संपकर्‍यांसारखे रस्त्यावर येऊन लोकांना कोंडीत पकडायची वेळ येईल उद्या. >>>>>>>>>>>>

उद्या ?? परवा, काल, आज केलेले आहेच हे बरेचदा ! तुम्हि स्वतःला डॉक्टर म्हणता आणी हे माहित नाहि ? रुग्ण रुग्णालयात मरत असताना संप केलेला आहे कित्येक डॉक्टरांनी किती तरी वेळा ! स्वतःच्या पेशातील सहव्यावसायिकांना समजावा आधी इबिल्स आणी मग येथे वाद घालायला या! लोक मरत असताना संपावर जाणार्या डॉक्टरांनी जर तुमच्या प्रोफेशनची इज्जत वाढते का ? एक दोन नाहि, हजारो डॉक्टर संपावर जातात. अपवाद नाहिये हा!

<<<

चाणक्यजी,

माझे म्हणणे असे आहे, की उगाच hearsay उदाहरणांनी कुणाची बदनामी करू नका. सगळे डॉक्टर्स दुधाने धुतलेले आहेत असे मला अजिबात म्हणायचे नाहीये.

रुग्णालये फोडून टाकणे, तिथे जाळपोळ करणे, पेशंट मेला म्हणून, किंवा अजून कसल्या imagined कारणाने डॉक्टरला मारहाण करणे हे प्रकार झाले तर आणी तरच मोठा संप होतो. तोही बहुधा १ दिवसाचा लाक्षणिक.

दुसरे तुम्ही मार्ड च्या संपाबद्दल बोलता आहात. "डॉक्टरांच्या" नाही. मार्डचे डॉक्टर्स हे विद्यार्थी असतात. मार्डने संप केल्यावर मोठी सरकारी रुग्णालये चालविणे कठीण होते. पण ते संप करताना तो का केला आहे ते तुम्ही विचारात घेतच नाही आहात. ती रुग्णालये चालविण्यासाठी सरकारने पुरेसे पगारी डॉक्टर्स ठेवलेले नसतात. तर मार्डच्या विद्यार्थ्यांच्या जीवावर ती रुग्णालये चालवून घेतलेली असतात. अशा संपांत मार्डचे डॉक्टर्स पॅरलल ओपीडी स्वखर्चाने चालवून रुग्णांना तोषिस पोहोचू देत नाहीत. कृपया विदा जमवा अन मग बोला.

मला आठवतो तो पहिला मार्डचा मोठा संप १९८३ साली झाला होता, अन तो महाराष्ट्रात उघडण्यात येणार्‍या खासगी वैद्यकिय कॉलेजांच्या विरोधी होता. त्यात नुसती मार्डच नाही तर विद्यार्थी अन खासगी व्यवसायीकही सहभागी होते.
(वर रिव्यु काकांनी 'तुम्ही काय करता' हे विचारले, त्या अनुषंगाने हेही ध्यानी घ्यावे ही विनंती.)

डॉक्टरांना समजाविण्यासाठी मी व्यक्तिशः काय केले किंवा नाही याचा लेखाजोखा तुम्हाला देण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे स्वतःचे प्रोफेशन पाहिलेत तर कसे?

इथे कुणीही उठून वाट्टेलते टंकू लागतील तर मी अरे ला कारे म्हणून उत्तर देणारच. डॉक्टर्स फार ऐकून घेतात अन चिखल फेक करायला सोपे गिर्‍हाईक असतात. गरज असली की मारे देव म्हणायचे. अन इतर वेळी जोडे मारायला मोकळे हा दुतोंडीपणा आम्हाला नको.

मला देखील एका प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही..

गरज सरो वैद्य मरो.. ही म्हण अशीच का आहे? गरज सरो आमदार मरो, वकील मरो, ... कुणालाच लोक मारत नाहीत.. Sad डॉक्टरलाच का मारतात?

ही म्हण मराठीत खूप शतकांपासून आहे.. म्हणजे अगदी पूर्वीपासूनच लोकांचा दृष्टीकोन असाच आहे असे म्हणायचे का?

जागो गरज प्यारे Sad

@ रेव्यु | 29 May, 2012 - 20:27

काका,
तुमच्या लिखाणात बोचरे/अनावश्यक शब्द आले, जसे "शेण खाणे", "असले धंदे", "तुम्ही डॉक्टरांनी काय केले"? म्हणून कडवट प्रतिसाद वर दिला आहे. माझी जळजळ तुमच्यापर्यंत पोहोचावी हाच त्यात हेतू होता.

>>बाय द वे -ही पोस्ट तुम्हाला उद्देशून नव्हतीच <<
मेल लिहीणारा मी असलो नसलो तरी त्या लिहिणार्‍याशी संपूर्ण सहमत आहे. बहुतेक सगळे चांगले डॉक्टर्सही सहमत असतीलच. त्या डॉक्टरच्या जेन्युइन त्राग्यावर तुमचा असा बाष्कळ प्रतिसाद - जो तुम्हाला शोभून दिसत नाही - पाहून संताप झाला म्हणून ती पोस्ट टंकलेली आहे.

अन माल-प्रॅक्टीस करणार्‍या डॉक्टर्सविरुद्ध आमच्यातलेच काही चांगले डॉक्टर्स काम करीत असतात. या धाग्यावर आलेल्या जनरलायझेशन करून सर्वच डॉक्टर्सना काळे फासण्याचा उद्योग करणार्‍या पोस्टवरच मी प्रतिसाद दिलेले आहेत.

या व्यवसायात चुकीच्या पद्धती रुळताहेत याबद्दल माझे दुमत नाहीच. त्यात सुधारणाही झालीच पाहीजे याबद्दलही दुमत नाही. पण म्हणून डॉक्टरकडे येतानाच मनात अशी अढी घेऊन यायचे की तो तुम्हाला लुटायला अन कापायलाच बसलेला आहे, हे चुकीचे.

रच्याकने.
हात धुवून मागे लागणार्‍यांत कॉर्पोरेट हॉस्पिटल्सचे नॉनमेडिको मार्केटींग म्यानेजमेंटवाले किती असतात, अन कसे वागतात अन तो बिचारा डॉक्टर त्यात कसा पिळला जात असतो हे तुम्हाला सांगून समजेल असे मला वाटत नाही. कारण तुमचा पूर्वग्रह आधीच झालेला आहे.

वेगवेगळे सरकारी कायदे, मेडिसिन कंपनीज, इन्श्यूरन्स कंपनीज मिळून भारतातला खासगी वैद्यकीय व्यावसायीक संपवून टाकून तुम्हाला-सामान्य जनतेला- लुटण्याच्या पाठी लागलेले आहेत. आज नाही पण अजून १० वर्षांनी समजेल. की डॉक्टर खरा तुमच्याच बाजूचा आहे. लुटणारे वेगळेच आहेत.

असो. तुमच्या पोस्टला तुमच्याच भाषेत पहिले उत्तर होते, दुसरे नीट लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे.

ता.क.
>>मी स्वतःच्या टेस्ट ब्लड शुगर व थायरॉईड साठी -त्या कंट्रोल मध्ये आहेत का यासाठी करतो?<<
ठीक. पण शुगर्/थायरॉईड लेव्हल्स कंट्रोल मधे आहे की नाहीत या साठी कृपया कुणा तुमच्या विश्वासातील तज्ञाकडून सल्ला घ्या, हे मनापासून काळजीने सांगतो आहे. औषधे स्वतःच अ‍ॅडजस्ट करू नका ही नम्र विनंती. प्रत्येकाची व्यक्तिशः "नॉर्मल" ही वेगळी असते, अन ती तुमच्या वय, आहार, ऋतू, सोबतचे इतर आजार इ. सोबत बदलती असते.... अगदी प्रत्येक लॅबची नॉर्मल देखिल वेगळी असते..

@नीधप | 29 May, 2012 - 19:11

चिनूक्सला अनुमोदन.

वैद्यकीय क्षेत्रासंबंधाने आपण सगळे जास्त इमोशनल होऊन विचार करतो. चुकीचं वागणारे डॉक्टर्स असतात त्यांच्याबरोबरच योग्य तो सल्ला देणारे, योग्य तेवढीच फी आकारणारेही डॉक्टर्स(च) असतात त्यांनाही धोपटले जाते १० रू, फुकट तपासणी असली उदाहरणे देऊन.
<<<

ते पहिलं अनुमोदन लक्षात नाहिये, पण तुमच्या बाकी पोस्टला संपूर्ण अनुमोदन.

इब्लिस आणि साती यांना पूर्ण अनुमोदन.
वर उल्लेख झालाय मार्डच्या संपाचा... आपल्या आरोग्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणारे हे मेडिकलचे विद्यार्थी (सरकारी हॉस्पिटल) कसे राहतात हे कुणी एकदा पाहिले ना तर भडभडुन येइल. अतिशय वाईट , गलिच्छ हॉस्टेल्स , सेवा सुविधांचा अभाव अशा अवस्थेत रहायचे, अभ्यास करायचा, वेड्या वाकड्या शिफ्ट ड्युटीज करायच्यात, आणी हे सगळे करुन त्यांना पुन्हा सोयी सुविधा नसणार्‍या खेड्यावर फेकणार ...का? अशा गलिच्छ ठिकाणी राहुनही ते चोख काम करत असतात पण त्याण्ना त्यासाठी तुटपुंजा पगार मिळतो हे अन्याय्य नाही का?
इंजिनीअर, प्रोफेसर, सॉफ्टवेअर वाले सगळ्यांना त्यांच्या वाटा निवडता येतात तर डॉम्टरांना का नको?
हा भाग खरेच एकांगी वाटला. डॉक्टरांनी त्यांच्या ज्ञानाचे पैसे घेतले तर इतरांना का दुखतेय? चुकीच्या गोष्टी होत असतील पण मग आपण सगळ्याच डॉक्टरांना त्यासाठी वेठीस धरु शकत नाही ना???

ते पहिलं अनुमोदन लक्षात नाहिये<<<
तुम्ही थोडीच चिनूक्स आहात!!
एपिसोड एकांगी वाटण्याबद्दल अनुमोदन होतं.

माझी माघार..

जनरलायझेशन बद्दल म्हणत असाल तर लहान मुलांच्या लैंगिक छळाबद्दलचा एपिसोड मला खटकला होता. समाजात इतक्या मोठ्या प्रमाणात विकृती आहे असा भयंगडं निर्माण होत असल्याने ज्या बेसवर तो एपिसोड होता तो सर्वे डाऊनलोड करून नीट वाचला आणि माझ्यापुरते माझे मत बनवून ठेवले आहे. ते इथे देण्याची गरज नाही...

मि. खान, प्लीज बी केअरफुल !

@नीधप

अहो ते कोणत्या पोस्टीला तुम्ही दिलत ते लक्षात नाही असं म्हणत होतो.

ती >> चिनूक्स | 29 May, 2012 - 14:14<< ही पोस्ट असेल, तर माझे त्या पोस्टलाही अनुमोदन आहेच.

>>'तुमच्या संस्थांमधली चांगली दिसणारी माणसं समोर ठेवा', 'ते आजोबा जरा अडखळत बोलतात, त्यांना हटवा तिथून', 'या आजींना जरा चांगली साडी नेसवा', 'तुम्ही हे वाक्य जरा चिडून बोलाल का, म्हणजे जास्त प्रभावी वाटेल', असे प्रकार चित्रीकरणादरम्यान घडले. स्टुडिओतले प्रेक्षकसुद्धा दिसण्यावर निवडले जातात.
चिनूक्स, यातून तुम्हाला काही सुचवायचे आहे का?
विषयाची एका तासात प्रभावी (effective) मांडणी हा त्यामागील उद्देश असेल असे मला वाटते. कोणाचा अपमान करणे, उत्स्फुर्त संवाद आणि प्रेक्षकांचा सहभाग हा उद्देश नसावा असे आतापर्यंत बघितलेल्या भागांवरुन वाटते.

इब्लिस
Happy
मी शांत -तुम्हीही शांत- मी तुमच्याहून बहुतेक मोठा (वयाने) म्हणून दोस्तीचा हात पुढे करतो.
१) माझ्या टेस्टसंबंधी: माझ्या आयुष्यात डॉक्टर वाक्यम प्रमाणम हे पाळले. उत्तरायुष्यात जे दणके बसले तरीही अजून तेच पाळतो - पण आता प्रत्येक डॉक्टर प्रमाणम नाही.
circa - 1972
BANAGALORE- Dr Parmeshwar Bhatt- ;eading and probably one among the few cardio
आईला कॉर पल्मोनेलः माझे वय २० - डॉ ची फी - ६० रु. -पहिला प्रश्न - तो देवू शकशील का ? तुझा पगार किती?
माझे उत्तर :
रु. १५०/

डॉ: या पुढे द्यायची गरज नाही. आणि इथून एक ऑक्सीजन सिलिंडर् घेवून जा .
circa _ same case - 1978 -Sion Hospital - Dr Date ( GOD)
मला फी देवू नकोस. आईची काळजी घे. मी फी दिली कारण आता स्थिती थोडी बरी होती.

circa 1984 - Same case -Nasik
Dr S R Kelkar - मी त्याना विसरू शकणार नाही.
शेवटी वयोमानाने आईचा देहांत . रात्रभर डॉ बाजूला बसून होते. पुढे आयुष्याचे साथी व मित्र झाले.
circa 2005 :
मला सायंकाली चक्कर आली, पायाला मुंग्या. डायरेक्ट आय सी यू. सकाळपर्‍यंत नॉर्मल ( मला वाटत होते) . ८ दिवस आय सी यू. बॉडी स्कॅन, एको इ. सर्व नॉर्मल . सांगितलेला डायग्नॉसिस : हार्ट अटॅक. माझ्या मावस भावाच्या ( बेळगावच्या ) एम डी -डॉ च्या म्हणण्याप्रमाणे इन्फ्रॅक्शन - मध्ये दिसते माझ्या मागे हॉस्पिट्लचा डोक्टर अन्जियो व प्लॅस्टी साठी हात धुवून लागला.दर ३५% कमी केला. कॉर्पोरेट पॅकेज वगैराचा संबंध नव्हता. बायकोला म्हणाला -यांची केस क्रिटिकल . शेवटी सगळे रिपोर्ट बेळगावला पाठविल्या वर मला पुण्याच्या डॉ जगदीश हिरेमठांकडे पाठविले -त्याच्या रेफरन्स ने. डॉ मला म्हणाले - माझ्या प्रोफेशनची लाज वाटणारे काम करताहेत. स्टॉप ऑल मेडिकेशन / कामावर परत जा. निदान फक्त दगदग व तणाव.
अजूनही अत्त्युत्तम डॉक्टर आहेत. फार कमी. पण आता विश्वास कुणावर ठेवायचा? दाखवायला गेले तर धड बोलत नाहीत.
ही फार दुखरी जागा आहे हो-
इतर व्यवसाय धुतल्या तांदळासारखे नाहीत पण इथे खूपच खडे झालेत .ते तरी काढायला हवेत ना?

इब्लीस
माझे सगळे रिपोर्ट माझ्या बेळगावच्या फिजिशियनला दाखवितो. अन मला माहित आहे की इथे ज्यांचे नाव पथॉलोजिस्ट लिहितो, तो कट घेतो/देतो -जे असेल ते~!!
पण तुमचा सल्ला मात्र बरोबर
धन्स
Happy

Pages