एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राधा घनाच्या जवळ ( एकदाची ) झोपते त्या प्रसंगी पार्श्वसंगीत म्हणून मराठी गाण कोणत बर दिसेल असा प्रश्न वाचला अन एकदम 'ये रे घना , ये रे घना ' आठवल

पर्फेक्ट Happy

बाप रे कुहु चे बरेच पंखे व्हायला लागलेत.. Happy असो.. मला तरी आत्ता सिरियल थोडी स्लो झाल्यासारखी वाट्ली.. पण चालेल.. हाच प्रसंग बअलहै (राम और प्रिया) मधे किती वेगळा दाखवला होता.. कुटुंबाबरोबर बघताना नक्कीच चॅनल बदलावा लागला असणार.. पण एलदुगो मधे किती हळुवार पणे दाखवला... अगदी प्रत्येक कपल ला त्यांचा पहिला वहिला स्पर्श आठवला असेल.. ह्म्म्म्म...
मला वाटत अळवार तुझी चाहुल का धडधड्ते हे ऊर.. हे गाणं ही चपखल बसलं असत.

कित्येक भाग पाहिले नव्हते, आता परत पहायला लागणार. कुहुचे ड्रेस बदलले का तोच युनिफॉर्मसारखा पॅटर्न घालुन आहे ती?

राधा घनाच्या जवळ ( एकदाची ) झोपते त्या प्रसंगी पार्श्वसंगीत म्हणून मराठी गाण कोणत बर दिसेल असा प्रश्न वाचला अन एकदम 'ये रे घना , ये रे घना ' आठवल

>>>>> Rofl

ये रे घना... एलओएल.
वेड्यासारखा हसतोय ! Rofl

Rofl

कुहुचे ड्रेस बदलले का तोच युनिफॉर्मसारखा पॅटर्न घालुन आहे ती?>> अजून तेच-ते कपडे असतात..पण वागण्यातला वेडगळपणा जरा कमी झालाय..कधी-कधी खरंच असं वाटतं की इकडच्या प्रतिक्रिया वाचून लेखक / दिग्दर्शक बदल करत असेल. Proud

<<"न्हाऊ घाल माझ्या मना" या ओळीला काय धबधब्याखालचा सीन? >>

अरे मंदार, आता त्यात जरातरी हळूवारपणा नको का रे...... डायरेक्ट धबधब्याखाली काय Proud Rofl

कदाचित हा सीन घनाला स्वप्नात दिसतोय असं दाखवलं असतं तर बरा चान्स होता..... म्हणजे घना स्वप्नात राधाबरोबर धबधब्याखाली उभा असल्याचा सीन बघतोय आणि त्याला उठवायला राधा त्याच्या तोंडावर पाण्याचा भरलेला तांब्या ओततेय Wink Proud

चिंब भिजलेले रूप सजलेले........ बरसूनी आले रंग प्रीतीचे.......... Rofl Lol

आणि त्याला उठवायला राधा त्याच्या तोंडावर पाण्याचा भरलेला तांब्या ओततेय ...... चिंब भिजलेले रूप सजलेले........ बरसूनी आले रंग प्रीतीचे.......... >>>>> भुंग्या...अरे किती हसवणार एका दिवसात ? Rofl

मंदार उकाड्यानी आणि पाणी टंचाईनी त्रासलाय त्यामुळे त्याला डायरेक्ट धबधबा आठवला असावा.....:)
अजून या सिरीयलमध्ये होळी, रंगपंचमी असे काही नाही आले का?

आजच्या भागातली कुहूची कविता फारच आवडली. शब्द न शब्द चपखल होता, त्याबरोबर घना आणि राधाची एक्सप्रेश्न्स सुद्धा.>>>+१...पण त्या कवितेतून कुहूल, 'घनाची पाठ रगडायला प्रभात आला आहे' असे सांगायचे होते.

पाच मिनिटात पाठ एकदम (कशीकाय बॉ) बरी होते? (आता पाठदुखीचा हेतू साध्य झाल आहे म्हणुन वाट्ट). त्या प्रभातला आमच्या ह्यांच्याकडे पाठवा जरा.
पाठदुखीसाठी माझ्याही सास-यांनी मला सल्ला दिला होता कि 'चांगला तुडव त्याला' Happy

सोनाली - पुढच्या आवश्यक हालचालींसाठी पाठदुखी असून चालणार नाहीत....
कृपया कसलेही गैरअर्थ काढू नयेत :प Happy

आपले विनोद चीप लेव्हलला उतरवू नका दोस्तहो.. पब्लिक फोरम आहे.

सिरीअलवर बोलूया.
सध्या मी टीव्हीपाशी नाहीये. काय चाललंय आजच्या भागात?

रच्याकने, तो कानातले प्रसंग जरा गंडलाय. जेव्हा ते रात्री एकत्र असतात. तेव्हा राधा जागी होऊन मान उंचावून घनाकडे बघते तेव्हा तिच्या डाव्या कानात ते कानातले असले पाहिजे कारण त्या रात्रीच ते घनाच्या शर्टात अडकले ना. सो ते मिसींग आहे. आजच्या एपि. मधे परत दिसले ते. Happy
जेव्हा दिग्याकाका घनाला चिडवतो तेव्हा पण काकाच्या एन्ट्रीच्या वेळची कानातल्याची जागा नंतर बदलते. Wink

अजून एक विषयांतर. राधाचे, म्हणजे मुक्ताचे डोळे मला प्रचंड आवडले. खूप टपोरे, सुंदर आणि बोलके आहे.

ए आज घना जरा जास्तच ओव्हर रिअ‍ॅक्ट करतोय...... असं नसतं Wink

(रच्याक, मी आज कित्येक दिवसांनी बघतोय त्यामुळे मधल्या एपिसोडमध्ये हा असाच बावरलेला वावरत होता का ते माहित नाही....... पण जरा जास्तच होतेय हे...... Proud )

आपले विनोद चीप लेव्हलला उतरवू नका दोस्तहो.. पब्लिक फोरम आहे.

ज्ञानेश - तो विनोद ईतकाही चीप नव्हता असे मला वाटले....बाकीच्यांनाही तो चीप वाटला असेल तर मग मी सर्वांची क्षमा मागून पोस्ट उडवेन...

जाऊद्या...... सोडा.... जाऊद्या....... अहोssssssss (आशु, हे बॅग्राऊंड गाणं नव्हे बरं का Happy )

सिरिअलवर बोलू काही.......... Wink

अरे त्या पोस्ट मी वाचल्या नव्हत्या मगाशी..... आता पुन्हा वाचल्या तेंव्हा लक्षात आलं..... Wink

Pages