"सत्यमेव जयते" - भाग २ (Child Sexual Abuse)

Submitted by आनंदयात्री on 13 May, 2012 - 06:45

दुसर्‍या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue02/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बालकांचे लैंगिक शोषण ह्या विषयाला बिनमहत्वाचे, न बोलण्यासारखे समजणे ही मानसिक विकृती आणि दांभिकता दोन्ही आहे.>>>>> +१

आणि समजा आमीरने पाणी टंचाई यावर एपिसोड काढला असता तर पाणी टंचाई हा काही महत्वाचा प्रश्न नाही,त्यापेक्षा बाल लैंगिक शोषण यावर कार्यक्रम का नाही केला असा प्रश्न याच महोदयानी विचारला असता....काही लोकाना विषय खुपले, काही लोकाना तीन कोटी खुपले तर काहीना त्याचे 'खान' असणे खुपले.. इतकाच या खुपण्यामागचा अर्थ>>>> +१

हे खुपणे ह्या विषयांच्या संवेदनशीलतेहुन महत्वाचे ज्यांना वाटते त्यांची किव करावी तेवढी थोडि आहे!

श्री मंदार कात्रे यांच्या मागे का लागला आहात सगळे ? एवढे महत्वाचे वाटतेय का त्यांचे मत ?
एक मत म्हणून द्या कि सोडून !!

भाग पाहायला अजून जमले नाही.
पण अमीरवर हळूहळु सगळे तोंडसुख घेणार आणि त्यातही त्याचं मुसलमान असून हिंदू बाईशी लग्न , घटस्फोट, धार्मिक जिहाद आमिरला मिळणारे पैसे, तो बाकी काय समाजसेवा करतो हे प्रश्न येणार हे कोणी तरी अगोदरच इथेच प्रेडिक्ट केले होते.

त्याचा कार्यक्रम आहे, त्याला वाटेल त्या क्रमाने तो त्याला महत्त्वाचे वाटलेले प्रश्न हाताळेल.

आम्ही हिंदुजा हॉस्पिटलात काम करत असताना आमिर तिथल्या लहान मुलांसाठी असलेल्या कॅन्सरच्या वॉर्डात वारंवार यायचा. ते ही कोणत्याही टिव्हीवाल्यांच्या/ पत्रकारांच्या लवाजम्याखेरिज. दुसर्‍या दिवशी बातमीही नसायची कुठे. फार काय आम्हालाही तो आल्यावर्/येऊन गेल्यावरच कळायचे, आधी उदोउदो नसे.

त्यावेळी आमिरचा हम है राही प्यार के गाजला असल्यामुळे(२-३ वर्षे होऊन गेलेली होती,चित्रपटाचे प्रमोशन नव्हते,हे विशेष.) खूप लहान पेशंटना त्याला भेटायची इच्छा असायची आणि तो ती पूर्ण करायला यायचा.

अमीरखानने एका अत्यंत ज्वलंत प्रश्नाला हात घातला आहे. दुर्दैवाने हे प्रकार भारतीय समाजात फारसे उघड होत नाहीत.

अप्लवयीन मुलामुलींना नग्नावस्थेत समोर बसवून चित्रकारांच्या घोळक्याने त्यांची नग्न चित्रे काढणे हा प्रकार सुद्धा "Child Sexual Abuse" या प्रकारात यायला हवा. अशा धंदेवाईक किंवा हौशी चित्रकारांवर Child Sexual Abuse च्या कायद्यान्वये कारवाई व्हायला हवी.

श्री मंदार कात्रे यांच्या मागे का लागला आहात सगळे ? एवढे महत्वाचे वाटतेय का त्यांचे मत ?
एक मत म्हणून द्या कि सोडून !!


दिनेशदा:

सही बोललात! १०१% सहमत. त्यामुळे खरतर उगाच भारंभार पोस्टी पडताहेत. सोडून द्या न!

लहान मुलांच लैंगिक शोषण ही समस्या इतकी गंभीर आणि व्यापक आहे की सगळ्या जगाने पेटून उठल पाहिजे. मी स्वतः ह्या विकृतीचा बळी होते. मात्र नवरा BFF असल्याने त्याने वाचा फोडली आणि मला लढायला प्रवृत्त केल. सर्व सांगितल्या नंतर मोट्ठा Shock होता तो म्हणजे आई-वडलांची निष्क्रियता! आणि ते action का घेऊ शकत नाहीत ह्याच गुळमुळीत उत्तर! Anyway, I have made peace with myself आणि त्यांच्या ह्या कमकुवत पणाला क्षमा केली आहे. मात्र माझ्या मुलांना अक्षरशः paranoid होउन...अशी विकृति समाजात बोकाळलेली असते...तुमच्या जवळपासच असते..खबरदारी घ्या.. असच वाढवल. माझ स्वतःच उदाहरण दिल त्यामुळे त्यांना त्याच गांभिर्य कळल. मुख्य म्हणजे Mom and Dad will always believe you हे जबरदस्त pump केल. माझ्या लेकाने ३ रीत असताना विचारलेला प्रश्न--Do only men do this gross stuff to kids?? I still do not have answer! Happy

आमीरने केलेल वर्कशॉप हे आमच्या इथे kindergarten मध्ये Mandatory आहे. No one should make you unconfortable and touching to Bikiini area is off limits हे त्यांना खूप लहान पणी शिकवल जात. तरी सुद्धा अमेरिकेत हा प्रकार वारंवार घडतो. मात्र एकदा उघडकीस आल की कायदा एवढा कडक आहे की त्याचा पाठ्पुरावा केला जातो--शिक्षा होइस्तोवर. एवढच काय Convicted sex offeder/pedeophile has moved into your neighbourhood अशी नोटीस अजूबाजूला राहणार्‍या लोकांना देण बर्‍याच राज्यात आता अनिवार्य आहे.

असो. ह्या बाबतीत मुलांना बोलत करण.. त्यांच्याशी सतत संवाद साधण खूप महत्वाच आहे. Rather, we owe to our kids!

>>एवढच काय Convicted sex offeder/pedeophile has moved into your neighbourhood अशी नोटीस अजूबाजूला राहणार्‍या लोकांना देण बर्‍याच राज्यात आता अनिवार्य आहे.

जबरदस्त. आपल्याकडे याविरुद्ध मानवतावादी गळे काढतील असं काही केलं तर Sad

तसेच ईथे preschool (special education सोडून) मधे मुला/मुली ने शी/सू केली असेल किंवा कपडे खराब झाले तर ते बदलण्यासाठी पालकाला शाळेत बोलावतात. तिथे दुसर्या कोणालाही मुलाचे कपडे/डायपर बदलाय ची परवानगी नसते.

A person required to register yearly as a sex offender will do so for the rest of their lives. The sex offenders name will be available to the public and they will have to report their location to law enforcement every time they move. Not all sex crimes require registration, but many do.

ज्या विधेयकासाठी आपण आग्रह धरतोय, त्याचा मसुदा कुठे उपलब्ध आहे का ? >>>>>>>

ते इथे आहे .. http://www.prsindia.org/billtrack/the-protection-of-children-from-sexual...
उजव्या साईडला पीडिएफ फाइल आहे (bill text)

बिल मांडले होते २४ मार्च २०११ ला. राज्यसभेने हे १० मे २०१२ ला पास केले , आमिरच्या इपिसोडच्या २ दिवस आधी. हा योगायोग नक्किच नाहि (आमिरचा शो १३ मे च्या आधीच शुट झाला असणार) . राजकारण्यांना चांगली बुद्धी झाली याचा आनंद आहे शोच्या निमित्ताने का होइना!

Do only men do this gross stuff to kids?? I still do not have answer!

याचं मात्र उत्तर 'नाही' असं आहे.
मुलांच्या नॅनिबरोबरच किशोरावस्थेतील मुलांचे लैंगिक संबंध ही काही नवि गोष्ट नाही.

विकृतीला लिंग,धर्म,देश असा काही धरबंद नसतो लोकहो.

कल्पु, खरेच सलाम.

लहान मूलांचे भावविश्व फार गढूळ होऊन जाते, अशा एखाद्या प्रसंगाने.

ते बिल वाचायला घेतो आता.

कल्पू, वाचून खूप वाइट वाटलं पण तुमच्या धीराचं आणि हिंमतीचं कौतुक वाटलं.
असंच धैर्य सर्वांनी दाखवले पाहिजे.>>> +१

>>बालकांचे लैंगिक शोषण ह्या विषयाला बिनमहत्वाचे, न बोलण्यासारखे समजणे ही मानसिक विकृती आणि दांभिकता दोन्ही आहे.<<

नीधप जी

तुम्ही विपर्यास करून फाटे फोडत आहात.

या चर्चेत अगदी मंदार कात्रे धरून "ह्या विषयाला बिनमहत्वाचे, न बोलण्यासारखे" असे कोणीही लिहिल्याचे मला तरी दिसले नाही. (चुकभुल देणे).
कोणाला कुठला विषय अधिक महत्वाचा वाटतो याबद्द्ल मतभेद जरूर आहेत पण असा मतभेद व्यक्त केला कि ती "मानसिक विकृती आणि दांभिकता दोन्ही आहे " असे म्हणणे हे फारच झाले.
तुम्ही स्वतः एखाद्या लोकप्रीय मताविरुद्ध असे वेगळे मत कोठेही मांडले नाही काय?
दिनेशदा यांचा ' एक वेगळे मत असे समजून घ्या' हा सल्ला योग्य आहे. ज्या कल्पु जींनी आपला अनुभव आणी त्यातून घेतलेले धडे येथे मार्गदर्शन म्हणून दिले आहेत त्यांनी देखील हीच भुमिका घेतली आहे हे ध्यानात घ्या.

कल्पु जी
तुम्हाला खरोखरच अभिवादन!

<आजचा एपिसोड पहिला .पण पहिल्या भागा इतका चांगला नाही वाटला , यापेक्षा महात्व्वाचे विषय असू शकतात
मी माझ्या मतावर १०० % ठाम आहे, आजच्या भागातल्या विषय तितका महत्त्वाचा नाहीये जितका "भारतीय शिक्षण व्यवस्था आणि सरकारी शाळांतील शिक्षणांचा खेळखंडोबा " हा विषय महत्त्वाचा आहे ...पाणी टंचाई आणि पाण्याचे गैर व्यवस्थापन इत्यादी मुद्दे हि अतिशय महत्त्वाचे आहेत .
लहान मुलांचे लैंगिक शोषण हा मुद्दा महत्त्वाचा आहेच ,यात वाद नाही,,पण तो मुद्दा आणि वर्कशॉप शालेय स्तरावर ही घेता येऊ शकतात ,अर्थात त्याबद्दल जागृती करण्यासाठी अमीर चे प्रयत्न कौस्तुकास्पद आहे,,
पण स्त्री-भ्रूण हत्या या विषया इतका आजचा विषय महत्त्वाचा नव्हता ....तेच तेच करुण कहाण्या ऐकवून, डोळे पुसणारे प्रेक्षक दाखवीत बसून इमोशनल करण्याचा प्रयत्न असेल ,तर आमीर एक चांगला प्लेटफोर्म वाया घालवीत आहे ,असे नांइलाजाने म्हणावे लागे
>

मंदार, शिक्षणाचा खेळखंडोबा हा विषय दीड तासात चर्चिला जाऊ शकतो का? तो तज्ज्ञांचा विषय आहे. तिथे माझ्यासारख्या सामान्य माणसाला (आधी मी तुमच्या-माझ्या लिहिले होते) प्रत्यक्ष करण्यासारखे फार काही नसेल. हेच जलव्यवस्थापनाबद्दलही म्हणता येईल.

आमीरने निवडलेले विषय सामान्य माणसाच्या आवाक्यातले आहेत. आपल्या मानसिकतेला छेद देणारे आहेत. (१)बाल-लैंगिक-शोषणाबद्दल बहुसंख्य पालक अनभिज्ञ असतात (२) लहान मुलांचे लैंगिक शोषणकर्ते आपल्यातच वावरत असतात (३) याबद्दल मुले आपल्या पालकांशी बोलू धजत नाहीत (४) बोलली तर पालक समजून घेत नाहीत इतके मुद्दे या चर्चेतून बहुसंख्यांच्या प्रथमच समोर आले असतील.

मुळात सेक्स हा विषय उघड बोलायचा नाही, लपूनछपून करायचा अशी भारतीय मानसिकता आहे. त्यामुळे (कुठल्याही) लैंगिकशोषणकर्त्यांचे फावते. कितीक कोवळी मने करपून जातात. पालकांना आपल्या मुलांशी बोलणे या कार्यक्रमाने सोपे झाले नाही काय? हा कार्यक्रम झाला नसता तर किती पालकांना त्याची गरज भासली असती आणि कितींना ते शक्य झाले असते? (अर्थात मुळात पालकांनी मुलांशी या विषयावर बोलायची गरजच नाही असेही कुणाचे मत असू शकेल. शालेय शिक्षणात सेक्स एक्ज्युकेशनचा समावेश करायला विरोध करणार्‍यांची संख्या कमी नाही.)

या कार्यक्रमानंतर हरीश अय्यर यांना सहा हजारांच्यावर इमेल्स आल्या. त्यातल्या बहुसंख्य इमेल्स बाल-लैंगिक-शोषणाला बळी पडलेल्यांच्या होत्या. त्यातल्या काहींचे विचार :
Q) i am trapped in my past.

my response :
"you cant go back and change your past, but you can put the past in the past and let it rest there. look at it in flashback baby, not in fast forward"

Q) i dont feel i have the ability to love.

my response:
"you have all the right to love. you have all the ability to make love. sex is never a bad thing. the act is not sin. the incidence was sin. and you are not the sinner if you have been sinned upon"

Q) I feel dirty. i feel i look dirty

my response:
" your body is not disfigured. you are sexy. and sexy as hell. make love to your mind. and then someone can make love to your body"

मी इथली चर्चा वाचून काल रात्री हा भाग पाहिला. मला हा भाग आणि पहिला भाग दोन्ही मुळीच प्रभावी वाटले नाहीत. विषय नक्कीच गंभीर आणि ज्वलंत आहेत पण अमिर खानने हे विषय खूप संवेदनशीलतेने, वेगळ्या पद्धतीने, प्रभावीपणे, माध्यमांचा विचारविनिमयपुर्वक वापर करुन मांडले आहेत असे कणभरही वाटले नाही. काहीच नाविन्य वाटले नाही. विषयाची तीव्रता त्यातून त्याने नीट प्रदर्शित केली नाही. बोलणे चालणे सगळे कसे थिल्लर वाटले. मुलाखतीत पण फार जीव वाटला नाही. वर्तमानपत्रातील ताज्या बातम्या वाचून उलट जास्त चटके जाणवतात.

ह्यापेक्षा बालपणी, प्रिया तेंडूलकर ह्यांचे 'रजनी' मधील सगळे विषय लगेच प्रभावी वाटत आणि ती काय म्हणते हे पटत असे आणि अनुकरण करण्याची जेंव्हा वेळ येई तेंव्हा रजनी आठवे.

तसेच पुर्वी १९८०-९० मधे शिवाजी साटम ह्यांची 'एक शून्य शून्य' ही मालिका यायची. त्यातही सामाजिक गुन्हेगारीवर अनेक भाग बघायला मिळत.

रजनी आणि १०० ची जर मी सत्यमेव जयतेशी तुलना केली तर नक्कीच सत्यमेव जयते फिके वाटते आणि हे विषय पहिल्यांदाच जनतेसमोर व्यक्त होत आहे असे कणभरही वाटले नाही. ह्या विषयायचे गांभिर्य सकस प्रभावीपणे जनतेसमोर पोचवायला नक्कीच अमिर खान कमी पडत आहे.

बी तुमच्या अगदी शेवटच्या वाक्याबद्दल.
स्नेहालय ह्या संस्थेला एका आठवड्यात ६२ लाखांची मदत मिळाली तेहि सत्यमेव जयते ह्या कार्यक्रमामुळे. ह्यातील किती लोकांनी आधी मदत केली असती? आमिरमुळे माझ्यासारख्यांना ह्या संस्थेबद्दल माहिती कळली. आणि आमिरमुळेच ह्या संस्थेबद्दल विश्वासपण निर्माण झाला.

भान, तुम्ही हे कुठे वाचले स्नेहालयाला इतक्या मोठ्या प्रमाणात मदत मिळाली. मदत नक्की कुठल्या स्वरुपात मिळाली? हल्ली माध्यम जे काही सांगतात ते सगळे खरेचं असते असे नाही. ते जर खरे असते तर परिस्थिती नक्की सुधारली असती.

Pages