इश्कजादे

Submitted by आयडू on 13 May, 2012 - 05:37

तीन ऑप्शन्स होते काकस्पर्श, विकी डोनर अन् इश्कजादे त्यातला काकस्पर्श विकांताला पहायचा मूड नव्हता अन् विकी डोनरची वेळ आम्ही चुकवल्री म्हणून मग ठरवलं की इश्कजादे पाहूया. [खोटं]

खरं- परिणिती चोप्राचा लेडीज वर्सेस रिकी बेहेल पाहिला आणि हाही पाहायचाच होता म्हणून विकी डोनरची वेळ मुद्दाम चुकवली अन् काकस्पर्श पुन्हा केव्हातरी म्हणून बेत रद्द केला. आता टिपिकल बॉलिवुडी मुव्हीत जे जे काय काय होतं ते ते सगळं इथंही होतं. प्लॉट मध्ये सगळा मसाला आहे - खून खराबा, दंगा फसाद, आयटेम साँग इ.
इतकंच नव्हे तर दारूगोळा (दारू आणि गोळ्या) पाण्यासारख्या वहातो पण खून आय मीन रक्त तेवढं सांडत नसतं! कदाचित, बजेट लो असल्या कारणाने किंवा रक्त वगैरे दाखवून बालमनावर परिणाम करायचा नसावा म्हणून दिग्दर्शकानं ही काळजी घेतली असावी. पिक्चरची सुरूवात शिव्यांच्या लाखोलीने होते अन् एन्ड ***** [udayone सांगितल्यानुसार शेवट एडिटलाय! आणि हो ह्यात टिप्पिकल बॉलिवुडी शेवट नाही वेगळा आहे! ह्यांचं वेगळं आहे! अशी टॅगलाईन लावयला हरकत नाही. Proud ] ह्या एका वाक्यात चित्रपटाबद्दल लिहिणं हे फारच नाईन्साफी केल्यासारखं होईल म्हणून या चार शब्द -

हिरॉईन अन् हिरोवर प्रेम करणारी गौहर खान सोडली तर स्टार कास्ट तगडी नाही. तरीही काही फरक पडत नाही कारण इतरांना फार काही संवाद नाहीत.
पिक्चर का पाहू नये -
कथेत काही दम नाही कथा वगैरे बकवास आहे ! हिरो बकवास! हिरोचे आजोबा, कुटूंब, आई (हिरोची) हिरॉईनची आई, बाबा ह्या सगळ्यांना उगीचच एक दोन संवाद म्हणायला दिले आहेत असं वाटतं.

नाही म्हणायला हिरो ला वाव आहे पण [ पण अक्कल नाही! आजोबा सांगेल ते करतो आई सांगते म्हणून माफी मागतो, आई सांगते म्हणून हिरॉईनला वाचवतो, हिरॉईन सांगते म्हणून मारतो... ] तो ज्या स्टाईल ने शिव्या घालतो, डिजल मागतो त्याच स्टाईलने माफी दे म्हणतो त्यात काही दम वाटत नाही!

पिक्चर का पहावा?

परिणिती चोप्रासाठी, तिच्या परेशान गाण्यासाठी [सुंदर गाणं आहे (पण वेस्टेड..)] एकाच गाण्यात एवढे ड्रेसेस वापरल्येत की नंतर ड्रेसच शिल्लक नाहीत असं वाटतं.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद पैसे वाचवल्या बद्दल....!
परिणिती चोप्राच्या, परेशान गाण्यासाठी संपुर्ण चित्रपट पहाण्या ऐवजी गाणे युटुबवर पाहीले जाईल..

वेका...........नंतर मी संपादीत केलेला........ते त्या कोंबडीसाठी लिहिलेले मुद्दामुन.. Lol

कोंबड्या Angry
वेकूडे मी जाणारेय काकस्पर्शला!
बहुदा उद्याच! Happy
(पण येऊन परिक्षण वैगेरे लिहिणार नाहिये. मला गद्यलेखनाचा भयंकर कंटाळा येतो)
आयडु : अती अवांतराबद्दल क्षमस्व Happy