बळी

Submitted by रावण on 11 May, 2012 - 05:06

डोळ्यात पाणी आणुन शेवटची विट लागताना नरसूआबान हात जोडुन शेवट्च दर्शन घेतल. खुप मोठा अपराध केल्याच पातक वाटत होत पण त्याचा काही इलाज न्हवता. स्वताच्या वंशाचा दिवा कायम साठी त्या बंद खोलीत गाडला गेला होता. आता रोज त्या खोली पाशी दिवा नारळ लाउन पुजा केली जाणार होती. आणी आजच हे शेवटचच दर्शन.
बधीर मनान अन खाल मानेन वाड्यात आला तेव्हा त्याच्या बायको पोरान छाती बडवून आक्रोश केला. नरसूआबाला दोशी ठरवून शिव्या शाप दीले. पण आता काहीच उपयोग न्हवता नियतीन मांडलेला खेळच असा होता की त्याच्या सरख्या कर्तबगार माणसाचा सपशेल नाईलाज झाला.
पडवीतल्या झोपाळ्यावर बसून भरल्या अंतकरणान तो वीस दिवसापुर्वीची घटना आठवत होता जेव्हा दरबारा तो हुकूम सुनावण्यात आला होता.
साधारण पणे १४ व्या शतकात बहामनी राजांच सोनल्लगी नगरावर राज्य होत. त्या काळातल्या सुलतानान भुईकोट किल्ला बांधायचा ठरवला. एका सुंदर तलावा काठची जागाही निवडली गेली. बहामनी सुलतानान अमाप धन खर्च करुन बांधकामास सुर्वात केली. त्या दरबारात नरसूराव आभूते कारकून म्हणुन काम करत.
कष्टाळू आणी प्रामाणिक म्हणून दरबारात चांगला लौकीक होता त्या मुळे दरबाराचे दिवाण दामोदर पंत यांचा नरसूआबा वर विषेश लोभ होता. भुईकोट किल्ल्याच्या बांधकामाच्या खर्चाचा हिशेब ठेवण्या साठी दहा कारकून होते त्या पैकी नरसूआबा एक. किल्ल्याच काम जवळ जवळ पुर्ण होत आल होत बुरुजबंद भुईकोट किल्ला खुपच सुरेख आणी मजबूत बांधला गेला होता. फक्त माची चढवायची राहीली होती काम जोरात चालु होत. अखेर ते काम ही संपल पण काय झाल माहीत नाही ज्या दिवशी हे काम संपल त्याच दिवशी माची कोसळली आठ लोक त्या ढीगार्‍यात चिरडुन मेले. दरबारातून कसून चौकशी झाली पण कोणतीच चुक लक्षात आली नाही. बहामनी राजान पून्हा बांधकाम करायचा हुकुम दीला या वेळेस सर्व काळजी घेण्यात आली आणी माची पुन्हा बांधुन संपली पण दोन दिवसांनी अचानक आग लागली आणी माची सोबतच पहार्‍यावर असलेले सैनीक, सेवक, हूजरे सारे जिवंत जळाले. या वेळेस मात्र दरबार जागा झाला कारण दुसर्‍या अपघाताच कारण ही काहीच न्हवत. आखेर सुलतानाने दरबारींच्या सल्ल्यानुसार फकिर, मांत्रीक, जोतीषी यांची मदत घेतली आणी सर्व उपाय करुन शूभ मुहूर्तावर पुन्हा माची बांधायला सुरवात केली पण माची आर्ध्यापेक्षाजास्त पुर्ण होतेय न होतेय तोच अचानक पावसाळी ढगांनी आकाश भरल जोरात वारा आला आणी कोणाला काही कळायच्या आधीच धडाडकन आवाज होऊन विज कोसळली. माची सोबत एक बुरुज ही ढासळला. या वेळेस पाहार्‍यावर असणार्‍यांची राख सुध्दा मिळाली नाही. आता मात्र सुलताना सकट दरबाराचा ही धिर सुटला. ही जागा शापीत आहे हे सर्वानुमते ठरले पण आधीच एवढा खर्च झाला होता की आता माग हटण म्हणजे खुप मोठ नुकसान करुन घेण आणी बहामनी सुलतान हा खर्च रयते कडुनच वसूल करणार हे नक्की होत.
अखेर दिवाण दामोदर पंत यांनी रयत नागवली जाउ नये म्हणुन सुलतानाला शेवटचा उपाय करून पाहायला सांगायच ठरवल. तो उपाय म्हणजे जवळच्याच जंगलात एक कपालीक वास्तव्यास होता. तो प्रचंड शक्तिशाली आणी सिध्द व्यक्ती होता. एकदा दामोदर पंतांच्या वडलांनी त्याला कूठल्याश्या अघोरी प्रयोगामूळे तो मरायला आला असताना वाचवले होते. ती एक वेगळी कथा आहे पण त्या मुळे दामोदर पंतांना विश्वास होता की त्यांनी जर स्वता: विनवल तर तो मद्त नक्की करेल.
जेंव्हा सुलतानाने हे ऐकल तसा तो म्हणाला
"दिवानजी हमने फकिर, मांत्रीक, जोतीषी ईनकी मदत लेके देखी है कोई फायदा नही हुवा, अब ये भला ऐसी क्या करामात दिखायेगा, नही नही हम और दौलत नही फेकेंगे"
पण दामोदर पंत यांचा विश्वास होता कि हा कपालीक नक्की काही रस्ता दाखवेल.त्यांनी सुलतानाला परत अर्ज केला
"जहापना आप ईतमीनान रखे मै जानता हू कि वो कपालीक सच मै शक्तिशाली है. अगर आप इजाजत दे तो मै खुद उन्हे लेके आता हू."
शेवटी हा नाही करता करता सुलतान तयार झाला.
खुप अवघड असा प्रवास करुन आणी प्रचंड त्रास सहन करून त्या भयाण जंगला मध्ये दामोदर पंतांनी त्या कपालीकाचा ठाव शोधुन काढला.
संपुर्ण नग्ना अवस्थेत जटा वाढलेल्या चेहेर्‍यावर कोड फुटावे तसे डाग आणी अंगभर कुठल्यातरी चीतेची राख माखलेली. शरीर ईतक बारीक कि चमड फक्त हाडांना चीकटल्या सारखे वाटावे. असा तो एका दगडावर बसून लाल भड्क डोळ्यांनी रागान पाहात होता.
जेव्हा दामोदर पंत यांनी हात जोडुन येण्याच कारण सांगीतल तसा तो प्रचंड भडकला रागानी शिव्या द्यायला लागला हातात येईल ते फेकुन मारायला लागला पण दामोदर पंत मान खाली घलुन हात जोडुन सर्व सहन करत होते अखेर तो कपालीक स्वत:च उठुन जायला लागला पण मध्येच वळून म्हणाला. "चाल्ता व्हो इथुन म्या रात्च्याला तलावापाशी यिन त्येथ यिवून थांब आन तुज्या राजाल बी म्हनाव हजर व्हायाला"
दामोदर पंत परत घरी आले आणी लगोलग सुलतानाला भेटले सुरवातीला सुलतान तयार होईना पण न जायचे परीणाम आणखी भयानक होतिल हे सांगीतल्यावर मात्र तयार झाला. अखेर रात्री तिन अंगरक्षक घेउन दामोदर पंत आणी सुलतान तलावा पाशी आले. तिथ तो कपालीक आणी त्याचे शिष्य तसेच नग्नावस्थेत पद्यासनात बसले होते. संमोहनात असल्यासारखे तलावा शेजारच्या किल्ल्याकडे बघत होते.
अखेर त्यांनी दामोदर पंत आनी सुलतानाकडे बघितले. उठुन त्यान जवळ जात एक ताम्रकलश ज्याच तोंड लाल कापडाने बांधल आहे तो सुलतानाच्या हातात दीला आणी म्हणाला
"आमी आम्च काम केलाव आन पुजा उर्कलाव आता हा कलश किल्ल्या मदी कुनला गावनार नाय अशा जागी गाडून ठीवा. " आनी आज पासुन तिस दिसानी अमावस हाय त्या दिशि बळी पायज या वास्तूला पन बळि त्याचा दियाचा ज्याच्या उजव्या तळहताव तिळ असल आन जो येकुल्ता येक असल."
आपल्या दरबारात असा व्यक्ती कोण आहे याचा विचार सुलतान करत असताना तो कपालीक लाल भडक डोळे रोखुन सुलतानाकड पाहात होता. मध्येच तो विचीत्र हसला आणि म्हणाला "आनी येक गोष्ट ध्यानात ठीवा त्या बळिच मायबाप भी येकुल्तयोक असल पाय्जे, जवर ह्यो कलश हित गाड्ला र्हायील तवर त्यो बळिचा आत्मा हित र्हायील आन तुमी तुम्च बांध्काम बिन घोर करु सकाल " एवढच बोलुन ते कपालीक आले तसे अंधारात गायब झाले.
दामोदर पंत आणी सुलतान भयानक हादरले अमावस्या अवघ्या तिस दिवसांवर होति आणी असा बळी ज्याच्या डाव्या हातावर तीळ असेल आणि जो एकूलता एक असेल असा बळी शोधन श्यक्य ही होत पण त्याचे आई वडील ही एकुलते एक असणारा बळी मिळन आणि तेही ईतक्या कमी वेळात आवघड होत.
सुलतानान ताबडतोब सर्व दिशांना दवंडी पिटवली जो असा बळी जाणार असेल त्याच्या नातेवाईकांना खुप जमीन आणी धन दौलत देणार आसल्याच जाहीर केल. पहीले तिन दिवस कोणी आल नाही पण जे परीस्थीनी गांजले होते ते नंतर यायला लागले की त्यांचा बळी दिला जावा म्हणून. कमीत कमी घरच्यांच तर आपल्या माघारी भल व्हाव हा उद्देश असावा . पण सुलतानाच्या हेर खात्याने चौकशी केल्यावर सर्वजण बळिस अयोग्य ठरले त्या सर्वांचे हात पाय तोडुन सोडुन दिले गेले.
आखेर एक जण सुलताना कडे आला आणी त्याला असा बळी मीळवून देण्याच्या बदल्यात मोठ्या बक्षीचाची मागणी कली. सुलतानाने तत्काळ मांन्यता दीली
सुलतानाच्या हेर खात्यान कसुन चौकशी करुन बातमीची सत्यता पडताळून पाहीली आणी खबर पक्की असल्याच कळवल.
नरसूआबा पडवीत बसून पोटूशी आसलेल्या सुनेची माज घरातुन गायलेली अंगाई कौतूकाने ऐकत होते त्यांची सुन गोदावरी सहा महीन्याची गरभार होती. आपल्या अजून न जन्मलेल्या बाळा बरोबर बोलण, अंगाई गाण हा तर तीचा रोजचा चाळा होता. तिच माहेर अश्याच होणार्‍या लढाया मध्ये लुटीच्या वणव्यात सापडून संपून गेल. तेव्हा पासुन सासू सासर्‍यांनाच तिन आई बापाच्या जागी मानल आणी सासरात साखर पाण्यात विरघळावी तशी मिसळून गेली.
अचानक दारापाशी घोड्यांच्या टापाचा आवाज आला तशी नरसू आबाची नजर दाराकडे वळली. दारात तिन चार हत्यार बंद शिपायी गडी आले आणी सुलतानान लगोलग बोलावल असल्याची वर्दी दिली. नरसूआबा अवाक झाले. अचानक शिपाई दाराशी पाहुन नरसूआबाची बायको आणी सुन घाबरुन बाहेर आल्या. त्यांना नजरेनच शांत राहायला सांगुन मूंडासे बांधत नरसूआबा दरबारात गेले.
दरबारात नरसूआबा गेले तेव्हा सुलतान लोडाला टेकून बसला होता आणी सारे दरबारी नरसूआबा कड टक लाउन पाहात होते फक्त दामोदर पंत खाल मानेन जमीनी कडे नजर लाउन होते.
नरसूआबान लउन सुलतानाला मुजरा केला. आणी हात जोडुन उभा राहीला
नरसूआबाला अंदाज लागत न्हवता की आपल्या सारख्या सामांन्य कारकुनाला ईथ का बोलावण आलय
पहीला प्रश्न सुलतानान स्वतःच विचारला.
"नरसू क्या तुम हमारे सल्तनत से इमान रखते हो"
नरसूआबा खाल मानेनच उदगारला
"व्हय सरकार"
सुलतानान वजीरा कडे पाहील तसे वजीर उभ राहुन नरसुला म्हणाला
"क्या तुम ईस सल्तनत के वासते कुर्बानी दे सकते हो"
नरसूआबा एक वेळ वजीरा कडे पाहीले आणी पुन्हा खाल मानेनच उदगारला
"व्हय सरकार"
तस सुलतानाच्या आणी दरबारींच्या चेहेर्‍यावर एक सुक्ष्म हास्य पसरल
वजीर लगेच उदगारला “तो फिर ठिक है मै खावींद की तरफ से तूम्हे ये हूक्म देता हु की अगली आमावस्या की रात को तुम अपने बेटे को बली देने के लिये लाओगे.”
खाड कन मान वर झाली नरसूआबाची भयानक हुकुम होता तो स्वतःच्या एककुलत्या एक मुलाचा बळी स्वप्नात सुध्दा ही कल्पना करू शकत न्हवता तो. भितीन पाय थरथर कापत होते घशाला कोरड पडली नरसूआबानी बळी साठी दीली जाणारी दंवंडी खुपदा ऐकली होती खरतर त्या कामात लागणारा खर्च ही त्यानेच काढुन दीला होता. पण त्याच्या हे लक्षातच आल न्हवत कि तो आणी त्याची बायको दोघ ही एकुलते एक आहेत आणी त्यांचा मुलगा ही त्यांच एकूलत एक आपत्य आहे. सर्वात योग्य बळी त्याच्याच घरात होता. जो विचार तो करु ही शकत न्हवता आज ते जहरी वस्तव बनुन समोर आल होत.भर दरबारात नरसूआबान उभ्या जागी लोळन घेतल आणी रडून विणवणी करू लागला
"सरकार दया करा गरीबावर म्या पाया पडतो माझ्या गरीबावर दया खावा माझा लेक गेला तर आमी कुनाक्ड पव्हून जगायाच वट्लतर माझा बळी घ्या पर माज्या पोराला सोडा माय बाप."
ईतकावेळ सुलतान शांतपणे लोडाला टेकुन हा तमाशा बघत होता पण वजीर कडाडला
"खामोश$$$ तुम्हारा बाप इकलौता नही था ईसलिये तुम हमारे कीसी काम के नही हो. सरकारी हुक्म कि तौहीन करने की जुरत मत करना हुक्म के मुताबीक अमावस के दीन अपने बेटे को लेके आना"
सुलतानान शांत पणे ईशारा केला तसा वजीर बोलला
"अब ले जाओ इसे, और कडी नजर रखो इसपे.”
रड्णार्‍या हातपाय जोडणार्‍या नरसूआबावर कोणालाच दया आली नाही.
सुन्न झाला होता नरसूआबा दरबार संपे पर्यत बाहेरच थांबला दरबार संपल्यावर त्याने तड्क दामोदर पंतांना गाठल सरळ पाय पकडुन रडुन म्हणाला
" दया दाखवा मालक आता तुमच्या शिवाय कुनाचाच आधार नाय काय कर करा मालक"
दामोदर पंतांना माहीत होत की यातुन वाचण मुश्कील आहे त्यांनी नरसुआबाला उठवल तो तरी ही हसमूसून रड्त होता
दामोदर पंतांनी त्याचा खांदा हलकेच थोपटत म्हणाले
"नरसू फार मोठी चुक झाली मी कपालीकांचा आधार घ्यायला नको होता. आणी आपल्याच फडातल्या एका कारकूनान हि माहिति मोठ्या बक्षीसाच्या लालसेन सुलतानाला दीली. ललाट रेशेत जे होत ते तर स्विकारावच लागत पण या अमावस्ये आधी तु जर दुसर्‍या कुणाला जो या सर्व अटी पुर्ण करु शकेल असा ईसम आणू शकला तर मी सुलतानांच मन वळवायचा प्रयत्न नक्की करेन. आता फक्त एवढच माझ्या हातात आहे."
एवढ बोलून पंत झपझप पावल टाकत निघून गेले
दरबारी कामात प्रत्यक्ष कधी भाग घेतला नसेल तरी आज वरच्या अनुभवा वरुन नरसुआबाला माहीत होत कि सुलतानाचा हुकूम मानावाच लागणार आणी जर का हा हुकूम मोडला तर सुलतान घरा दाराची राख रांगोळी करेल.
पळुन जाण्याचा प्रश्नच न्हवता आज पासुनच त्याच्या प्रतेक हलचालींवर सुलतानाचे लोक नजर ठेउन असणार.
ऊन्मळून पडलेल्या झाडा सारखा नरसु आबा घरी आला आणी आंगणात मातीतच बसला.
गोदावरी नुकतीच पाय मोकळे करायला म्हणुण बाहेर आलेली नरसु आबाला अस जमीनी वर बसलेल पाहुन तीच्या काळ्जात धस्स झाल आपला अवघड्लेल शरीर सांभळत लगबगीन ती नरसु आबा कडे आली आणी हाक मारली
"मांमजी!! काय झाल तुमास्नी ठिक हाय न्हव"
नरसु आबानी एक वेळ वर तोंड करून आपल्या सुनेच्या चेहेर्‍या कडे पाहील आणी तोंड झाकून अक्रोश करत बोलले
"घात झाला पोरी कुठ्ल्या कर्माची शीक्षा मला मिळतीये"
गोदावरीला नरसुआबाची आवस्था बघवेना त्यांना ती आधार देत पडवीत घेऊन आली आणी झोपाळ्यावर बसवल. आत जाउन थोड पाणी आणून दिल.
थोड पाणी पिउन नरसु आबा जरा शांत झाले मग गोदावरीन पुन्हा विचारल तस नरसु आबान रडत रडत दरबारात घड्लेला प्रसंग सांगीतला आणी पुन्हा तोंड लपवून रडू लागले
गोदावरी ने शांतपणे ऐकून घेतल खूप वेळ विचार करत होती ती. जिचा नवरा बळी दीला जाणार आहे ती बाई आकांड तांडव करेल पण गोदावरी शांतच होती. हे लक्षात आल्या वर नरसु आबान आश्चर्यान तीच्या कड पाहील. ति अजून हि स्वतःच्या हाताकडे पाहात विचार करत होती
"सुनबाई "नरसु आबान हाक मारली तशी गोदावरी शुध्दीवर आली.
"मांमंजी बळी गडी मानसाचाच पायजे का बाई मानुस पन चालल" गोदावरीचा हा अनपेक्षीत प्रश्न ऐकून नरसु आबा चमकले पण प्रश्नाच उत्तर दील.
"बळी येकुल्ता येक पाय्जे आन माय बाप बी येकुल्ता येक पाय्जे त्यात मंदी गडी आन बाई असा भेद न्हाई आन माज्या फाट्क्या..... "
अचानक पुढचे शब्द ओठातच अडकले. गोदावरीच्या मनात काय चाललय हे नरसु आबाच्या लक्षात आल. गोदावरी स्वतः एकुलती एक होती आणी तिचे आई बाप पण एकुलते एक होते.
ताडकन ऊभे राहीले नरसू आबा.
पोराच्या काळजीन एतका वेळ तळमळत असणारे नरसू आबा आता त्याला विसरून सुनेकडे भयाने पाहु लागले
भयाची जागा आता रागान घेतली किंचाळलेच ते
"खुंटा एवढी पोर तु पन असल वंगाळ ईचार कर्तीयास नाय नाय असल काय सपनात भी आनू नग "
गोदावरी जंमीनी कडे पाहात राहीली. सख्खी पोर मानायचे तीला नरसू आबा जास्त काळ राग नाही धरु शकले. थोड शांत झाल्यावर समजावणीच्य सुरात म्हणाले
"सुनबाई पोटुशी हायस टु आन अस्ला वंगाळ ईचार करु नगस झाल ते काय कमी हाय व्हय"
गोदावरी शांतपणे म्हणाली
" सख्ख्या पोरिगत जिव लावलाय्सा तुमी मला मामंजी सौभाग्याच लेण घीउन जायाची पर्वान्गी द्या. ईधवा बाइच जिन जीन्याचा शाप नगा दिउ पाया पड्ते तुमच्या. परत यांच्या माग्न कोन कुनाला आधार द्येनार तुम्च्या माग ना धनी ना माहेर ना सासर कस जगायच म्या तेव्डा ईचार करा"
काय चुकीच बोलत होती ती वीस वर्षाची पोर आपण तीला जन्माला पुरणार तर नाही आहोत परत जन्माचा जोडीदार गेला तर ती राहाणार कशी त्या पेक्षा पोरगा वाचला तर कमीत कमी आपल्या चीतांना अग्नी तरी देणार होईल. या क्षण भराच्या स्वर्थी विचाराची आणी स्वतःचीच लाज वाट्ली नरसू आबांना. पण गोदावरीन ओळखल हीच संधी आहे पटकन पूढे होत पाय पकडले आणी म्हणाली.
"मामंजी नवर्‍याआधी जान्यच भग्य नशीबवान बाय्कास्नी लाभतय, मला अस उघड्या कपाळान बघाया परीस म्या त्यांच्या सठी जिव ठीवला तर चांगल न्हाय का ? अखंड सौभाग्याची भिक घाला मामंजी "
पण तरीही नरसूआबा म्हणाले
"नाय सुनबाई बळीच्या हातावर तिळ भी पायजे"
गोदावरीच्या चेहेर्‍यावर हसु आल नरसूआबा तिच्या कड आश्चर्यान पाहत असताना तिन आपला नाजुक उजवा हात पुढे केला त्या वर तिळ होता नरसुआबा तिचा हात कपाळावर ठेउन रडत राहीले.
थोडावेळ तसाच गेला मग गोदावरी म्हणाली
"मामंजी आजुन येक्च माग्न माग्ते सासुबाई आनी ह्यांना काय बी कळु देऊ नगा जवर मि हाय तवर मला सुखा समाधानान भरलेल्या घरात र्हाऊ द्यात मर्नाची छाया संग्ट नगो मला"
“चल्ला मामंजी आता दोन घास खाउन घ्या पुढ्च्या आमावासे पतूर सेवा करायची संदि द्या”
रडत रडत नरसुआबान होकार दीला.
दामोदर पंत आर्श्चाने पाहतच राहीले जेव्हा नरसू आबान सुनेला पोरा बद्ल्यात बळी म्हणून देण्याच सांगीतल
सुनेवर नरसू आबाच पोरी सारख प्रेम होत हे माहीत होत. पंतांचे ही डोळे पाणवले.
अखेर सुलतानाला स्वतः जामीन राहुन दामोदर पंतांनी गोदावरीचा बळी मंजूर करुन घेतला कमालीची गुप्तता राखली गेली या बाबतीत.
ईकडे घरात काहीच झाल नसल्या सारख हसून खेळून वावरणारी गोदावरी पाहीली के नरसू आबाच काळीज तिळ तिळ तुटे
बघता बघता तो दिवस आला
सकाळीच नरसू आबाच्या दारा समोर पालखी येऊन थांबली गोदावरी संपुर्ण सौभाग्याच लेण अंगावर चढ्वल लग्नातला शालू नेसला आणी आश्चर्यान पाहाणार्‍या आपल्या सासुच्या पायावर डोक ठेवल. पतीच्या ही पाया पडली. एकदा घराकड ओळे भरुन पाहील आणि सरळ दारा बाहेर पालखीत जाउन बसली.
नवरा सासू धावत दारा पर्यंत आले पण दारावर पाहारा बसला होता नरसू आबा सोडून कोणालाच बाहेर जाऊ दिल जाणार न्हवत आज. आणी थोड्या वेळान त्यांना ती भयंकर बातमी समजणार होती
बायको पोराकड बघायची हिंमत न्हवती नरसू आबाची खाल मानेने तो पालखी बरोबर चालु लागला
किल्ल्यात आल्यावर गोदावरीची पुजा झाली बळी ची केली जाते तशी.
सर्व सोपसकार झाल्यावर तीला एका छोट्याश्या खोलीत नेण्यात जी पुर्णपणे बुजवुन तिची समाधी बणनार होती. संपूर्ण दरबार आणी सुलतान तिचा बळी विधी बघायला जमा होते . मंत्रोचाराच्या स्वरात हळू हळु एक एक विट लावली चालली होती.
गोदावरी शांत होती नरसूआबा एका कोपर्‍यात उभे राहुन अश्रु ढाळत तिच शेवटच दर्शन घेत होते आता पुन्हा ही हरणी दिसणार नाही या विचारांनी मरणप्राय वेदना होणार होत्या. आता काही शेवटचेच दगड लावायचे उरले अचानक गोदावरीची नरसू आबांशी नजरा नजर झाली. ती त्यांच्या कड पाहुन गोड हसली अगदी नेहेमी सारख आणि मान झुकवून तीच्या पितासमान सासर्‍यांना शेवटचा नमस्कार केला त्या क्षणी शेवट्ची वीट लावळी गेली नरसू आबा कोलमडुन खाली पड्ले दामोदर पंतांनी त्यांना कसबस सावरल
पुढे कोणताही अपशकुन घडला नाही अस म्हणतात. माची ही बांधली गेली असेल या घटनेला कित्येक वर्ष झाली बहामणी राज्य संपुन शतक ओलांडली तो भुईकोट किल्ला ही आता भग्न अवशेष बनुन राहिला आहे. सोनल्लगी नगर हि आता शहर झालय २१ व्या शतकात पाय ठेवत अनेक ईमारती. वाहानांची गजबज गोंगाट वाढलाय
पण आज ही अमावस्येच्या रात्री अचानक एखाद्या अनोळख्या क्षणी तिच्या न जन्मलेल्या बाळासाठी तिची गायलेली अंगाई ऐकू येते.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

prafullashimpi,

दुर्दैवाने अशा घटना होत असंत. बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या शिवचरित्रात एका गोष्टीचा उल्लेख आहे. बहुतेक तोरणा किंवा पुरंदराची डागडुजी चालू होती त्यावेळेस किल्लेदाराने आपली मुलगा व सून मुख्य दारात चिणली होती. हे शिवाजीमहाराजांनी स्वतंत्रपणे कार्य करायला सुरुवात केल्यावर लगेच घडलं होतं. महाराज २५ वर्षे वयाच्या आतबाहेर असतील.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान अगदी योग्य आहे तुमच मत बळीप्रथा ही त्या काळात सामांन्य बाब होती आणी बळी द्यायच्या नियमा नुसार बळी हा त्याच्या मर्जीने देण्याच बंधन होत पण प्रत्येक बळीचा अंत हा बहुतेकदा त्याच्यावर जबरदस्तीच असे.

फारच क्रूर प्रकार होता बळी देण्याचा. अशीच एक कथा श्री. म. माट्यांच्या उपेक्षितांचे अंतरंग पुस्तकात वाचली होती.

रावणः
अगदी मन हेलावून टाकणारी कथा आणि तुम्ही खूपच सुरेख फुलवली आहेत. प्रत्येक प्रसंग तुम्ही इतका जिवंत केला आहे की अगदी सगळी कथा अगदी डोळ्यासमोर सरकते. खरच छान.

सुन्न करणारी कथा..!
छान लिहीलेय

एक शंका-
ते बळी द्यायला अपात्र ठरलेल्या लोंकाचे हातपाय तोडून का बरे सोडत होता तो बहामनी सुलतान.

छान कथा.

एक शंका-
ते बळी द्यायला अपात्र ठरलेल्या लोंकाचे हातपाय तोडून का बरे सोडत होता तो बहामनी सुलतान.
>>>> धनाच्या लालसेने बळीसाठी पात्र नसलेले लोकही बळी जाण्यासाठी आले होते. असा बळी दिला असता तर किल्ल्याच बांधकाम पुर्ण झालच नसतं. म्हणून इतर लालसी लोकांना जरब बसावी म्हणून सुलतान तसं करत असावा असा माझा अंदाज Happy

आपल उत्तर बरोबर आहे आबासाहेब बळी च्या अटी नुसार त्याच्या उजव्या तळहातावर तिळ हवा आणी तो एकुलताएक हवा होताच. पण त्याबरोबरच त्याचे माता पिता ही एकुलतेएक असायला हवे होते व या बदल्यात बळीला भरपुर संपत्ती तेसेच जमीन देण्यात येणार होती. पण जर ही अट पुर्ण न करणारा व्यक्ती बळी गेला तर परीणाम भयानक होउ शकले असते ते थांबवण्या साठी सुलतानान ही शिक्षा सुनावली

सांगलीमधील "Irwin" पूल आहे त्याचीही अशीच गोष्ट एकून आहे. एखादी कथा खरी असेल पण सगळ्या नसाव्यात असे वाटते. खरे तर हे तपासून पहाणे सोप्पे आहे... अशा कथा अफवा आणि काही इतर कारणामुळे तयार होतात असे वाटते.

पण कथा आवडली.

सोनल्लगी का सोन्नलगी? सोन्नलगी म्हणजे तर आजचं सोलापूर. सोलापूरच्या किल्ल्याबद्दलची दंतकथा आहे का ही?

आपल्या सर्वांचे धन्यवाद.बळीजाण किंवा सतीजाण हे खरोखरच भयानक आहे. हि कथा म्हणजे असा निर्णय घेण्याची वेळ ज्या व्यक्तीवर येते मग कारण त्याची स्वतःची संमती कींवा विनासंमती असो त्याच्या शेवटच्या क्षणांना त्याला काय वाटत असेल हे धरुन त्याच चित्र रेखाटायचा प्रयत्न आहे.

khup ch chan.

Btw sonnalagi mhanje solapur.

Solapurchya Bhuikot killyabaddal eikaliye hi mahiti mi lahan panapasun

घेतल

होत

काय झाल

शेवटचच>>

घेतलं

होतं

काय झालं

शेवटचंच

अक्षरांवर टिंब का नाही टाकत.....???? प्रचंड राग संताप......

Pages