"सत्यमेव जयते" - भाग १ (Female Foeticide)

Submitted by आनंदयात्री on 6 May, 2012 - 03:43

योगायोगाने आमीरच्या नव्या 'सत्यमेव जयते' चा पहिला भाग बघायला मिळाला. आमीर म्हटल्यावर 'काहीतरी वेगळं' असणार, या आशेला सुखद बळकटी मिळाली.

जनजागृती आणि उद्याचा भारत घडवण्यासाठी प्रत्येक भारतीयाला केले जाणारे कळकळीचे आवाहन हा या मालिकेचा गाभा असेल असे वाटते. उद्याचा भारत घडवण्यासाठी आपणही काय काय करू शकतो, इतके दिवस 'सिस्टीम बदलली पाहिजे' वगैरे वगैरे अंतर्गत चर्चेतच येणारे विषय आता सार्वजनिक व्यासपीठावरून आमीर मांडेल असेही वाटतंय..

आपणही या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊ शकतो का? माबोकरांना काय वाटतं या मालिकेबद्दल? या आणि अशाच प्रकारच्या पण सत्यमेव जयते याच मालिकेशी संबंधित गप्पांसाठी हा धागा...

पहिला भाग -
http://www.satyamevjayate.in/videos/#LBFEe1hZOgk
किंवा
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NG3WygJmiVs

ओ री चिरैया, नन्हीसी चिडिया, अंगना में फिर आ जा रे - http://www.youtube.com/watch?v=_bv0Q9HTegE

रूनी ने दिलेल्या या काही लिंक्स -
पार्ट १
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqd3

पार्ट २
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqdm

पार्ट ३
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqe4

पार्ट ४
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqeg

अस्चिगने दिलेल्या लिंक्स -
५७८२७११ वर Y केलत का टाईप?
स्नेहालयः अकाऊंट SJ-SHL
912010021691949

www.satyamevjayate.in
PO Box 37401
JB Nagar Post Office
Andheri (E), Mumbai 400059

मला अमेरीकेत http://www.dailymotion.com/video/xqn95a_satya-6may-1_creation
येथे पहाता आला शो.

सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ता बघतेय.
अशक्य शहारा आला अंगावर.
स्टिंग ऑपरेशनची क्लिप बघून सटकलं डोकं.

आपण स्वतः हे करणार नाही एवढ्यानेच पुरेसं होईल असं वाटत नाही. अशी मानसिकता असलेल्या लोकांशी किंवा असं केलेल्या लोकांशी तात्काळ संबंध तोडणे हे आपण सुशिक्षित समजणारे लोक करू शकतो का?
(मी पण विचार करतेय.. )

भयाण आहे परिस्थिती. आजवर नुसते वाचलेले, प्रत्यक्षात पाहुन काटा आला अंगावर. स्टींग मधले डॉक्टर बघुन चक्रावले.. हे तर खुन्यांपेक्षाही खालच्या दर्जाचे आणि आजही ते डॉकटरकी करताहेत, लोक त्यांच्याकडे जाताहेत.... कोणाकोणाला दोष द्यावा?????

.... कोणाकोणाला दोष द्यावा?????>>>>>> अनुमोदन.
मुस्लीम स्त्रीची कहानी तर अविश्वसनीय आहे Sad ईतक्या क्रूरपणे कोणी कसं काय वागू शकतं.पण त्या स्त्रीला खास सलाम _/\_
किती भक्कम वाटत होती ती. एवढं सगळं होऊनहि जराहि असहाय्य वाटली नाहि.
बाकि दोघीपण महानच.
पण मला राहून राहून वाटत होतं कि ज्यांना खरच मुलाची ईच्छा असते आणि त्याकरीता काहिहि करायची तयारी असते त्यांच्यावर जरातरी फरक पडेल का Sad खूप कोडगे असतात असे लोक.
बाकि आमिरला संदेश पाठवला का? जेवढे जास्त मेसेज जातील तेवढं चांगलं. जर आपल्या सहकार्यामुळे राजस्थान सरकारने त्या नालायक डॉक्टर्सवरील खटला लवकर तडीस नेला तर चांगलच आहे .
बाकि,आमिर रॉक्स Happy

मी केनयात आहे, मला दिसला.
उत्तम कार्यक्रम होता. फक्त एम. टि. पी. अ‍ॅक्ट चा उल्लेख झाला नाही. या कायद्याचेच संरक्षण
डॉक्टरांना मिळ्ते. त्याचा पुसटसा उल्लेख स्टींग ऑपरेशन मधे आहे.

मातृभुमी - अ नेशन विदाउट वुमन पण आठवला

ज्याने बनवला त्याला वाटलेही नसेल एवढ्या लवकर त्याचा चित्रपट सत्यात उतरेल Sad

तेही खरेच.... आज लोक खुलेपणे बोलताहेत म्हणजे ही परिस्थिती बरीच आधीपासुन असणार...

पण मला तर तिथल्या मुलींच्या परिस्थितीची नुसती कल्पना करुनही अस्वस्थ व्हायला झाले. किती असुरक्षित आहेत त्या. छेडछाडीपासुन ते गॅगरेपपर्यंत काहीही होऊ शकते... आपण इथे ब-याच सुरक्षित वातावरणात राहात असताना कोणी असेही जगतेय हा विचार किती घुसमटवतो.

बघतेय एपिसोड .. पहिल्यच बाईचा इंटरव्ह्यु, ८ वर्षात ६ वेळा जबरदस्तीने अबॉर्शन .. ?? :(.
या ज्या रिअल केसेस दाखल्यात त्या गुन्हेगारांना तरी गजा आड केलय का / करु शकतो का ?

म्हणजे मुलींची जास्त असोत वा कमी, त्यांना किंमत शून्य उलट त्यांनीच किंमत मोजायची - हुंड्याद्वारे किंवा मग बाजारात विकलं जाऊन. संताप येतो.

काही महिन्यांपूर्वी अमेरिकन बाईनी केलेली डोक्युमेंटरी कि क्लिप पाहिली होती 'इंडिअय हॅज सिक्रेट' , त्यात स्टिंग ऑपरेशन्स आणि डॉ. नीतु जी सत्यमेव जयते मधेही दाखवलीये, तिची मुलाखत त्यात पण होती.

या ज्या रिअल केसेस दाखल्यात त्या गुन्हेगारांना तरी गजा आड केलय का / करु शकतो का ?>>
तिच्या वकीलाचे बोलणे नाही का ऐकले, जज पोलिसालाच ओरडत होता की ह्या नवर्‍याला , सासूला इतक्या लवकर का पकडलेय? वंशाला दिवा सगळ्यांनाच हवा असतो. तेव्हा त्यात गैर काय.

छान चर्चा सुरु आहे. अमिरखान नेहेमी सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवतो आणि काही तरी वेगळं करतो.

कार्यक्रम बघायला आवडेल.

आज अमिरच भाष्य होतं की तुम्हाला मुलगी होत असेल तर ती आईची चुक नसुन वडिलांची चुक असते. जे देवाने आपल्या पदरात दिलय त्याला आपण शांतपणे स्विकारलं पाहिजे.
मुळात मुलगी होणं ही चुक कशी असु शकते? आणि शांतपणे स्विकारण्याचा प्रश्न येतोच कुठे?.........सहमत
मी सीरियल बघितली नाही. पण जर त्याने 'चुक' हा शब्द वापरला असेल तर योग्य शब्दांची
निवड करता आली नाही . या वाक्यमुले मुलगी होणे ही चुकच आहे पण ती चुक वडिल करतात असे मत होणे साहजिक आहे .
चुक या शब्द ऐवजी " सहभाग , वाटा अश्या अर्थाचे शब्द वापरायचे होते असे वाटते.

दोन मोठे गैरसमज आहेत (अ) मुलगी होणे हा कमी पणा आहे अशी सर्वसाधारण समजुत (ब) मुलगी झाली ह्याला सर्वस्वी आईच/ स्त्री जबाबदार आहे (त्यामुळे म्हणुन तिच्या जाचात अजुनच भर).

अमिरखानाला दोन्ही बाबींना लक्ष करायचे आहे. आजच्या वैज्ञानिक दृष्टीकोनातुन वडिलांचे गुणसूत्रे लिंग ठरवतात. ह्यात वडिलांची चुक नाहीच (तसे अमिरला म्हणायचे ही नसेल), पण आई कशी जबाबदार नाही हे ठसवतांना 'चुक मानलीच तर' वडिलांची आहे असे समजायचे... आता वडिलांना चुक ठरवले म्हणुन पुरुषांना जाच Happy होण्याच्या घटनांत वाढ होणार नाही हे अमिरला माहित आहे.

आनंदयात्री, या लिंक्स हेडरमधे देणार का ? म्हणजे सगळ्यांना लाभ होईल.
अमिरच्या भावना प्रामाणिक वाटल्या, त्यात अभिनयाचा भाग वाटत नव्हता.
त्याचे लो प्रोफाईल मला आवडले तसेच कोर्टाच्या बाबतीतले त्याचे विधान योग्य होते. वकिलाने केलेले
विधान बोचरे होते, पण त्याला त्याची कल्पना असेलच.
अमिरचे पुरुषांच्या सहभागाबदल नेमके विधान आठवत नाही, पण ऐकताना ते खटकले नव्ह्ते.

काल रात्री १०ला पाहिला कार्यक्रम... पाहुन डोकं गरगरलं. त्या बायकांनी किती सहन केलय.
आणि स्टिंग ऑपरेशन तर भयंकर. त्या डॉक्टरांना इतकं सहज बोलताना पाहुन डोकं सटकलं.

कार्यक्रम नाही पाहता आला, पण बर्‍याच जणांच्या प्रतिक्रियांवरुन खूपच चांगला वाटतोय.

माझ्या एका मित्राची या कार्यक्रमाबद्द्लची फेसबुकवर फारच बोलकी प्रतिक्रिया :

Satyamev Jayate.... if ppl find today's episode an eye opener then either they are far from current world... or they are using the news paper for some different purpose... Come on guys... pretty old and chewed topic... how many times you need somebody to come and explain u the same thing.... was ur brain sleeping all these days before starting a show?

दुर्दैवाने १००% सहमत Sad

वेल, गर्भजलचिकित्सेनेच लिंगपरीक्षण होतं असं नाही....... १६ ते १८ आठवड्यात सोनोग्राफी केल्यास सोनोलॉजिस्टला लिंगनिदान करता येतं..... मग मेल असल्यास 16 असा सूचक आकडा, व फिमेल असल्यास 19 असा सूचक आकडा टाकून मातेस अथवा नातेवाईकास लिंग काय आहे ते सांगण्यात येतं.... कुणी आक्षेप घेतल्यास १६ व १९ आठवडे बाळाचं गर्भावस्थेतील वय आहे असं सांगितलं जातं..... आणि मुलगी असल्यास सोनोग्राफी रिपोर्ट मध्येच रिट्रोप्लासेंटल ब्लीड आहे ज्यामुळे बाळाचे ठोके कमी झाले/बंद झाले व नाईलाजाने अ‍ॅबॉर्शन करावे लागले असा देखावा करता येतो.

प्रत्यक्ष लिंगनिदान करताना डॉक्टर्सना पकडल्यावरच लायसन्स रद्द होणे ( प्रोफेशनल डेथ से न्टेन्स ) होवू शकतं..... अन्यथा कोर्ट केस्,जामिन...वर्षानुवर्ष केसेस चालणं हे प्रकार चालूच रहाणार.

मित, तुमच्या मित्राचे स्टेटस पटले नाही. सॉरी.
आपल्याला सगळ्यांनाच बेसिक प्रॉब्लेम नुसता माहित होता हे खरंय. पण काल कार्यक्रमात आलेले अनेक संदर्भ पेपरमधे येत नाहीत. तसेच वाचायच्या न्यूजपेपरपेक्षा दृकश्राव्य माध्यमाची परिणामकारकता जास्त असते ना....

काल रात्री पाहीला हा कार्यक्रम.
आमीर काहीच वावग बोलला नाही.
एवढ स्ट्रींग ऑपरेशन होऊनही एका डॉक्टरवरही कारवाइ झाली नाही हे फारच खेदजनक आहे Sad

या कार्यक्रमाबद्दल धागा निघाला असणार या अपेक्षेने आलो आणि समाधान वाटलं. कार्यक्रमाचं सादरीकरण अचूक होतं. कालच्या विषयातल्या बातम्या वेगवेगळ्या संदर्भात वाचनात / पाहण्यात आलेल्या होत्या. पण त्याचं एकत्रित सादरीकरण इतकं प्रभावी होऊ शकतं हे कालच्या कार्यक्रमात दिसून आलं. टीव्ही या माध्यमाची ताकद काय आहे आणि भारतात त्याचा कसा खेळखंडोबा झालेला आहे हे काल अधोरेखित झालं. टीव्ही इंडस्ट्री आणि पत्रकार यांनाही अंतर्मुख व्हायला लावणारा हा कार्यक्रम होता.भारतीय दूरचित्रवाणी उद्योग इथून पुढे प्रगल्भ होईल अशी आशा ठेवायला हरकत नसावी. पूर्वी दुरदर्शनवर असे कार्यक्रम झालेले आहेत ( टर्निंग पॉइंट ?). दूरदर्शनच्या स्टुडिओत बसून अशा कार्यक्रमांच्या फिल्म्स पहायचा योग आला होता. चंबळचे डाकू आणि त्यांचं वास्तव असे अनेक हटके विषय घेणारी एक मालिका अशीच होती. दूरदर्शनवर पोसली गेलेली पिढी आजही त्यामुळेच सर्वंकष विचार करताना दिसते. तर लोकांना हवं तेच आणि सनसनाटी देणारी, कुणाला तरी दोष देणारे शो सादर करनारि भांडवलशाही माध्यमं हा आजच्या पिढीसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.

आमीरमुळे ते संयमित वार्तांकनाचं युग पुन्हा अवतरेल हा आशावाद आहे. एका रात्रीत समस्या सुटणार नाहीत याची जाणीव आहेच. शपथा घेण्याचं आवाहन करून रोग दूर होणार नाही हे ही वास्तव आहे. पण थोडं सकारात्मक असणं नेहमीच चांगलं. समाजमन ढवळून काढणारी मालिका घेऊन आमीर आलाय, त्याच्या या प्रचंड मेहनतीला, दुर्दम्य आशावादाला अनेक शुभेच्छा.

आणि हो, अशा कार्यक्रमासाठी एसेमेस पाठवायला काहीच वाटणार नाही. हे पैसे सामाजिक संस्थेला देण्यात येणार आहेत आणि जमा झालेल्या पैशाइतकेच पैसे रिलायन्स फाऊन्डेशन त्यात घालणार आहे हे आणखी एक आश्वासक वेगळेपण. रिलायन्सचा या निमित्ताने सामाजिक कार्याशी संबंध येतोय.

थँक यू मिस्टर खान !

इथे झालेली चर्चा छान वाटली. आमीरच्या त्या एका वाक्याचा बाऊ करण्याचं कारण नाही. कुठलंही वाक्य कोट करताना नेहमी मागचे पुढचे संदर्भ लक्षात घेणं आवश्यक वाटतं.

किरण,सहमत.
यापुर्वीही असे कार्यक्रम झालेत. अगदी प्रिया तेंडूलकरच्या रजनी पर्यंत मागे जाता येईल. तिनेही मग नासूर
सारखा एक सिनेमा केला होता.
पण त्याचे समाजावर विशेष प्रभाव पडले नाहीत. अमिरच्या बाबतीत आशा ठेवायला वाव नक्कीच आहे.

स्टींग ऑपरेशन करुनही काही फरक पडला नाही, हे तर चिड आणणारे होते.

rajani madhalya samasya kharya hotya pan te shevati fiction chya angane janare hote ani solution dakhavale asayache te khup symplistic asayache. Ya karyakramachi jaatkuli tyapeksha vegali ani mhanun jast parinamkarak aahe.

Pages