पंचवीस वर्षांपूर्वी उघडकीला आलेल्या बोफोर्स घोटाळ्याने आज पुन्हा डोके वर काढले. अमिताभ बच्चन निर्दोष असल्याचे उघडकीला आले तर माजी पंतप्रधान राजीव गांदी यांनी कशा प्रकारे सोनिया गांधींचे सुहृद असलेले क्वात्रोची यांना कसे वाचवले ते ही उघडकीला आले.
या घोटाळ्यात कुणाची पापे झाकण्यात आली तर कुणाला विनाकारण गोवलं ते इथे पहा:
http://timesofindia.indiatimes.com/videos/news/Bofors-investigator-alleg...
http://timesofindia.indiatimes.com/india/Bofors-scam-I-have-lived-with-s...
माजी स्वीडीश पोलीस प्रमुख स्टेन लिंडस्टोर्म यांचा खुलासा:
http://www.indianexpress.com/news/swedish-former-top-cops-bofors-remarks...
हे सगळं असतानाही काँग्रेसने मात्र निर्लज्जपणे प्रतिपादन असे केले आहे:
ई-सकाळ:
नवी दिल्ली- बोफोर्स प्रकरण आता संपले असून, ते पुन्हा उघडण्याची गरज नाही, असे केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शिद यांनी आज (बुधवार) येथे म्हटले आहे.
मला वाटते की, हे प्रकरण आता संपले आहे. नवीन विषय घेऊन हे प्रकरण पुन्हा-पुन्हा उघडू नये. जो काही निर्णय असेल, तो न्यायालय देईल, असे खुर्शिद पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
आजवर एकाही आर्थिक घोटाळ्याची
आजवर एकाही आर्थिक घोटाळ्याची पूर्ण चौकशी होऊन, तो पैसा सरकारजमा
झाल्याचे मला आठवत नाही.
हर्षद मेहता, भरत शाह, कलमाडी.. मोठी यादी होईल.
त्यामानाने पाशवी गुन्हेगारांचे खटले चालून त्यांना फाशीची सजा व्हायचे प्रमाण वाढले
आहे, हि समाधानाची गोष्ट आहे.
राजकारणांत भ्रष्टाचार
राजकारणांत भ्रष्टाचार झाकण्यात काँग्रेस कमालीची परिपक्व आहे. <<< + infinity.> सही
गंटांगळ्या खात असलेले सरकार ही ते ५ वर्ष आरामात चालवतात
दिल्ली की विशेष सीबीआई अदालत
दिल्ली की विशेष सीबीआई अदालत ने 11 साल पुराने रिश्वत केस में बीजेपी के पूर्व अध्यक्ष बंगारू लक्ष्मण को दोषी करार दे दिया है और कोर्ट सजा का ऐलान कल (शनिवार को) करेगी. सजा का ऐलान होने के तुरंत बाद सीबीआई ने बंगारू लक्ष्मण को हिरासत में ले लिया.>>>>>>>>>> आता हाफचड्डीवाले कोणत्या तोंडानी बोलणार आहे..स्वतःच्या पक्षाच्याच अध्यक्षाने सैन्यादळात दलाली साठी पैसे घेतलेले..तहलका ने हे सगळॅ बाहेर काढले. जय हो तहलका
यामुळेच मुंगेरीलाल चे स्वप्न . फक्त आयुष्य भर स्वप्न्च राहणार आहे. कॉंग्रेस चे बोफोर्स आहे तर भाजपाचे तहलका आहे..
एक रमेश दुसरा सुरेश..
राजीव गांधीनी पैसे घेतले असा कुठे ही पुरावा नाही आहे. फक्त क्वाचोत्री याला देशा बाहेर जाण्यात मदत केली. याचा मात्र पुरावा आहे.
इथे तर सरळ सरळ पैसे घेतलेला विडीओ आहे..यामुळे बंगारु लक्ष्मन, जॉर्ज फर्नांडीस, यांना राजिनामे द्यावे लागले. सत्य हे नेहमी सत्यच असते
भगव्यांचा राम काय आणि लक्ष्मण
भगव्यांचा राम काय आणि लक्ष्मण काय... देशाला काही काडीचा उपयोग नाही.
प्रश्न भाजप काँग्रेसचा नसावा,
प्रश्न भाजप काँग्रेसचा नसावा, असू नये.
पारदर्शकता नसणे यास आपण सारे सरावलो आहोत आणि याचे कारण शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एक निरपराध फासावर जाता कामा नये अशा तत्वावर आपले शासन स्थानापन्न झालेले आहे. या तत्वातील पहिला अर्धा भाग अधिक प्रामाणिकपणे पाळला जात आहे. नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा हा प्रकार अस्तित्वात येत नाही.
भारत हा लुटला गेलेला व लुटला जात असणारा देश आहे. येथे कोणतीही शासनव्यवस्था आली तरी तो लुटला जाईल. याचे कारण येथील नैसर्गीक सुबत्ता आणि झुंजण्याची वृत्ती नसलेला एक प्रचंड समुदाय, ज्यात एक दोन टक्के शूर वीर निर्माण होत राहतात.
लुटल्या जाणार्या देशात शांतपणे जीवन कंठणे अथवा रस्त्यावर उतरून स्वतःचा जीव धोक्यात आणून राजकारण्यांना जाब विचारणे, इतकेच हातात आहे.
धन्यवाद
काँग्रेस चोर आहे हे जग जाहीर
काँग्रेस चोर आहे हे जग जाहीर आहे. १००० हरामखोर मेले असतील तेव्हा कुठे एक काँग्रेसी नेता जन्माला येतो. गेंड्याची कातडी जन्मापासुनच मिळते यांना. इथ पर्यंत बरोबर पण भाजपा महाचोर आहे स्वार्थापोटी दंगल पेटवुन सत्तेची पोळी भाजणारा पक्ष आहे हे मान्य करतात का ?
ते काशाला मान्य करतील? पण हे
ते काशाला मान्य करतील? पण हे सत्य तुम्हा आम्हाला माहीत आहे ना? मग झाले तर
पण प्रत्येकवेळी योगायोगाने
पण प्रत्येकवेळी योगायोगाने (?) जेव्हा जेव्हा बोफोर्सेची बातमी येते त्या १-२ दिवसात लगेच विरोधी पक्षाला अडचणीत आणणारा एखादा रिपोर्ट येतो. मग तो गुजरात असो की तहलका .
तु मेरी खुजा ....मे तेरी
तु मेरी खुजा ....मे तेरी खुजाता हु.....
बेफि, ते वाक्य नेहमीच
बेफि, ते वाक्य नेहमीच चुकीच्या अर्थाने वापरले गेलेय. म्हणजे एका अपराध्याला
शासन करायचे तर १०० अपराध्यांना सोडा.. अशा अर्थाने.
आपणही पाठपुरावा करत नाही. आपली न्याययंत्रणा सक्षम आहे पण या प्रोसिजरला
फायदा घेत पळवाटाच शोधल्या जातात. तो कोड आधी बदलायला पाहिजे.
त्या यंत्रणेला लागणार्या वेळात आपण सगळे विसरतो आणि आपल्यासमोर नवा घोटाळा, पेश केला जातो.
एक रमेश दुसरा सुरेश..>>> हे
एक रमेश दुसरा सुरेश..>>> हे सही आहे
म्हणजे एका अपराध्याला शासन
म्हणजे एका अपराध्याला
शासन करायचे तर १०० अपराध्यांना सोडा.. अशा अर्थाने.>> खरे आहे
>>पण प्रत्येकवेळी योगायोगाने
>>पण प्रत्येकवेळी योगायोगाने (?) जेव्हा जेव्हा बोफोर्सेची बातमी येते त्या १-२ दिवसात लगेच विरोधी पक्षाला अडचणीत आणणारा एखादा रिपोर्ट येतो. मग तो गुजरात असो की तहलका
अनुमोदन. हीच तर गंमत आहे. म्हणजे हे चोर नाहीत असं सिद्ध करण्या ऐवजी (ते शक्यही नाही म्हणा) समोरचा पण चोर आहे असं सांगायचं. म्हणजे यांची चोरी कमी महत्वाची.
विन्स्टन चर्चिल ची भविष्यवाणी
विन्स्टन चर्चिल ची भविष्यवाणी यांनी खरी ठरवली:
"Power will go to the hands of rascals,rogues and freebooters. All Indian leaders will be of low calibre and men of straw. They will have sweet tongues and silly hearts.
They will fight among themselves for power and will be lost in political squabbles"
- हाऊस ऑफ कॉमन्स मधे केलेल्या भाषणातील उतारा.
काँग्रेस चोर आहे हे जग जाहीर
काँग्रेस चोर आहे हे जग जाहीर आहे. १००० हरामखोर मेले असतील तेव्हा कुठे एक काँग्रेसी नेता जन्माला येतो. गेंड्याची कातडी जन्मापासुनच मिळते यांना. इथ पर्यंत बरोबर पण भाजपा महाचोर आहे स्वार्थापोटी दंगल पेटवुन सत्तेची पोळी भाजणारा पक्ष आहे हे मान्य करतात का ?
---- १०० % मान्य. मी वेगळे समजत नाही. फक्त काँग्रेसमधे १२५ वर्षांच्या अनुभवाने (लोकांना बनवण्याची) परिपक्वता आलेली आहे तशी भाजपांत नाही....
(No subject)
( जामोप्यानी लिहिलेले मी सभ्य
( जामोप्यानी लिहिलेले मी सभ्य भाषेत लिहितो..... )
काँग्रेसने भ्रष्टाचार केला असेल, पण निदान त्या कंपन्या आणि तोफा तरी खर्या होत्या.. देशाचे पैसे गेले, पण माल मिळाला आणि युद्धात त्यानी कामही केले.
पण भाजपाच्या बंगारुअनी ज्याच्याकडून लाच घेतली तो माणूस, ती कंपनी, त्यांचा माल काही आस्तित्वातच नव्हते... लाच खाउन जो माल घ्यायचा त्याची साधी शहनिशाही या लोकानी केली नाही.. कुणीही आला लाच घ्या म्हणाला, यानी घेतली.. यांच्यापेक्षा काँग्रेस बरी.
बरोबर. मी हेच लिहिले होते..
बरोबर. मी हेच लिहिले होते..
जिल्लेइलाही, >> पण भाजपाच्या
जिल्लेइलाही,
>> पण भाजपाच्या बंगारुअनी ज्याच्याकडून लाच घेतली तो माणूस, ती कंपनी, त्यांचा माल
>> काही आस्तित्वातच नव्हते... लाच खाउन जो माल घ्यायचा त्याची साधी शहनिशाही या
>> लोकानी केली नाही.. कुणीही आला लाच घ्या म्हणाला, यानी घेतली.. यांच्यापेक्षा काँग्रेस बरी.
हेच नेमकं कलमाडीच्या बाबतीत म्हणता येईल. आणि 2G च्या बाबतीतही. काचेच्या घरात राहणारे लोक दुसर्यांच्या घरावर दगडफेक करताहेत हे पाहून मौज वाटली.
मी भाजपचा चाहता नाही. मात्र उडदामाजी काळेगोरे करण्याचा आपला प्रयत्न हाणून पाडण्यात मला १००% रस आहे.
आ.न.,
-गा.पै.
आपल्या मित्राला गुंतवून
आपल्या मित्राला गुंतवून क्वात्रोची या संताला मुक्त करण्याचे काम राजीव गांधी यांनी एक कर्मयोगी म्हणून केले असेल का? त्यांचे त्यांना माहीत. पण एक मात्र खरे की नेहरु-गांधी घराण्याच्या प्रदीर्घ सत्ताकाळात प्रचंड मोठे भ्रष्ट- आचार करूनही सुटून जाण्याचा जणू एक राजपथ तयार झाला आहे. तो असा:-
अवैध संप्पत्ती-संचय, खून, बलात्कार, दारू पिऊन भरधाव गाडी चालवून माणसे मारणे, सिनेमातील हिरो करतात तसलीच स्टंटबाजी समाजात वावरतांना करून लोकांना मारहाण करणे, बेकायदेशीर शिकार करणे, खोटे सर्टिफिकेट देऊन आरक्षित जागा/बढत्या/नोकऱ्या मिळविणे वगैरे कोणत्याही भ्रष्ट - आचरणाने गोत्यात आल्यास सुटण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांची रूपरेषा :
१) कोणताही आरोप झाल्यावर सर्वप्रथम हे आरोप खोटे , हेतुपुर्वक केलेले आहेत असे म्हणून साफ नाकारायचे. विरोधकांची ही चाल आहे असा धोशा लाऊन परस्पर चिखलफेकीचा कार्यक्रम कांही काळ चालवायचा. दोघेही गोत्यात येण्याची शक्यता दिसल्यास ’तेरी भी चुप, मेरी भी चुप!’ आपोआपच होते!
२) फारफार गदारोळ झाला तर चौकशी चालू आहे असे सांगितले जाऊन सहिसलामत सुटण्यासाठी तरतूद करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल अशी तजवीज करून घ्यायची. पुढे एफ़ आय आर दाखल केला जातो वा कमिशन नेमले जाते. यानंतर फाईली गहाळ होणे, महत्वाचे कागदपत्र गहाळ होणे, कागदपत्रांना आगी लागणे, साक्षीदार फोडणे, आपले आरोप अंगावर घेणारे व्यवसायिक शोधणे यातील योग्य पर्यायांची तज्ञांच्या सल्ल्याने निवड करता येते.
कालहरणाने प्रकरण आपोआप थंड होईल याबाबत आशावादी असावे. कालहरणासाठी मदतीच्या स्त्रोतांचा सातत्याने शोध आवश्यक.
३) याबरोबरच सुब्रम्हण्यम स्वामी सारख्या उपद्व्यापी माणसाने न्यायालयीन कारवाई सुरू केली असेल आणि न्यायालयानेच पराणी लावली तर मग कांही करणे भागच पडते. अटक होण्याचा वास आला तर ’अटकपूर्व जामिना’साठीचा अर्ज करणे आलेच! तो मंजूर झाला तर ठीकच! कांही काळ तरी प्रकरण थंडावते वा ’कालाय तस्मै नम:!’ अंतर्धान पावते.
पण तो मंजूर झाला नाही तर मात्र पुढील मार्ग जरा लांबलचक असू शकतो.
४) अटक व्हायची वेळ आलीच तर तपास यंत्रणेला आपण दिसणार नाही याची तरतूद आवश्यक. मग आपोआपच ’फरार’ घोषित केले जाते. प्रसारमाध्यमांना देखील आपण दिसणार नाही याची तरतूद आवश्यक.
५)यथावकाश पुढील सर्व पायऱ्या पार पाडण्याची व्यवस्था झाल्यावर ’अटकपूर्व जामिना’साठीचा अर्ज (पूर्वी झाला नसेल तर) कोर्टात सादर करायचा. तो मंजूर झाला तर ठीकच! नाहीतर पोलिसांकडे ’आत्मसमर्पण’ करणार असल्याचे
माध्यमांकडून जन्तेला कळावे याची आवश्यक असेल तर तर्तूद करावी लागते.
६ )हे ’आत्मसमर्पण’ प्रसारमाध्यमांसाठी अगदी पर्वणीच! ’कोणत्याही क्षणी ’आत्मसमर्पण’ होईल असे सांगत कित्येक तास
ती वार्ता त्यांना पुरवून खाता येते. एखाद्या महापराक्रमी माणसाला पहायला जावे तसे लोक जमलेले दिसतात. त्यांच्या गर्दीतून
छायाचित्रकार अगदी पोलिसांच्या गाडीपर्यंत त्यांचे कॅमेरे सांभाळत झुंडीने पोचलेले दिसतात. एरवी लाठ्याकाठ्यांचा प्रसाद देणारे पोलिस येथे मात्र अगदी मेटाकुटीने भ्रष्टाचार्याला गाडीतून काढून ढकलाढकलीतून मार्ग काढत कसेबसे कोर्टात नेतात. या रेटारेटीची मात्र तयारी ठेवावी लागते. नट वा नेता असलात तर त्याही गडबडीत आपल्या चमच्यांना चर्चिलच्या आविर्भावात दोन बोटांचा ’व्ही’ दाखवण्याचा सराव करून ठेवावा. अधिकारी असाल तर कोणी काळे फासू नये म्हणून तोंड लपवण्याच्या विविध मार्गांचा विचार व सराव आवश्यक!
७) कोर्टातून कोणती का कोठडी मिळेना, छातीत कसेतरी व्हायला लागण्याचे नाटक ही अगदी सर्वात महत्वाची प्राथमिक आवश्यकता! याला पर्याय नाही. अशी तक्रार करताच पुढील सर्व ठरल्याप्रमाणे होण्याची व्यवस्था केली असली तरी माध्यमांमधून जन्तेला आपण दिसणार असतो याचे भान हवे. त्यासाठी कसेतरी होणे, कळा येणे खरे वाटावे इतपत नाट्यकला अवगत करून घ्यावी. आपल्या छातीत कसेतरी व्हायला लागल्यावर मग न्यायाधीश तरी बिचारे काय करणार?
हॉस्पिटलात पाठवावेच लागते. त्यानंतरची तरतूद आधीच करून ठेवणे आवश्यक. डॉक्टर तरी बिचारे काय करणार? आय सी यु मध्ये दाखल करून मग पुढील तपासण्या आल्याच!
८) कोर्टाने जास्त खोलात न जाता सरकारी वैदयकीय अहवाल मान्य केला तर मग पुढील मार्ग स्पष्ट असतो.
९) यथावकाश वैद्यकीय कारणास्तव कारागारात न जाताच चौकशी वगैरे पूर्ण होऊन वैद्यकीय कारणाने जामीन मिळवणे.
१०)हॉस्पिटलातून घरी जाण्याचा समारंभ तर अधिक देखणा हवा! घरात जाईपर्यंत तरी आजारी दिसावेच लागते. पण एकंदर निर्माण केलेले वातावरण निर्दोष मुक्तता झाल्यागत असले पाहिजे. तोवर आणखी कोणी महापुरुष प्रसारमाध्यमांना सापडतोच आणि ते आपले निहित कर्तव्य बजावण्यास मोकळे होतात. पुन्हा एकदा (एखादया सिरीयल प्रमाणे) तसेच प्रसंग, तपशीलात थोडा बदल आणि पात्रे बदलून ते सर्व आपल्याला पहायला मिळत राहते. आपोआपच आपले नाव पुसट होत जाते.
११)आपल्यासारख्यांची अगदी रेलचेल असल्याने ’रोज मरे त्याला कोण रडे’ म्हणतात तशी जन्तेची स्थिती होऊन जाते.
घोटाळ्यांच्या रकमाही मुद्रास्फितीची दखल घेऊन ’वाढता वाढता वाढे’ प्रमाणे वाढत जाऊन आधीच्या घोटाळ्यांच्या रकमांना हास्यास्पद ठरवतात आणि पूर्वजांबद्दल सहानुभूति निर्माण करतात.
१२) जामिनावर सुटल्यावर पुन्हा आपापल्या क्षेत्रात ’स्काय इज द लिमिट!’ नवे उच्चांक प्रस्थापित करण्यास मोकळीक! मागील चुका टाळून वरवरच्या पायऱ्या गाठायच्या. पुन्हा जन्तेचे लाडके देखील होता येते. निवडणूक लढवून जींकल्यास ’ न्यायालयात’ कागदावर खटला जिवंत असला तरीही बिनदिक्कतपणे ’निर्दोष’ असल्याचे प्रमाणपत्र जनतेनेच दिले असल्याचे ठणकावून सांगता येते. यावर न्यायालयाने कधी आक्षेप घेतल्याचे अजून ऐकलेले नाही.
(१३)प्रकरणानंतर कित्येक वर्षे लोटतात. प्रकरण विस्मृतीत गेल्यावर जुन्या प्रकरणाचा साधारणत: खालील प्रमाणे निकाल लागण्याची शक्यता ध्यानात ठेवावी.
(अ) पुराव्या अभावी कोणालाच शिक्षा होत नाही.
(आ) कोणीतरी बळीचा बकरा बनवलेला अडकतो; पण बाहेर राहिलेल्यांनी नंतर हरप्रयत्नाने त्याला सोडविण्यासाठी थेट सुप्रीम कोर्टापर्यंत जायचे.
(इ) कोणाला शिक्षा झालीच तर कोर्टाच्या वरवरच्या पायऱ्या उपलब्ध असतातच! कोठल्या तरी वरच्या पायरीवर ’न्याय’ मिळण्यास वाव असतोच!
(ई)यामध्ये सरतेशेवटी जीत आपलीच असते कारण ’सत्यमेव जयते!’
(कि जयते ते सत्यमेव?)
मग हरते कोण? हरते ती जन्ता! कारण हा सगळा मलिदा त्यांनी कररूपाने दिलेल्या पैशातून गेलेला असतो वा त्यांच्यातीलच कोणीतरी पीडित असतात.
मग जन्ता यावर कांही करते?
छे छे! ती काळजीच नको. तिला कुठे वेळ असतो? रोजीरोटीसाठीची धावपळ, कुटुंबाची जबाबदारी, क्रिकेटचे वर्षभर चालणारे सामने, बॉलिवुडच्या चविष्ट कथा, सतत एकामागून एक येणाऱ्या, विविध आश्वासनांचे आशेचे गाजर दाखविणाऱ्या निवडणुका आणि त्यात होणारी खैरात, यातून त्यांना वेळच कुठे असतो विचार आणि कृती करायला? शिवाय जन्तेची स्मरणशक्ती मदतीला असतेच!
(१४) आपल्या मलिदयातील बराच मलिदा मात्र अनेक स्तरांवर गळती होऊन आपल्यापर्यंत व पुढील पिढीलाही पोचतो. त्यामुळे आपले स्मृतिदिन
साजरे होतिल याचीही तरतूद होऊन जाते. पुढील पिढीला त्यामुळे प्रेरणा, स्फूर्ती इ. मिळत राहाते.
संदर्भ:
खालील ’भ्रष्ट - आचरण’ प्रकरणांच्या अभ्यासातून वरील ’ज्ञानकण’ हाती लागले.
या अभ्यासासाठी प्रसारमाध्यमांम्धून आलेल्या माहितीच्या खजिन्याचा उपयोग केला आहे. त्यांचे आभार.
या बातम्यांची सत्यता पडताळून पाहाण्यास वा स्वतः बातम्या मिळविण्यास आमच्याजवळ साधने नसल्याने भ्रष्टाचाऱ्याच्या सर्व कार्यपद्धती आम्हाला कळल्या आहेत असा दावा नाही.
प्रकरण आठवावे म्हणूनच केवळ नावांचा उल्लेख! अन्यथा ही सर्व नावे आम्हाला प्रात:स्मरणिय़च आहेत.
प्रकरणे :- भास्कर वाघ, तेलगी, मॅच फ़िक्सर अझरुद्दीन, सुखराम, मधू कोडा, लल्लू-चारा , ताज कॉरिडॉर फ़ेम मायावती, बोफोर्स, हर्शद मेहता, अंतुले, सलमानखान-अपघात, सलमानखान-हरीण शिकार , कॅश फॉर व्होट, एशियाड, लवासा, आदर्श, टू जी आदि प्रकरणांमधील एक्के ! दुर्या तिर्यांची तर गणतीच करता येणार नाही.
झाले या प्रात:स्मरणियांचे कांही वाकडे? म्हणूनच हा तर आता रुळलेला राजमार्गच !
निष्कर्ष: ' येन केन प्रकारेण' अमाप संपत्ती गोळा करा नि खुशाल भ्रष्टाचारी व्हा. वरील मूलतत्वे अभ्यासा, आचरणात आणा, आणी बिन्घोर राहा. पकडले गेलात तर आता अगदी काळाच्या कसोटीवर उतरलेला आणी आता रुळलेला राजमार्ग उपलब्ध आहे.
भ्रष्टाचारी सुखी भवेत् !
दामोदर. त्यात एकाचा उल्लेख
दामोदर.
त्यात एकाचा उल्लेख करायचा राहिला.!.
घूस कांड में दोषी करार दिए गए
घूस कांड में दोषी करार दिए गए बीजेपी के पूर्व अध्यक्ष बंगारू लक्ष्मण को अदालत ने 4 साल सश्रम कारावास की सजा सुनाई है. बंगारू पर 1 लाख रुपये जुर्माना भी लगाया गया है. सजा के बाद उन्हें सीधे जेल ले जाया जा रहा है.
बंगारू लक्ष्मण के वकील अजय दिगपाल ने कहा कि इस फैसले के खिलाफ हाईकोर्ट में अपील की जाएगी.
इससे पहले मामले में शनिवार को बहस के दौरान सीबीआई ने बंगारू लक्ष्मण के लिए कड़ी सजा की मांगी की. सीबीआई ने सुप्रीम कोर्ट के कई फैसलों का हवाला देते हुए ऐसी मांग की.
दूसरी ओर बंगारू लक्ष्मण के वकील ने बीमारी और खराब सेहत का हवाला देते हुए उनके लिए कम सजा की मांग की.
शुक्रवार को ही सीबीआई की विशेष अदालत रिश्वत कांड में बंगारू लक्ष्मण को दोषी करार दे चुकी है. उसके बाद उन्हें हिरासत में लेकर दिल्ली के तिहाड़ जेल भेज दिया गया. लक्ष्मण को भ्रष्टाचार निरोधक कानून की धारा-9 के तहत दोषी करार दिया गया.
दरअसल एक न्यूज पोर्टल ने 13 मार्च 2001 को अपने स्टिंग ऑपरेशन का वीडियो जारी किया, जिसमें ये दावा किया गया था कि बंगारू लक्ष्मण ने हथियारों के सौदागर से 1 लाख रुपए रिश्वत ली थी. खुफिया कैमरे में बंगारू लक्ष्मण रक्षा सौदे के फर्जी एजेंट से एक लाख रुपये लेते दिखाई दिए.
और भी... http://aajtak.intoday.in/story.php/content/view/696546/13/0/Fake-arms-de...
>>> ---------------- -------------------------------- ----------------------- ---------------- -----------
भाजपा आता तरी सुधरा जरा
आज लोकसत्ता मधे बी जी देशमुख
आज लोकसत्ता मधे बी जी देशमुख यांच्या एका पुस्तकातील एका उतार्याचा एक भाग दिला आहे. त्यात राजीव गांधींवर थेट आरोप आहेत. हे देशमुख त्या काळात गृहसचिव होते.
पुस्तक वाचायला हवे ते.
आज इथल्या भाजपाप्रेमींनी
आज इथल्या भाजपाप्रेमींनी शोकसभा ठेवली आहे वाटते..बंगारु यांच्यानिमित्ताने. कुठे तोंड लपवावे हेच कळत नाही त्यांना. जबर मानसिक धक्का बसला असेल. तुमच्या या दु:खात आम्ही सहभागी नाही आहोत.
रिटायर झाल्यावर करमणूक म्हणून
रिटायर झाल्यावर करमणूक म्हणून असले लोक असली पुस्तकं लिहतात... त्याला कसलेही कायदेशीर मूल्य नसते.
आणि मी चहा करणार होते. पण साहेब म्हणाले कॉफी कर... साहेब फक्त ठराविक लोकानाच कॉफी देतात हे माहीत होते.. कोण हे म्हणून पाहिले तर कुणीतरी गॉगल घातलेले परदेशी लोक. नंतर साहेब त्याना घॅऊन कुठल्याशा हॉटेलात गेले. जाताना ते सुटकेस घेऊन गेले, ती रिकामी होती, कारण साहेब अगदी हलक्या हाताने ती घेऊन जात होते.. आणि येताना मात्र......
------------- भंगारु लक्ष्मणची स्वयपाकीणही उद्या असे पुस्तक लिहू शकेल...
काय उपयोग?
दामोदरसुत, यात आणखी राहिले
दामोदरसुत,
यात आणखी राहिले म्हणजे तपास पूर्ण न होणे, पुरावे सादर न होणे, आरोपपत्र नीट दाखल न होणे, साक्षीदार फूटणे...
दामोदरसुत, तुमच्या पक्षात
दामोदरसुत, तुमच्या पक्षात किती सज्जन लोक आहेत नै... ईतक्या सज्जन लोकांना राजकारणाच्या आणि सत्ताकारणाच्या साठमारीत कशाला उतरवायचे....? असा ईष्ट विचार करुन जनतेने साठवर्षे तुमच्या सज्जनांना फक्त पानसुपारी शाल श्रिफळ देऊन नमस्कार केला असावा.
एखादा भाजपचा भ्रष्ट मंत्री
एखादा भाजपचा भ्रष्ट मंत्री सापडला तर हर्षवायू झालेल्यांना एक प्रश्न करावासा वाटतो. भ्रष्टांनी राज्य करू नये तर स्वच्छ लोकांनी करावे. काँग्रेसकडे कोण आहे का तसा? भाजपकडे निदान नरेंद्र मोदीतरी आहेत.
दुसर्याच्या डोळ्यातील कुसळ दिसतेय पण स्वत:च्या डोळ्यातील मुसळ दिसत नाहीये.
आ.न.,
-गा.पै.
तळटीप : मी भाजपचा चाहता नाही. मात्र भाजपच्या भ्रष्ट नेत्यांच्या मागे लपायला काँग्रेसच्या हितचिंतकांना जागा मिळू न देण्यात मला १००% रस आहे.
मी भाजपचा चाहता नाही. मात्र
मी भाजपचा चाहता नाही. मात्र भाजपच्या भ्रष्ट नेत्यांच्या मागे लपायला काँग्रेसच्या हितचिंतकांना जागा मिळू न देण्यात मला १००% रस आहे.>> तुमचा रस काढला भंगारु लक्ष्मण ने
भाजपकडे निदान नरेंद्र मोदीतरी आहेत.>> कोणत्या तोंडाने सांगत आहात..परदेशीबसुन संघाचा ईपेपर वाचुन बरगळत जाउ नका. जरा गुजरात मधे जाउन बघा.
काँग्रेसकडे कोण आहे का तसा? >> उगाच ८ वर्षे सत्ते वर आहे का ? भारतीय जनतेला तुमच्यापेक्षा जास्त अक्कल आहे.
दुसर्याच्या डोळ्यातील कुसळ दिसतेय पण स्वत:च्या डोळ्यातील मुसळ दिसत नाहीये>> ते तुमच्या भाजप वाल्यांना सांगा..बोफोर्स वरुन बेंबीच्या देठापासुन बोंबलत असताना स्वतःच्या पक्षातला "भंगारी" दिसला नाही.
तुम्हाला जागा नाही आता तोंड लपवायला. लक्ष्मन ने भाजपाचेच पायताण भाजपाच्याच तोंडावर मारले आहे.
|भाजपकडे निदान नरेंद्र
|भाजपकडे निदान नरेंद्र मोदीतरी आहेत.
पर्रीकर ही आहेत.
Pages