Submitted by प्राजक्ता३० on 13 April, 2012 - 18:04
माझी मुलगी ऑगस्ट २०१२ मध्ये KG त प्रवेश घेणार आहे. मला विचारायचे होते की पब्लिक स्कूल आणि चार्टर स्कूल यापैकी कुठले चांगले? दोन्हीचे फायदे-तोटे याबद्दल मायबोलीकरांना काही माहिती असल्यास हवी होती? मुलांचा सर्वांगिण विकास कुठल्या प्रकारच्या शाळेत होतो?
मला दोन्ही शाळापद्धतींबद्दल जास्त माहिती नाही, त्यामुळे तुमचे प्रत्यक्ष अनुभव सांगितलेत तरी चालेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्राजक्ता, सगळ्यात प्रथम
प्राजक्ता, सगळ्यात प्रथम तुम्ही ज्या स्कूल डिस्ट्रीक्टमध्ये आहात तिचं नेटवरून रेटिंग चेक करतात. रेटिंग या विषयावर अन्य माबोकर कदाचीत जास्त प्रकाश टाकु शकतील्..आम्ही पण आता हे सगळं शिकतोय्..त्यामुळे माझ्या इतर मित्रमंडळींचे अनुभव तुम्हाला सांगु शकते.
एकीने तिच्य मुलाला चार्टर स्कूलला टाकलंय पण तिथे लॉटरी सिस्टिम आहे आणि फी पण रिसनेबल आहे...त्यांची स्कूल डिस्ट्रिक्ट फार छान नाहीये पण तिला तिचं कामाच्या दृष्टीने घर इ. बदलायचं नव्हतं..त्याचा त्या लॉटरीत नंबर आला तिचं काम झालं..
पैशाच्या दृष्टीने जर तुम्ही चार्टरमध्ये जास्त पैसे टाकणार असाल तर तेच पैसे त्यापेक्षा पुढे कॉलेजसाठी ठेवलेले चांगले हे पालक म्हणून मला वाटतं..
जी स्कूल डिस्ट्रिक्ट्स चांगली असतात तिथे भारतीय पालक मुलांना पब्लिक स्कूलमध्येच घालताना पाहिली आहेत....
प्राजक्ता, चार्टर शाळा या
प्राजक्ता, चार्टर शाळा या देखिल पब्लिक शाळाच असतात. (काही प्रायव्हेट असतील तर माहिती नाही.)चार्टर स्कूल्सविषयी थोडी माहिती इथे बघा.
ज्या टाऊन्समध्ये पब्लिक
ज्या टाऊन्समध्ये पब्लिक स्कूलचं रेटींग हाय असतं तिथे चार्टरला टाकायची गरज नसते. आमच्या टाऊनला हाय रेटींग आहे. मध्यंतरी दोन चायनीज चार्टर स्कूल्स येऊ नयेत म्हणून बर्याच आईवडिलांनी विरोध केला होता.
वेका आणि मृण्मयीशी
वेका आणि मृण्मयीशी सहमत!
आमच्या स्टेट मधील चार्टर स्कूल बद्दल माझ्या मुलाने स्टोरी केली होती.
http://blogs.indystar.com/ypress/2012/01/07/more-choices-but-no-easy-ans...
त्यावरुन साधारण कल्पना यावी. तुम्ही तुमच्या स्कूल डिस्ट्रीक मधील पब्लिक आणि चार्टर अशा दोन्ही शाळांची टूर घ्या. शाळा सुरु असताना प्रत्यक्ष जाऊन पाहिल्यास निर्णय घेणे सोपे जाईल. तसेच शाळांच्या रेटिंगचा क्रायटेरीया काय आहे तेही माहित करून घ्या. दोन वर्षापूर्वी आमच्या इथली एक शाळा प्रोबेशनवर होती. खरे तर ती शाळा खूप चांगली आहे पण मुलांच्या प्रगतीचा आलेख एका पातळीला येऊन स्थीर झाला होता. तेव्हा आधीच्या वर्षासारखाच रिझल्ट म्हणून प्रोबशनवर ठेवले होते.
चार्टर स्कूलची स्थापना काही
चार्टर स्कूलची स्थापना काही उद्देशाने झाली असते. तो त्यांच्या चार्टर मध्ये असतो. उदा: काही शाळा economically disadvantaged मुलांसाठी असतात, तर काही minorities साठी असतात. तर काहींचा चार्टर academic असतो. सर्वात प्रथम ते बघणे महत्वाचे आहे. माझा मुलगा पाचवी ते आठवी आणि मग नववी ते बारावी असा दोन चार्टर स्कूलला गेला. आमचा अनुभव खूप चांगला आहे.
थँक यू वेका, मृण्मयी, सायो,
थँक यू वेका, मृण्मयी, सायो, स्वाती आणि रत्ना.
चांगली माहिती दिली. आमच्या स्कूल डिस्ट्रीक्टमधली शाळा छान आहे, पण माझी मुलगी सध्यातरी तिच्या वयाच्या मानाने अभ्यासात थोडीशी पुढे आहे, म्हणून मला वाटले की चार्टर स्कूल तिच्यासाठी जास्त चांगले होईल का म्हणून. मला तिला शाळेव्यतिरिक्त कुमॉनवगैरे क्लासेस लावून तिच्यावर खूप भार टाकायचा नाही.
>>>आमच्या स्कूल
>>>आमच्या स्कूल डिस्ट्रीक्टमधली शाळा छान आहे, पण माझी मुलगी सध्यातरी तिच्या वयाच्या मानाने अभ्यासात थोडीशी पुढे आहे,
राग मानू नका, पण ही आपली अत्यंत टिपिकल मानसीकता आहे. (आमचीही होती.) पोर अभ्यासात पुढे असलं की आहे ती शाळा किंवा शिक्षक त्यासाठी काय करू शकतील हा विचार न करता आपण शाळा बदलणं, जास्त चॅलेंजिंग करिक्युलममधे घालायचा प्रयत्न करणं आणि तत्सम पर्याय शोधायला लागतो. पण अनुभवांती (आणि स्कूल काउन्सेलर्सना भेटून) एक जनरल चित्र समजायला लागलंय.
अभ्यासातल्या हुशारी इतकाच सर्वांगीण विकास आवश्यक आहे. सोशल, इमोशनल, को-करिक्युलर, एक्स्ट्राकरिक्युलर अशा अनेक बाबी विचारात घ्यायच्या असतात. आपलं मूल आई-बापांनाच व्यवस्थीत माहिती असतं हे खरं असलं तरी शाळेतली त्याची प्रगती, वागणूक, सुधरायला वाव आहे असे काही व्यक्तिमत्त्वाचे भाग या सगळ्यांवर विचार करावा. (...किंवा इतका विचार तरी कशाला? ) हे लक्षात आलंय.
पुन्हा या बाफाला 'मुलांना रॅटटरेसेत ढकलावं का' असं वळण लागू नये म्हनून थांबवते. कारण अशा चर्चा अनेकदा, अनेक बाफांवर होऊन चुकल्यात.
तुमच्या शाळाबदलाच्या निर्णयात ती ज्या शाळेत जाणार तिथल्या तज्ज्ञांचं मत विचारात घ्यावं असं वाटलं तरी सध्या त्यांना तिच्याबद्दल काही माहिती नाही. तेव्हा आधी घराजवळच्या शाळेत सुरुवात केली तरी पुढे निर्णय घेता येईल.
मृण्मयी यांना अनुमोदन. आमच्या
मृण्मयी यांना अनुमोदन.
आमच्या मुलाबद्दलही असे तज्ञांचे मत ऐकल्यावर आनंद वगैरे झाला पण पब्लीक स्कूलच्या इयत्ता जसजश्या वाढायला लागल्या तसतसे आम्ही खूप आटापिटा न केल्याचा किंवा त्याच्याकडे स्पेशल म्हणून (फार दिवस) न पाहिल्याचा फायदा समजला. चांगल्या पब्लिक शाळेत मुलांना गरजे प्रमाणे रॉकेट मॅथसारख्या (किंवा विज्ञान) वर्गांना आपोआपच पाठवतात आणि तेच पुरेसे आहे असे आम्हाला वाटते. गेल्या महिनाभरात शाळेनेच त्याला रॉकेट मॅथ मधून आणखी वर पाठवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची उडी तितकी नसल्याचे आम्हाला तरी जाणवते आहे. त्याला गणिताची पूर्ण नावड निर्माण झाली आहे. आणखी थोडे दिवस वाट पाहून वर्गशिक्षिकेला पुन्हा आधीच्या वर्गात पाठवण्याची विनंती करणार आहोत.
आपली मुलगी अभ्यासात वयाच्या मानाने पुढे असल्याबद्दल अभिनंदन.
पण ती अजूनही बरीच लहान आहे असे वाटते. आपल्याला शुभेच्छा.
मला वाटतं चार्टर स्कुल
मला वाटतं चार्टर स्कुल कशासाठी आहे ते बघा. (रत्नाची पोस्ट)
पब्लिक स्कुल किती चांगलं/वाईट आहे ते बघा.
आणि मग ठरवा...
हेच बरोबर तेच चूक .. अश्याप्रकारचे उत्तर देता येणार नाही.
आणि हो, आपण घरी बर्यापैकी तयारी करून घेत असल्याने बरीच मुलं सुरूवातीला अभ्यासात पुढे असतात
प्राजक्ता, मी, मुलीला वयाच्या
प्राजक्ता, मी, मुलीला वयाच्या मानाने जास्त येत असणं आणि चार्टर स्कूल या दोन्ही अनुभवातून गेले आहे. तेव्हा थोडा विस्तृत प्रतिसाद देते आहे. माझी मुलगी केजीत गेली तेव्हा तिला खूपच जास्त येत होते. मला याची कल्पना होती, तरी शाळा वयाच्या अटीशी सहसा शिथील नसतात, हे ही माहित होते म्हणून फारसं काही केलं नाही. पण, तिच्या टीचरच्या ही गोष्ट महिन्या भरातच लक्षात आली. तिने प्रिंसीपॉलला हे सांगितले. त्या बाईने वर्गात येऊन खात्री केली. मग तिच्या प्रीस्कुल टीचरला कन्स्ल्ट केले. ( हा नं. तिला अॅडमीशन फॉर्म वरुन मिळाला.) हे सगळं झाल्यावर मला फोन केला की त्यांच्या मते ती पहीलीत जायला योग्य आहे, ते घालायला तयार आहेत, तर माझं काय मत आहे ? मी सायकॉलॉजीस्ट पासून पीडीअॅट्रीशीयन पर्यंत सगळ्या जगाशी बोलून त्यांना हो म्हणून सांगितलं. त्यांनी तिला १ली आणि २ री च्या काँबीनेशन क्लासात घातलं.
दोन महीन्यांनी नवर्यानी जॉब बदलला आणि आम्ही दुसर्या स्टेट मधे गेलो. तिथली पब्लीक स्कुल वय लहान म्हणुन तिला पहीलीत घ्यायला जाम तयार होईना. जवळ एक चार्टर स्कूल मिळालं. नवर्याच्या ऑफीस मधले दोघं त्याच्या बोर्डावर होते. ते त्या शाळेचं पहीलंच वर्ष होतं. इथे वयाचा प्रश्न नव्हता, त्यांची मल्टीएज क्लासरुम होती, पहीलंच वर्ष असल्याने प्रचंड उत्साहाबरोबर प्रचंड गोंधळ देखील होता. जानेवारी ते जुन या काळात ३ टीचर बदलल्या. बाकं वगैरे अजून यायची होती. मुलं सतरंजांवर बसायची. पण त्यांचं करीक्यूलम खूपच अॅडव्हान्स होतं. अभ्यासाव्यतीरिक्त इतक्या गोष्टी तिथे चालत की त्यातलं १० ट्क्के देखील पब्लीक स्कूल मधे मुलांना मिळत नाही. परीणामी, तिची २ री चीच काय ३ री ची तयारी झाली.( अर्थातच २ यत्ता पुढे ढकलायची माझी बिलकूल तयारी नव्हती. आम्ही तिला पब्लीक स्कुलात रीतसर २ रीत दाखल केले. नंतर ३रीत तिचे गिफ्टेड प्रोग्रॅम मधे सिलेक्शन झाले. ) सध्या याच चार्टर स्कूलची ख्याती नाठाळ मुलांची शाळा अशी आहे. प्रत्येक चा. स्कु. वेगळे असते. स्कुल डीक्स्ट्रीट चा कुठलाही कंट्रोल नसल्यामुळे असते त्यापेक्शा वेगळे होऊ शकते. तू ज्या चा. स्कु. चा विचार करते आहेस त्याच्याविषयी बर्याच गोष्टी पडताळुन बघण्याची गरज आहे. प. स्कु. मधे पुष्कळ बेसिक गोष्टी कॉमन असतात, तसच गिफ्टेड वगैरे प्रोग्रॅम असतात त्यात मुलं बर्यापैकी चॅलेंज होतात. अजुनही बरेच अनुभव गाठीशी आहेत. तू संपर्कातून मेल करुन बोलु शकतेस.
हुश्श ! पहील्यांदाच एवढं टायपलं.