उंच माझा झोका

Submitted by सानी on 13 March, 2012 - 05:59

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया. Happy

Uncha Maza Zoka-Promo.jpgUncha Maza Zoka-News.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डेलिया, ही बालविवाहावर आधारीत मालिका नाही, शीर्षकात लिहिल्याप्रमाणे ही मालिका रमाबाई रानडे यांचा जीवनपट उलगडून दाखवणारी आहे.

>>मागिल साईट वीजीट्ला एका मध्यमवयिन कामगाराने ८ वा मुलगा झाल्याचे पेढे आणले. आधीच्या ७ मुली. ह्याच वय ४८. बायकोच २२. ही त्याची दुसरी बायको. आधीची ला पहिल्या ४ मुली झाल्या. मग ती असतानाच दुसर्‍या १५ वर्षांच्या मुलीशी लग्न केले. तिला पण पहिल्या ३ मुली झाल्या. आणि ४ था हा मुलगा. हा ग्रुहस्थ आमच्या साईट वर सुपरवायजर आहे. पगार ७ हजार. बरं हे काही दुर्गम भागात नाही तर दापोली सारख्या ठीकाणी. ह्यात तिकडे कोणाला फारसे नवल वाटले नाही. फार कॉमन गोष्ट वाटली. <<<

@मोहन कि मीरा

हे तर कैच्या कै आहे,
दापोलीसारख्या ठीकाणी आणि वरिल प्रकार, जिथे जन्मप्रमाण पत्र, किंव्हा शाळेचा दाखला लग्नांच्या मंडपात दाखविल्याशिवाय भटजी लग्नच लावत नाहीत. अशा ठीकाणीवर उल्लेख केलेला किस्सा होऊच शकत नाही. आणि झालाच असेल तर त्या व्यक्तीच नाही पण ज्या भागात तुम्ही सांगितलेला किस्सा घडलाय त्या भागाच नाव सांगू शकता का?
मी स्वत: ३० वर्षाहून अधिक काळ दापोलीत राहतोय!

दापोली??????? आश्चर्य आहे. माझं सासर दापोली.
दापोली तसं खुप सुधारलेलं आहे. शहराप्रमाणे विकास दिसतो तिथे. अशी गोष्ट घडणे पटत नाही.

प्रज्ञा१२३ ........ ह्या सिरियलमधे जो पितळी पानाचा डबा दाखवलाय ना अगदि तसाच डबा माझ्याकडे पण आहे.>>>>
माझ्या आजोबांकडे अस्साच डबा होता, पान-सुपारी-कात-अडकित्ता ठेवायला. ते बाहेर फिरायला गेले कि आम्ही तो खेळायला घ्यायचो. ते दिवस आठवले Happy ...छान आहे डबा.

लोक्स दापोली चुकुन लिहिले. ही घटना आहे देवगड तालुक्यातल्या आरे-रेंबवली गावातली. माझा नेहेमी देवगड दापोली मध्ये गोंधळ होतो. साइट वर गेले १ वर्ष जायला लागले. सध्याच कोकणातिल गावे व तालुके माहीती होत आहेत.

पण विश्वास ठेवा ही घटना सत्य आहे. वयातलं अंतर ही खुप कॉमन बाब वाटली. ८-८ मुलांना जन्म देणारे नरपुंगव अजुनही आपल्या समाजात आहेत.

प्रज्ञा, काय मस्त डबा आहे हा... पितळेची, तांब्यांची भांडीसुद्धा आता हळूहळू दिसेनाशी होत चालली आहेत... मग आता असा डबा वगैरे म्हणजे एकदम दूर्मिळ खजिनाच की! Happy

विक्रम गायकवाड उर्फ माधवराव दिवसेंदिवस फारच आवडायला लागलेत. Happy
यमू.. आपलं रमाने किती छान निरुपण केलं. गुंगून गेले एकदम... ह्या मालिकेचा प्रत्येक भाग सुखद असतो. सत्यकथा असूनही किती रंजकपणे सादर करतायत. एक भागही मिसणे नको वाटते...

कालचा एपि मिसला. Sad
यमीला गार पाण्याने न्हाऊ घातल्याच पाहिलं होतं अ‍ॅड मध्ये, का? ती गोर्‍या बाईला प्रसाद देते म्हणून?? पण मग माधवाची काय रिअ‍ॅक्शन? त्यांना पटते हे थोतांड?

काल यमीचे अणि तिच्या बाबांचे संवाद छान होते. आईच्या अनुपस्थितीत लेकीला समजावणारे

आणि गार पाण्याने न्हाऊ घातल्यावर यमी मस्त हसली

सानी, ह्या मालिकेची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. मला आवडली मालिका. मुख्य म्हणजे पात्रयोजनाही आवडली. रमाचं काम करणारी तेजश्री गोड, चुणचुणीत आहे अगदी.
तिची आम्ही सारे खवय्येमधील मुलाखत आत्ताच पाहिली. आजकालच्या ( बर्‍याच ) मुलांसारखी आगाऊ नाही वाटली. प्रत्यक्षातही तितकीच गोड वाटली. तिची निरागसता अशीच टिकून राहो, डोक्यात वारं न शिरो Happy

खरच छान मालीका आहे ही. ति मुलगी खुपच गोड आहे. बोलते तेव्हा एकत रहवस वाटत. वातावरण निर्मीती पण छान केली आहे. ति पुरण बक्षीस म्हणुन दिते ती विधवा स्री यमीची कोण असते? छान बोलते. शिवाय सासुबाइ पण मस्त आहे. एकदम सोज्वळ.

पुरण बक्षी म्हणुन दिते ती विधवा स्री यमीची कोण असते? छान बोलते. >>> ती यमीच्या नवर्‍याची काकू.
तिने पूर्वी 'मन उधाण वार्‍याचे' मध्ये नीरजाचे काम केले होते.

पण त्या काळात खरेच जास्त कपडे असायचे का? किंवा वेगवेगळ्या रंगाचे? का एक अंगावर अणि एक दांडीवर असे होते?

कुतुहल म्हणून विचारते कारण रोज तेच कपडे पहायला नको वाटातात हे खरे Happy

मालिका मस्तच आहे.

कालच्या भागात तेवढा आत्याचा परत येण्याचा प्रसंग दाखवायला नको होता असं वाटलं मला. त्यात यमी आहे त्याहून अगदी लहान दिसायला हवी होती. शिवाय आत्या पण जरा तरूण असायला हवी होती.

लोकहो तीव्र माफी, पण या सिरीज ची जाहिरात बघितल्यापासून ती मुलगी, तिचे बोलणे व एकूणच वातावरण जाम डोक्यात गेलेला मी एकटाच असेन असे वाटत नाही. समविचारी लोक कृपया सपोर्ट करा Happy

फारेंडा मागील पानांवरच्या माझ्या पोस्टी पहा. अपुनभी वैच बोला था.
-यातले दिग्दर्शन तू लिहीलेल्या मुहोब्बतेच्या दिग्दर्शनासारखे आहे. subtle वगैरे काय नाहीच.
-निर्मीतीमुल्य का काय म्हणतात ते यथातथा आहे.
-नाटकी पद्धतीने कथा पुढे सरकत असते, त्यात पाणीही घातले आहे आणि आता त्या छळवादी सासुचे -काम पार डोक्यात जाते.

जौद्या झालं आहे सगळंच.

फारेंडा, डोण्ट वरी, सपोर्ट आहे,
माझ्या अगदी तीव्र डोक्यात वगैरे जरी गेलेली नसली, तरी मी ही मालिका अजून पाहत नाहीय यात काय ते समज Proud

मीही नाही पहात ही मालिका.
हिंदीत लहान मुलांना (प्रेक्षक नव्हे, मालिकेतल्या व्यक्तिरेखा) केंद्रस्थानी ठेवून मालिकेला सुरुवात करायची, प्रेक्षकांना जाळ्यात पकडायचे आणि नेहमीच्या भूलभुलैयात आणून सोडायचे अशी एक ट्रेंड झाली होती/आहे, तेव्हापासून लहान मुले केंद्रस्थानी असलेल्या मालिका टाळलेल्या बर्‍या हे कळले.
आता ही मालिका जरी नजिकच्या इतिहासातल्या व्यक्तीबद्दल असली तरी अ‍ॅप्रोच तसाच वाटतोय. शतकापूर्वी समाजसुधारणेचा विचार करणार्‍या व्यक्तीबद्दल पडद्यावर काही चाललेय असे वाटले नाही. बालविवाह, स्त्री-शिक्षण, विधवांचे आयुष्य यांसारखे विषय पार्श्वभूमीच्याही पाठी ढकलून केलेली कौटुंबिक मालिकाच जास्त वाटली. एकतर खोटेखोटे हसरे गोडगोड वातावरण नाहीतर हृदयाला पीळ आणि डोळ्यातून पाणी काढा.

कालच्या भागात तेवढा आत्याचा परत येण्याचा प्रसंग दाखवायला नको होता असं वाटलं मला. त्यात यमी आहे त्याहून अगदी लहान दिसायला हवी होती. शिवाय आत्या पण जरा तरूण असायला हवी होती.>>> अगदी अगदी!!!! मी हाच विचार करत होते...

मला तरी अजूनही आवडतेय मालिका... आणि अगदी प्रोमो पाहूनच बघायची उत्सुकता लागली होती... पहिल्या भागापासून आवडलीच. भरत, ही मालिका लहान मुलांना केन्द्रस्थानी ठेवून जरी दाखवत असले, तरीही ही एक सत्यकथा असल्याने छोटी रमा किती दिवस या मालिकेचा भाग असेल, याबद्दल शंकाच आहे. रमाबाई रानडेंचे जीवन इतके नाट्यमय नसेलही कदाचित, पण मालिका मनोरंजक बनवण्याच्या दृष्टीने काही भाग नाट्यमयरित्या सादर करत असल्याचे मालिकेच्या सुरुवातीला येणार्‍या संदेशात दिसते.

मला वाटतं, जुन्या काळात कसे जीवन होते, कसे कपडे घालत, भाषा बोलत, संस्कृती कशी होती, याची उत्सुकता असलेला वर्ग ह्या मालिकेकडे आकर्षित होत असावा...

मात्र, ती ताईसासू प्रचंड मोठमोठ्याने किंचाळत जो आक्रोश करत असते, तो मात्र डोक्यात जातोय... आवरा म्हणावं तिला जरा...

>>>प्लीज प्लीज यातील पात्रांना कपडे बदलु द्या. आठवडा न आठवडा एकच लुगडं.<<<< Lol

>>पण मालिका मनोरंजक बनवण्याच्या दृष्टीने काही भाग नाट्यमयरित्या सादर करत असल्याचे मालिकेच्या सुरुवातीला येणार्‍या संदेशात दिसते.

तो संदेश पाहूनच ही मालिका पहायचं नाही असं ठरवलं होतं तरी ह्या बीबीवरच्या चर्चा पाहून एके दिवशी थोडा भाग पहायचं धाडस केलं. तर एक लाल आलवणातली बाई थयथयाट करत होती. सुदैवाने त्या एपिसोडचा शेवट होता पण दुसर्‍या दिवशीच्या भागात तीच बाई पुन्हा थयथयाट करताना दिसल्यावर मी कानाला खडा लावला.

लोकहो तीव्र माफी, पण या सिरीज ची जाहिरात बघितल्यापासून ती मुलगी, तिचे बोलणे व एकूणच वातावरण जाम डोक्यात गेलेला मी एकटाच असेन असे वाटत नाही. समविचारी लोक कृपया सपोर्ट करा >>>> अगदी अगदी Happy मला पण ही मालिका बघायची आहे पण आज बघीन उद्या बघीन असं करून सुरवात करणे अज्जिबात जमत नाहीये Happy राहू दे झालं आता Happy लेख वाचलेले आहेत that is enough I guess Happy

लोकहो तीव्र माफी, पण या सिरीज ची जाहिरात बघितल्यापासून ती मुलगी, तिचे बोलणे व एकूणच वातावरण जाम डोक्यात गेलेला मी एकटाच असेन असे वाटत नाही. समविचारी लोक कृपया सपोर्ट करा >>>> मी पण आहे यात. Happy मला पण नाहि आवडत ही मालिका... २-३ दा च बघितली.... मला तर
boar zhaale te baghun.

शेवटी काल शिक्षणाचा "श्री गणेशा" झाला...!! Happy
माधवरावांचा शांत- सौम्य स्वभाव, त्याचे रमेला समजावणे आवडत जाते आहे...
ताईसासूबाई सोडल्या तर इतर सर्व पात्रांचा अभिनय मस्त जमला आहे.. Happy
माईसासूबाई, शरद पोंक्षे तर दर्जेदार अभिनय Happy

Pages